Reunion - Part 25 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 25

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 25

ऊमाने मोहनला आणि त्याच्या मित्राला परत परत आग्रहाने वाढले .सर्वांचे खाऊन झाल्यावर ऊमाने नयनाला सर्वांच्या पाया पडायला लावले आणि सर्वांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले .मोहनमामाला आणि त्याच्या मित्राला नयनाने नमस्कार केला .मोहनने नयनाला जवळ घेतले आणि त्याच्या मित्राने नयनाला भातुकलीचा खेळ भेट दिला . तेव्हढ्यात नयनाला आठवले ,“मामा अरे तुझे सरप्राईज गिफ्ट कुठे आहे ?”नयनाचा हा प्रश्न ऐकल्यावर ऊमा पण थोडी बिचकली ..नयनाच्या डोक्यात एकदा एखादी गोष्ट शिरली की त्याचे निराकरण झाल्याशिवाय गप्प बसत नसे .आता काय करणार मोहन ?अशा प्रश्नार्थक नजरेने तिने मोहनकडे बघितले .मोहन नयनाकडे बघून म्हणाला ..अरेच्या विसरलोच ...थांब गाडीतून घेऊन येतो असे म्हणून तो बाहेर पडला .नयनाच्या मित्र मैत्रिणी सगळे  आता खाणे झाल्यावर आपापल्या घरी निघाल्या होत्या त्यांना नयनाने परत बोलावले .आणि सर्वांना सांगितले की तिच्या मामाने तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणले आहे ते बघायला थांबा.मोहन वाड्याबाहेर गेला आणि येताना एक मोठी पिशवी घेऊन आला .सगळीजण पाहत होती काय बरे असेल त्यात ..?ऊमा पण बघतच राहिली हे काय चाललेय जवळ जवळ नयनाच्या उंचीची असलेली ती गिफ्टची पिशवी पाहून नयना हरखली .तिने उत्सुकतेने ती फोडली ..आतमध्ये मस्त काळ्या काळ्या डोळ्यांचा गुलाबी रंगाचा मउ मऊ गुबगुबीत टेडी होता .त्याला पाहिल्याबरोबर नयनाने त्याला आपल्या मिठीत घेतला आणि ती त्याचे पापे घेऊ लागली .“मामा कसला भारी आहे रे हा टेडी ..नयना खुश होती नयनाचे मित्र मैत्रिणी आणि वाड्यातले लोक पण हे गिफ्ट बघून चकित झाले .गिफ्ट म्हणून खरेतर सतीशला आणायचे ठरले होते पण ऐन वेळा हा बेत यशस्वी न झाल्याने  मोहनने ही शक्कल लढवली होती .ऊमाला मोहनच्या प्रसंगावधानाचे खूपच कौतुक वाटले .नयना थोडी दूर होती ..तेव्हाच ऊमा मोहनला म्हणाली ही आयडिया मस्तच काढली मोहन तुम्ही ..त्या वेळेस मला सुध्दा पंचाईत पडली होती तुम्ही काय कराल आता अशी . “हो वहिनी खरेतर दुपारी मला अचानक नयनाने सरप्राईज गिफ्टचे विचरल्यावर काही सुचेना .माझ्या डोक्यात तर तेव्हा सतीशचेच विचार होते त्यामुळे तेव्हा कशीतरी मी वेळ मारून नेली .पण मला माहित होते नयना शांत बसणार नाही आणि जरी ती लहान असली तरी फार तल्लख आहे  तिच्या डोक्यातून हा विषय जाणार नाही मग माझ्या डोक्यात आयडिया आली आणि पटकन बाहेर जाऊन हे घेऊन आलो .मोहनचे बोलणे ऐकून ऊमाने डोळ्यानेच त्याला ..भारी आहे अशी पावती दिली .सध्या तरी गिफ्टचा विषय अशा रीतीने समाप्त झाला होता .आणि नयनाचा वाढदिवस थाटामाटात पार पडला होता .  संध्याकाळचे सात वाजायला आल्यावर मोहन परत निघाला .तो सहसा कधीच त्याच्या मित्राकडे किंवा ऊमाकडे मुक्कामाला रहात नसे .काम झाले की ताबडतोब परतत असे .त्याने आपल्या मित्राचा,नयनाचा आणि ऊमाचा निरोप घेतला .नयनाने मामा परत लवकर मला भेटायला ये असे त्याला पुन्हा पुन्हा सांगितले .मोहन येणार होता हे माहित असल्याने ऊमाने त्याच्या घरी देण्यासाठी बेसन लाडू .चिवडा करून ठेवलाच होता .सोबत आजीसाठी नयनाच्या वाढदिवसाचा केक ऊमाने त्याच्या सोबत दिला .दिवसभर बरेच खाणे झाल्याने त्या रात्री थोडा मितकुट भात खाऊन नयना लौकरच झोपून गेली .दिवसभराच्या दगदगीने ती खूप दमली होती .ऊमाला पण काही खास भूक नव्हती .तिने एक कपभर दुध घेतले .आणि घरातली थोडी आवराआवर करून ती पण लाईट बंद करून नयना शेजारी पडली .ती सुद्धा खूप थकली होती .पण वाढदिवस आनंदात आणि थाटात आणि अगदी नयनाच्या मनाप्रमाणे पार पडल्याने मनाला एक समाधान होते. बाहेरच्या रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात नयनाचा नाजूक देखणा चेहेरा चमकत होता .डोळ्यावर केसांच्या बटा आल्या होत्या .त्या ऊमाने हलकेच बाजूला केल्या .गालावरचा तीळ नेहेमीच सतीशची आठवण करून देत असे .आज तर प्रकर्षाने तिला त्याची आठवण आलीच ..काय झाले होते कोण जाणे ..सतीशला ?सतीशचे वागणे नेहेमीसारखेच चमत्कारिक होते .त्याच्या वागण्याचा कोणालाच कधी अंदाज आला नव्हता .रात्री मोहनचा सुखरूप पोचल्याचा मेसेज आला होता .दुसरा दिवस नेहेमीप्रमाणे उगवला .नयनाची पण आज शाळा होती .तिला आवरून देऊन खायला घालून आजीकडे सोडून ऊमा कामावर जायला थोडी लवकरच निघाली .दुपारी जेवणाच्या सुटीत तिला मोहनचा फोन आला.काहीतरी सतीशविषयीच असावे असा अंदाज केला ऊमाने सतीश त्याचाही जवळचा मित्र असल्याने तोही अस्वस्थ असणे साहजिक होते “बोला की मोहन काय म्हणता ?”“वहिनी काय सांगू तुम्हाला तिकडून आल्यापासून सतीशचा विषय डोक्यातून जात नाही बघा मला माहित आहे तुमची ही अशीच अवस्था असणार आहे ..तिकडून बाहेर पडल्यावर मी अक्षरश: वीस पंचवीस फोन केले त्याला पण फोन बंदच लागत होता .इकडे येता येता असे काय झाले असेल की त्याचा फोन बंद लागतो आहे .शिवाय त्याने पण काही संपर्क साधला नाही .त्या नंबरवर मेसेज पण केले पण पोचल्याचे चिन्हच येत नाही .शेवटी मी त्या फोनचे लोकेशन पण ट्रेस करायचा प्रयत्न केला .माझ्या एका मित्राच्या मदतीने ..”त्याचे बोलणे अर्धवट तोडून ऊमा म्हणाली ..“मग काय झाले कोणत्या भागात आहे सतीश ..समजले का ?“आपल्या गावाच्या अलीकडे एक निर्जन भाग आहे जिथे काहीही वस्ती नाही आणि जंगल आहे तिथे त्या फोनचे लोकेशन सकाळी दाखवत आहे ..पण काय शोधणार तिथे आणि कसे शोधणार ?’मोहन म्हणाला ..“ मलाही काहीच समजेना झालेय ..येत येता काही घातपात तर झाला नसेल ना त्याचा ..?ऊमाच्या बोलण्यात दुख्ख: आणि भय होते  ..नाही नाही वाहिनी असे काही नका बोलु  .असेल सुरक्षित तो ..आपण सकारात्मक विचार करूयातुम्ही फार काळजी नका करू .मी लक्ष ठेवून आहे या गोष्टीवर आणि प्रयत्न ही करतो आहे त्याला शोधायचा .काही मिळाले तर कळवेन तुम्हाला ..नयनाची काळजी घ्या ..ठेवू का फोन ?”“ठीक आहे मोहन तुम्ही आहात त्यामुळे काळजी नाही मला .बघा काय काय कसे जमते ते .काही माहिती मिळाली तर कळवालच मला तुम्ही तुमच्यासारखीच माझी पण अवस्था असणार आहे “असे बोलून ऊमाने फोन ठेवला सतीश असताना पण असाच तिला चिंतेत टाकून जात होता .आणि आता तो नाहीय तरी ऊमाला चिंताच लागून राहिली होती .  यानंतर कित्येक दिवस मोहनने जंग जंग पछाडले .पण सतीशचा पत्ता अजिबात लागला नाही .शेवटी सतीश आणि ऊमा दोघांनी ठरवले आता हा विषय सध्या बाजूला ठेवायचा .बघू पुढे काय होते ते .मोहनने आपल्या पोलीस खात्यातील मित्रांना सुद्धा सांगून ठेवले कधीही याविषयी काहीही माहिती मिळाली तर सांगायला .असे कित्येक दिवस जातच होते आणि काहीही घडले नाही.   आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नसते . तर पुढे जातच असते ..ऊमा आणि नयना तशाच आपल्या आयुष्याच्या चाकोरीतून जातच होत्या ..क्रमशः