Niyati - 60 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 60

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 60








भाग 60




तिला आता... रडूच कोसळले.... लीलासुद्धा रडू लागल्या...

तसे मायराने त्यांच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि रडू लागली.....
हे दृश्य दाराजवळ उभा असलेला मोहित पाहत होता...
मायलेकींना असं पाहून त्यालाही गलबलून आले...
आणि...मग....
तो तसाच आल्या पावली परत फिरला.....



खरं पाहता त्याच्यासाठी आज.... मोठा दिवस होता.... त्याच्याकडे आज कोणीतरी त्यांच्या घरी त्यांचं स्वतःचं 
असं कूणीतरी नात्याचं आलं होतं...



त्यामुळे त्याला बाहेर राहावलंच नव्हते... म्हणून तो गेल्या पावली परत आला होता...

बाहेर आला आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊन..... पाणावलेल्या नेंत्रांनी उभा राहिला...



तेवढ्यात सावित्रीबाई यांचे लक्ष गेले त्याच्याकडे... त्याला तसा उभा पाहून... काहीतरी घडले असावे... म्हणून प्रथम दुर्लक्ष केले पण आता त्यांचे लक्ष त्यांच्या खोलीच्या दाराकडे गेले... तर तेथे असलेल्या पादत्राणांवरून लक्षात आले त्यांच्या घरी कोणीतरी आले असावे....





तसेच त्या सावकाश चालत ..."मायरा"....आवाज देत
घरात आल्या....
तर त्यांना मायरा .....लीला यांच्या पायाशी बसून त्यांच्या मांडीवर डोके ठेवून दिसली..... त्यावरून त्यांना समजले 
की या कुणीतरी तेवढ्याच जवळच्या असाव्या ....जेवढ्या दिसत आहेत....



त्या आतमध्ये आल्यानंतर.... दिसलेले दृश्य पाहून....
थबकल्या अवस्थेत उभ्या होत्या.... मग ....
रामचे त्यांच्याकडे लक्ष गेले....




सावित्रीकाकू त्यांना म्हणजे रामला उद्देशून म्हणाल्या...
"ते सकाळपासून मायरा दिसली नाही..... आज बोलणेही 
झाले नाही आतापर्यंत काहीच आमचे ....म्हणून मी आले..."



त्यांचा आवाज ऐकून मायरा आणि लीला भानावर आल्या...





मायरा सावित्री काकूंना म्हणाली....
"काकू... ही माझी आई आहे.... आणि हा माझा दादा 'राम'
दोघेही पहिल्यांदाच आले आहेत ना इथे मला भेटायला...
म्हणून जरा दोघींनाही आम्हाला भरून आले होते...
आणि आई या सावित्री काकू आहेत... तुझ्या प्रमाणेच त्या माझी काळजी घेतात अगदी आईसारखी.... म्हणूनच त्या मी उठले नाही आज लवकर तर मला पाहायला आलेल्या की
मला बरं नाही ना...!! मला काय झाले असावे...?? या उद्देशाने...."






सावित्री काकूंना छान वाटले...की... मायराने त्यांना आईचा दर्जा दिलेला आहे..... रामलाही छान वाटले की मायराने त्याला भावाचा दर्जा दिला.... तसा तो तर तिला नेहमीच बहीण मानायचा जरी संबोध करत नसला तरी.... पण आज तिने समोर बोलूनही दाखवले होते.... 
त्याला ते फार फार आवडले.





सावित्री काकू म्हणाल्या....
"अगं.... आई सकाळी सकाळी आलेली आहे.... 
दादा पण सोबत आहे...मग त्यांच्यासाठी नाश्त्याचे बनवलं का काही... तरी....??"

हे ऐकले ....ना ऐकले मायरा धडपडत उठली...





मायरा....
"हो काकू ... बरं झाल.... तुम्ही आठवण करून दिली... 
थांबा..... मी आता पोहे बनवायला घेते पटकन...."






सावित्री काकू म्हणाल्या....
"अगं ...पाहुणे आलेत आणि मोहित दिसत नाहीये...."






मायरा (गडबडून) म्हणाली....
"अहो ....तो लायब्ररीत जाऊन येतो असे बोलला..."






सावित्री काकू म्हणाल्या....
"अगं... पण तो तर मला म्हणाला होता की आज लायब्ररी
बंद राहणार आहे तर तो... घरीच अभ्यास करणार..."






हे तर तिलाही माहित होते... ती पण समजून गेली होती की कदाचित आईला आवडणार नाही तो जवळ आलेला.. म्हणून तो दूर जाऊन बसला असेल कुठेतरी....






लीला आणि राम ..यांच्या सुद्धा लक्षात आले ते....
लीला यांनी रामला इशारा केला त्यावर..





रामंच मग पुढे बोलू लागला....
"थांबा ....मीच घेऊन येतो जावयांना..."





त्यावर मायरा पटकन म्हणाली....
"नको ....दादा असू दे... काकू ...तुम्ही कांदे आणि मिरच्या कापता का प्लीज.... मी कांदेपोहे बनविते.... मला माहित आहे मोहित कुठे थांबला असेल....??"





असं म्हणून ती झटपट बाहेर आली आणि...
तिला गेटकडे वॉचमन काकांसोबत बोलत उभा असलेला मोहित दिसला......





त्याच्याकडे लगबगीने जाऊ लागली... तेवढ्यात त्याचेही लक्ष तिच्याकडे गेले.... इशाऱ्याने तिने त्याला बोलावले... कुठलीतरी गरज असावी कामाबद्दल म्हणून तोही धडपडीने आला....




तसा ती त्याचा हात पकडून त्याला घरात घेऊन आली....
त्याला काही बोलायला सूचायच्या अगोदर तो घरात आला होता....




तसे मग तो तेथील बेडवर बसला.... त्याला तर काय बोलावे सुचत नव्हते....??


तेवढ्यात बाहेरून वॉचमॅन काकांनी आवाज दिला... म्हणून सावित्री काकू बाहेर गेल्या....






आता त्या गेल्यावर थोडे घरातले वातावरण मोकळे 
वाटू लागले मायराला....
मायरा ...काकूंनी अर्धवट कापलेले कांदे घेऊन कापू लागणार तर तिच्या हातून मोहितने घेतले आणि स्वतः करू लागला.






तिला म्हणाला....
"जा तू....बोलत बस आईसोबत... मी करतो....."
असं म्हणाला पण क्षणासाठी थबकला...
मायराकडे पाहून.... हळूच कुजबुजत म्हणाला...
"पण चालेल ना... मी बनवलेले..."



त्यावर मायराने अर्धवर्तुळाकार मान हलवली...


तसे त्याला हायसे वाटले... आणि त्याने भरभर 
ऊरकायला घेतले.....





तोपर्यंत दोघीजणी बोलत बसल्या इकडचे तिकडचे... 
मायरा सांगू लागली की ती काय काय करते...??
सावित्री काकू आणि मायरा दोघीही भांडणाच्या कोचिंग क्लासेस मध्ये शिकवणी देतात दुसऱ्यांना.....
हे तर ऐकून लीला आणि राम दोघांचेही डोळे मोठे झाले
होते...






लीला....
"शहरामध्ये ऐकावं ते काय काय नवलंच असतं...??"





आणि मोहितकडे वळून विचारू लागल्या...

लीला....
"जावई बापू.... तुमची परीक्षा कधी आहे म्हणायची आता..."






मोहितने तर अपेक्षितच केले नव्हते की त्या त्यांच्याशी बोलतील ....काही विचारतील...??... आणि त्या तर चक्क त्याला जावईबापू ....म्हणत होत्या.... त्याला गडबडल्यासारखे झाले... पण छानही वाटलं.... जावईबापू ऐकून..



मोहित....
"पुढच्याच आठवड्यात आहे आता परीक्षा माझी....
ही पहिली परीक्षा राहील माझी... जर याच्यात मी पास
झालो तर मग.... दुसरी होईल... ती मुलाखत असेल..."


लीला....
"होईल ...नक्कीच...  तुम्ही पास व्हाल... आमचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत... पंचक्रोशीत तुम्ही नाव उज्वल कराल.. याची आम्हाला फार फार आशा आहे...."





त्यांचं असं बोलणं ऐकून मोहितला तर दडपणंच आलं आता..

तो....मनात....
"मेहनत तर घेतोय मी एवढी... यांच्या अपेक्षेत मी पास नाही झालो तर.... बापरे...."






त्याच्या चेहऱ्यावरूनंच मायराला समजलं त्याच्या मनात काय चालले आहे....??
ती आपल्या आईला म्हणाली....
"अगं  आई..... तो जीवाचं रान करूनच अभ्यास करत 
आहे रात्रंदिवस.... खूप खूप कठीण असते ती परीक्षा.... 
त्याचा प्रयत्न चालूच आहे.... पाहूया काय होतं ते....!!"





रामलाही समजले ...मोहित वर दडपण आले ते...
पण त्यालाही माहीत होतं त्याच्या मालकीणबाईचा स्वभाव....
त्यांचं ते कडक बोलणं नेहमीच... मायराच्याही सरावाचं होतं...
पण मोहितला ते माहीत नव्हतं ....त्यांचा स्वभाव...
परिस्थिती लक्षात घेता मायरा... त्याच्यासोबत उभी राहून पटापट त्याला मदतीचा हात देऊ लागली....




कांदेपोहे थोड्याच वेळात तयार झाले आणि रूमभर सुगंध दरवळला त्यांचा....







त्या दरवळलेल्या सुगंधाने लीला आणि राम दोघांच्याही पोटात भुकेने ढवळून आले..... आज दोघेही म्हणजे लीला आणि राम मायराच्या घरचे ....त्यांनी बनवलेले काहीतरी प्रथमच खाणार होते.... तर त्यांना कधी एकदा ....हे दोघे समोर कांदेपोह्यांची प्लेट आणून देणार असे वाटू लागले.....





मोहितने प्लेट रेडी केल्या... मायरा सावित्रीकाकू आणि वॉचमन काकांना आवाज देण्यासाठी गेली...
रेडी झालेल्या प्लेट्स मोहितने ट्रेमध्ये घेतल्या आणि दोघांसमोर धरल्या....
कांदेपोह्यांची प्लेट दोघांनीही घेतली.... प्रथमतः त्यांना वाटले की मायराला येतपर्यंत थांबावे....





पण शेवटी न राहवून लीला यांनी एक घास घेतला....
त्यांना कांदेपोहे खूप आवडले..... आपल्या पोरीला एवढे छान कांदेपोहे बनवता येतात.... असं वाटून त्यांनी लगेच दुसराही घास घेतला... घाईघाईने...... जरा मोठाच....





आणि तेवढ्यात त्यांना ठसका बसला....


मोहित जवळ उभा होता.... लगेच त्याने पाण्याचा ग्लास घेतला... त्यांच्याजवळ आला.... तोपर्यंत रामने त्यांच्या हातातली प्लेट घेतली होती.... पण त्यांचा ठसका  बघून
मोहितने लगेच ग्लास त्यांच्या तोंडाशी लावला... तसे त्या पाणी पिऊ लागल्या... मोहितने त्यासोबतच त्यांच्या पाठीवरून काळजीने हात फिरवला..... काय.... काय....
काय नव्हते त्यात...??
त्या स्पर्शामध्ये काळजी तर होतीच पण एका आईबद्दल वाटणारी माया होती....??? ही माया कधीच लीला यांना धवल  याने केलेल्या स्पर्शातही वाटली नव्हती....




त्या पाणी पिता पिता त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या....
का आपण या एवढ्या चांगल्या मुलासोबत असे वागलो....??
तो एक व्यक्ती आहे... तो एक चांगला माणूस आहे.... या भावनेने आपण का नाही बघू शकलो याच्याकडे...???
आपल्या मुलीसाठी आपल्याला एक चांगल्या माणसाचीच 
.... एका चांगल्या व्यक्तीचीच तर जावई म्हणून गरज होती ना....!!  





किती निर्मळ चांगल्या भावना आहेत याच्या स्पर्शात आपल्याबद्दल....??? आपण यांच्यासोबत एवढं 
असं तसं केलं तरी सुद्धा.... त्याने एका शब्दांनी आपल्याला काहीही म्हटले नाही..... किती त्रास झाला असेल त्याला तरीसुद्धा काही बोलला नाही आता???.. या सर्व घडून येणाऱ्या चक्रामध्ये त्याचे आई वडील सुद्धा त्याने गमावले.... पोरका झाला हा....??
तरी अजिबात कपट म्हणून वाटत नाही याच्या स्वभावात.... 
बरं झालं... मायराने याला निवडलं...




कदाचित मायराचा नशीब चांगलं असावं म्हणून सुंदर सोबत हिचे लग्न झाले नाही.... नाहीतर त्याने मायराचेसुद्धा
मीराप्रमाणे हाल करायला मागेपुढे पाहिले नसते.....


त्यांना.... हा सर्व विचार करून.... त्यांचे हृदय भरून आले...
आणि त्यांनी....
मोहितचे दोन्ही हात आपल्या हातात पकडले... आणि म्हणाल्या....
"जावई बापू.... क्षमा करा मला.... आम्ही जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच... उच-नीच धरून बसलो.... बदलत्या काळाबरोबर माणसानेही बदलायचे असते... तो बदल स्वीकारायचा असतो... हे आमच्या लक्षात आले नाही....
खरंच ...आम्ही तुमची मनापासून माफी मागतो.."


असे त्या हळव्या स्वरात म्हणाल्या... आणि मग....





🌹🌹🌹🌹🌹