Niyati - 3 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 3

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 3





भाग 3




मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी ही नेहमीची सवय झाली होती.




तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.




त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???




"मोहित्या हे काय आहे...???"




"मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे."




"बक्षीस किती रुपयांचा असेल...???"



मोहित आता खरच मनातून चरकला.

गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे पाहिले. पण त्यांना काहीही न बोलता तो गप्पच राहिला. आणि त्याने तो सिल्वर कप ....त्याची जे ट्रंक होती त्या ट्रंकेत ठेवून दिला.



मामा दारू ढोसून असल्यामुळे सारखा बडबड बडबड करीत होता. त्याची वयाची साठी उलटून गेली होती.

अगदी थकला होता तो. पण भरपूर पिणे त्याने काही अद्यापही कमी केले नव्हते.

"मोहित्या... आता तुझी शाळा संपली का...??"



"हो....."




"हा... आता तुला सांगतो तुझ्या गाव खेड्यात काही जाऊ नकोस. महिन्यातून चार-दोन मढी .येणार आणि तू जगणार. कवडूचे एकट्याचेच नाही पोट भरत तिथे. तू तिथे जाऊन आणि काय करणार...??"



"मी नोकरी करणार...??"



"नोकरी...??"



"हो ....आता मला चांगली नोकरी लागेल."



"पोरा... गोड साखरेसारखं बोलतोस की राव.. अरे इकडे आपला धंदा आहे. पिढी जात आहे धंदा.. त्याला पोसायला नाही पाहिजे मग..?? इथेच राहा आता. बापाचा नको माझा धंदा बघ. माझा जावई म्हणून रहा. माझी पोरगी शिकली नाही तरी हुशार आहे."




"मामा.... मी एवढ्यात लग्न करणार नाही."




"अरे .....असं म्हणून आपल्या जातीला चालतं व्हय रे. मिसरूड फुटलं म्हणजे लगीन करून घ्यायचं असतं."



याप्रकारे मामाने बोलण्याची सुरुवात केली होती. सारखा कितीतरी वेळ बडबडत होता. मोहितला ते बोलणे असह्य झाले होते. पण सारे ऐकणे भाग होते.

त्याची जिद्द संपली होती.

त्याला वाटलं होतं आनंदाने मामा संपूर्ण वाडी भरनाचेल.. आपल्या भाषेचे कौतुक करेल अशीच त्याची अपेक्षा होती आणि ती आता संपली होती.



संपूर्ण बडबड ऐकत पर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले.



साडेनऊ वाजता उठला. त्याचे मामा तर जेवायचं नावच घेत नव्हते. आणि त्यांची बडबड ऐकून मोहितची सध्या भूक मेली होती.


तो वाडीतून बाहेर पडला तेव्हा रस्त्यावरचे एक दोन कुत्रे त्याच्याकडे पाहून भुंकत होते.




ह्या घरी आल्यानंतर एका तासात तो ......त्यापूर्वी जेवढा यशाने हवेत तरंगत होता .....आता मात्र सत्यसृष्टीत आणून नियतीने त्याला आदळले होते.



जमिनीला त्याचे पाय टेकले होते यशाने हवेवर तरंगत असणारे.मध्य रात्र झाली तरी त्याला घरी परत जावेसे वाटत नव्हते. या काळातंही त्याची परिस्थिती अशी होती की खिशात एकही दमडी नव्हती.



तो तसाच रात्रभर भुकेला राहिला. आणि भुतासारखा इकडे तिकडे फिरत राहिला.

त्याचे मन उद्विग्न झाले होते...पहाटे पहाटे कधीतरी तो पुन्हा घरी आला आणि तसाच झोपला न जेवता.



सकाळीच त्याने आपल्या गाव खेड्याला जाण्याची तयारी केली. तेवढे पैसे त्यानी त्याच्याजवळ बरोबर जपून ठेवले होते.समोरच्या नळावर तो आला.



गार पाण्याने छान आंघोळ केली. त्याचंच पाहून तर त्या वाडीतील तरुण मुलं सुद्धा नळाखाली उभे राहून आंघोळ करू लागली होती.


त्याला आता गावखेड्यातील घराचे वेध लागले होते.

तेथे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचं प्रेम.तीही तर तिथेच राहणारी होती त्या गावातील. दोघेही एकाच गावचे.शिकण्यासाठी तिच्या वडिलांनी येथे तिला आणले.


आणि तो तर....तो लहानपणापासून याच शहरात शिकत होता  आपल्या मामा जवळ.


अकरावीत ती त्याच्या कॉलेजमध्ये आली. कधीही नीट मुलींशी न बोलता येणारा तो तिच्या प्रेमात पडला.म्हणून तोही प्रयत्न करून.... तसेही त्याला कुठे ना कुठे शिकायला जावेच लागणार होते. तर त्याने ती शिकत असलेल्या  तिच्या कॉलेजमध्येच  पुढेही बीएससी ला ऍडमिशन घेतली होती.


तीही पास झाली होती. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता ती गावांमध्ये परतणार होती.म्हणून त्यानेही गावांमध्ये जाऊनच नोकरी करण्याचे आणि गाव खेड्यातील शेतातली परिस्थिती आणि अजून काही करता आले तर गावातच राहून करण्याची.... त्याने विचार केला होता.




पण आता जाण्यापूर्वी ते त्यालाही माहित करून घ्यायचे होते किती केव्हा निघणार आहे..परिस्थितीने होरपळलेला तो या काळातही त्याच्याजवळ फोन उपलब्ध नव्हता.



ती ज्या होस्टेलमध्ये राहत होती.त्या होस्टेलमध्ये चौकशी त्याने बाहेर उभे राहून तिथे एक दोन मुली होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याला समजले की ती सकाळीच गावाला निघून गेलेली आहे.



तसा तो तयारच होता. मग तिच्याबद्दल माहिती मिळताच आनंदाने तो बस स्टॉपकडे निघाला. खूप दिवसापासून त्याने बरोबर नेमके गावाला जाण्यापुरती तिकीट चे पैसे वाचवून ठेवलेले होते.


बस मध्ये बसून आता आपण घरी पोहोचणार आणि तिलाही भेटणार हा एक वेगळाच आनंद त्याला अनुभवता येत होता.



आता मात्र बसमध्ये बसल्यावर आपल्याला काल मिळालेले बक्षीस सिल्वर ट्रॉफी सोबत घ्यायला हवी होती असे वाटू लागले. पण आता बस निघाली होती.आपण कालच तिला भेटायला पाहिजे होते असे त्याला आता वाटू लागले होते.



बस त्याच्या गावाला थांबली. आणि पुन्हा त्याचे पाय जमिनीला लागले. एका बाजूला तो थांबून पुढे जाऊ की नाही. हाच संघर्ष त्याच्या डोक्यात उभा राहिला.




रात्रीचा प्रसंग त्याचे अंतकरण पिळवून टाकणारा होता. तो आता तिच्या घराकडे निघाला होता. कारण स्टॉप पासून तिचे घर जवळ होते.त्याला मनात धाकधूक वाटत होती की तोच अनुभव पुन्हा तर नाही ना येणार आपल्याला...???पण नकळत त्याचे पाय पुढे चालू लागले. एका दुकानात त्याने टाईम पाहिला तर दहा वाजायला आले होते.




मोहित (मनात)....."ती घरी असेल काय..???बाहेर आपल्या मैत्रिणींसोबत तर गेली नसेल कुठे...???त्यांच्या घरचे माझ्याशी कशी वागतील..??तिला भेटायला गेलो तर कोणता अनुभव येईल मला..??मामा सारखाच तर हे सुद्धा विचार नाही करतील...??"




या सर्व विचारांचा डोंगर डोक्यावर घेऊन तो भव्य बंगला वजा इमारती जवळ पोहोचला.




बंगल्याचे गेट खुले होते. गेटवरील वॉचमन जवळ त्याने निरोप दिला आणि नाव सांगितले आपले. आणि तो तेथेच गेट जवळ उभा राहिला पहात. आणि अचानक ती....




मायरा त्या इमारतीच्या डोअर मधून बाहेर येताना त्याला दिसली. तसेच त्याचे लक्ष वर गेले तर बंगल्याच्या वरील भागातल्या खिडकीमधून दोन माणसे त्याच्याकडे पाहत होती.




मायरा येत होती हसत हसत आनंदाने त्याच्याकडे.त्याला वाटले "आपण स्वप्न तर पाहत नाही आहे...!!!"




मायरा येत असताना तिच्या हातामध्ये न्युज पेपर असल्याचे दिसून आले. ती त्याच्याजवळ आली त्याचा हात पकडला आणि आत मध्ये घेऊन जाऊ लागले. त्याला तर शॉक बसला आणखी.



मायरा चक्क हात पकडून त्याला आत मध्ये नेत आहे म्हणजे काय...???एवढे खुले विचार बंगल्यांमध्ये केव्हापासून होऊ लागले.



मायरा चालता चालता त्याच्यासोबत बोलू लागली..."मोहित हे पाहिलं..??"हातातील हितवाद न्युज पेपर त्याच्या समोर धरून विचारले तिने.तो या सर्व प्रकाराने गडबडला होता. तसाच बोलला ..."काय...??"



एका अब्जाधीशांची मुलगी... आपल्याला पाहून अशी धावत घेऊन जायला येईल अशी त्याने अजिबात अपेक्षा केली नव्हती बंगल्यात असताना.बाहेर तिकडे शहरात घ्यायला आली असती कदाचित मानलेही असते.पण इथे ........इथली मेंटॅलिटी वेगळी होती. म्हणूनच तो आतून घाबरून होता.




"मोहित... तुझा फोटो आलाय न्युज पेपर मध्ये.. बघ!!"



एक तर त्याला वाटत होते की त्याचे स्वागत अतिशय थंड होईल.आणि मायरा ने धावत येऊन हात पकडून घरात नेणे हा पहिला शॉक.



न्युज पेपर मध्ये त्याच्यासारख्या मुलांचा फोटो येणे म्हणजे दुसरा शॉक.................तर तिने बोलल्यानंतर तो आश्चर्याने जोराने "काय...???" म्हणाला.



त्यावर मायरा खळखळून हसत म्हणाली...."चल...... तू येणार हे माहित होतं मला.मीच येणार होते तुला घ्यायला सकाळी.... पण तू तुझा पत्ताच कधी सांगत नाहीस."




बंगल्यातल्या स्टेप्स चढता चढता एका ठिकाणी थांबून न्यूज पेपर पाहू लागला. तर त्याला तिसऱ्या पेजवर सिल्वर कप घेतानाचा फोटो दिसला. तेथे त्याची बरीचशी स्तुती पण केलेली होती.


त्याला खूप छान वाटले स्वतःचा फोटो न्युज पेपर मध्ये पाहून. आणि माहिती इतक्या छान तर्हेने लिहिलेली होती की त्याने दोनदा तिथेच वाचून काढली.हळूहळू त्याच्या मनात जी भीती होती ती आता कमी झाली स्वतःबद्दल.त्याच्या चेहऱ्यावरील ते हावभाव पाहून मायरालाही छान वाटत होते. कारण त्याची सर्व परिस्थिती ती जाणून होती.



बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.



स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..

....


🌹🌹🌹🌹🌹