Mandodari - 4 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 4

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 4

****४******************* सुलोचना सुंदर होती. तिच्या सुंदरतेनंच तिला स्वर्गातील अप्सराही बनवलं होतं व ती स्वर्गात नृत्य करुन देव लोकांचं मनोरंजन करीत होती ती. तीच मेघनादची पत्नी बनली होती. तिचा जन्म हा नागलोकात झाला होता. म्हणतात की तिचा जन्म व तिचीच बहिण राजा जनकपत्नी सुनयनाचा जन्म हा वासूकीच्या अश्रुतून झाला. ती एक पतीव्रता स्री होती. ती सोज्वळ होती नव्हे तर अप्सरा. म्हणतात की ती स्वर्गातील रहिवाशी होती व तिला इंद्रजीतनं जिंकून आणलं होतं आणि तिच्याशी विवाह केला होता. कोण होती ती? तिचा इंद्रजीतशी संबंध कसा आला व तिनं इंद्रजीतशी विवाह का केला असावा? ही उत्तरं अनाकलनीय आहेत. कोणी म्हणतात की ना तेव्हा स्वर्ग होता, ना नरक होता. मग ही स्री स्वर्गातील अप्सरा कशी ठरली? त्याचं उत्तर आहे, तिची सुंदरता. ज्याही मुली सुंदर असायच्या. त्यांची चर्चा परिसरात असायची. ज्यातून त्यांना स्वर्गभुमीत जबरदस्तीनं नेलं जात असे. त्यांच्या अब्रू लुटल्या जावू नये म्हणून. त्यातच त्या त्या स्रियांना आपल्याभुमीत नेल्यानंतर त्यांचा एक उपभोग्य वस्तू म्हणून वापर केला जाई तर कधी त्यांच्या नृत्याचा उपभोग घेवून आपलं स्वतःचं मनोरंजन केलं जाई. स्वर्ग आणि नरक अर्थात पाताळ स्थळ हे पृथ्वीवरच होतं. स्वर्गभुमी अर्थात असं पृथ्वीवरील असं स्थळ होतं की ज्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे श्रीमंत लोकं राहात. ज्या लोकांना दुःख काय ते माहीत नव्हतं. ना ही ते दुःखी लोकांच्या सानिध्यात येत. ना ही ते दुःखी लोकांना मदत करीत. उलट त्यांना ते हीन लेखत असत. तशीच तिथं फार मोठ्या प्रमाणात सुसंपन्नताही होती आणि पाताळभुमी अर्थात असं स्थळ होतं की ज्या ठिकाणी अगदी गरीब लोकं राहात. ज्यांच्यात सर्वच बाबतीत विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. ती सुंदर अप्सरा. तिचं नाव सुलोचना होतं व तीही एक नागकन्या होती. नागकन्या अर्थात तिचा जन्म नागाच्या घरी झाला होता. म्हणतात की तिचा जन्म नागाच्या अश्रुतून झाला. ज्यावेळेस नागाला त्रास झाला, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून अश्रु गळले. त्यावेळेस एका डोळ्यातील अश्रुतून सुलोचना व एका डोळ्यातील अश्रुतून राजा जनकपत्नी सुनयनाचा जन्म झाला होता. त्या पाठीमागे पौराणिक लोकं एक प्रकारचा इतिहास लावतात. म्हणतात की पार्वती दररोज आपल्या पतीच्या दंडावर एका नागाला बांधत असे. त्यात त्याला एके दिवशी वेदना झाल्या व त्या वेदनेतून त्याचे अश्रू बाहेर निघाले. ज्यातून एका डोळ्यातून सुलोचनेचा व दुसऱ्या डोळ्यातून सुनयनेचा जन्म झाला. पृथ्वीवरील जन्माच्या बऱ्याच दंतकथा आहेत. ज्या आता ऐकल्या की थोतांड वाटतात. कारण आता विज्ञानानं हे सिद्धच केलंय की कोणत्याही नर आणि मादीच्या संबंधातून एक नवीन प्रजाती निर्माण होतेय. मग तो लहानसा किटक का असेना. कितीही मोठा जीवजंतू असो की एखादा कितीही लहानात लहान असलेला सुक्ष्मजीव. त्या जीवांपैकी नर जीव हा मादी जीवांच्या संपर्कात येतो. तेव्हाच नवीन जात निर्माण होते. असा नियम असतांना सुलोचनेचा वा सुनयनेचा जन्म हा नागाच्या अश्रुतून झाला म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. कदाचित त्या दोघीही बहिणींना त्या काळात वासुकी नावाच्या नाग प्रजातीच्या माणसानं दत्तक घेतलं असावं व दत्तक वडील म्हणून पालनपोषण केलेलं असावं. तसं पाहिल्यास तो काळ म्हटला तर त्याही काळात अनेक ठिकाणे अशी होती की त्या ठिकाणी वेगवेगळ्या समुहातील लोकं राहात असावेत. त्याला नाव असावं. त्याला नावं असावीत, पाताळभुमी, देवभुमी, नागभुमी आणि पृथ्वीभुमी. इतरही बरीच नावं असावीत. सध्या दुरचित्रवाणीच्या माध्यमातून दाखवलं जातं आणि ग्रंथातही लिहिलं आहे की स्वर्गभुमी, पृथ्वी व पाताळभुमी, त्यातच नागलोक वैगेरे समुदाय व त्यांची स्थळं वेगवेगळी आहेत. परंतु मुळात ते सर्वच स्थळं हे पृथ्वीवरील स्थळं होती. त्यातच त्या त्या प्रदेशात राहणारी मंडळी ही सर्व शूरच असतील. त्यातच त्या काळात युद्ध चालत असावेत व युद्धप्रसंगी पाताळभुमी हारली तर पाताळातील स्रियांवर व्याभिचार केले जात असावेत आणि देवभुमी हारली तर देवभुमीतील स्रियांनाही पाताळभुमीतील लोकं छळायला मागंपुढं पाहात नसावेत. अशातूनच संतती जर झाली तर त्या संततीचं पालनपोषण उत्तम प्रकारे व्हावं. त्या संतत्या बेवारस जगू नये म्हणून त्यांना दत्तक घेण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी. ज्यातून सुलोचना व सुनयनालाही असंच वासूकी नागानं दत्तकच घेतलेलं असावं व संबंध लावला असावा की सुलोचना आणि सुनयना या त्याच्या डोळ्यातील अश्रूतून झाल्या. विनाकारण कोणत्याही जन्मास आलेल्या मुली वा मुलं राजरोषपणे आपलं जीवन जगू शकतील. तशीच त्यांची पिढ्यान् पिढ्या बदनामी होणार नाही. तसं पाहिल्यास त्याही काळातील काही लोकं हे समजदार असून त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असावा. तो परीसरच तसा सुसंपन्न होता व त्या ठिकाणी नागवंशीय लोक राहात होते. त्यांना नागवंशी संबोधत. कारण तिथं नागा नावाच्या प्रजातीचं राज्य होतं व ती प्रजाती फार शूर होती. वासूकी नावाचा व्यक्ती म्हणजे नाग नसून नागभुमीत राहणारा व्यक्ती. त्या भुमीला नागभुमी म्हणत. त्याचं कारण होतं, त्या ठिकाणी असलेला सापाचा वावर. तशीच त्या ठिकाणी असलेली ही नागा प्रजाती. ही नागा प्रजाती पाहिजे त्या प्रमाणात काटक नसेलच. म्हणूनच ती त्या काळात भुमीगत म्हणून वावरली. ती ना ही देवभुमी आणि पाताळभुमीपेक्षा शूर असेल. ती शूर असेल प्राणीमात्रासाठी. कारण त्या प्रजातीचा वावर हा सदाहरीत वनस्पती असलेल्या भागात आढळतो नव्हे तर जंगलात आणि दऱ्याखोऱ्यात आढळतो. तसाच देवभुमीतील लोकांचा वावर हा मैदानी वा पठारी प्रदेशात असेल. त्यावेळेस पृथ्वी काही वेगळी नसून पृथ्वीवरच त्या सर्व प्रकारची माणसं राहात असतील व त्या त्या ठिकाणाच्या अधिवासानुसार त्यांच्या अधिवासांचे प्रकार पडलेले असतील. ज्यात देवभुमी, पाताळभुमी, नागलोक, या भुमींचा समावेश असेल व ती मंडळी देव, दानव, नाग व मनुष्य अशा स्वरुपानं ओळखले जात असतील. देव अर्थात देवभुमीत राहणारे, राक्षस अर्थात पाताळभुमीतील राहणारी मंडळी, नाग अर्थात नागलोकात राहणारी माणसं व मनुष्य अर्थात पृथ्वीवर राहणारी माणसं. ज्यांना पुढे जावून देव अर्थात देवभुमीत जी मंडळी राहात. त्या लोकांना पुढं जावून ब्राह्मण म्हणून ओळखलं गेलं. नागलोकात जे लोकं राहात, त्यांना आदिवासी म्हणून ओळखलं गेलं व पाताळभुमीत जे लोकं राहात, त्यांना शुद्र म्हणून ओळखलं गेलं. अन् मनुष्य नावाचा घटक ज्याठिकाणी अधिवास करीत होता. त्यांना बहुजन असे संबोधले जावू लागले. अर्थातच त्या त्या नावावरुन व त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणावरुन त्यांच्या संस्कृती व त्यातील समाविष्ट विशिष्ट जाती उदयाला आल्या असाव्यात. तसंच स्वर्गभुमी अर्थात देवभुमीतील माणसं अतिशय हुशार असावीत. ज्यांनी तत्वज्ञान लिहून ठेवलंय. ज्यांनी मोठमोठ्या ग्रंथांची रचना केलीय व आपल्या मनासारखं लिहिलं. त्यांनीच प्राणीमात्राचा नाही तर सबंध सृष्टीचा जन्म हा नाकातून, तोंडातून दाखविलेला असून त्या त्या संबंधीत व्यक्तींचे आईवडील लपवलेले असावेत. खरं तर प्रत्येक जीवांच्या पाठीमागं नर व मादीचा संबंध होता नव्हे तर आहे. हे नाकारता येत नाही. देवभुमीचा अधिवास हा पानझडी वनांच्या प्रदेशात असेल. ज्या भागात सुसंपन्नता व आल्हादकारकता होती. तर पाताळभुमी ही रेताड व बंजर भागात वसली असेल आणि नागभुमी सदाहरीत अशा वनाच्या प्रदेशात. ज्या ठिकाणी बाराही महिने पाऊस पडायचा. या लोकांना खायला प्यायला भरपूर मिळत असेल. परंतु दलदलीच्या त्या भागात राहाणं म्हटलं तर अवघड असेल. शिवाय जंगली, विषारी व हिंस्र प्राण्यांची भीती. सर्वात सुरक्षित असेल तो भाग. जो भाग पठारी प्रदेश होता. नागभुमीतील अधिवाश करणारी ही मंडळी या ठिकाणी जाण्याचं कारण असेल भीती. भीती कुणाला वाटत नाही. तशी भीती याही लोकांना वाटली असेल. कोणाची तर देवभुमी आणि पाताळभुमीतील लोकांच्या संघर्षाची. ही मंडळी सतत आपल्या अस्तित्वासाठी युद्ध करीत असतील. कधी देवभुमीतील लोकं जिंकत असतील तर कधी पाताळभुमीतील लोकं जिंकत असतील. तसं पाहिल्यास त्या त्या प्रदेशातील लोकांना विशिष्ट अशा नावानं ओळखण्याची पद्धत निर्माण झाली असेल. ती पाताळभुमी व त्या पाताळभुमीतील लोकं शूर होते. ज्यांना राक्षस संबोधलं गेलं. ती मंडळी आपल्या शुरत्वाच्या ताकतीनं सर्व प्राणीमात्राला त्रास देत नव्हे तर त्यांना अन्न मिळत नसल्यानं त्यांना कोणताही नवीन मनुष्यप्राणी दिसला की ते त्यालाही कापत असत. तसं पाहिल्यास नागवंशीय लोकं हे अल्पसंख्याक असल्यानं आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी ते या दोन्ही लोकांच्या सानिध्यातून दूर पळाले व त्यांनी आपलं त्याच ठिकाणी राहून अस्तित्व स्थापन केलं. जिचं नामाभिधान ठरलं नागभुमी. नागभुमीपासून आदिवासी प्रजाती अस्तित्वात आली असावी. त्या पाताळभुमीतील लोकांच्या अधिवासावरुन पुढे अस्पृश्य जाती अस्तित्वात आली असावी. सुलोचना ही नागकन्या होती. नागाच्या अश्रुतून नाही तर नाग प्रजातीच्या गर्भातून जन्मलेली कन्या. ती सुंदर होती व तिची चर्चा तिच्या सुंदरतेनंच चारही बाजूला पसरली होती. साहजिकच तिच्यावर देवभुमीतील लोकांची नजर पडली व तिला देवभुमीत घेवून गेले. कारण व्यवहार करण्यासाठी कधीकधी नागभुमीतील लोकंही देवभुमीत जात व देवभुमीतील लोकंही कधीकधी नागभुमीत. अशातच सुंदर रुपानं सुलोचना देवभुमीत लक्षात आली व साहजिकच सुलोचनाला देवभुमीत अप्सरा म्हणून सन्मान मिळाला. स्वर्ग आणि नरक या भ्रामक कल्पना वाटतात. पुर्वीच्या काळातील राक्षस व देवांच्या अस्तित्वावरुन. देव म्हणून देवाला संबोधणे म्हणजे देवांचा होत असलेला सन्मान साहजिकच दिसतो व राक्षस म्हणून राक्षसाला संबोधणे म्हणजे राक्षसांचा अपमानच दिसतो. तसं पाहिल्यास तिही माणसंच होती. हे विसरुन चालत नाही. स्वर्ग वा नरक या पुर्वीच्या भ्रामक कल्पना आहेत. परंतु त्या जरी आपणाला भ्रामक कल्पना वाटत असल्या तरी त्याचं वर्णन वेगवेगळ्या ग्रंथात त्या त्या पद्धतीनं वास्तववादी स्वरुपात केलेलं आहे. म्हटलं जातं की स्वर्ग हा अमूक अमूक असा होता. तसाच होता नरक. परंतु नरकात राक्षस राहात व स्वर्गात देव. अमूक असा होता. तसंच त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांना राक्षस व देव संबोधले जाते. खरंच यावर सखोल विचार केल्यास पाताळात राहणारे लोकं राक्षस होते काय? अन् स्वर्गात राहणारे लोकं देव होते काय? अन् ज्यांना देव संबोधले गेले. ते खरंच देव होते काय आणि ज्यांना राक्षस संबोधले गेले, ते खरंच राक्षस होते काय? ह्या आजच्या पिढीला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. राक्षस म्हणजे काय? असा विचार करतांना पुर्वी राक्षस त्याला म्हणायचे की जो नरभक्षी होता. जो चांगला राहात नव्हता, अर्थातच मांस खात होता. जो व्यक्ती सौंदर्यानं चांगला नव्हता. ज्यांना सुधारणा म्हणजे काय? हे माहीत नव्हतं. जे वर्षानुवर्ष अंघोळ करीत नव्हते व जे पशुगत राहात होते नव्हे तर ज्यांची राहणी पशुगतच होती. याऊलट होते देव. देव त्याला संबोधन होतं की जे स्वच्छ राहायचे. जे फक्त फळ खायचे. जे मांस अजिबात भक्षण करीत नसायचे. ज्यांचा व्यवहारही माणूसकीला शोभणारा असायचा. अर्थातच तो भाग नंदनवनच असायचा की तिथं खायला प्यायला विपूल मिळायचं. अशा मंडळींना विपूल खायला मिळत असल्यानं ती मंडळी खरंच मांस खाणार काय? नक्कीच याचं उत्तर नाही असंच येणार. साहजीकच ज्यांना अन्न मिळत नसेल, ते नाईलाजास्तव मांस खात असतील. त्यांना तथाकथित समाजानं राक्षस संबोधलं. खरंच यात त्यांचा गुन्हा होता काय? नाही. तरीही तो समाज राक्षस ठरला. राक्षस ही शिवीच होती त्यांचेसाठी. परंतु ते त्या शब्दाला शिवी मानत नव्हते. ना त्यांनी त्या शब्दाला शिवी मानलं. ते आनंदाने जगले. जरी त्यावेळचा तथाकथित समाज त्यांना शिव्या देत होता तरी. अन् तोच समाज दूर ठेवत असला तरी. त्यातच तथाकथित समाजानं ही राक्षस प्रजाती घाबरायला हवी म्हणून स्वर्ग व नरकाच्या भ्रामक कल्पना मांडल्या. ज्यातून त्यांच्यावर राज्य करता येईल. हा उद्देश होता. तो पानझडी वनांचा परीसर. ते नंदनवनच होतं त्या काळातील. ज्या वनात वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. त्यातच विपूल प्रमाणात खायला प्यायलाही मिळत होतं. अर्थातच त्या परीसराला स्वर्ग म्हटलं जात असे. म्हणजेच स्वर्ग अर्थात तो परीसर की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असायची. ज्या ठिकाणी वेगवेगळी फळं खायला मिळायची. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संस्कार लोकांवर होत असत. कारण गरिबी व दारिद्र्य नसल्यानं अशा लोकांना परिस्थितीशी झगडावंच लागत नव्हतं. मग ते संस्काराकडे लक्ष देणार नाही तर काय? हाच तो स्वर्ग व हीच ती देवभुमी. स्वर्ग हा तो भाग होता की ज्या भागात त्या काळानुसार रस्तेही अतिभव्य दिव्य असतील. वाहतूकीची साधनं चांगली असतील. एवढंच नाही तर चांगलं खायला प्यायला मिळत असेल. या ठिकाणची भुमीही चांगली असेल की सर्व प्रकारच्या जिनसाचं उत्पादन त्याठिकाणी होत असेल. स्वर्ग असा भाग असेल की त्या ठिकाणी राहायला कंटाळा येत नसेल. एक राजा असेल, त्यातच त्यांचं मनोरंजन करण्यासाठी कित्येक सुंदर मुलींची रांग लागत असेल. या सुंदर मुली नृत्य करुन त्यांचं मनोरंजन करीत असतील. ज्यांना अप्सरा म्हणत असतील. या गोष्टी आजच्या ग्रंथात लिहिलेलं वाचलं की सहज लक्षात येतं. परंतु आज जे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून स्वर्ग दाखवला जातो. तसा स्वर्ग नसेलच. ना ही त्या काळात माणसांना पंख असतील ना ही त्यांना उडता येत असेल. स्वर्ग व स्वर्गात असलेलं वातावरण. जसं वातावरण त्या काळात स्वर्गभुमीत असेल, ज्याप्रमाणे स्वर्गात सुख असेल. तसं सुख हे पाताळभुमीत नसेलच. म्हणतात की पाताळात राक्षस राहात असत व त्यांचे संस्कार हे चांगले नव्हते. पाताळ...... पाताळ हा पृथ्वीवरील असा भाग की ज्या ठिकाणी गरीब लोकं राहात असतील. ज्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसेल. विश्वप्रकारचं दारिद्र्य असण्याचं कारण तेथील भुमी. ही भुमी त्याही काळात रेताड वा बंजर भुमी असेल की जिथं अजिबात पिकत नाही. अशी भुमी असेल की जी उपजाऊ नसेल व तिथं विपूल प्रमाणात झाडंही नसतील. अशी भुमी असेल की ज्या भुमीत खायला पुरेसं अन्नधान्यही मिळत नसेल. साहजिकच अशी मंडळी काय खाणार? पोट असायचंच आणि पोटाची भूकही असायचीच. त्यातच ती भूक एवढी सतावत असेल की ज्यातून उपाशी राहणं कठीण होत असेल. मग ही मंडळी काय खाणार? साहजिकच ही मंडळी काहीही खाणार. जे मिळेल ते. अर्थातच ही मंडळी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात असतील. अन् तेही न मिळत असल्यानं कधीकधी माणसांनाही मारुन टाकत असतील ही मंडळी अन् खातही असतीलच. त्यांना मनोरंजन काय असतं हेही समजतही नसेलच. त्यातच ते जेव्हा ऐकत असतील, स्वर्गभुमीत चांगली खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. ते ऐकून त्यांच्या मनात लालसा निर्माण होत असेल की आपण स्वर्गभुमीवर आक्रमण करायचं. त्या स्वर्गभुमीला जिंकायचं व तेथील अन्नधान्य संपेपर्यंत खात बसायचं. असा विचार करताच ही पाताळ भुमीतील मंडळी आस दाखवत व अन्नधान्याचं विश्लेषण करुन पाताळातील तमाम लोकांना एकत्र करीत असतील व अन्नाच्या आणि पोटातील भुकेच्या लालसेनं अशी मंडळी तयार झालीत की स्वर्गभुमीवर आक्रमण करीत असतील. त्यातच ते केवळ स्वर्गभुमीवर आक्रमण करुन तेथील अन्नधान्यावर व भुमीवरच ताबा मिळवीत नसतील, तर ताबा मिळवीत असतील, त्या सुंदर सुंदर नृत्य करणाऱ्या मुलींवरही. ज्या स्वर्गभुमीत नृत्य करीत असत व तेथे राहणाऱ्या लोकांना खुश करीत असत. ज्यांना अप्सरा नावाचा एक सन्मान करणारा शब्द असायचा. त्यानंतर ते त्यांच्याशी विवाह करीत असतील. स्वर्गभुमी आणि पाताळभुमीचं वर्णन. खरंच पाताळ आणि स्वर्ग हे वेगवेगळे जरी असले तरी ते पृथ्वीपासून कितीतरी दूर अंतरावर होते काय? त्याचं उत्तर नाही असंच आहे. स्वर्ग आणि पाताळ, ही दोन्ही ठिकाणं पृथ्वीवरच असतील व कोणताच व्यक्ती उडून पाताळ वा स्वर्गात जात नसेलच. मात्र सर्व खेळ हा भीतीदायक वातावरण तयार करण्यासाठी केल्या गेलं असेल याबाबत शंका नाही. राहिला अप्सरांचा प्रश्न. तर अप्सरा हे नाव जरी सन्मानदर्शक असले तरी अप्सरा नावाचा एक शब्द स्री पाठीमागे लावून सुंदर स्रियांचा वापर त्या काळातील सर्वांनीच म्हणजे पाताळभुमी व देवभुमीतील लोकांनी आपल्या स्वार्थासाठी केला. अप्सरा नावाच्या तेथे असणाऱ्या सुंदर सुंदर मुली. या मुली कुठल्या असतील? असा प्रश्न केल्यास साहजिकच या मुली स्वर्गभुमीत जन्माला आलेल्या मुली नक्कीच नसतील. त्या मुली असतील पाताळात कांवा इतरत्र जन्मास आलेल्या सुंदर सुंदर मुली. स्वर्गभुमीतील व पाताळ भुमीतील काही मंडळी ही भ्रमणाचं कार्य करत असत. ते कधी स्वर्गभुमीत जात तर कधी पाताळ भुमीत जात असत. त्यानंतर ते त्या त्या भुमीचं वर्णन आपल्या भुमीतील प्रमुखांजवळ करीत. त्यातच त्यात कधीकधी तेथील सुंदर मुलींचं वर्णन असायचं. मग काय, असं वर्णन ऐकताच त्या त्या भुमीतील व्यक्ती हा त्याच सुंदर कन्येला मिळविण्याच्या लालसेनं त्यांच्या त्यांच्या भुमीवर आक्रमणं करीत असतील. ज्यातून अशा मुली मिळवल्या जात असतील. मग स्वर्गातील लोकं जिंकले तर ते अशा सुंदर मुलींना आपल्या भागात घेवून जात असतील. त्यांना अप्सरा नाव देवून त्यांचा वापर आपल्या मनोरंजनासाठी करीत असतील. अशा कितीतरी सुंदर मुली या स्वर्गभुमीत होत्या. पाताळ वा इतर ठिकाणाहून युद्धात जिंकून आणलेल्या. त्यांचं कार्य केवळ नृत्य करुन तेथील राजदरबारातील लोकांचं मनोरंजन करणं होतं. अशा सुंदर मुलींशी, त्या पाताळातून आणल्या गेल्यानं स्वर्गभुमीत त्यांचा वापर फक्त नृत्यच करण्यासाठी केला जात असेल. हे ग्रंथात आढळून येतेय. साहजिकच पत्नी बनविण्यासाठी नाही. मानवतेच्या हेतूतून त्यांच्यावर अत्याचार जरी होत असला तरी त्यांना अप्सरा असं नाव असल्यानं त्यांची बदनामी होत नसे वा बदनामी झालीही. तरी ती क्षम्य असे. त्यावर कुणाचा विरोध वा वात्रट बोलणं नसायचं. तसं पाहिल्यास त्याही काळात अत्याचार सहन केला स्री जातीनंच. पाताळात राहणाऱ्या लोकांचं असं नसेलच. कारण तसं वर्णन हे कोणत्याही ग्रंथात सापडत नाही. ती मंडळी अप्सरेच्या वा भूक भागविण्याच्या उद्देशानं जरी स्वर्गभुमीत आक्रमण करीत असले, तरी विजय प्राप्त होताच अशी मंडळी अशा अप्सरेसोबत चांगला थाटामाटात विवाह करीत होते. त्यांना राजमातेचा दर्जा देत असत. त्यांना पट्टराणी बनवत असत. अशा कितीतरी अप्सरांशी राक्षस संबोधल्या जाणाऱ्या लोकांनी विवाह केलेला होता. त्याचं कारण होतं, कधीही कल्पना न केलेल्या वस्तू मिळणं. स्वर्गभुमीत अशा अप्सराची वानवा नव्हती. कारण तेथे पर्यावरण चांगलं असल्यानं लोकं दिर्घकाळ जगत असत. त्यातच तेथील वातावरणाचा परिणाम होवून सौंदर्यही टिकत असे व सौंदर्य चांगलं राहात असे. तसं सौंदर्य हे पाताळात आल्हादकारक वातावरण नसल्यानं राहायचं नाही. साहजीकच पाताळभुमीत अप्सरा नाविण्याची गोष्ट राहायची पाताळवाल्यांसाठी. म्हणूनच पाताळातील राजे, युद्ध जिंकताच त्या अप्सरांशी विवाह बद्ध होत असतील. ज्यांना राक्षस संबोधले गेले आहे. खरंच ते राक्षस होते का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आहे भूक. भूक कोणाला लागत नाही. सर्वांनाच लागते. ती त्यांनाही लागायची. परंतु अन्न मिळत नसल्यानं नाईलाजास्तव त्यांना मेलेल्या प्राण्यांचं मांस खावं लागलं. तसंच अन्न मिळत नसल्यानं नाईलाजास्तव त्यांना भुक भागविण्यासाठी जीवंत असलेलीच माणसं कापून खावी लागली. कारण मजबूरी होती. याऊलट स्वर्गभुमीतील वातावरण. जिथं पानझडी वनांचा प्रदेश होता व धनधान्य विपूल प्रमाणात होतं. अन्न भरपूर मिळत होतं. जर असं अन्न भरपूर प्रमाणात पाताळभुमीत मिळालं असतं, तर तेथील लोकांना प्राण्यांचे मांस खाण्याची गरज राहिली नसती. माणसंही मारुन माणसांचही मांस खाण्याची गरज राहिली नसती. त्यांनाही राक्षस संबोधलं गेलं नसतं. विशेष म्हणजे कालप्रवाहानं काल जरी पाताळभुमीत राहणाऱ्या लोकांना राक्षस संबोधलं असलं तरी ती माणसंच होती आणि स्वर्गभुमीत राहणाऱ्या लोकांना देव जरी संबोधलं जात असलं तरी तिही माणसंच होती. फरक होता फक्त वातावरण व परिस्थितीचा. परिस्थितीनंच त्यांना राक्षस व देव बनवलं होतं. तसं पाहिल्यास पाताळभुमीत राहणारी मंडळी काही राक्षस वाटत नाहीत. तसंच काल जरी स्वर्ग आणि नरक होता, अशी आपण कल्पना केलेली असली तरी प्रत्यक्षात आजच्या वातावरणावरुन त्या काळात असलेला स्वर्ग वा नरक हा भाग समजणे म्हणजे केवळ आपल्या विचारांचे भासमान भ्रमण वाटते. त्यामुळंच त्या काळात जरी स्वर्ग आणि नरक असला तरी प्रत्यक्षात स्वर्ग आणि नरकाच्या कल्पनेवरुन राक्षस आणि देव नाही तर ती साधी माणसंच असल्यानं कोणीही त्या काळातील कोणालाही राक्षस संबोधून त्यांचा अपमान करु नये, नव्हे तर त्यांना तुच्छ मानू नये.