Aarya ( Part 8) in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या... ( भाग ८ )

Featured Books
Categories
Share

आर्या... ( भाग ८ )

       आर्या च्या वाढदिवसाची तयारी आता सुरू झाली होती . सर्व सजावट ही लहान मुलांना आकर्षून घेणार अशा चांगल्या प्रकारची करणार होते , त्या मध्ये आर्या आणि इतर लहान मुलांचे आवडते कार्टून्स असणार होते . आर्याला ऐकू, बोलता येत नव्हतं म्हणून तिचाच विचार करून सर्व काही मॅनेज करत होते . त्यांनंतर त्यांनी गेम्स मध्ये त्यांनी एक जादूगार आणि जोकर बोलवायचं ठरवलं ते न बोलता फक्तं त्यांच्या कलेने आर्या ला खुश करणार असं ठरवलं होत . त्या दोघांना ही आर्या बद्दल कल्पना दिली जाणार म्हणजे पुढील कार्यक्रम फक्त ते दोघे सांभाळणार !   श्वेता आणि अनुराग यांनी खूप छान प्रकारे आणि प्रमुख म्हणजे विचारपूर्वक मॅनेजमेंट करून सर्व जवळ असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आमंत्रण करणे सुरू केले , आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांना घेऊन यायचं असं आग्रहाने सांगितलं . त्यांच्या बऱ्याच नातेवाईकांना आर्या आणि तिची शारीरिक स्थिती याबद्दल कल्पना होती . म्हणुन काही जण वाढदिवस या कल्पनेने काही जास्त खुश नव्हते , त्यांना वाटत होत मुलीची परिस्थिती अशी असताना हा वाढदिवस कोणासाठी ! हे लोक फक्त आपला दिखावा म्हणून हा वाढदिवस तर करत नाही ना ? अशी त्यांच्याच नातेवाईकांना मध्ये चर्चा सुरू झाली होती ! पण श्वेता आणि अनुराग यांनी पूर्ण कार्यक्रम काय असेल याची कल्पना कोणाला हि दिली नव्हती ! अगदी त्यांच्या आई  वडिलांना ही नाही .

शेवटी आर्या च्या वाढदिवसाचा दिवस सुरू झाला . श्वेता आणि अनुराग ने तर पूर्ण ऑफीस मधून रजा घेतली होती . त्यांनी सकाळी उठल्यानंतर आधी आर्या साठी रूम सजवून ठेवली होती . पूर्ण रूम मध्ये छान गुलाबी आणि सफेद या रंगाचे फुगे लावून ठेवले होते . तिला कार्टून मधील इतके काही समजत नव्हतं पण थोडे फार ती कार्टून बघून आनंदी होते याची त्यांना कल्पना होती . म्हणून त्यांनी काही कार्टून्स तिच्या रूम मध्ये ही लावले होते . आता श्वेता समोर गेली आणि आर्या च्या गाळावर पप्पी घेत होती . तिचे केस तिच्या त्या नाजूक डोळ्यांवरून मागे करत होती . अनुराग ने हळूच खिडकी चा पडदा बाजूला केला . त्यामधून येणारा सूर्यप्रकाश हा आर्याच्या चेहऱ्यावर पडला होता , त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अजूनच तेज दिसत होते .श्वेता च्या स्पर्शाने आर्या उठणार होती , तीने डोळे उघडताच तिच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश आला आणि तिने तिचे हळुवार उघडलेले डोळे छोटे छोटे करून बंद केले . अनुराग ला आता राहवलं नाही ... ती इतकी गोंडस दिसत असताना फक्त दुरून बघतं मजा घेणं काही त्याला योग्य वाटल नाही ... तो धावत तिच्या बाजूला गेला .. श्वेता ला बाजूला केलं आणि आर्या ला उचलून एकदम जवळ घेतलं. तिला अस श्वेता स्मरून उचलून घेतलं म्हणून ती चिडली... तिला आर्याला असं जबरदस्तीने उठवायचं नव्हतं .. म्हणून तिने त्याला एक जोरात फटका मारला  आणि म्हणाली , शेवटी आज ही तू तेच केलंस ना ! तो हसत म्हणाला काय करू इतकी गोंडस मुलगी समोर असताना , तिला फक्त बघत राहणं मला नाही जमत हा..! अस म्हणून तो आर्याच्या खूप छान छान पापी घेऊ लागला ! आणि हे सगळं बघून तर श्वेता ही खूप आनंदि होती . आर्या ही झोपेतून उठली होती .. ही दोघे तिला पूर्ण रूम मधील छोट्या छोट्या गोष्टी तिला दाखवत होते .

आर्या किती आनंदी हे तिच्या चेहऱ्यापेक्षा डोळ्यांवरून या दोघांना कळत असे . हे सगळं बघून तिच्या डोळ्यांमध्ये चमक आली होती आणि चेहऱ्यावर आनंद ! प्रत्येक गोष्टीला तिला जवळ जाऊन स्पर्श करायचं आहे ..असं ती त्या दोघांना तिच्या हालचाली मधून सांगत होती  आणि तिने ते सांगण्याआधीच हे दोघे तिला प्रत्येक नवीन खेळण्याच्या समोर नेऊन उभे करत असे . काही अचानक बाहेर येणारे बाहुले होते तर हात लावल्यानंतर उडणारी नकली पाखरे होती . हे सोडून बरेच से कार्टून्स होते . हे पाहून ती जितकी आनंदी होत होती  तितके ते दोघेही होत होते . नंतर तिच्या आजी आजोबांचा आवाज आला . घरामध्ये बर्थडे पार्टी च्या तयारीची सुरुवात झाली होती . सगळे एक एक करून आले आणि घर भरून गेलं होत . सर्वच आर्या साठी काहीतरी नवीन घेऊन येत होते . शेवटी ज्याची सगळे वाट बघत होते त्याची आता थोड्याच वेळात सुरुवात होणार होती .

त्यांनी थीम ही एकदम आकर्षित केली होती . सर्वत्र रंगी बेरंगी लाइट्स होत्या . काही ठिकाणी रंगी बेरंगी मासे होते . छोटे छोटे फिश टैंक काही काही अंतरावर ठेवण्यात आले होते . कार्टून्स च्या भूमिकेतील बरेच से लोक इकडे तिकडे फिरताना दिसत होते. एक जादूगार स्टेज वर सूत्रसंचालन करत , वेगवेगळे आवाज करत होता. सर्व लहान मुले अगदी हे सगळ बघून आनंदी होऊन गेले होते . ते आपल्या आई वडिलांना सोडून इकडे तिकडे धावत होते . तितक्यात एक पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कपड्यांमध्ये एक सुंदर, नाजूक , सगळ्यांची नजर तिच्यावर पडेल अश्या आपली आर्या परी राणीचं आगमन झालं होतं !!!

....... continue