अनुराग ने श्वेता ला हळूच डोळ्यांनी इशारा करून शांत राहण्यासाठी सांगितलं. आजी आजोबा इतके शांत होते की श्वेता खाली मान खाली करून बसली होती . आजी आजोबा कस उत्तर देणार हे तिला कळत नव्हतं! थोड्याच वेळात आजोबा म्हणाले तसं तुम्हाला सांगायला काही हरकत तर नाही, पण इतकंच पुन्हा पुन्हा त्याचं भयानक आठवणी जागा होतात इतकचं ! अनुराग पुढे होऊन आजोबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला , " बाबा ! तुम्हाला जर मनापासून सांगावस वाटत असेल तर तुम्ही सांगा , स्वतःला त्रास करून आणि आम्हाला बर वाटेल म्हणून नको !"तितक्यात बाबा पुढे म्हणाले," अरे मुलांनो त्रास कोणाला होणार नाही ? असं आपल्या आधी आपल्या मुलाबाळांना जाताना पाहून ! " आजी पुढे म्हणाल्या , पण अनुराग काही झालं आहे का ? अचानक तुम्ही दोघे घरी आलात! आणि आता हे ? श्वेता, आजींच्या हातावर हात ठेवत म्हणाली , अहो आई सहजच आम्ही आलो आहोत ! तितक्यात अनुराग म्हणाला , "सहजच असं नाही पण मला माझ्या आई बाबांकडून प्रिन्सी च्या मम्मी पप्पा विषयी समजल पण थोडक्यात ! मला ते जाणून घ्यायचं आहे ! खर तर तुम्ही चुकीचं अस समजू नका , पण मला आता प्रिन्सी ही आर्यासारखीच आहे ! म्हणून विचारत आहे ! "प्रिन्सी ही आर्या सारखीच आहे हे ऐकल्यानंतर आजी आणि आजोबांना खूप बरं वाटलं होत . आजोबा म्हणाले, बरं अनुराग ऐक काय झालं होत ! " मनन आणि दिपा म्हणजे प्रिन्सी चे मम्मी पप्पा! दिपा हि खूप स्वभावाने खूप चांगली आणि समजुतदार मुलगी होती . माझ्या मित्राचीच मुलगी होती . एका कार्यक्रमामध्ये आमची ओळख तिच्यासोबत झाली ! मनन च्या आईला आणि मला ही बघता क्षणी च आवडली . प्रश्न होता मनन चा! थोड्या वेळाने आम्ही सहजच त्या दोघांची ओळख करून दिली . मनन ही तिथे कोणाला ओळखत नव्हता म्हणून दिपा त्याला सर्वांसोबत ओळख करून देत होती , मनन ला कुठल्याही प्रकारचं त्रास होईल असं तिला तिथे काही होऊन द्यायचं नव्हतं ! त्याच्या करमणुकीसाठी ही तिने खूपच मेहनत घेतली ! तीही उत्साहाने ! आम्ही घरी आल्यानंतर मनन फक्त दिपा बद्दलच बोलत होता . मला खूप आनंद झाला होता , कदाचित जे माझ्या मनात आलं होत तेच त्याच्या ही मनात होत ! मी त्याच्या आईला हळूच इशाऱ्याने त्याला पुढे विचारण्यासाठी सांगितलं... तितक्यात आई पुढे म्हणाली , काय मग ? विचारूया का तिच्या आई वडीलांना ? मनन ने थोड काहीही न कळल्यासारखं केलं ! मी हसून म्हणालो , अरे तुझ्या आणि दीपाच्या लग्नाबद्दल ! मनन थोडा लाजला ! आणि म्हणाला हो चालेल जर तुमची इच्छा असेल तर काय ! ( चेहऱ्यावर हास्य झळकत होत ) मी लगेचच दोघांच्या बद्दल तिच्या आई वडीलांना विचारलं ! आमचे संबंध खूप चांगले होते म्हणून काही अडचण नाही आली. काही दिवसातच धूमधडाक्यात दोघांचं लग्न झालं . सगळ खूप व्यवस्थित चालू होत . दिपा हि आमच्यामध्ये एकदम रुळून गेली होती .आम्हाला ही मुलीची कमी भरून निघाल्यासारखं वाटत होत . लग्नाच्या तीन महिन्यातच आम्हाला आम्ही आजी आजोबा होणार हे दोघांनी सांगितलं ! आम्ही खुश झालो होतो सगळे ! दीपाला तिच्या जागेवरून ही उठण्यासाठी मनाई होती ! काही लागलं तरी आम्ही हातात देत असू .. खूप काळजी घेतली तिची आम्ही .. तिला तर आम्ही माहेरी सुद्धा नव्हत पाठवलं ! तिच्याशिवाय घर आता खाली वाटत असत ! तिच्या आईवडिलांनाच आम्ही बोलवून घेतलं होत . तिला प्रिन्सी सारखी गोड मुलगी झाली . घरात फक्त आणि फक्त आनंदाचे वारे वाहत होते . अस वाटत होत आपलं कुटुंब हे सगळ्यात आनंदी कुटुंब आहे . काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून हे या जन्मी अनुभवत आहोत अस आम्हाला सतत वाटायचं! प्रिन्सी सहा महिन्याची झाल्यापासून च दिपा हि मनन सोबत ऑफिस ला जाऊ लागली .सगळ अगदी स्वप्नासारखं चालू होत . त्या दोघांचं ऑफिस ला एकत्र जाणं येण आणि आमच प्रिन्सी ला सांभाळणं ! ते दोघे घरी आल्यानंतर तर घरी एकदम जल्लोष सारखं वातावरण असायचं . एकदिवस मनन चा फोन आला, दोघे बाहेर जाणार होते ! उशीर होणार म्हणून ! मग आम्ही दोघेही जेवून घेतलं आणि प्रिन्सी ला जेवण भरवून झोपवलं होत !
.....