२ ऑपरेशन सिंदूर (कादंबरी)
अंकुश शिंगाडे
कुंकू..... कुंकूला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्याला सौभाग्याचं लक्षण समजलं जातं, नव्हे तर प्रत्येक सणासुदीला महिला वर्ग कुंकू लावून सण साजरे करतांना दिसतात. कुंकू हे स्रियांच्या सौंदर्यातील सोळा श्रृंगारापैकी एक वस्तू आहे. ते विजयाचं प्रतिक आहे. एवढंच नाही तर अगदी विवाह करतांना नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरुन तिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. असे करतांना स्री आपल्या घरी विजयोत्सव साजरा करते. कारण तिनं आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन कुणालातरी आणलेलं असतं.
पुर्वी जगात मातृसत्ताक कुटूंब पद्धती होती. ज्यात विवाह झाल्यानंतर एक पुरुष हा स्रियांच्या घरी राहायला येत असे. याचाच अर्थ तो घरजावई बनत असे. परंतु कालांतरानं काळ बदलला व हुशार पुरुषानं अतिशय अक्कल हुशारी वापरुन स्रिला गुलाम करण्यासाठी घरजावई प्रथा बदलवली व तो स्रिला आपल्या घरी घेऊन जावू लागला. मात्र त्याला स्रिया कुंकू का बरं लावतात. हे माहित नसल्यानं केवळ कुंकवाला सौभाग्याचं लक्षण समजून कुंकू लावण्याची प्रथा तशीच ठेवली.
स्री ही स्वतःच्या माथ्यावर कुंकू लावून घेते. याचा अर्थ ती कुंकू लावण्याला विजयाचं प्रतिक मानते. ज्यानुसार नवरीचे स्वतःला कुंकू लावणे म्हणजे तिनं नवरदेवाला जिंकणे होय. म्हणूनच अलिकडील काळात स्रिने विवाहप्रसंगी आपल्या पतीला जिंकलेले असल्यानं आजकाल पतीचे हुकूम चालत नाही तर स्रियांचेच हुकूम चालतात. तसं पाहिल्यास पुर्वीही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असून पतीचं अर्थात पुरुषांचं महिलेसमोर काहीच चालत नसे. त्याचं कारण आहे कुंकू.
कुंकू हे पुर्वी आत्मसंरक्षण म्हणून वापरले जाई. त्यासाठी कुंकू हे गेरु, अस्सल हळद व सापाचे किंवा विंचवाचे विष यापासून तयार केले जायचे. त्याचं कारण होतं आत्मसंरक्षण. कधीकधी स्रिया एकट्या असत. तेव्हा येथीलच पुरुषी समाज तिला एकटं पाहून तिचा विनयभंग करण्याचा वा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असे. अशावेळेस ती आपल्या कपाळावरील कुंकू बोटाने घेवून प्रेमाप्रेमानं अत्याचार करणाऱ्या पुरुषांच्या तोंडात टाकत असे. ज्यातून बलात्कार करणाऱ्या पुरुषांचा मृत्यू होत असे व त्यातून अशा स्रियांची बलात्कारातून मुक्ती होत असे. स्री आपल्या हुशारीनं बलात्कारातून स्वतःची मुक्ती करीत असल्यानं कुंकवाला पुढील काळात विजयाचं प्रतिक म्हणून दर्जा मिळाला. कुंकू एक शक्ती म्हणून उदयाला आलं.
कुंकवाचा शोध हा राक्षस विजयापासून लागला असेल असे वाटते. एखाद्यावेळेस एखाद्या राक्षसावर विजय मिळाल्यावर ती स्री त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर लावत असे आणि विजयोत्सव साजरा करीत असे. हे रक्त चिलकालबाधक टिकत नव्हतं. त्यामुळं पशूबळी देवून त्यांच्या रक्ताचा टिळा लावण्याची पद्धत सुरु झाली. परंतु दररोज पशूही कापणं सहज शक्य होत नव्हतं. म्हणूनच त्यानंतर स्रियांनी तो विजय चिरकाल आठवणीत राहावा म्हणून मातीचा टिळा लावण्याची प्रथा सुरु केली. असा टिळा लावणाऱ्या स्रियांच्या वाट्याला कोणी जात नसे. कारण तिला शूर स्री मानलं जात असे. पुढं हा टिळा दुरुन दिसत नसल्यानं व तो दिसावा यासाठी हळदीचा टिळा लावण्याची पद्धती सुरु झाली. परंतु हळद ही रंगानं पिवळी असल्यानं तिही दिसत नव्हती. तद्नंतर ती दिसावी यावर शोध सुरु झाला. त्यानंतर विचार केल्या गेला की राक्षसांचं रक्त लाल असतं. कुंकवाचाही रंग लाल असावा. हे ठरल्यानंतर कुंकवाला लाल रंग देण्यासाठी त्यात लाल माती मिसळून त्याचा टिळा लावण्याची पद्धती सुरु झाली. परंतु ती लाल माती पाहिजे त्या प्रमाणात लाल नसायची. पुढे गेरुचा शोध लागल्यानंतर त्यात गेरु मिसळण्याची पद्धत सुरु झाली. त्यात बरंच संशोधन झालं व आज त्यात बऱ्याच गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या व आजचा कुंकू तयार झाला.
आज कुंकवाचा वापर सौभाग्याचं लक्षण व सौभाग्य रक्षण म्हणून केल्या जातो. कोणी कुंकू लावण्याच्या प्रथेला महालक्ष्मीचा आशिर्वाद मानतात तर कोणी त्याला शिवपार्वतीचाही आशिर्वाद मानतात.
पहलगाम हल्ला. हा हल्ला कुंकवासी संबंधीत असून या हल्ल्यात आतंकवाद्यांनी सामान्य माणसांना शिर्षस्थानी ठेवून त्यांची हत्या केली. हा भ्याड हल्लाच होता. तसं पाहिल्यास ते आतंकवादी मर्द नव्हते. कारण मर्द जर असते तर ते सैनिकांशी लढले असते. त्यांनी सामान्य माणसांना मारलं नसतंच. तसं त्यांना भारताच्या कुंकवाबद्दल माहित नसेल की भारतीय कुंकूत किती ताकद आहे. ते कुंकवाला मारुन तर गेले. परंतु ज्यांनी कुंकू लावलं होतं. जे कुंकू आज्ञाचक्र जागृत करत असतं. ते मिटल्यानं पुढं जावून हे कुंकू खवळलं. ज्यातून ऑपरेशन सिंदूर झालं व सव्वीस लोकांच्या बदल्यात तब्बल शंभर आतंकवादी मारले गेले. त्यातच पाकिस्तानचीही नशा उतरली. ही शक्तीच आहे कुंकवाची की त्या कुंकवानं आतंकवाद्यांचे नव्हे तर पाकिस्तानचे हालहाल केले. जर कुंकू मिटलं नसतं तर कदाचीत आतंकवाद्यांचा आतंकवादीपणा तेवढा आपल्या भारताच्या निदर्शनास आला नसता. जेवढा आजमितीस दिसला. आज कुंकू मिटवलं गेलं, म्हणून ऑपरेशन सिंदूर घडलं. यापुर्वी कधीच ऑपरेशन सिंदूर घडलं नव्हतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास हे कुंकू आहे. भारतात याला विजयाचं प्रतिक मानतात. भारताची शान आहे कुंकू. जर या देशातील तमाम कुंकूधारी भगिनीच्या कोणी वाट्याला गेलं ना. तर ते कुंकू त्याला कधीच सोडत नाही. हा इतिहास आहे. ज्याला कुंकवाचा इतिहास माहित नसेल, त्यानं तो माहित करुन घ्यावा. म्हणजे कळेल की कुंकू खरंच काय आहे ते. मगच कुंकवावरुन वार करावा. स्वतःला बेचिराख करुन घ्यायचे असेल तर. कारण कुंकवात कुणालाही बेचिराख करण्याची ताकद नक्कीच आहे, यात तीळाचीही शंका नाही. ऑपरेशन सिंदूरवरुन लक्षात येते की भारतात साधी कुंकू न लावलेली नागीण नागराजाला कोणी काही केल्यास सोडत नाही. मग ही पहलगामची कुंकूधारी महिला होती. जणू नागीणच. ती कशी सोडणार होती. कदाचीत त्यामुळंच ऑपरेशन सिंदूर करता आलं. ऑपरेशन सिंदूर निमित्याने कुंकवात आजही शक्ती आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं नव्हे तर कोणी जर कुंकवावरुन वाट्याला जात असेल तर भष्म होईल. हाच संदेश पहलगाम प्रकरणाने दिलेला आहे. मग ती सामान्य जनता का असेना. कुंकू कुंकू असतं, ती माती नाही. हे ऑपरेशन सिंदूरवरुन दिसलं. हे तेवढंच खरं.
महिला ही शांत असतेच. ती अशांत नसतेच. परंतु जर तिला कोणी डिवचलंच तर ती रुद्र रुप घेत असते. तिची महाकाली बनत असते. कधी तिच्यात दुर्गेचं रुप दिसते तर कधी ती सीता बनून अख्खा रावणराज समाप्त करुन टाकते तर कधी द्रोपदी बनून अख्खं महाभारत घडवून आणते. अर्थात शंभर प्रकारची शक्ती असलेलं कौरवाचं साम्राज्य नष्ट करुन टाकते. पहलगामची घटना अशीच. तब्बल सव्वीस महिलांचं कुंकू पुसण्याचं प्रकरण. ज्यातून महिलांची शक्ती दिसली. पहलगाममध्ये कुंकवावरुन जो वाद निर्माण झाला. त्याच वादात महिलांनीच आतंकवाद्यांनाच नाही तर अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला. हे सगळं घडलं कुःकवाच्याच शक्तीनं.
कुंकू...... कुंकवामध्ये एवढी शक्ती असते की त्या भरवशावर एखादी महिला कुणालाही नेस्तनाबूत करु शकते. तसं पाहिल्यास महिला ही शांतच असते. तिला कुंकवानंच शांत केलेलं असतं. अन् कुंकवाला धक्का लागलाच तर ती बिथरते. अन् ती जेव्हा बिथरते. तेव्हा ती काय करु शकते. हे दाखवून दिलं रुकसार आणि सपनाच्या टीमनं. त्यांनी ऑपरेशन सिंदूर करुन कुंकू महान असतं नव्हे तर महिला ही कमजोर नसते हेच दाखवून दिलं.
ती रुकसार आणि सपनाची जोडी. त्या जोडीनं कुंकवाचं महत्व सांगीतलं नव्हे तर त्यांनी स्वतः कृती करुन दाखवून दिलं. परंतु हे जरी खरं असलं आणि वास्तविक घडलं असलं तरी येथील पुरुषसत्ताक समाज स्री पराक्रमाला महत्व देत नाही. हे दिसलं एका मंत्री महोदयाच्या वक्तव्यावरुन. त्यांनी आपली जीभ घसरवत म्हटलं की पहलगाम हल्ल्यात आमच्या बहिणीचे सिंदूर पुसून टाकणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून बदला घेतला.
ते त्या मंत्र्याचं बोलणं. तो एक पुरुषी चेहरा. त्याआधीच रुकसारनं खुलासा केला होता की मी मुस्लीम जरी असलो तरी मी आतंकवाद्यांविरुद्ध लढलो. कारण ते आतंकवादी आहेत व आतंकवाद्यांना कधीच जात व धर्म नसतोच. नातंही नसतंच. अन् जी रुकसार नावाची विरांगणा लढली. ती कशी काय आतंकवाद्यांची बहिण होवू शकते. याचा विचार मंत्र्यानं करायला हवा होता. त्यावर सारवासारव करत मंत्री महोदय अस्सल माफी मागायला तयार नव्हते. ते पुढे म्हणाले की जर माझ्या विधानामुळे वा वक्तव्यामुळे कोणी दुखावले असेल तर दहावेळा मी माफी मागायला तयार आहे. मी रुकसारचा माझ्या बहिणीपेक्षा जास्त आदर करतो. याचाच अर्थ असा की मंत्री महोदय मी विधान मागे घेतो असं म्हणत नव्हते तर ते माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर माफी मागतो असं म्हणत होते.
रुकसार बाबत केलेलं मंत्री महोदयांचं विधान म्हणजे एक प्रकारचा रुकसारचा अपमान करणारं विधान होतं. एवढंच नाही तर तमाम पहलगाममध्ये कुंकू पुसलं जाणाऱ्या महिलांचा अपमान होता. त्यातच हा संबंध मानवजातीतील महिलांचा अपमान होता. त्याचं कारण म्हणजे रुकसारचा पराक्रम. बिचारीनं आपल्या जीवावर उदार होवून ऑपरेशन सिंदूर केलं होतं नव्हे तर त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिचा जीवही गेला असता. त्याचं येथील संबंध पुरुषजातीला काही घेणंदेणं नाही. असंच एकंदरीत मंत्री महोदयांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं. तो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एका फंडाच असेल. त्याची दखल महिला आयोगानं घेतली होती. महिला आयोगानं काय केलं माहित नाही, जे काही करेल, ते चांगलंच केलं असेल. महत्वपुर्ण बाब होती आपली मानसिकता. आपण स्रियांना डिवचतो. त्यांना कमजोर समजतो. त्यांच्याबाबत अनैतिक वक्तव्य करतो. त्यांचा पदोपदी अपमान करतो. कधी त्यांना जोहार साठी बाध्य करतो तर कधी त्यांच्या हक्कांना बाधा पोहोचवतो. त्यांनी केलेल्या पराक्रमांनाही आपण तुच्छ लेखतो. आपण हेच करीत नाही तर आपण त्यांना कमजोर समजून कोणती जबाबदारी द्यायची याबाबत टाळाटाळ करतो. हे त्या वक्तव्यावरुन दिसून आलं होतं.
रुकसारनं जी भुमिका ऑपरेशन सिंदूर माध्यमातून केली. ती वाखाणण्याजोगीच होती व तमाम महिला जातींचा तिनं आपल्या कर्तृत्वानं उत्साहही वाढवला होता. शिवाय हेही दाखवून दिलं होतं की जगातील कोणतीच महिला ही कमजोर नाही व तिला कोणीही कमजोर समजू नये.
रुकसार एक मुस्लीम महिला होती व ती कर्नल होती. ती सैन्यात विंग कमांडर होती. परंतु तिनं स्वतःला मुस्लीम न समजता एक खरी भारतीय समजून ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्य केलं. ज्यातून ऑपरेशन सिंदूर तर झालंच. त्याव्यतिरिक्त ऑपरेशन पाकिस्तानही झालं. याचाच अर्थ असा की ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पाकिस्ताननं भारताला कमजोर समजून जे युद्धासारखं आव्हान दिलं. त्यातून पाकिस्तानला शह दिल्यानंतर जी भारताची ताकद पाकिस्तानलाच नव्हे तर जगाला दिसली, त्यावरुन भारतही एक बलशाली व बलाढ्य राष्ट्र आहे, हे सिद्ध झालं. कदाचीत ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं नसतं तर पाकिस्तानसमोर भारताचा हशा झाला असता. तसेच जागतिक स्तरावरही भारताला नाक दाखवायची शरम वाटली असती. आज भारताची मान जगासमोर ताठ आहे. आता शरम वाटत नाही. ते सगळं घडलं भारतातील महिला शक्तीमुळं आणि कुंकवामुळं. ज्यांनी ऑपरेशन सिंदूर साकारलाय. म्हणूनच महिला शक्ती ही महान आहे आणि तिचं कुंकूही महानच आहे. तिला कोणीही कमजोर समजू नये.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आतंकवाद्याची बहिण म्हणणं. हा मुद्दा वादाचाच होवू शकतो. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतोच. त्याला जात, धर्म व नाते नसतातच. अन् यात रुकसारनं स्वतःला आतंकवाद्यांची बहिण समजलं असतं तर कदाचीत तिनं पाकिस्तानच्या घरात शिरुन ऑपरेशन सिंदूर केलं नसतं.
महत्वाचं म्हणजे महिलांनाही नाते असतातच. नसतात असे नाही. परंतु त्या नात्यांचा त्रास जर होत असेल तर ते नाते काही कामाचे नसतात. अशावेळेस महिला या नाते संपवतात. खरी बहिण तीच असते, जर त्यांचा सख्खा भाऊ जरी आतंकवादी असेल तर त्या त्यांना भाऊ समजत नाही. हे आपल्याला महाभारतातून दिसते. महाभारतात द्रौपदी ही स्नुषा व भावजंय असूनही तिचा भर दरबारात अपमान करण्यात आला. त्यानंतर तिनं नातं संपवलं व आपल्या अपमानाचा तिनं बदला घेतला.
आतंकवाद्यांनाही नाते नसतात. ते गुन्हेगार असतातच. शिवाय त्यांनी कोणाचं कुंकू पुसूच नये. कुंकवात एवढी शक्ती असते की तेच कुंकू राजाला रंक बनवू शकते. यात शंका नाही. भारतात तरी कुंकवाला जास्त महत्व आहे. भारतातील हिंदू स्रिया कुंकवाला विशेष महत्व देत असून आपण गतकाळात पाहिलेच आहे की गतकाळात हिंदू स्रिया विधवा झाल्यास प्रसंगी जोहार करीत असत. परंतु कोणत्याही प्रकारचा व्याभिचार सहन करायच्या नाहीत. हिंदू स्रिया प्रसंगी सती जात. परंतु दुसऱ्याशी विवाह करणे टाळत असत. त्यातच काही कुंकूधारी स्रिया आपल्या सतीत्वाच्या आधारावर राक्षसांनाही स्वतःच्या अंगाला स्पर्श करु देत नव्हत्या. हे आम्हाला आमचे ग्रंथ सांगतात. उदाहरण द्यायचं झाल्यास माता सीतेचं देता येईल. माता सीतेच्या अंगाला रावणही कुंकवाच्या आधारावर स्पर्श करु शकत नव्हता. म्हणूनच कुंकू हे हिंदू स्रियांसाठी महत्वपुर्ण वस्तू आहे. विशेष सांगायचं झाल्यास आतंकवाद्यांना नातं नसतं. परंतु मंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार तसं वक्तव्य करुन आतंकवाद्यांनाही नातं असतं असं म्हणणे व त्याचा संबंध रुकसारशी लावणे हा प्रकार येथे पुन्हा हिंदू मुस्लीम वाद तयार करण्याचा प्रकार होता. कदाचीत हा प्रकार हिंदू मुस्लीम एकता तोडण्याचा तर प्रकार होता. जी ऐकदा ऑपरेशन सिंदूर निमित्यानं दिसली होती. तसं सिद्ध करुन मंत्री महोदयानं पुर्ण करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पाणी फेरलं होतं. ज्याचा फायदा विरोधक घेत होते.
रुकसार व सारिका दोन मैत्रीणी होत्या. दोघीही जीवलग होत्या. रुकसार शेजारीच राहात होती सारिकाच्या. दोघीही एक पान वाटून खात होत्या. रुकसार मुस्लीम होती तर सारिका हिंदू होती.
ते बालपण व त्या बालपणात एकाच शाळेत त्यांचं नावही टाकलं होतं. धर्म म्हणजे काय हे रुकसार व सारिका आपल्या बालपणात जाणत नव्हत्या. अशातच एक तो कारगील युद्धाचा दिवस उजळला व बातमी आली. रुकसारचे वडील कारगील युद्धात शहीद झाले होते. रुकसारच्या घरावर शोककळा पसरली होती. रुकसारचे वडील कारगील युद्धात शहीद झाले होते. ती अनाथ झाली होती. मात्र सारिकाचे आईवडील जीवंत होते. त्यांनी रुकसारला काहीच अंतर दिलं नाही. सारिकानं ती आपली एक लहान बहिण आहे. असंच तिला वागवलं. तिच्या परिक्षेचेही पैसे भरले. तिच्या शिक्षणात मदत केली. तिला शिक्षण सोडू दिलं नाही. तशी रुकसार जास्त शिकली नाही. तिच्या आईनं तिच्या बिरादरीतील चालीरीतीनुसार तिचा विवाह लवकरच लावून दिला व ती सासरी गेली.
रुकसार सासरी गेली होती. मात्र सासरकडील मंडळी चांगली होती. त्यांनी तिच्या शिक्षणाची गोडी ओळखली व तिला भरपूर शिकवलं. त्यातच रुकसार आज खुप शिकली होती व ती आता सैन्यात विंग कमांडर बनली होती.
मध्यंतरीचा काळ असाच गेला. सारिका व रुकसारची बऱ्याच कालावधीपर्यंत भेट झाली नाही. कारण रुकसारचा विवाह झाल्यानंतर सारिकाचे आईवडील एका कार अपघातात मरण पावले. सारिका एकाकी झाली होती. त्यातच ती आता एकाकी झाल्यानं अनाथालयात गेली. ती कोणत्या अनाथालयात गेली हे काही रुकसारला माहित नव्हतं. परंतु जसा सारिकाचा विवाह जुळला. तिला रुकसारची आठवण आली व ती शोध घेत घेत रुकसारच्या घरी आली. तिनं रुकसारचा पत्ता घेतला व ती आपल्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी रुकसारच्या घरी गेली.
सारिका रुकसारच्या घरी गेली होती. तिनं रुकसारला ओळख दिली. रुकसारनंही आपल्या बालमैत्रीणीला ओळखलं. तशा बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातच रुकसारला तिनं आपल्या विवाहाची पत्रिका देवून अगत्यानं येण्याचं सांगीतलं. त्यानुसार रुकसारही सारिकाकडे तिच्या विवाहानिमित्याने हजर झाली. त्यानंतर त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला.
सारिकाचा विवाह थाटामाटात पार पडला. सगळं आटोपलं. तसा रुकसारनं तिला फोन केला. विचारलं की तिचा विवाह कसा काय पार पडला. त्यावर उत्तर देत सारिकानं चांगलंच सांगीतलं. त्यानंतर तिनं रुकसारला हनीमूनबद्दल विचारलं. त्यावर सारिकानं सांगीतलं की ती जम्मूला जात आहे. जम्मूवरुन ती पहलगामला जाणार आहे.
सारिका बोलल्याप्रमाणे आपल्या विवाहानंतर जम्मूला गेली. त्यानंतर ती पहलगामला. तशी ती जिथे जिथे जात असे. तेथील सर्व आठवणी फोनद्वारे ती रुकसारला सांगत असे. कारण पुष्कळ दिवसानं तिची बालपणची मैत्रीण तिला मिळाल्याचा आनंद, तिला अतीव झाला होता. तिला काय माहित होते की ती पहलगामला जाताच तिचं कुंकू पुसलं जाणार, तेही धर्मावरुन. त्या आतंकवाद्यांनी सारिकाच्या पतीला त्याचा धर्म विचारुन धर्म सांगताच यमसदनी पाठवलं होतं आणि ज्यावेळेस आंतकवाद्यांनी पहलगामला तिला घेरलं होतं. त्यावेळेस तिनं तिही बातमी रुकसारला तिच्या पतीच्या हत्येपुर्वी सांगीतली होती.
*****************************************