भाग 61
आणि म्हणाल्या....
"जावई बापू.... क्षमा करा मला.... आम्ही जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच... उच्च-नीच धरून बसलो.... बदलत्या काळाबरोबर माणसानेही बदलायचे असते... तो बदल स्वीकारायचा असतो... हे आमच्या लक्षात आले नाही....
खरंच ...आम्ही तुमची मनापासून माफी मागतो.."
असे त्या हळव्या स्वरात म्हणाल्या... आणि मग....
मोहितला अजिबात राहावले नाही...
त्यालाही अगदी हळवे झाल्यासारखे वाटले....
तो म्हणाला....
"मालकिन बाई...."
तो पुढे बोलतंच होता तर लीला यांनी त्याला
बोलता बोलता थांबविले आणि ..
त्या म्हणाल्या....
"नाही ....तुम्ही आता मला आई म्हणायचं...
तेव्हाच मी समजेल की तुम्ही मला माफ केले... जावईबापू."
मायरा दारातूनंच सर्व बघत होती.... तिला फार छान वाटलं की तिच्या आईने मोहितचा स्वीकार केला आहे एक मुलगा म्हणून...
मोहित म्हणू लागला लीला यांना ....
"तुम्ही पण मला जावई बापू म्हणू नका आणि मला मोहीतंच म्हणा तुम्ही...."
मायरा आली.... आणि मोहितला म्हणाली....
"मी सावित्री काकू आणि वॉचमन काकांना पोहे देऊन येते.... तिकडेच मागविले दोघांनी.... येते मी दोन मिनिटात..."
आल्यानंतर ती सुद्धा सोबतंच नाष्टा करू लागली...
सहजच मायराच्या मनात प्रश्न आला...
"आई... ट्रेन तर रात्रीची आहे ना इथली पोहोचण्याची...
तुम्ही दोघे सकाळी कसे काय आले...?? आणि बाबाला का नाही आणलं...??? तेही आले असते तर किती छान वाटलं असतं मला..."
तिने असे म्हटल्यानंतर मोहितच्याही लक्षात आले की खरंच
हे दोघेही रात्री येण्यास हवे होते ट्रेनच्या अनुसार....
नक्कीच कुठेतरी रात्री थांबले असावे......
तो विचार करतच होता याप्रमाणे...
तर लीला शांतपणे म्हणाल्या.....
"येथे आम्ही तिघे आलेलो रात्रीच... तुझे बाबा... मी आणि राम... रात्री आम्ही लॉजवर थांबलेलो होतो..... तुझ्या बाबाची तब्येत थोडीशी प्रवासाने... त्यांना बरोबर वाटत नव्हती... तर तेथेच आराम करत आहेत रूमवर आणि आम्ही दोघे आलो.."
त्यांनी हे सांगितल्यानंतर मायरा पॅनिक झाली...
"अगं ....मग त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल ना..."
लीला म्हणाल्या...
"दाखवलेलं आहे डॉक्टरांना... त्यांनी ...
त्यांना आराम करायला सांगितला औषधी देऊन वगैरे.... आलोच आहोत आम्ही... पण तुला डोळाभर पाहण्याच्या ओढीने मी येथपर्यंत आले."
मायरा त्यावर म्हणाली...
"अगं ..मग व्हिडिओ कॉल केला असताना..."
लीला म्हणाल्या....
"व्हिडिओ कॉल ने समाधान होतं का गं.... ??
जाणारच आहोत आम्ही पटकन... बाबांनाही तुम्हा दोघांना भेटायचं होतं... त्याच आशेने ते आलेले होते पण त्यांची
तब्येत बिघडली..."
बोलताना त्या मोहित कडे पाहत होत्या की त्याला काय वाटतं...?? बाबाराव यांना त्याला भेटावेसे वाटत आहे
तर मोहित खरंच भेट घेईल का त्यांची...??
अपेक्षेने त्या मोहित कडे बघत होत्या..
मोहित म्हणाला मायराला.....
"मायू.... चल झटपट नाश्ता कर.... आपण सर्वजण जाऊन भेटून येऊ..... आई.... तुम्ही चिंता नका करू... ते लवकरच ठीक होतील...."
थोड्यावेळाने सर्व आवरून... मोहितने सावित्रीबाई यांच्याजवळ घराची चावी दिली आणि हे चौघेही बाबाराव थांबलेले होते त्या लॉज कडे गेले....
तेथे पोहोचल्यानंतर...
मायराला तर आपल्या बाबांना असे शांत झोपलेले पाहून
कसेसे वाटले.... चाहूल लागताच बाबाराव उठून बसले.... आणि मायराला इशाऱ्याने जवळ बोलावले....
तशी मायरा त्यांच्या मिठीत गेली..... आत्ता कुठे बाबाराव
यांना समाधान वाटत होते....?? किती किती दिवसांनी मन
शांत झाल्यासारखे वाटत होते...!!
त्यांना आता समजले होते की पैसा आडका कितीही असला तरी तो सुख देऊ शकत नाही..
मानसिक सुख हे आपल्या मुलाबाळांनीच ... त्यांच्या सुखरूपतेनेच प्राप्त होते......
मोहितही दुरूनच बघत होता त्यांना.... पूर्वी कणखरपणे दिसणारे बाबाराव कुलकर्णी आज त्यांना.... केवळ या सहा महिन्यात... पोक्त झालेले... दिसत होते...
बाबाराव यांनी मायराला जवळ घेऊनच मोहितला विचारले...
"अभ्यास कसा सुरू आहे तुमचा जावईबापू...??"
त्यांचा असा प्रश्न येताच सकाळपासून हा त्याला दुसरा
धक्का होता.... त्याला उत्तर द्यायला सुचलेच नाही....
त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बाबाराव कुलकर्णी
खळखळून हसले.
ते मिशीवर ताव देऊन म्हणाले....
"कोणत्याही हालती मध्ये... परीक्षेत तुम्ही सफल व्हायलाच हवे... पंचक्रोशीत मानमरातब आहे आमची..... तो टिकून राहायला हवा.... समजलं का जावईबापू...."
यावर मघाप्रमाणे..... आता ही त्याला मनावर दडपण आल्यासारखे वाटले....
... तरीही त्याने बाबाराव यांना समर्थन दर्शवन्याच्या
उद्देशाने मान वर खाली हलविली....
दिवसभर दोघे तेथेच त्यांच्यासोबत राहिले...
संध्याकाळी तेथेच त्यांच्यासोबत जेवणंही करून घेतले लॉजवर...
रात्रीच्या ट्रेनने तिघेही परत निघाले....
जाताना त्यांनी आश्वासन घेतले की...
मायरा पहिल्या परीक्षेच्या वेळी तेथेच सोबत राहील....
जर मोहित प्रथम परीक्षेत सफल झाला... तर मुलाखत
जिथे कुठे होईल तिथे होईल....
पण त्याची तयारी करण्यासाठी मात्र तिथेच त्याला राहावे
लागेल दिल्लीमध्ये कोचिंग साठी.... मॉक इंटरव्यू साठी....
तोपर्यंत मायरा त्याच्यासोबत असेल....
सिलेक्शन झाल्यावर मात्र जेव्हा त्याची ट्रेनिंग असेल
त्यावेळी मायरा परत येणार कुलकर्णी बंगल्यात....
मोहितची ट्रेनिंग पूर्ण होतपर्यंत....
......
आता मोहित आणि मायरा दोघेही फार आनंदी होते... नात्यांमध्ये असणारी कटूता दूर झाली होती त्यांची....
आणि घरच्यांची .....पुन्हा आता मोहित नव्या उमेदीने....
.....अभ्यास करू लागला.....
मायराचेही रूटीन व्यवस्थित सुरू होते... ती त्याला अजिबात डिस्टर्ब होऊ देत नव्हती.... त्याने त्याच्या अभ्यासाची कॅपॅसिटी आणखी वाढवली.... अशातच त्याची परीक्षा झाली...
त्याचे पेपर अगदी छान गेले होते.... रिझल्ट बद्दल त्याला कोणताही डाऊट नव्हता... त्याला चांगलेच माहीत होतं की आपला रिझल्ट काय येणार आहे...???
तो खुशीतच घरी आला.... त्याची खूशी पाहूनच मायराला समजले होते की पेपर त्याचा कसा गेला असावा...??
मायरालाही फार फार आनंद झाला...
आता फक्त इंटरव्यू बाकी होता.... आणि तोही तो
नक्कीच क्रॅक करणार याची त्याला कल्पना होती...
तोच त्याच्याबद्दल विश्वास मायरालाही होता....
मायराने गावी फोन करून सर्वांना त्याचे पेपर चांगला गेला आहे हे सांगितले..... ज्या दिवशी पेपर झाला त्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी... घरीच... चौघांनी....
मायरा आणी मोहित... वॉचमन काका आणि सावित्री काकू....
बाहेरून जेवण बोलवून अंगणात टेबलखुर्ची टाकून पार्टी केली होती.....
.....
रात्री झोपताना.... मोहितच्या मनात विचार आला....
"ही परीक्षा तर नक्कीच मी पास होईल याच्याबद्दल मला खात्री आहे... मी प्रयत्न करणारंच आहे.. जितकी शक्य होईल तेवढे... मुलाखत यशस्वी व्हावे यासाठी.... पण मुलाखत झाल्यानंतर मला ट्रेनिंगला जावे लागेल....
आणि मला मायराला गावी पाठवावे लागेल..."
विचार येताच त्याचा जीव कासाविस झाला...
......
तुरुंगामध्ये झोपेत असताना... आजकाल सुंदर शेलार हा पिसाळल्यागंत करत होता... त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती... इकडे झोप लागली की तिकडे मीरा मानगुटीवर बसून नरड्याचा घोट घेते की काय असे वाटत होते....
आजकाल ती रोजच रात्री त्याच्या झोपेत खोळंबा घालत होती.
रात्र रात्र झोप येत नसल्यामुळे... त्याचे डोके काम करत नव्हते... त्याला भ्रमात असल्यासारखे आता होऊ लागले होते. मन रोज तीळ तीळ मरत होतं त्याचं.....
मानसिक आणि शारीरिक अवस्था त्याची ढासळत चालली होती दिवसेंदिवस.... त्याच्यावर आता जेलमध्ये.... डॉक्टर उपचार करत होते.... पण त्याची तब्येत साथ देत नव्हती आता....
अशातच एक दिवस त्याने संधी साधून... स्वतःच्या हाताला चिरा मारून घेतला होता.... आणि सकाळी रक्ताच्या थारोळ्यात होता... सकाळी डॉक्टरांनी बघितल्यानंतर त्याला मृत घोषित केले..होते....
.......
आज रात्री मायराने सिम्पल प्लेन ... वाईट बॉबी प्रिंट
असलेला ब्लॅक कलरचा नीलेंथ वन पीस घातला होता...
खूपच भारी दिसत होती त्यामध्ये ती...
आठवड्यापूर्वीच तिने तो ऑनलाईन खरेदी केला होता... पण घालण्यासाठी योगायोग आला नव्हता... पण आता आज त्याने फर्स्ट एक्झाम यशस्वी केली होती... थोड्यावेळापूर्वीच रिजल्ट माहीत झाला होता...
म्हणून आज तिने विशेष प्लॅन केला होता रात्रीच्या सेलिब्रेशनचा दोघांमध्येच... दिवसेंदिवस आणखीनंच सुंदर दिसू लागली होती मायरा... या पंधरा दिवसात तर एक वेगळेच तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर... एक विशेष चमक तिच्या नैसर्गिक सौंदर्यत उठून आली होती...
भान हरपून बघत होता मोहित तिच्याकडे आज....
मोबाईल मध्ये मंद आवाजामध्ये संगीत लावून दोघेही हळूहळू एकमेकांसोबत बोलत डान्स करत होते...
तो तिला म्हणाला...
"मायू.... तुला साडी किती छान दिसते...?? आज का नाही घातलीस..???"
मायरा....
"नको ....मग तू जास्त त्रास देतो मला... मी आता स्पेशल ऑकेजनच्या वेळी घालणार आहे...."
मोहित....
"केव्हा येणार आहे ते स्पेशल ऑकेजन....???...मग..."
मायरा....
"जेव्हा तू इंटरव्यू क्रॅक करशील तेव्हा.."
मोहित...
"मी एवढा वेळ वाट पाहायची..."
त्यावरती वर खाली मान हलवते..."येस्स.."
असं म्हणताबरोबर तो तिला कंबरेला धरून जवळ ओढून
घेतो आपल्या.... धुंद होऊन तिचा गंध भरून घेतो श्वासात.
एकमेकांच्या स्पर्शासाठी आसूसलेले दोघेही... एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले... आज मायराने छान पायामध्ये चाळ घातलेले....
त्यांचा छूम छूम आवाज वातावरण उत्तेजित करीत होता...
त्यांच्या संगीतामध्येच रत होऊन दोघांनी प्रणयोत्सव साजरा केला....
मोहितचे मॉक इंटरव्यू देणे सुरू होते... प्रॅक्टिस त्याची जोरात सुरु होती...
इतक्यातंच... मायराला गोड बातमी समजली...
दोघांनाही फार फार आनंद झाला... सावित्रीबाई आणि वॉचमन काका दोघेही... त्यांनाही फार फार आनंद झाला... जणू त्यांचाच नातू किंवा नातीन येत आहे याप्रमाणे..
ही गोड बातमी मायराने फोन करून गावी कळविली...
बाबाराव यांना तर... या बातमीने अंगात नवी उमेद संचारल्यासारखे वाटू लागले...
.....
काही महिन्यातच इंटरव्यू होऊन मोहित पास झाला.
उपजिल्हाधिकारी म्हणून त्याची निवड झाली....
सगळ्यात जास्त खुश तर मायरा झाली होती त्याक्षणी...
आनंदाश्रू आले तिच्या नयनांमध्ये...
मोहितही त्याच्याजवळ असणाऱ्या आई-वडिलांच्या फोटोकडे पाहून आज आनंदाने रडला...
आणि म्हणाला....
"आई बाबा...तुमच्या दोघांचीही इच्छा मी पूर्ण केली..."
पोस्ट मिळाल्यानंतर..
मात्र त्याने त्यांच्या गावात... संपूर्ण रीतीने विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले..... त्याच्या गावातल्या लोकांचीही वैचारिक पातळी उंचावण्याची सुद्धा त्याने प्रयत्न करून विकास घडवून आणला...
त्या गावांमध्ये जी वैचारिक दरी होती..
उच्च...नीच दर्शवणारी..... ती दरी आता मिटवण्याचा त्याने कयासंच बांधला होता..... आणि त्यात तो यशस्वीही झाला..
आता दिल्ली सोडून दोघेही ...गावातंच राहायला आले होते. तेव्हाच त्यांनी एक छान मोकळी जागा बघून बंगला बांधून घेतला..होता...
त्यांच्या सोबत तेथे आता वॉचमन काका आणि सावित्री काकू राहत होत्या.... आणि ते दोघे त्यांच्या छोट्याशा पिल्लूचा सांभाळ करत होते...
एकाच गावात राहत असले तरी बाबाराव कुलकर्णी हे मात्र त्यांच्याच बंगल्यात राहत होते... पण आता ते आणि लीला दोघेही... मायराकडे दिवसभरातून दोन चारदा तरी येऊन
जाऊन राहत होते...
गावातली बरीच कामे आता मायरा.... लीला यांच्या मार्गदर्शनाखाली करत होती... हातभार देण्यासाठी राम सोबत होताच... रामचेही आता लग्न झालेले होते... तो आता जास्तीत जास्त बाबाराव कुलकर्णी यांची तब्येत पाहता त्यांच्या सेवेत उपस्थित राहत होता..
दिवसेंदिवस मोहित... त्याच्या कामामुळे... अख्या पंचक्रोशीत... प्रसिद्ध झाला होता..... आणि आता तो त्यांचा जावई आहे..
हे .....हे बाबाराव कुलकर्णी आणि लीला कुलकर्णी अभिमानाने सांगत होते ज्यांना त्यांना.....
🌹🌹🌹🌹🌹
समाप्त....
धन्यवाद 🙏🙏🙏🙏