*****३********************** मंदोदरीही काही कमी नव्हती. ती पुर्वजन्मातील एक अप्सराच होती. तसं पाहिल्यास तिनं भगवान शिवाला प्रसन्न करुन एक वर मागितला होता. मला महापराक्रमी व विद्वान, पंडीत व्यक्ती मला पती म्हणून मिळावा. त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर दिला. ज्यानुसार रावण तिला पती म्हणून लाभला. जो विद्वान होता. पंडीत होता व तसाच तो महापराक्रमीही होता. रावणाचे दोन भाऊ होते. विभीषण आणि कुंभकर्ण. कुंभकर्णाचा विवाह बलीची मुलगी वज्रज्वालाशी झाला होता. तसेच विभीषणाचा विवाह गंधर्वराज शैलेषची मुलगी सरमाशी झाला होता. त्यातच तिघंही आपआपल्या संसारात खुश होते. रावण व मंदोदरीचा विवाह हा भगवान शिवाच्या आराधनेतून झाला. तिची व त्याची पहिली भेट मन्दोर इथं झाली होती. तशी ती मंन्दोरची राहणारी होती. रावणाचा जन्म पुलस्य ऋषीचा मुलगा महर्षी विश्रवा व कैकसीच्या पोटी झाला होता. त्याचे वडील ऑगष्ट ऋषीचे भाऊ होते. त्यांना रावण, कुंभकर्ण, विभीषण व सुरपंखा असे पुत्र जन्मास आले. तसेच त्याच ऋषीची दुसरी पत्नी ऋषी भारद्वाजची मुलगी इलाविडापासून कुबेरचा जन्म झाला. जो रावणाचाच भाऊ होता. लंका ही कुबेराचीच राजधानी होती. परंतु रावणानं एकदा लंकेवर आक्रमण करुन कुबेराकडून लंका जबरदस्तीनं हिसकावून घेतली. कुबेर रावणाचाच भाऊ होता व त्यानं शिवभगवानाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती. कुबेर हा सात्विक स्वरुपाचा होता तर रावण हा दुराचारी स्वभावाचा होता. तो आपल्या उपद्व्यापी स्वभावानं कोणालाही त्रास देत असे. ज्याची तक्रार कुबेरापर्यंत पोहोचत असे. एकदा समजुतीच्या स्वरात त्यानं रावणाकडे एक दूत पाठवला. ज्यातून रावणानं त्याच दूताला ठार केलं. त्यातच कुबेराचा सल्ला रावणाला आवडला नाही व त्यानं ठरवलं की ज्या राज्याचा कुबेर राजा आहे. ते राज्य आपण जिंकावं. तसा विचार करताच रावणानं एक दिवस लंकेवर स्वारी केली व लंकेला जिंकून कुबेराला हाकलून लावलं. त्यानंतर कुबेर आपल्या वडिलांजवळ राहायला निघून गेले होते. रावणाला दृष्ट प्रवृत्तीचं मानलं जातं. त्यामूळं रावणाचं दसऱ्याला दहन. का तर तो दृष्ट प्रवृत्तीचा होता. त्यानं बालपणापासूनच कितीतरी निरपराध वस्तू, जीवजंतू व निरपराध प्राणीमात्रांना त्रास दिला. एवढा त्रास की तो त्रास सहन होणारा नव्हता. रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा होता काय? तो सात्विक नव्हता काय? याचं उत्तर तो दृष्ट प्रवृत्तीचा होता असंही येतं आणि नव्हता असंही येतं. होय, या दृष्टीनं विचार केल्यास त्याचा साधू संतावर होत असलेला अत्याचार पाहून त्याच्या मोठ्या भावानं म्हणजेच कुबेरानं त्याला समजावण्यासाठी एक दूत त्याच्याकडे पाठवला. ज्यात रावणाला भयंकर राग आला व त्या दुताचा कोणताही अपराध नसतांना त्याची हत्या केली. रावण एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं कुबेरावर हमला करुन त्याच्या डोक्यावर भयंकर वार केला. कसाबसा कुबेर जीव वाचवून पळाला. नाही तर तो जागीच मरण पावला असता. एवढंच नाही तर त्याच्या अत्याचाराचे शिकार झाले ते निरपराध साधू संत की जे निरपराध होते. त्यातच त्यानं जेव्हा सीतेला पळवून आणलं. तेव्हा त्याला समजावणाऱ्या विभीषणाला त्यानं पायानं मारहाण केली होती. तसंच आपल्या मोठ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस चक्कं त्यानं सर्व ग्रहांनी लाभस्थानातच राहावं अशी धमकी दिली होती आणि जो शनी बाराव्या स्थानात गेला. त्यालाही तद्नंतर बंदी बनवलं होतं. त्यातच सीतेचं अपहरण हे निमित्तमात्र ठरलं. हा झाला त्याच्या दृष्टपणाचा भाग. चांगूलपणाचा भाग त्यानं परिवारासाठी दाखवला. ज्यात त्यानं सुरपंखेचा लक्ष्मणाकरवी नाक कापल्याची घटना ऐकताच त्यानं क्रोधीत होवून सीतेचं पलायन केलं. कारण त्याला ती घटना सहन झाली नाही. दुसरा चांगूलपणाचा भाग आहे मेघनाद. ज्याला परमसुख लाभावं म्हणूनच त्यानं सर्व ग्रह लाभस्थानी आणले होते. मंदोदरीवर तो आयुष्यभर प्रेम करीत राहिला आणि लंकेतील आपल्या प्रजेला सुखी ठेवलं. हे रावणानं केलं व रावण असे का करु शकला? याचं उत्तर आहे त्याला प्राप्त झालेलं ज्ञान. त्याला अगाढ ज्ञान प्राप्त झालं होतं. विशेष म्हणजे कोणत्याही जीवाची सात्विकता स्पष्ट करतांना तो घटक परिवाराशी कसा वागला. त्यावरुन त्याची सात्विकता प्रकट होत नाही, तर तो समाजात कसा वागला. त्यावरुन त्याची सात्विकता प्रकट होते. रावणाचा जन्म हा राक्षसकुळातील असला तरी त्यात ब्रम्हतत्वाचे गुण होते. त्यानं कठोर तपश्चर्या केली होती. त्याला दशानन असेही म्हणतात. कारण त्याला दहा प्रकारच्या कला येत होत्या. तंतूवाद्य त्याला चांगलं अस्खलितपणे वाजवता येत होते. त्यावरुन त्याला दहा तोंडं वा दहा हात नव्हती, तर त्याच्यामध्ये दहा प्रकारचे गुणदोष होते. रावण हा भगवान शिवाचा भक्त होता. एकदा त्याच्या स्वप्नात शिवभगवान आले. त्यांनी त्याला म्हटलं की हे रावणा, तू कैलासावर ये. त्यावर रावण कैलासावर गेला व त्यांना बोलावण्याचं प्रयोजन न विचारता म्हणाला की तुम्ही लंकेत या. मी तुम्हाला सोन्यानं मढवतो. त्यावर भगवान शिवानं म्हटलं की तुझ्यात ताकद आहे तर तू मला उचलून खांद्यावर ने. तसा रावणाला गर्वच होता, त्याच्यातील तुफान ताकदीचा. परंतु तो शिवाला उचलून खांद्यावर घेवूच शकला नाही. रावणाला सहा भाऊ होते. खर, दुषण, कुंभकर्ण, कुबेर, विभीषण. तशाच दोन बहिणी होत्या. सुरपंखा आणि कुंभीणी. कुंभीनी ही मथुरेतील मधुदैत्याची पत्नी बनली होती. लवणासूर हा तिचा पुत्र. तसाच कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा सुरपंखेचा पती. रावण ज्ञानी होता व तो जीवनभर ज्ञानाच्या शोधातच राहिला आणि असे ज्ञान मिळवीत असतांना त्यानं कुणाला त्रासही दिला. शिवाय त्यानं एवढे ज्ञान मिळवले होते की त्या ज्ञानाचा त्याला गर्व झाला होता. म्हणतात की त्या दहा तोंडं होती. परंतु सत्य हे आहे की त्याला दहा तोंड नसून दहा प्रकारचे गुण वा विद्या वा ज्ञानकौशल्य त्याच्यामध्ये अस्तित्वात होते. म्हणतात की रावण हा तपश्चर्या करण्यात आघाडीवर होता व एक दिवस त्यानं ब्रम्हदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. ज्यात त्यानं आपले दहा मुंडके कापले. परंतु ते धांदात खोटं वाटत असून त्यानं तपश्चर्येदरम्यान त्याला प्राप्त होणारे ज्ञान अनुक्रमानं दहावेळा ब्रम्हचरणी प्रकट केले होते. म्हणतात की रावणाला ब्रम्हदेवानं एक अमृताची कुपी दिली होती. परंतु तसं काही दिलं नसून ब्रम्हानं त्याला आशीर्वाद दिला होता की तुला जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे. त्याचा खऱ्या रुपानं वापर केल्यास तुझं ज्ञान चिरकाल टिकेल व तूही चिरकाल टिकशील. कारण ज्ञान जर माणसात असेल तर तो भवसागरही पार करुन जातो. जसं पोहण्याचं ज्ञान असेल तर कितीही खोल पाण्यात पडू द्या. तो वाचतोच. रावणही तसाच बरेच दिवस जगला. कारण त्याला प्राप्त झालेलं ज्ञान ही अमृताची एक कुपीच होती. जी त्यानं मेंदूत न ठेवता पोटात ठेवली. अर्थातच त्या ज्ञानाचा वापर त्यानं साम्राज्य वाढविण्यासाठी केला. ज्यात कंबोडिया, लाओसपर्यंतचा बराचसा भाग त्यानं जिंकून घेतला होता. ज्यातून बऱ्याच लोकांना त्रास झाला होता. त्यांच्या त्यानं हत्याही केल्या होत्या. तेच ज्ञान जर त्यानं जर मेंदूत साठवलं असतं तर मेंदूतील ज्ञानाचा योग्य वापर करुन त्यानं चांगले निर्णय घेतले असते. ज्यातून त्याला वाईट व करुण मृत्यू असंभव होता. परंतु जसजसं त्याचं ज्ञान वाढत गेलं. तसतसा त्याचा गर्वाचा डोंगरही वाढतच गेला. ज्यातून त्याला मरणासन्न यातनाही झाल्या. तसं पाहिल्यास ज्ञान एवढंच असावं की त्याचा उहापोह होवू नये. ज्यात एखादा अनाडी परवडला. परंतु शहाणा माणूस नाही. कारण शहाण्या माणसाचा बैल नक्कीच रिकामा असतो. समजा एखाद्याला पोहण्याचं अगाढ ज्ञान आहे. परंतु त्याला ते पाण्यात पडल्यावर आठवलंच नाही तर काय होईल. अर्थातच तो बुडेलच. रावणाचंही तेच झालं. अगाढ ज्ञान त्याला प्राप्त असल्यानं त्याचा परिवार त्याच्या डोळ्यासमोर मरण पावला. परंतु त्यानं नमतं घेतलं नाही. मंदोदरी ही त्याची प्रिय राणी. तशा त्याला एक हजार भार्या. परंतु मंदोदरी ही अतिशय प्रिय होती. तिनंही त्याला सल्ला दिला होता की त्यानं सीतेला सोडून द्यावं. परंतु तेही त्यानं त्याला प्राप्त असलेल्या ज्ञानामुळं ऐकलं नाही. विचार केला की आपल्याला भरपूर ज्ञान प्राप्त आहे. आपण निश्चितच रामाचा अंत करु शकतो. अन् जेव्हा त्याला प्राप्त असलेल्या ज्ञानानं त्याला खरा मार्ग दाखवला. तेव्हा वेळ निघून गेली होती. शेवटी मरणासन्न अवस्थेत असतांना त्याला अक्कल आली व त्यानं मंदोदरीला बोलावलं. म्हटलं, "हे मंदोदरी, तू माझी प्रिय राणी. प्रिय राणीचा दर्जा हा मी तुलाच दिला. इतरांना नाही. तू माझी पट्टराणी आहेस. तेव्हा मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी जे केलं. ते बरोबर नाही. मात्र माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या पार्थिवावर सती जावू नकोस. राम खरंच आदर्श आहे. त्यानं दाखवून दिलं की आगावूचं ज्ञान हे काही कामाचं नसतं. ते फोल ठरतं जीवन जगत असतांना. मी तसा दोषी आहे. ज्ञानाच्या भरवशावर मी लोकांना त्रास दिला. मात्र हा जो मला बोध झाला. तो बोध मला जगाला द्यायचा आहे. परंतु आता वेळ निघून गेली आहे. माझे सर्व नातेवाईक, आप्त मरण पावले आहेत. शिवाय विभीषणही माझं ऐकणार नाही. तेव्हा एकच पर्याय आहे तू. तू जीवंत राहावी व मला अंतिम समयी प्राप्त झालेलं ज्ञान हे तू जगाला द्यावं. म्हणजे जगाचं कल्याण होईल. राम आदर्श आहे. तू त्याला ही गोष्ट सांग. सांग की आगावूचं ज्ञान फोल असतं. ज्यातून माझ्या पतीचा अंत झालाय. आता यापुढे माझ्या मृत्यूनंतर राम काय सांगतो. तसं कर. तो तुलाही चांगलाच मार्ग दाखवेल." आजही असे रावण जगात भरपूर आहेत. ज्यांना त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा गर्व आहे. ज्यांना वाटते की आपण आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाने बरंच काही करु शकतो. परंतु अति शहाणा त्याचा बैल रिकामा असल्यागत त्यांना प्राप्त ज्ञानाचा गैरवापर केल्यास तो व्यक्ती निश्चित खड्यातच पडतो रावणासारखा. हे शिक्षण क्षेत्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यावरुन लक्षात येईल. संगणकाचं अगाढ ज्ञान प्राप्त झाल्यानं बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून खोटी कागदपत्र बनवली व जे लायक नव्हते. तेही शिक्षक बनले. ज्यातून शिक्षण क्षेत्राला बदनाम केलं गेलं. शेवटी लटकले. कारण अधिकारी बनलेल्या वर्गाला जास्त ज्ञान प्राप्त झाल्यानं त्यांनी ते ज्ञान पोटात साठवलं व जसा रावणानं साम्राज्य विस्तार केला. तसाच त्या अधिकाऱ्यांनी विनाकारण समाजहित न पाहता स्वतःचा पैसा वाढवला व गैरमार्ग अवलंबून शिक्षकांच्या मान्यता प्रदान केल्या. जर हेच अधिकारी वर्गाला प्राप्त असलेलं ज्ञान त्यांनी मेंदूत साठवलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. तसंच दुसरं उदाहरण. न्यायाधीश महोदयांना ज्ञान प्राप्त झाल्यानं ते न्यायाधीश बनले व त्यांनी निर्णय दिला. परंतु ते त्यांच्या पोटात ज्ञान असेल की मेंदूत असेल, त्यांनी टेट परिक्षेचा निर्णय दिला. ज्यातून देश देशोधडीला जावू शकतो अन् जावूही शकत नाही. जेव्हा परिस्थिती तशा स्वरुपाची तयार होईल. तेव्हा त्याचं स्वरुप कळेल. महत्वपुर्ण बाब ही की ज्ञान ही अशी संकल्पना आहे की ते जास्तही नको की त्या ज्ञानाचा आपल्याला गर्व भासेल. ज्यानं रावणासारखा आपलाही अंत होईल. म्हणूनच प्रत्येकानं ज्ञान मिळवावं. अगाढ ज्ञान मिळवावं. परंतु त्या ज्ञानाचा योग्यप्रकारे वापर करावा. गैरवापर करु नये वा ज्ञानाचा वापर करीत असतांना गैरमार्ग अवलंबू नये. रावणानं मंदोदरीला सांगितलं. सांगितलं की त्याला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे. ते अनमोल आहे. त्यासाठी तू जीवंत राहायला हवं. कारण ते ज्ञान तुझ्याशिवाय कोणीच लोकांना देवू शकणार नाही. असा माझ्या हिताचा कोणीच नाही की जो मला प्राप्त झालेलं ज्ञान जगाला देईल. रावण सांगत होता, त्याला प्राप्त झालेलं ज्ञान, आपल्याच प्रिय पत्नीला. त्यानं पुढं म्हटलं, "मंदोदरी, एक सुलोचना होती की जी मला प्राप्त झालेलं ज्ञान लोकांना सांगू शकली असती. परंतु ती सती गेली या जगातून. तिनं नाव कमवलं. अन् ती तरी काय करणार या जगात जीवंत राहून. लोकांनी नावबोटंच ठेवले असते तिला. म्हटलं असतं तिला वारंवार की हिच्या सासऱ्यानं सीतेला पळवलं. हिच्या पतीनं आपल्या वडिलांना मदत केली. म्हटलं असतं की तो विभीषण पाहा की त्या विभीषणानं रामाला मदत केली." रावणानं आवंढा गिळला. तसा तो पुन्हा म्हणाला, "मंदोदरी, सुलोचना ते सगळं सहन करु शकली नसती. ती हळवी होती. कणखर नव्हतीच. अपमान सहन होत नव्हता तिला. अन् ती तरी कशी सहन करणार सासऱ्याबद्दलकं बोलणं. हं, तू सहन करु शकतेस आपल्या पतीबद्दलचं बोलणं. कारण तू पत्नी आहेस माझी. सुलोचनेवरुन मला आठवलं की तू जर जीवंत राहिली, तर तुलाही लोकं दुषणे देतीलच. तुलाही नावबोटं ठेवतीलच. शिवाय तुझ्या सन्मानालाही ठेच लागेलच. याची मलाही चिंता आहे. परंतु यावर एक उपाय आहे. मी मरण पावताच तू विभीषणाशी विवाह कर. त्याची पट्टराणी बन. म्हणजे तुला चिंता करायची काहीच गरज राहणार नाही. तुला सन्मानही मिळेल व तुला कोणीच काही म्हणणार नाही. विभीषणही चांगला आहे. तो तुला सांभाळून घेईल." रावण मृत्युशय्येवर होता. त्याच्या मनात भयंकर चिंता होती. परंतु आता त्याच्या मनात क्रोध नव्हता, ना रामाबद्दल आकस होता. उलट रामाबद्दल त्याच्या मनात आदरच निर्माण झाला होता. मंदोदरीला सती जायचं होतं. तसा तिनं विचार करुन ठेवलाच होता. रावणानं मंदोदरीला जे म्हटलं. ते लक्षपूर्वक ऐकल्यानंतर मंदोदरी विचलीत झाली. विचलीत झाली, कारण त्याकाळात सती जाण्याची प्रथा होती. तसं तिला कोणाची दुषणं ऐकत जीवन जगायचं नव्हतं. अन् तसं जीवन तिलाही आवडत नव्हतं. त्यामुळंच ती सती जाणार होती. तो काळ व त्या काळात असलेली सतीप्रथा. स्रिया पतीच्या शरणावर सती जात असत. त्याचं कारण असायचं समाजाचं वागणं. समाज पती निधनानंतर अशा विधवा झालेल्या स्रियांना चांगली वागणूक देत नसे. शिवाय सती जाणाऱ्या स्रिला पतीव्रता समजलं जात असे. अन् ती जर जीवंत राहिली तर तोच समाज तिला दुषणं देत देत जगवत असे. म्हणत असे की ही बला होती. म्हणूनच तो मरण पावला. समाजाचं असं बाकीच्या स्रियांबद्दल वागणं पाहूनच इंद्रजीतची पत्नी सुलोचनाही सती गेली होती. हे तिनं प्रत्यक्ष पाहिलं होतं नव्हे तर अनुभवलं होतं. समाजाचा रोष सहन करावा लागू नये म्हणून. मंदोदरीला तिच्या पतीनं म्हणजेच रावणानं माझ्या निधनानंतर सती जावू नकोस, तर जीवंत राहा. असं म्हणताच ती विचार करु लागली. विचार करु लागली की मी कशी राहणार जीवंत. अन् विभीषण माझे दीर. त्यांचेशी विवाह तरी कसा करणार? अन् तसं जरी माझं प्रयोजन असलं तरी ते मला शक्य होईल काय? माझी हिंमत तरी होईल काय, विभीषणाला विचारायची. म्हणायची की बाबारे, तू माझ्याशी विवाह करशील काय? हं, ठीक आहे की मी लंकेची पार्वतीच आहे. परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर खरंच माझा शब्द तरी इथं खपेल काय? ती विचारच करीत होती. तसा विचार करीत असतांना रावण म्हणाला, "मंदोदरी, तू नीट ऐकली ना माझी गोष्ट. तू पाळशील ना मी सांगीतलेल्या गोष्टी. तू सांगशील ना मला प्राप्त झालेलं ज्ञान जगाला. तसं तू मला वचन दे." रावण मृत्युशय्येवर. तो मृत्युशय्येवर असतांना बोलत होता. तो आपल्या प्रिय पत्नीला बोलत होता. तशी विचार करणारी मंदोदरी आपल्या पतीला म्हणाली, "नाथ, आपण कशाला चिंता करता. अन् कोणत्या ज्ञानाची गोष्ट करता. काश! हेच ज्ञान तुम्हाला आधीच प्राप्त झालं असतं तर........ तर ही वेळच आली नसती. आता जावू द्या त्या ज्ञानाच्या गोष्टी. आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान मी जगाला देणार नाही. मलाही आपल्यासोबत सती व्हायचं आहे. अन् मी ही वस्तुस्थिती आपल्यासमोर का बरं मांडत आहे. त्याची कल्पना आहेच आपणास. अहो, आपल्या मृत्यूनंतर मी जर जीवंत राहिले ना. तर हा समाज मला जगू देणार नाही. हा समाज मला किती तिडून भाजून खाईल. याची कल्पना नाही आपणाला. म्हणेल की ही त्या त्रैलोक्यनाथ रावणाची भार्या आहे. म्हणेल की हिचा पती असा होता. तसा होता. मग मी काय उत्तर देणार? हं, आपण आतापर्यंत जीवंत होते. म्हणूनच कोणात हिंमत नव्हती मला काही म्हणायची. परंतु आपल्या मरणानंतर........?" मंदोदरी बोलत होती. तसा तिचा शब्द मधातच डावलत रावण म्हणाला, "म्हणूनच मी म्हणतोय की माझ्या मृत्यूनंतर तू बिभीषणाशी विवाह करायचा." "परंतु नाथ, ते शक्य तरी आहे काय?" "का नाही शक्य?" "अहो, मी तसं विवाहाबद्दल त्यांना विचारणार तरी कशी आणि तसं विचारलं जरी. तरी विभीषण माझ्याशी विवाह तरी करेल काय?" मंदोदरीनं म्हटलेले शब्द. ते शब्द मृत्युशय्येवर असलेल्या रावणानं ऐकताच तोही सखोल विचारात गढल्या गेला. तसा तो म्हणाला, "हे बघ, मंदोदरी. तसं केल्याशिवाय मला प्राप्त झालेलं ज्ञान जगासमोर जाणार नाही. जे फक्त नि फक्त तूच करु शकतेस. मी केलंही असतं. जर माझ्या समोर मृत्यू नसता तर...... मृत्यूनं कदाचित मला शिवलं नसतं तर..... परंतु आता मृत्यू काही माझ्या हातात राहिलेला नाही. तो माझ्या मुठीतून केव्हापासून निसटून जाण्याच्या तयारीत आहे. आता तो मला सोडून केव्हा जाईल. याची काही शाश्वती देता येत नाही. आता तू ठरव की तुला माझ्यासोबत यायचं आहे, संबंधित सर्व ज्ञान जमीनीत गाडून टाकण्यासाठी की तुला याच धरणीवर राहायचं आहे, आपल्या संबंधित पिढ्या सक्षम करण्यासाठी. तुला जर वाटत असेल की येणारी भविष्यातील आपली पिढी सक्षम व्हावी. तर तू जीवंत राहायला हवं. त्यातच तू विभीषणाशी विवाहबद्ध व्हायला हवं. जेणेकरुन तू सांगत असलेलं ज्ञान संपुर्ण जग ऐकू शकेल." "परंतु स्वामी, जर मी तसं केलं तर ते एका पतीव्रता स्रिला शोभेल काय? मी जर तुमच्यानंतर विभीषणाशी विवाह केला तर त्यात पत्नीधर्म असेल काय? तो धर्म केव्हाच नष्ट झालेला असेल. मग मी कसा करणार विभीषणाशी विवाह?" "रामानं म्हटलं तरीही नाही!" "राम....... राम. राम सांगेल मला तशा स्वरुपाचा विवाह करायला?" "होय, सांगेलच. माझं अंतर्मन म्हणतं." "असं जर असेल तर ठीक आहे. मी त्यावर त्यावेळेस विचार करेल." ती रावणाची मृत्यूशय्या. रावण रणांगणांवरच मृत्युशय्येवर पडला होता. त्याला लंकेत आणण्याचा मंदोदरीनं बराच प्रयत्न केला. परंतु त्यानं नकार दिला. तोच त्याला भेटायला राम आला. तशी सुचना मंदोदरीनं रावणाला दिली. तसं रावणानं मंदोदरीला तेथून प्रस्थान करण्यास सांगीतलं. म्हटलं की मला रामाशी महत्वपुर्ण विषयावर चर्चा करायची आहे आणि त्यासाठी मला एकाकी सोड. मंदोदरीनं रावणाचं ऐकलं व ती त्याचेजवळून उठून बाजूला गेली. तोच राम साक्षात रावणाच्या जवळ आला. त्यानंतर ते दोघंही बोलायला लागले. रावण म्हणाला, "राम, मला माफ कर. मी तुला सीता परत करु शकलो नाही. त्याचं कारण आहे माझा मृत्यू. माझा मृत्यू तुझ्याच हातात होता. परंतु माझी एक इच्छा आहे, अन् तीच माझी चिंताही. मला माहीत आहे की तू आदर्श आहेस. तेव्हा ते कार्य तू करशीलच." "कोणती चिंता आहे आपणास?" "मला तर आता मृत्यू येणार आहे. तेव्हा माझ्या पश्चात मंदोदरीचा विवाह विभीषणाशी करुन द्यावा. अन् माझ्याजवळचं सखोल ज्ञान हे जगाला मिळावं. बस एवढंच. बोल. हे माझं कार्य तू करु शकशील काय?" रामानं रावणाचं ऐकलं. तसे ते विचार करु लागले. तोच तेही म्हणाले की हे शक्य आहे काय? त्यावर रावण म्हणाला, "राम, तुला काय शक्य नाही. अरे तू ज्या व्यक्तीला आज धराशायी केलं. तो काल त्रैलोक्याचा सम्राट होता. सारी सृष्टी त्याला घाबरत होती. सर्व ग्रह, तारे तसंच स्वर्ग, पाताळ आणि मृत्यूलोकंही. त्या रावणावर तू सहज विजय मिळवला. मग तुला ते कसं शक्य नसेल? अन् ते कार्य तुला करावंच लागेल. त्याला एक कारण आहे." "कोणतं कारण आहे असं महत्वपुर्ण? जरा मलाही कळू दे." "हे बघ राम. ज्ञान तेवढंच असावं माणसाला. जेवढं त्याला पचतं. अतिरिक्त ज्ञान त्याला नकोच की ज्याचा गर्व होईल व गर्वानं तो त्रैलोक्याचा स्वामी बनण्याचा प्रयत्न करेल. तो आंधळा होईल गर्वाने. मग त्याला मागचं पुढचं काहीच दिसणार नाही. दिसेल केवळ अंधकार. ज्यानं जगाची नाही तर सृष्टीची धुळधानीच होईल. तेच ज्ञान पाजलं मी मंदोदरीला. मात्र ती जीवंत असणं गरजेचं आहे. ती तेव्हाच जीवंत राहू शकेल. जेव्हा तिचा माझ्या मृत्यूनंतर गेलेला सन्मान तिला परत मिळेल. हे तेव्हाच शक्य होईल. जेव्हा तिचा विवाह विभीषणाशी होईल. तसाच जेव्हा विभीषण लंकेचा राजा असेल. मला माहीत आहे की विभीषण हाच लंकेचा राजा व्हावा माझ्यानंतर. कारण त्याच्याशिवाय दुसरा लंकेचा राजा होण्यासाठी वारसच उरला नाही लंकेत." रामानं रावणाचे बोल ऐकले. त्या बोलात विलक्षण ताकद होती की ज्या ताकदीच्या भरवशावर जगात बदल होवू शकणार होता. अन् हेही तेवढंच खरं होतं की मंदोदरीच ते कार्य करु शकणार होती. राम विचार करीत होते. तोच रावण त्याला म्हणाला, "राम, कसला विचार करतोस? ठरवलं का मी सांगीतलेलं प्रयोजन तू मनात? पटलीय का तुला माझी गोष्ट?" रावणाचे ते बोल. त्यावर विचार करीत राम म्हणाले, "होय. पटलीय मला तुझी गोष्ट." "मग काय ठरवलं? विभीषणाशी मंदोदरीचा विवाह करुन देशील?" "होय." "तसं वचन दे मला." "हे कार्य फक्त मंदोदरीच करु शकेल काय?" "म्हणजे?" "दुसरा कोणी करु शकणार नाही काय?" "राम, माझ्या समक्ष आता तरी दुसरा कोणी दिसत नाही मला." "मला दिसतोय." "कोण?" "लक्ष्मण." "ठीक आहे. परंतु मी विश्वास तरी कसा करु? अन् तुझंही बरोबर आहे. मंदोदरी आणि लक्ष्मण दोघांनाही त्याचं तसं ज्ञान असणं गरजेचं. एक विसरलाच तर दुसरा. तसं वचन दे मला." रामानं रावणाला वचन दिले. तसा तो म्हणाला, "राम, मी आता सुखानं मरु शकेल." "ठीक आहे. परंतु माझंही एक काम आहे. कदाचीत माझ्या बंधूलाही आपण बोध द्यावा. मी त्यालाही आपणाकडे पाठवतोय आपल्याशी परामर्श करायला." "ठीक आहे. पाठव राम लवकर. कारण माझ्याकडे वेळ फारच कमी राहिलेला आहे." रावणाचं बोलणं संपताच राम तेथून निघाले. तो थेट लक्ष्मणाजवळ गेले. म्हणाले, "लक्ष्मणा, हा रावण अति विद्वान. प्रकांडपंडीत. कदाचित त्याचेपासून तुलाही बोध होईल. जा त्याचा आशीर्वाद घे." रामानं म्हटलेली गोष्ट. ती ऐकताच लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं व तो रामाकडे आश्चर्यकारक नजरेनं पाहू लागला. तोच राम म्हणाले, "काय झालं असं?" "तो रावण. तो काय मला बोध देणार!" "लक्ष्मणा, असं बोलू नकोस. तो हुशार आहे आणि मरतासमयी कोणत्याही माणसाच्या मनात कपट नसतोच. तो मरतासमयी जे बोलतो. ते खरं असतं. ज्याचा जीवनात आपल्याला उपयोग होतो. जा आता त्याचेकडे. " लक्ष्मणानं रामाचं ऐकलं व तो हीनच भावनेनं रावणाकडे गेला. त्याला दंडवत घातलं. तसा तो म्हणाला, "रावण महाशय. माझ्या भावानं पाठवलं तुझा आशीर्वाद घ्यायला. सांग काय बोध करु शकतोस मला?" "हे बघ, ज्याचा भाऊ हा त्याच्यासोबत असतो. त्या व्यक्तीला कोणाचंच भय नसतं. तो चिरंजीव असतो." रावण बोलला. जे बोलला ते खरं होतं. परंतु ते काही त्याला समजलं नाही. तसा तो उठला व रामाकडे निघून आला. तसं रामानं त्याला विचारलं व रामानं त्याला विचारल्यावर त्यानं सगळं सांगताच राम म्हणाले, "लक्ष्मणा, आता मला सांग, तू त्यातून असा कोणता बोध घेतला?" "बंधो, मला समजलं नाही." "ठीक आहे, वेळ आल्यावर समजेल." असं म्हणत राम चूप झाले. रावण मरण पावला होता. त्याचं प्रेत शाबूत राहावं व त्याचं प्रेत पुरण्यात आलं त्याच डोंगराच्या भुमीत. त्यानंतर रावणाच्या मृत्यूनंतर लंका पोरकी झाली होती. त्या लंकेला राजा हवा होता. तशी लंका ही कुबेराची राजधानी. कुबेराला पाचारण केलं गेलं व विचारणा केली गेली. परंतु कुबेरानं राजा बनण्यास नकार दिला. वाटलं की पुढंही एखादा रावण तयार होईल व हे राज्य माझ्या हातून हिसकावून नेईल. त्यापेक्षा नकार दिलेला बरा. कुबेरानं नकार देताच रामानं विभीषणाला विनंती केली व त्यालाच लंकेचा राजा बनविण्यात आलं होतं. रावण ज्यावेळेस मरण पावला. त्यावेळेस काही दिवस राम लंकेतच निवाशी होता. विभीषण राजा बनला होता व रामानं त्याला राजपद दिलं होतं. तसा राम विचार करीत होता मंदोदरीचा. रावणानं म्हटल्यानुसार मंदोदरीचा विवाह विभीषणाशी करायचा होता. रावण मरण पावला होता. त्यानंतर मंदोदरी काही सती गेली नाही. रावणानं म्हटल्यानुसार व आग्रहाखातर मंदोदरी जीवंत राहिली. परंतु आता ती दुःखातच बुडून राहात असे. तशी ती आपल्या कमऱ्यातच राहायची. ती विचार करायची की लोकं तिला हिनवीत असतील. दुषणे ठेवत असतील. परंतु पुढे येवून बोलायची हिंमत होत नसेल. मंदोदरी जीवंत होती व मंदोदरीला गतकाळातील आठवणी आठवत होत्या. एकएक आठवण येत होती. तशी तशी आठवण येताच अतिशय दुःखी होत होती. तिला आठवत होती सुलोचना व तिचाच मुलगा सुलोचनेचा पती. ज्याचं नाव इंद्रजीत होतं. मंदोदरी पतीव्रताच होती. तसंच तिचं रावणावर जास्त प्रेम होतं. त्यातच ते रावणाचं युद्ध. त्यातच रावणाचा मृत्यू झाल्यानंतर मंदोदरी रणमैदानात गेली. तिनं पाहिलं की तिथं लंकेतील लोकांची प्रेतेच प्रेते पडलेली आहेत. त्याचं तिला फार वाईट वाटलं. ज्यातून तिचा राग अनावर झाला होता. रागाच्या भरात ती रामाकडे गेली व रामाला तिनं लागलीच शाप दिला. तूही आपल्या राज्यात पत्नीवियोगानं तडपशील. त्यावेळेस ती आपलं पुत्रीप्रेम विसरुन गेली होती. लागलीच राम जेव्हा अयोध्येत आले. तेव्हा सीतेनं रामाला अयोध्येतील प्रजेनं काही म्हणू नये. म्हणून ती वनवासात गेली. त्यातच तिनं अख्खं आयुष्य वनवासातच काढलं होतं.