भाग ३.
"ओम भगा भुगे भगनी भगोदरी ब्रम्हासे क्लीमना क्लीमना ओम भट स्वाहा!", तिच्या छातीवर हात ठेवत कोणीतरी बोलत असते. आवाज ही विचित्र होता. असे हात ठेवल्याने भीतीने तिचा थरकाप होत होता. हळूच धीर करून आपले डोळे ती उघडते आणि पाहते. तर समोर तिचा टेडी बसलेला होता. त्याचे हात तिच्या छातीवर होते. तो मंत्र बोलत असतो. आता त्याचा आवाज खूप कर्कश वाटत होता. तिला तर सगळ पाहून खूपच भीती वाटत असते.
"काय....काय ....करत आहेस तू?",ती कसेबसे भीतीने एक एक शब्द जुळवत विचारते.
"थांब! मला माझं काम करू दे! हा मंत्र म्हटला की माझा आत्मा तुझ्यात , तुझा आत्मा बाहेर!",टेडी अगदी तात्या विंचू सारखे बोलत असतो. आता मात्र ती त्याला दूर ढकलून देते. मोठ्याने श्वास घेत असते.
"तू पागल आहेस का?झपाटलेला पिक्चरचे डायलॉग बोलून मला वर पोहचवण्याची तयारी करत आहेस का? किती भीती वाटली मला तुझ्या अश्या वागण्याने.", अजूनही तिचे हात आपल्या छातीवर होत. श्वास वर खाली होत होते. टेडी जो खाली पडला होता तो उठून उभा राहतो.
"मला कंटाळा आला आहे अस राहून राहून. मी झपाटलेला पिक्चर लहान असताना पाहायला गेलो होतो. तेव्हा ते बघितल होत. तात्या विंचू लक्ष्मीकांत यांच्या अंगावर बसून मंत्र बोलत असतो ते. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. मग ट्राय करत होतो. खरच होत का पाहायला. सॉरी.", टेडी खूपच वैतागत बोलत असतो.
"रात्री ३ वाजता तू अस काही करत असेल तर भीती वाटणारच ना? तो पिक्चर होता. हे इथ खर आयुष्य आहे. उलट सुलट होईल सगळ. आता तर मलाच भीती वाटत आहे तुझी.",गायत्री रागात म्हणाली. (विचार करा रात्री ३ वाजता असे कोणी अंगावर बसून विचित्र आवाज काढत असेल तर काय होत असते?)
"मला टेडी मध्ये राहून कंटाळा आला आहे.",टेडी बोलतो.
"यावर मी काहीच करू शकत नाही! आता गप्प झोप आणि मला ही झोपू दे! नाही तू झोप इथ मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपते. आता मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. हार्ट अटॅक येईल मला आता पुन्हा अस काही केलं तर तू.",खूपच चिडून बोलून तिथून निघून जाते. टेडी उदास होत ती गेली त्या दिशेला पाहत असतो. दरवाजा ही जाता जाता गायत्री जोरात ओढून जाते.
"तुला नाही समजणार माझी अवस्था.",तो हतबल होत म्हणाला. पर्याय ही दुसरा नव्हता सध्या त्याच्याकडे. गायत्री एकच अशी व्यक्ती होती जी त्याला समजून घेत होती. नाहीतर बोलणारा टेडी पाहून इतरांनी घाबरून त्याला पळाले असते. न्यूज मध्ये मात्र ही बातमी नक्कीच झळकली असती. गायत्री मात्र शांत सगळ हॅण्डल करत होती. आता यानेच तिला घाबरवले असल्याने, ती मदत करेल का? हा प्रश्न निर्माण झाला होता. एक सुस्कारा सोडत तो बेडवर चढत आडवा होतो. पोटावर काही झोपता येत नव्हते. कारण ते खूपच मोठं गोल असे होते म्हणून तो पाठीवर झोपून जातो.
इकडे गायत्रीची झोप मात्र चांगलीच पळाली होती. बिचारी दुसऱ्या रूम मध्ये येऊन सुद्धा अजून ही आसपास पाहत होती. रूम तिने आतून लॉक केली होती. विंडो ही बंद केल्या होत्या. अगदी कर्टन ही ओढून घेतले होते. इतकंच नव्हे तर दरवाजाला आतून टेबल ही जड असे सरकवून लावले होते. ज्या कारणाने कोणी लॉक तोडून आत येऊ नये. अंगावर ब्लँकेट घेतली होती. अंधारात झोपणारी ती आता रूम मध्ये लाईट लावून पडली होती. आपले हात, पाय ब्लँकेटच्या बाहेर झाले की लगेच आत ओढून घेत होती. इतकी भीती आता तिला वाटत होती. मनाने तयार झाली होती ती टेडीला मदत करायला. पण टेडीची आताची कृती पाहता तिला भीतीच वाटत होती. अगदी त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखी स्थिती झाली होती तिची सध्या. तो एक आत्मा होता. हे तिला चांगल माहीत होते. आपल्याला काहीही करू शकतो याची भीती जास्त वाटू लागली होती. सारखा सारखा तिला त्याचा भास होत असतो. कधीतरी पहाटेच तिचा डोळा लागतो.
***
"एकुलता एक वारस गेला त्यांचा कोमात. आता कधी त्याला शुद्ध येईल? हे सांगता येत नाही. तो पर्यंत त्या डॉक्टरला पैसे देऊन मारून टाकायला सांग त्याला. म्हणजे कायमचा पत्ता कट होईल.",एक व्यक्ती सिगारेट ओढत बोलत असतो. त्या रूम मध्ये आता सिगारेटचा धूर जास्त होता. त्या धुरात देखील त्याच्या चेहऱ्यावर विक्षिप्त हसू होते.
"ठीक आहे साहेब. पण ती डॉक्टर लय हुशार आहे बर का. सहजासहजी नाय तयार व्हायची.",समोर असलेला व्यक्ती त्याला म्हणाला.
"तिची कमजोरी शोधून काढा आणि तिला पाहा. प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमजोरी असते. तशी तिची ही असेल? तिचं काढा शोधून. तिला हवे तेवढे पैसे द्या आणि त्या युवराज पाटील चे काम संपवा. तो जिवंत राहिला तर माझा बिझनेस चालणार नाही. त्याच्या घरात घुसण्याची इच्छा माझी कधीच पूर्ण होणार नाही! यासाठी त्याला मारावेच लागेल.",विचित्र आणि क्रूर हसू चेहऱ्यावर ठेवत तो बोलत असतो.
"जी सरकार.",दुसरा एक जण बोलतो.
****
टेडी सकाळी उशिराच आळस देत उठत असतो.
"ओ गॉड, मी आता माझ्या शरीरात नाही आहे. मग जीम कशी करू? करून करून काय याला बारीक करू का? नाही होणार बारीक मी असेही. काय संकट आहे हे? कुठे ती माझी लाईफ स्टाईल होती आणि आता काय आहे?मला लवकरात लवकर या सगळ्यातून सुटायच आहे. ती डॉक्टरच मला मदत करू शकते. अरे यार ही डॉक्टर उठली असेल का? वाजले तर आठ आहेत.", स्वतःशी बोलत तो समोर असलेल्या भिंतीवरच्या घडाळ्यात वेळ पाहतो. या क्षणी त्याला गायत्री सोबत बोलायचे होते. पण काल ती त्याच्या मुळे घाबरली होती याचा विचार करून तो हताश होत असतो.
गायत्री त्याच वेळी तयार होण्यासाठी म्हणून रूमचा दरवाजा उघडून आत येते. त्या रूम मध्ये टेडी आहे ती एका क्षणाला विसरली होती. पण जेव्हा तो टेडी बेडवर उभा राहत विचार करत असतो. हे पाहून ती चांगलीच उडते. आता ती ज्या कामासाठी तिथं आली होती ते विसरून तिथून पळत असते. पण तेवढ्यात रूमचा दरवाजा आपोआप हवेने लॉक होतो. हे पाहून तर चांगलाच तिला धक्का बसतो. टेडी मात्र हसत असतो.
"ए डॉक्टर, जास्त शहाणी झालीस ना तर तुझा आत्मा माझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर करेन मी!",टेडी तिला आपला हात दाखवत बोलत असतो. पळत असणारी गायत्री पाठमोरी उभी राहून त्याच ऐकते.
"हे.....हे.... दार.....?", बोलायला सुचत नव्हते भीतीने तिला.
"आत्मा आहे मी हे विसरू नको तू. मी च केलं हे. आता समजल तुला मी काय काय करू शकतो ते?", टेडी हसतच बोलत असतो. खरतर तिला घाबरवायचे नव्हते. पण ती त्याला पाहून पळत होती म्हणून काही सुचले नाही. त्याच वेळी त्याने हात वर केला तर आपोआप दार बंद झाले होते. जे त्याला देखील कळले नव्हते.
"टेडी, मला सोड....मला भीती वाटते सगळ्याची......मी बाकी सगळ हॅण्डल करेन.....पण भूत, आत्मा याची लहान असल्यापासून भीती वाटते मला.... प्लीज तू समजून घे मला....माझा आत्मा बाहेर नको काढू..... प्लीज प्लीज.....",गायत्री या क्षणी त्याला पाहत रडकुंडीला येत म्हणाली.
"ए, रडू नको! मला मदत कर फक्त. बाकी काहीच नको आहे.", टेडी यावेळी शांत राहत म्हणाला.
"मला भीती वाटते तुझी.",नाक वर ओढत ती म्हणाली. तसा टेडी रागीट कटाक्ष टाकतो तिच्यावर. त्याची नजर पाहून ती पटकन होकारार्थी मान हलवते. ते ही तिच्या नकळत. पर्यायच नव्हता तिच्या समोर सध्या तरी. जे काही टेडी तिला आवडत होते. ती आवड आता तिची गायबच झाली होती जणू. ह्या टेडीला पाहून.
"गुड गर्ल आहेस डॉक्टर तू. आता जा तुझं काम कर. माझी नजर आहे तुझ्यावर. हे सत्य कोणाला सांगायचं नाही की टेडी मध्ये मी आहे तो. नाहीतर त्या क्षणी माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर फेकेन बघ.",टेडी शेवटचं धमकी देत म्हणाला. ते ऐकून ती एक आवंढा गिळत आपले कपडे घेण्यासाठी वॉर्डरोब कडे जाते. तो असताना ती कसतरी तिथून आपले कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते. तसा टेडी स्वतःशी हसतो.
क्रमशः
*******