Mandodari - 6 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 6

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 6

*******६********************* सुलोचना मंदोदरीची स्नुषा. इंद्रजीतची भार्या होती. तिला सतत दुःख जाणवायचं इंद्रजीतशी विवाह केल्याबद्दल. मंदोदरीही सुलोचनेसारखाच विचार करीत होती. तशी ती एकदा सुलोचनेला भेटली. तिच्या कक्षात गेली होती ती. त्यातच सुलोचनेनं तिला बिरादरीबद्दल प्रश्न केला. त्थावर तिचं सांत्वन करण्यासाठी ती म्हणाली, "सुलोचना, स्वर्गलोक राक्षस समजतात आपल्या बिरादरीला. परंतु आपल्या बिरादरीतील लोकांचं काय चुकलं. ही देव मंडळी पुरातन काळापासून आमचा रागच करतात. राग करतात की आम्हीच देवांना त्रास दिला. परंतु देव आणि राक्षस ही एकाच बापाची मुलं. परंतु ज्यावेळेस समुद्रमंथन झालं. तेव्हा समुद्रात मिळालेल्या अमृतकलशातील अमृताचं वाटप करण्यात आलं होतं. ज्यात दोन रांगा बनविण्यात आल्या. ज्यात अमृतवाटप हे एकाच रांगेत सुरु होतं. ज्यात अमृत आपल्याला मिळेल किंवा नाही असा विचार करुन आमचाच पुर्वज स्वरभानू देवांच्या रांगेत जावून बसला. आपल्यालाही अमृत मिळावं म्हणून. परंतु देवांनं आमचाच पुर्वज असलेल्या स्वरभानुची हत्या केली. ज्यातून पळून जातांना जे रक्ताचे थेंब पडले. ज्यातून कांदा आणि लसणाची उत्पत्ती झाली. आज आपण पाहतो की आज आजाराचं प्रणाम वाढलेलं आहे. कुणाला कोणताही आजार होतो आणि केव्हाही होतो. हे आजार भयानक स्वरुपाचे असतात व त्याचं योग्य निदान झालं नाही तर मृत्यू संभवतो. आजार हे अगदी लहान लहान मुलांना शिवतात. ज्यांचं निदान करणं कठीण जातं. त्यातच जास्त उष्णता वाढली की उष्माघात होतो व जास्त थंडपणा वाढला की लकवा मारतो. ज्यात उष्माघातानं बेशुद्ध पडल्यावर कांदा नाकाद्वारे सुंघविल्यास व्यक्ती शुद्धीवर येतो. त्याचं कारण कांद्यात उष्णता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. जो कांदा उष्माघातानं बेशुद्ध झाल्यास शरीरातील उष्णता शोषून घेवून त्या व्यक्तीला शुद्धीवर आणतो. तसंच लकवा मारलेल्या व्यक्तीची मालिश लसनाच्या तेलानं केल्यावर तो व्यक्ती सुधारतो. परंतु हे आजार आज जास्त प्रमाणात दिसतात. त्याचं कारण आहे आपले कांदा किंवा लसून हे घटक अति प्रमाणात खाणे. त्यातील एक पदार्थ जरी जास्त झाला तरी समतोल बिघडतो. म्हणूनच आपल्या पुर्वजांनी त्या वस्तू खाण्यावर बंधन आणलं. ज्याला अंधश्रद्धेची जोड दिली. त्याचा काळ ठरवला नवरात्र. त्या वस्तू नवरात्रच नाही तर केव्हाही काही काळ खाणं टाळावं म्हणजे झालं. ज्यातून आपलेच आरोग्य चांगले राहतं." मंदोदरी विचार करु लागली. पुढे ती तिला म्हणाली, "समुद्रमंथन नेमकं काय व ते का केलं गेलं? समुद्रमंथन का केलं गेलं, त्याचं कारण आहे दुर्वासा ऋषींनी देवतांना दिलेला शाप. दुर्वासा ॠषी शिवजीच्या दर्शनाला जात असतांना वाटेत भेटलेल्या स्वर्गाधिपती इंद्रानं त्यांना वंदन केले. तसं पाहिल्यास ह्या काळात ऋषींचं अलौकिक स्थान व त्यांची शापवाणी खरी ठरते. तसं स्वर्गाधिपती इंद्रानं वंदन करताच दुर्वासा ऋषींनी त्याला पारिजातकाचं फुल बक्षीस दिलं. त्यावर स्वर्गातच पारिजात उपलब्ध असल्याने मला हे फुल कशाला? अशी भावना मनात आणून इंद्रानं ते फुल आपल्या हत्तीच्या पायात टाकलं. त्यानंतर हत्तीनं ते पायानं तुडवलं. जो ऋषी दुर्वासाचा अपमान होता. शेवटी उन्मत्त झालेल्या इंद्राला दुर्वासा ऋषींनी शाप दिला. म्हटलं की तुझं संपुर्ण राज्य जाईल. ऋषी दुर्वासांनी दिलेला शाप. ज्यातून इंद्राचं राज्य गेलं. लक्ष्मी, पारिजात, ऐरावत अशा सर्वच वस्तू गेल्या. त्या समुद्रात गेल्या. त्यातच सर्वात प्रथम ज्या हत्तीनं ते फुल पायाखाली तुडवलं. त्या हत्तीत तेजस्वी बल आलं व ते निघून गेलं. तेही समुद्रातच. त्यातच इंद्राची शक्ती हीन होताच आमच्या असूर जातीनं स्वर्ग जिंकून घेतला. ज्यात प्रश्न पडला की स्वर्ग असा दानवाच्या हातात जास्त दिवस राहाणं बरं नाही. त्यातच सर्व देवगण भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णुला साकडे घातले व त्याचं कारण सांगून त्यावर उपाय विचारला. तद्नंतर विष्णू भगवान म्हणाले, 'चूक तर झालीच. घोडचूक झाली. आता यावर उपाय एकच. समुद्रमंथन. ते करुन त्यात असलेलं अमृत पिवून तुम्ही अमर व्हा व आपलं गेलेलं ऐश्वर्य व वैभव परत मिळवा. मला माहीत आहे की समुद्रात अमृत आहे.' समुद्रमंथन करुन गेलेलं वैभव परत मिळवायचं ठरलं. परंतु समुद्रमंथन काही लहानशी गोष्ट नव्हती की ती फक्त देवगणच करु शकतील. ती करायला दानवांचाही सहभाग आवश्यक होता. मग ठरलं, दानवांचाही सहभाग घ्यायचा. परंतु घेणार कसा? त्यातच श्रीहरी विष्णूंनी उपाय सांगीतला. तुम्ही दानवांना अमृत पिवून अमर होण्याची आस दाखवा. मग ते तयार होतील. त्यानंतर तीच गोष्ट देवगणांनी दुतांकरवी दानवांना सांगीतली व दानव गण अमृत लालसेनं समुद्रमंथन करायला तयार झाले. ते समुद्रमंथन. ज्यात तुझ्या वडिलाच्या वासूकीच्या देहाची दोरी बनविण्यात आली. मंदरांचल पर्वताची मथनी बनविण्यात आली व समुद्रमंथन सुरु झालं. ज्यातून पाणी ढवळलं जावून सर्वप्रथम विष निघालं. ज्यात प्रश्न पडला की अशा विषानं आपण सर्व मरणार. तेव्हा त्यावर उपाय म्हणून शिवभगवानाने ते विष गिळले. दुसरं रत्न निघालं कामधेनू. जी ऋषींना दान देण्यात आली. त्यानंतर निघाला उश्चश्रवा नावाचा घोडा. तो बली राजानं ठेवून घेतला. चवथे रत्न निघाले ऐरावत. जे इंद्रानं ठेवले. पाचवे रत्न कौस्तुभ मणी. जे भगवान विष्णूनं ठेवले. सहावे रत्न निघाले. कल्पवृक्ष व रम्भा नामक अप्सरा. जी देवलोकांची शान बनली. त्यानंतर निघाली महालक्ष्मी. जी विष्णू भगवानाचीच पत्नी बनण्यास तयार झाली. त्यानंतर वारुणी नावाची कन्या निघाली. जी असुरांना मिळाली. त्यानंतर चंद्रमा, पारिजात व शंख निघाले. ज्यातील पारिजात व चंद्रमा यांनी स्वर्गलोक निवडलं तर शंख विष्णू भगवानानं ठेवून घेतलं. सुरा निघाली. ती दानवांना मिळाली. शेवटी निघाले धन्वंत्तरी वैद्य. ज्यांच्या हातात अमृतकलश होता. जे असूरांनी हिरावलं व इथेच भांडण सुरु सुरु झालं. त्यातच दुर्वासा ऋषीच्या शापानं शक्तीहिन झालेल्या देवात एवढी ताकद नव्हती की जे तो अमृतकलश दानवांकडून हिसकावून घेतील. ते चूप बसले व दानवांचे लढणे पाहात बसले. तोच कुर्म अवतार घेवून आपल्या पाठीवर मथनी ठेवणारे विष्णू भगवान विचार करु लागले की जर हे अमृत राक्षसांनी प्राशन केलं तर अनर्थ होईल. वाईट विचार वाढतील. चांगले विचार नष्ट होतील. कारण चांगल्या गोष्टी या चांगल्याच विचारांच्या लोकांच्या हाती जायला हव्यात. कारण त्या काळात राक्षसांना वाईट विचारांचे व देवगणांना चांगल्या विचारांचे संबोधण्यात येत होते. शेवटी त्यांनी मोहिणी रुप धारण केलं. ज्या मोहिणीनं आपल्या तेजानं दानव व देवांना भुरळ पाडली. राहिला अमृतकलश जागच्याजाग्यावरच." मंदोदरी सांगत होती आपल्या प्राय स्नुषेला. तिलाही माहीत असावी दानवांची माहीती याचा विचार करुन. ती पुढे म्हणाली, "मोहिणी रुप धारण करताच त्या मोहिणीनं अमृतकलश आपल्या हातात घेवून देव व देवतांना रांगेत बसवलं. दानवही मोहिनीच्या इशाऱ्यावर चूप बसले. त्यांनी अमृतकलशाकडे लक्षच दिलं नाही. त्यातच त्यांचं लक्ष मोहिनीच्या कृत्याकडेही गेलं नाही. मोहिनी जेव्हा अमृताचं वाटप करु लागली. ज्यात तिनं अमृतकलश वाटपाची सुरुवात देवांच्या रांगेतून केली होती व ती एकेक करीत देवांनाच अमृत देत होती. ज्यातून एकेक देव अमर होत होते व सर्व दानव ते दृश्य पाहात चालले होते." मंदोदरी विचलीत झाली. तिला दुःख वाटलं. तसा ती विचार करु लागली. माझ्या स्नुषेला अमृत कलशाची पुर्णच माहीती हवी. तशी ती परत पुढे म्हणाली, "ती अमृताची वाटणी. ते देवांना मिळणारं अमृत. त्यावर नजर ठेवणारे देवगण. ज्यात ते अमृत दानवांना अजिबात मिळू नये असं केलं गेलेलं नियोजन. दानवांना ही गोष्ट लक्षातच आली नाही. ते मोहिनीरुपावर भाळून भुलून गेले होते. त्यांचं अवधान हे अमृतकलशावरुन विचलीत झालं होतं. शिवाय अमृत हे चांगल्या विचारांच्या माणसांनाच मिळावं. वाईट विचारांच्या माणसांना नको. ही चालच होती व ती चाल स्वरभानू नावाच्या राक्षसाला समजली. त्यानं देवाचं रुप धारण केलं व तो देवांच्या रांगेत जावून बसला. ज्याला अमृत मिळालं व ते अमृत त्यानं प्राशन केलं. परंतु ते अमृत प्राशन करीत असतांना ते सुर्यानं ओळखलं. त्यांनी सुचना दिली की हे अमृत स्वरभानू नावाच्या राक्षसानं प्राशन केलेलं आहे. ते ऐकताच चांगूलपणाचा विचार करणाऱ्या विष्णूनं त्या राक्षसाची मान कापली. ज्यातून धड वेगळं व मुंडकं वेगळं झालं. शेवटी या मुंडक्याची छिन्नभिन्न अवस्था होवू नये म्हणून धड सोडून त्या स्वरभानूचं अमर झालेलं मुंडकं पळून जायला लागलं. ज्यातून त्या मुंडक्यातून रक्त वाहात होतं. ज्या रक्ताचे थेंब खाली सांडत होते. ते पृथ्वीवरही सांडत होते. ज्या एका थेंबातून लसून व दुसऱ्या थेंबातून कांदा या अन्नघटकाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. कांदा व लसून हे रक्तमिश्रीत असुरांच्या रक्तातून उगविलेली झाडं. ज्यात अमृताचा एक अंश होता. जे दोन्ही पदार्थ खाल्ले की आरोग्य चांगलं राहातं. असं आपल्या पिढीतील लोकांचं म्हणणं. म्हटलं जातं की लसून हे प्रतिकारशक्ती वाढवतं व कांदा हे अन्नाचं पचन करतं. अन्नाचे पचन करणे व पोट साफ होणे ही गोष्ट चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. त्यातच प्रतिकारशक्ती वाढणं म्हणजेच कोणताच आजार शरीराला न शिवणं आहे. त्यामुळंच ते पदार्थ खाणे गरजेचे आहे व ते पदार्थ खायलाच हवेत. परंतु ते पदार्थ नवरात्रीच्या काळात खाणे टाळले जाते. त्याचं कारण सांगीतलं जातं की ज्यावेळेस महिषासूराचं युद्ध नवदुर्गेसोबत सुरु होतं. त्या काळात लोकांनी उपवास ठेवले. सात्वीक आहार ग्रहण केला. चांगले विचार ठेवले. ज्यातून नवदुर्गेला प्रेरणा मिळाली व तिला बळ आलं. ज्यातून महिषासूराचा वध झाला." तो मंदोदरीचा विचार. जो तिनं सुलोचनेला सांगीतला होता व तो तिला पटलाही होता. आज काही मंडळी नवरात्र पाळतात. ते देवीला बळ यावं म्हणूनच. आख्यायिका आहे की जो या काळात सात्वीक राहतो. ज्यातून चांगली शक्ती निर्माण होते व ती निर्माण झालेली चांगली शक्ती नवदुर्गांना महिषासूर नावाच्या दैत्याशी लढायला प्रेरणा देते. त्यातच बळही देते. बदल्यात जेव्हा युद्ध समाप्त होते अर्थात दैत्य महिषासूर मरतो. त्यानंतर देवी नवदुर्गा ज्यांनी ज्यांनी त्या काळात देवी नवदुर्गेला बळ यावं म्हणून जे जे काही केलं. त्यांना आशीर्वाद देते. शिवाय असंही मानलं जातं की ज्यांनी ज्यांनी या काळात कांदा आणि लसणाचं सेवन केलं. ते त्यांनी पाप केलं. कारण त्याचं सेवन केल्यानं महिषासूर नावाच्या दैत्यालाच जोर येत होता. त्यामुळंच ते पापच झालं. या गोष्टीमुळे नवरात्र निघून गेल्यावर देवी अशा वस्तू खाणाऱ्या मंडळींना आशीर्वाद देत नाही. असं जुन्या पिढीतील लोकांचं म्हणणं. तसं पाहिल्यास कांदा लसून खायला आपल्या जुन्या लोकांची मनाई नाही. फक्त हा नवदिवसांचाच काळ तेवढा त्याज्र मानला जातो. कांदा लसून या काळात खाणं वाईट. त्यात तथ्य काय आहे ते माहीत नाही. परंतु लोकं अशा गोष्टी मानत नाहीत. त्यांना भाकडकथा असं म्हणतात. परंतु या भाकडकथा नाहीत. ज्या आपल्या पिढीतील जुन्या लोकांनी सांगीतल्या. कदाचित त्यात काहीतरी सार लपलेले आहे. कदाचित लसून हे उष्णतावर्धक असल्यानं अति उष्णता शरीरात निर्माण होवू नये वा कांदा हे शीतवर्धक असल्यानं अती थंडपणा शरीरात निर्माण होवू नये. त्यातच आपल्या शरीरात नियंत्रणात्मक शक्ती निर्माण व्हावी म्हणून लसून व कांदा खाण्यावर आपल्या पिढीतील लोकांनी बंधनं घातली असतील. परंतु यावर लोकं म्हणतात की हाच काळ का की कांदा लसून खाणं वज्र. त्यावर सांगणं एवढंच असेल की कोणत्यातरी निमित्यानं आपल्याला अशा वस्तू खातांना बंधन पाळता येतं. ज्यात आपली जीभही नियंत्रणात असावी. हा त्यामागील हेतू. जसं श्रावण महिन्यात मांस खाणं टाळलं जातं. कारण जरी मांस हे शरीराला ताकद देत असेल तरी तो काळ हा साथीच्या रोगांचा काळ असतो. ज्यातून प्राणीही आजारीच असतात. अशा आजारी प्राण्यांच्या मांसातून आपल्याला आजार होवू नये. म्हणून पावसाळ्याचा हा दोन तीन महिन्याचा काळ मांस मटन खाण्यास त्याज्य समजला जातो. एवढंच नाही तर फळ आणि भाजीपालाही या काळात खाण्यास त्याज्रच समजलं जातं. त्याचंही कारण आहे फळ व भाजीपाल्यावर या काळात रोग असणं. ज्यातून वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या नावानं हेच महिने पाळले जातात. जसा हिंदूत श्रावण, जैन धर्मात चातुर्मास व बौद्ध धम्मात वर्षावास. तसंच आहे कांदा, लसनाचं. या दोन पदार्थातील शास्रीयपणा लोकांना पटत नसल्यानं त्याला अंधश्रद्धेची जोड दिली व म्हटलं की ते स्वरभानू नावाच्या दैत्याच्या थेंबातून तयार झाले. तसंच म्हटलं की हे खाण्यानं दैत्यांना जोर येतो. महत्वपुर्ण बाब ही आहे की कांदा, लसून न खाणं. ज्यात अंधश्रद्धा नसायलाच हवी. परंतु लोकं असं कुणाला खावू नका सांगीतल्यावरही ते अलगद खातात. ते पाळत नाहीत. ज्यातून रोग होतात. म्हणूनच आपल्या पुर्वजांनी त्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा आणली व सांगीतलं की कांदा, लसूण खाणं वज्र करा काही दिवस खाण्यातून. कदाचीत शरीरात नियंत्रीत शक्ती निर्माण करण्यासाठी. कदाचित या गोष्टीवरुन आपल्या पुर्वजांना आपली किती काळजी होती. ते दिसून येते. विशेष म्हणजे कदाचित या वस्तू न खाण्यामागे विज्ञान असून त्याला अंधश्रद्धेची जोड न देता काही दिवस त्या वस्तू खाण्याचा मोह टाळावा. जेणेकरुन आपल्याच शरीराचे उष्णता निर्माण करणारे वा थंडपणा निर्माण करणारे घटक नियंत्रणात येतील व आपलंच आरोग्य सुदृढ होईल. सुलोचनेला आठवत होता मंदोदरीचा विचार. जेव्हा ती लंकेत बसली होती मंदोदरीजवळ. सुलोचना विचार करीत होती आपल्या जीवनाबद्दल. तिला वाटत होतं की जर स्रीजातीला तिचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसेल तर तिनं का बरं जन्म घ्यावा. घेवूच नये जन्म. म्हणजे संपूर्ण पुरुष जातीला अक्कल येईल. तसे तिच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण झाले होते. आपलं काय चुकलं की आपण स्रीजातीत जन्म घेतला? आपलं काय चुकलं की आपण पती म्हणून इंद्रजीतला प्राधान्य दिलं? माझा पती इंद्रजीत काय कमी शूर आहे? तो अधिक हुशार अन् तेवढाच बलवान आहे. मग हा देवांच्या मनात माझ्या विवाहावरुन प्रश्न का निर्माण व्हावा? स्री देवी की छळायला मिळणारी उपभोग्य वस्तू आहे? तिच्या मनात निर्माण झालेले ते प्रश्न. ते प्रश्न तसे बरोबरच होते. कारण स्री ही वंशवाढीची देवी होती व तिला कोणाशी विवाह करावा व कोणाशी करु नये हे चांगलं समजत होतं. तिला तसं माहीतच पडत नव्हतं की ती कोणाला जन्म देणार आहे. दानव की देवांना. तसं पाहिल्यास ज्यावेळेस ब्रम्हांडाची उत्पत्ती झाली होती. त्यावेळेस स्रिला फार मोठं महत्व प्राप्त झालं होतं. आज आपल्याला दिसतंय की नवरात्र सुरु असून लोकं मंदिरात जात आहेत. देवीची पुजा करीत आहेत व तिचा उदोउदो करीत आहेत व त्यानिमित्यानं त्या देवीलाच नाही तर तमाम स्री जातीला सन्मान देत आहेत. परंतु नवरात्र निघून गेल्यावर हा दर्जा कायम राहिल काय की महिलांना वर्षभर छळलं जाईल कावळ्यांसारखं. जसा कावळ्याला फक्त श्राद्ध पक्षातच मान मिळतो. बाकी दिवस होळ्या होळ्या म्हणत त्याची टिंगल उडवतात नव्हे तर त्याचं मांस चांगलं लागतं वा त्याचा बहुमुल्य उपयोग होतो म्हणून त्याची तस्करी करतात. हा एक अनुत्तरीतच विचार आहे. स्री ही देवी आहे की जिनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कित्येक राक्षसांचा वध केला. तशीच तीच एक स्री आपल्या गर्भात बाळाला ठेवते. त्याच्या जन्मापुर्वी अनन्वीत यातना गर्भाशयात सहन करते व ती बाळाला जन्म देते. त्याच्या जन्मानंतरही त्याचं संगोपन करीत असतांना ती स्रीच त्रास सहन करते. मग ते लहान मुल स्रीगर्भ असो की पुरुष गर्भ. ती त्याचेबद्दल कधीच भेदभाव करीत नाही. तो कसा निघेल याचाही ती विचार करीत नाही. अन् तो तसा निघालाच तरी ती त्याला सोडत नाही वा टाकून देत नाही. मात्र तो पुरुषगर्भ जन्मानंतर मोठा झाला की तिच्यासोबत भेदभाव करतो. तो एकीकडे तिला देवी संबोधून तिची पुजा करतो आणि दुसरीकडे तिचा उपभोग्य वस्तू समजून तिचा वापर करतो. त्यातच बलात्कार. अन् तिला मुलं पैदा करण्याची मशीन समजणे. शिवाय तिच्यापासून होणाऱ्या अपत्यांना मेहनत न करता आयत्या बिळातील नागोब्यासारखा आपलंच आडनाव देतो. खरं तर ती स्री वंशवाढीची देवी असल्यानं तिच्याच माहेरचं आडनाव तिच्यापासून होणाऱ्या अपत्यांना मिळायला हवं. परंतु तसं होत नाही. वंश...... वंशाची सुरुवातच स्रिपासून होते व खरा वंश स्रीच चालवते, अनादीकाळापासून तर आजतागायत अन् आजही. तरीही तिच्या भाग्यात आज दुय्यमपणाच लिहिलेला आहे. काहीजण तिला उपभोग्य वस्तू मानून तिच्यावर बलात्कार करीत असतात तर काहीजण तिला मुलं पैदा करण्याची मशीन समजून तिच्या उदरातून तिला त्रास होत असतांनाही पाहिजे तेवढी मुलं निर्माण करुन घेतात अन् तिही जीव धोक्यात घालून आपल्या उदरात मुल ठेवते. ती जेव्हा बाळाला जन्म देते, तेव्हा त्यावेळेस बऱ्याचशा स्रिया दगावतातही. परंतु त्या दगावल्या तरी त्यांनी जन्माला घातलेला बाळ तिचं नाही तर त्याचा वंश चालवत असते. हे आडनावावरुन लक्षात येतं. खरा वंश स्रीच चालवते असे म्हटल्यावर आतिशयोक्ती होणार नाही. कारण कालच्याही स्रिया बाळांना आपल्या पोटात ठेवत असत. तेही तब्बल नऊ महिने. पोटात होणाऱ्या अतिशय वेदना गिळंकृत करुन. त्या काळात स्रियांना अतिशय त्रास होत असायचा. बाळ गर्भात राहण्याचा काळ. हा अतिशय नाजूक असा काळ असून त्या काळात स्रिला पुरेसं जेवन धकत नाही. चक्कं स्रिया त्या काळात त्या उपाशीच असतात. जेही काही त्या काळात त्या खातात. ते पचत नाही व ताबडतोब ओकारी होते. त्यानंतर थोडासा काळ गेलाच तर कधीकधी पोटात दुखणं खुपणं दिसून येतं. त्यानंतर बाळाच्या विकसनाच्या काळात बाळ तिला चक्कं रात्रभर झोपूच देत नाही. ते चक्कं तिच्या गर्भाशयात पाय मारत असतं. कधीकधी ओटीपोटीला एवढी खाज सुटते की तिला चांगलं खाजवावंसं वाटतं. तरीही ती खाजवत नाही. कारण तिला वाटत असतं की मी त्या भागात खाजवल्यानं गर्भाशयातील बाळाला धक्का लागून बाळाचा एखादा अवयव निकामी होईल तर कधी त्या बाळाच्या गर्भाशय क्रिडेनं पोटात गुदगुल्याही होतात. त्यातच एखाद्या स्रिला बाळ व्हायच्या पुर्वी काही काळ पोटात असह्य असं दुखत असतं, वेदना होत असतात. त्यातच बाळ जेव्हा गर्भाशयात असतं, तेव्हा त्या स्रियांना पालथं वा उताणं झोपता येणं शक्य होत नाही. तिला एका कडवरच झोपावं लागतं. बाळ जन्माच्या शेवटच्या काळात म्हणजे प्रसुतीच्या काळात स्रियांच्या पोटात तीव्र दुखत असतं. वाटत असतं की असे बाळ कधीच जन्माला घालू नयेत. कारण त्या वेदना त्याही काळात सहन होत नाही. तसा तो नवा जन्मच असतो. त्यातच त्या स्रीचं सीझर झालं तर तिला सहा महिने त्रासच असतो. कारण तिची बाळ गर्भातून बाहेर काढतांना पोटावर झालेली जखम सारखी दुखत असते सहा महिनेपर्यंत. अन् तीच जखम साधली नाही वा शिवण्यात बरोबर आली नाही तर मग तिला त्या जखमेचा जीवनभरच त्रासच होत असतो. बाळ झाल्यानंतरही स्रियांना त्रासच असतो. ते बाळ लहान असतांना दिवसभर झोपतं अन् रात्रभर जागं असतं. ते बाळ कधी झोपेल व कधी जागं असेल हे काही सांगता येत नाही. शिवाय त्याच काळात स्रियांना घरची कामंही असतात. ती कामं व ते बाळ सांभाळतांना व त्यातच झोप सांभाळतांना स्रिला नाकीनव येतं. त्याच काळात माणूस दिवसभर कामाला जात असतो. तो घरी आल्यावर त्या स्रिला कामात मदत करत नाही. काही अपवादही असतात. तो कामावरुन आला की झोपतो. कारण तो फारच थकून आल्याचा आव आणत असतो. अशा काळात अशा स्रियांना आपली झोप मोडूनच घरासाठी काम करावं लागतं. लेकरं पैदा करावी लागतात. त्यानंतर नामकरण केलं जातं व नामकरणात त्या बाळाला नाव मिळतं व त्याच्यासमोर नाव लागतं, अमूक अमूक वंशाचा वारस. बिळातील आयत्या नागोबासारखा काही न करता तिचा पतीदेव तिच्या लेकराला तिचं नाव न देता आपलं नाव देत असतो. ही पुरुषप्रधान संस्कृती. सगळं स्रियांनी करावं. बाळ जन्माला घालतांना तिनंच मेहनत करावी. गर्भातील अनन्वीत यातना भोगाव्यात. अन् पुरुषांनी काहीही न करता त्या बाळाला चक्कं नाव द्यावं. स्रियांनी मुलं पैदा करण्याच्या मशीनीगत पाच सहा व त्यावरही मुलं जन्माला घालावी. त्यासाठी मरण पत्करावं व पुरुषांनी मजा मारावी. माझा मुलगा म्हणून समाजात मिरवावं. पुढं मुलगी असेल आणि ती सासरला गेल्यावर तिचं काही चुकल्यास दोष देतांना तिच्या आईचाच उद्धार व्हावा असं आपलं वागणं. ह्या सर्व गोष्टी त्या स्रिचा दुय्यमपणा दर्शवितात. आज स्रिला पुजलं जात आहे. कुठं दुर्गा म्हणून तर कुठं काली म्हणून, कधी कुठं तिला लक्ष्मी तर कुठं तिला सरस्वती म्हणूनही पुजलं जातं. त्यातच तिला सर्वशक्तीमान मानलं जातं तर दुसरीकडं तिची हेळसांड केली जाते. तिला अपमानीत केले जाते. बलात्कार तर रोजचेच सुरु असतात. कालही तिच्यावर अत्याचार होतच होते. कधी तिला सती म्हणून रोजच जाळत असत. कधी प्रथांच्या अनुषंगानं, नगरवधू म्हणून तिला अपमानीत केलं जात असे. तसंच तिच्यावर नगरवधू व देवदासी म्हणून रोजच बलात्कार केला जात असे. तिच्यासाठी कन्यावध, गंगाप्रवाह ह्या प्रथा काही नवीन नव्हत्या. कालचा समाजही तिला कधी सीता, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी आणि वेगवेगळ्या देवीच्या नावानं पुजत होता आणि आजही तो त्याच नावानं पुजतो. तशीच तीच स्री आपल्या वंशाच्या दिव्याला जन्म देते. त्यासाठी कितीतरी वेदना सहन करते. असे असतांना आपण तिला दुय्यम दर्जा का द्यावा? तिचा आज फक्त वंशवाढीसाठी वापर का करावा? समाजसुधारणा झालेली असतांना आजही तिच्यावर अत्याचार का करावा? शिवाय जी स्री आपला वंश वाढावा म्हणून जोखीम पत्करुन बाळाला जन्माला घालते. त्या स्रीपासून होणाऱ्या संततीला पुरुषांनी काही न करता आपलेच नाव का द्यावे? तिच्या माहेरचे आडनाव ती जन्माला घालायची मेहनत करीत असल्यानं व अतिशय वेदना सहन करीत असल्यानं का देवू नये? ह्या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. विशेषता ही की काल आणि आजही जो समाज तिला एक देवी म्हणून पुजतो. सर्वशक्तीमान समजतो. तिला देवीचा दर्जा देतो. तिचा वंशवाढीसाठी विचार करतो. तरीही तिला दुय्यम दर्जा? ह्या सर्व गोष्टी निदान आजच्या काळात तरी बऱ्या नाहीत. त्या गोष्टी तिच्यासोबत आजतरी करु नये. खरा विचार केल्यास तीच वेदना पत्करुन बाळाला जन्म देत असल्यानं व त्यावरुन तीच वंशवाढीची देवी ठरत असल्यानं आजच्या पुरुषसत्ताक संस्कृतीत तिच्याच माहेरचं आडनाव तिच्यापासून होणाऱ्या अपत्याला द्यावं. जेणेकरुन तिचा यथोचित सन्मान होईल व तिला खऱ्या देवीचं स्वरुप प्राप्त होईल यात शंका नाही. तसं जर आजची पुरुषप्रधान संस्कृती करीत नसेल तर त्याच पुरुषप्रधान आजच्या संस्कृतीला आजच्या काळात कोणत्याही स्वरुपाची देवी म्हणून पुजण्याचा अधिकार नाही. तो दुतोंडीपणाच दिसतो. कालचा काळही तसाच होता. आजही पाहिजे त्या प्रमाणात काळ बदललेला नाही. आजही तसंच दिसतं नव्हे तर प्रत्ययाला येतं. आजही आपल्याला दिसतंय की नवरात्र सुरु असून लोकं मंदिरात जात आहेत. देवीची पुजा करीत आहेत व तिचा उदोउदो करीत आहेत व त्यानिमित्यानं त्या देवीलाच नाही तर तमाम स्री जातीला सन्मान देत आहेत. परंतु नवरात्र निघून गेल्यावर हा दर्जा कायम राहिल काय की महिलांना वर्षभर छळलं जाईल कावळ्यांसारखं? जसा कावळ्याला फक्त श्राद्ध पक्षातच मान मिळतो. बाकी दिवस होळ्या होळ्या म्हणत त्याची टिंगल उडवतात नव्हे तर त्याचं मांस चांगलं लागतं वा त्याचा बहुमुल्य उपयोग होतो म्हणून त्याची तस्करी करतात. हा एक अनुत्तरीतच विचार आहे व हा विचार विचार करायला लावणारा एक प्रश्नच आहे. सुलोचना विचार करीत होती. 'माझ्याही बाबतीत तसंच घडलं. मी सुंदर असल्यानं मला स्वर्गातील अप्सराच बनवलं. परंतु माझी इच्छा तोडून स्वर्गातील लोकांनी माझा विवाह इंद्र पुत्र जयंताशी लावण्याचा प्रयत्न केला. त्यातच मी त्या विवाबाला नकार दिल्यानं आणि इंद्रजीतशी विवाह केल्यानं मलाच त्रास देण्यासाठी इंद्रजीतला ठार करण्यासाठी लक्ष्मणाला पाठवलं होतं.