Niyati - 59 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 59

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 59





भाग 59


उशीर झाला तरी दोघेही आज तसेच झोपलेले होते..

.मोहितही लवकर उठून रनिंगला जायचा तोही गेला नव्हता...



थकलेले शरीर दोघांचे....ते....तसेच... पुन्हा... निवांत झोपून राहिले आज....मोहित उठला ... त्याने डोळे खोलले आणि समोर ती दिसली....



तिला असं निरागसपणे झोपताना बघून त्याला

"एखाद्याच्या सहवासासाठी रात्रही अपुरी पडू शकते"

हे जे म्हणने ऐकलं होतं त्याच्यावर विश्वास बसला त्याचा.....


त्याने मोबाईल हातात घेऊन टाईम बघितला...सकाळचे साडेआठ होऊन गेलेले होते... तो तसाच उठला हळूच तिला धक्का लागणार नाही या दृष्टीने काळजी घेत...पण तरीही तो बेड फोल्डिंगवाला असल्यामुळे... कधी नव्हे तो थोडासा किरकिर वाजला...

त्या आवाजाने ती देखील उठली.तेवढ्यात तिचेच लक्ष स्वतःकडे गेले...

आणि ती जेवढ्या उमेदीने उठली होती. ....तेवढयाच घाईने ब्लॅंकेट गळ्यापर्यंत पांघरून घेतले.... होते आता....

तसा त्याने तिचा लाजेने लालबुंद झालेला गोरामोरा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेतला आणि त्यावर तो नजर फिरवत माथ्यावर ओठ ठेवत म्हणाला....

"मायू... तू ...तुला अजून आराम करायचा असेल तर तू करू शकतेस..."

त्यावरती झटपट ... मायरा म्हणाली...

"नाही नाही......सावित्री काकू आणि वॉचमन काका काय म्हणतील...??तू थांब इथेच.... तिकडे तोंड कर बघू... मी कपडे चेंज करते अगोदर...."

मोहित....

"बरं ...तू चेंज कर ...मी चहा मांडतो दोघांसाठी..."

असे म्हणत .......तो गॅस शेगडीवर चहा मागण्यासाठी पातेलं घेऊ लागला...

इकडे तिचे कपडे बदलून झाले आणि तिकडे त्याचा चहामांडून झाला...

पटापट पांघरूणाच्या घड्या केल्या....

दोघांचेही ब्रश घेतले पेस्ट लावून.... एक मोहितच्या हातात दिला... आणि दुसरा स्वतः जवळ घेऊन ब्रश करू लागली.... तसे मोहितने दरवाजा खोलला... आणि बाहेर आला....

तर त्याची नजर बाहेर ....सावित्रीकाकू त्या......भांडे घासत असताना त्यांच्यावर गेली.

त्याला त्या गालातल्या गालात हसत आहेत आपल्याकडे पाहून असा भास होऊ लागला...

झटकन त्याने नजर फिरवली आणि वॉशरूमच्या दिशेने गेला...


तो तसा नजर चोरत वॉशरूमच्या दिशेने घाईघाईने जाताना पाहून...तेथेच बाजूला बसून असणारे वॉचमन काका आणि सावित्रीकाकू एकमेकांकडे पाहून हसू लागले...



इकडे वॉशरूममध्ये .....मोहितनेही त्यांच्या दोघांचा हसण्याचा आवाज ... त्याच्या कानांनी तेथे टिपला...आता त्यालाही थोडं लाजल्यागत झाले..



त्याने ब्रश केल्यानंतर तेथे अंगणात असणाऱ्या दोघांचीही नजर चुकवंत तो आतमध्ये आला...




आता मायरा.... तिला तर ... वॉचमन काका आणि काकूंचे दोघांचेही रोजचे रुटीन माहीत होते...



त्यामुळे तिने आज तिकडे नजर अजिबात फिरकवली नाही.


डायरेक्ट वॉशरूम.... गाठले आणि... फ्रेश होऊन डायरेक्ट आत मध्ये.... ना इकडे नजर फिरवली.... ना तिकडे नजर फिरवली..... सरळ आतमध्ये आली...


तर मोहित चहा गाळत होता दोन्ही कपांमध्ये...दोघांनीही छान गरम चहा घेतला....

आणि मायराला सांगून..... आज रनिंग नाही झाली तर निदान चार फेरफटका तरी मारून याव्या परिसरातंच म्हणून निघाला.........



कॅम्पस एरियातच भराभर फेरफटका मारून झाल्यानंतर तो परत आला रूमकडे जावे म्हणून तर त्याला कॅम्पसच्या गेटवर कोणीतरी चौकशी करत आहे.. वॉचमन काकाकडे असे वाटले....तर तो तेथे गेला..



. बघितले तर राम आणि मायराच्या आई लीला ह्या आलेल्या दिसल्या.... तसे तो जवळ गेला.....



आणि त्याने.... भावनेच्या भरात  नमस्कार करण्यासाठी तो जवळ जाणार तर त्याच्या लक्षात आले गावातले वातावरण.....



दचकून दोन हात  दूर...उभा...राहिला....

त्याला पाहून लता यांच्या मनाला समाधान वाटले आणि भरून आले होते.... आता ....

कारण तो आपला जावई आहे ....ही प्रतिमा त्यांच्या मनात चांगली ठसली गेली होती...

ही भावना आता त्यांच्याही मनात आपुलकी धरून होती...


एक वेगळा जिव्हाळा वाटू लागला होता त्यांना मोहित विषयी...हे दोघे दिसल्यानंतर .... त्याने बघितलेले की कुणीतरी आले आपलं जवळचं गावाहून..... या भावनेने मोहित आवेगाने जवळ आला होता पण.... तेवढ्यात....... त्याला कदाचित गावचे नियम आठवले असावेत आणि तो दोन हात दूरच थांबला दचकून.. तेथूनच नमस्कार केला दोघांना....तसे दोघांनीही मोहितचा नमस्कार स्वीकारून....त्याच्यासोबतच रूमपर्यंत आले......




मोहितने आवाज दिला बाहेरूनंच मायराला...मायरा त्याचा आवाज ऐकून बाहेर आली.....तसे तिचे समोर लक्ष गेले आणि ती.. थक्क होऊन पाहत राहिली....




तिचे नेत्र पाण्याने तुडूंन भरले... तिला समोरचे धूसर दिसू लागले...



इकडे लीला यांची सुद्धा स्थिती काहीवेगळी नव्हती.....परिस्थिती बघता मोहित.... म्हणाला....


"अगं.... आतमध्ये तरी येऊ दे ना त्यांना..."

तशी ती भानावर आली..... त्यांना आतमध्ये घेतले....



रामही ...मायराला पाहून.... त्याचे नेत्र पाणावले होते....

"येतो गं मी लायब्ररीतून...." असे म्हणून मोहित मायलेकींना मोकळे सोडावे म्हणून लायब्ररीचे निमित्त करून बाहेर गेला...




लीला आतमध्ये आल्या आणि.... एकाच रूममध्ये तिने संसार थाटलेला बघून....त्यांच्या जीवाचे पाणी पाणी झाले...


"कसे राहत असावे दोघे एवढ्याच खोलीत...??"

रामही विचार करू लागला पाहून.....


लीला आणि राम दोघेही न्याहाळंत होते खोली.... त्यांच्यासाठी मायरा गॅस शेगडीवर चहा बनवू लागली.....


त्यांची खोली निव्वळ बारा बाय बाराची.... उजव्या बाजूला ....गॅस सिलेंडर... गॅस शेगडी टेबलवर ठेवलेली होती आणि खाली सिलेंडर... त्या सिलेंडर वरतीच पाण्याचा गुंड भरून ठेवलेला....टेबलच्या खाली मोकळी जागा होती तिथे आडव्या पाट्यांनी कप्पा बनवलेला... त्यावर संसाराला लागणारे मोजकीच भांडी ठेवलेली होती..... खोलीच्या डाव्या बाजूला ...बंद कोपरा... तेथे दोघांपुरता असलेला फोल्डिंगचा बेड ठेवलेला होता..... त्यावरच्या अंथरुणाच्या घड्या एका बाजूला लावलेल्या होत्या...पण चोळामोळा झालेली बेडशीट अजूनही व्यवस्थित सरळ केलेली नव्हती....त्यावरून त्यांनी अंदाज काढला की बहुतेक हे आज सुट्टी असल्यामुळे दोघेही उशिरा उठलेली असावीत...




चहाचे आंधण ठेवल्यानंतर सहजच मायराने आईकडे बघितले.तर लीला यांचे निरीक्षण चालू असताना तिला दिसले.



तसे तिने ऑकवर्ड होऊन राम कडे बघितले... त्यावर रामने त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस असे इशाऱ्याने सुचवले...


यांच्याकडे जर कोणी वेळेवर आले तर दोन खुर्च्या असाव्या म्हणून मायराने त्या घेतलेल्या होत्या...

त्यातील एकाखुर्चीवर लीला ह्या बसलेल्या होत्या.... बाजूलाच थोड्या अंतरावर दुसऱ्या खुर्चीवर राम बसलेला होता....


आईसोबत कुठून बोलणे सुरू करावे आज ....?? मायराला सुचत नव्हते.....



चहाला उकळी आली.... मायराने गॅस सिम वर केली...आणि पटकन बेडवर ठेवलेले अंथरून तेथेच बाजूलाअसलेल्या स्टूल वर ठेवले...



आणि बेडशीट झटकून व्यवस्थित अंथरली पुन्हा बेडवर...आणि आईला म्हणाली....

"आई... येतेस का इथे आरामशीर बसायला...?? प्रवासामुळे थकून गेलेली असशील तू....तुला चालेल ना  इथे बसलेले....."





लीला म्हणाल्या....

"चालेल ना म्हणजे....?? जर नसते चालले तर मी इथे बसून असती काय तुझ्या रूममध्ये...???"




मायरा....(थरथरत)....

"आई.... तू कशी आहेस...?? बाबा कसे आहेत...??"




लीला....

"मी समोर दिसत आहे म्हणून हा प्रश्न सुचला का तुला....??"




मायरा.....

"तसं नाही गं आई...... मला रोज तुझी आठवण येत होती...गं... पण बाबांनीच म्हटलं होतं ना...!!"




लीला...

."मग काय झालं बाबांनी तसं म्हटलं तर..... तू असं केलं तर त्यांना थोडाही राग नाही यावा का...?? त्यांचा स्वभाव बघता... तुला तेवढं तर माहीतच असायला पाहिजे होतं.... तुम्ही मुलं काहीही कराल..... आमच्याही काही अपेक्षा असतीलंच ना तुमच्याकडून.... मग आम्ही तुम्हाला असंच माफ करून द्यायचं.... आम्ही थोडेसे ही तुमच्यावर रागवायचं नाही... आमचा अधिकार नाही का तुमच्यावर तेवढाही...."




मायरा तिला तर काही बोलायचे सुचतंच नव्हते...तिलाही समजत होतं... तिची आई जे म्हणत आहे ते अगदी खरं आहे... अशा सिच्युएशन मध्ये कोणतेही आई-वडील रागावणारंच.... त्यांच्याही स्वतःच्या मुलांबद्दल काही अपेक्षा असतात.... आणि ते मूल स्वतःचेच खरं करत असेल तर.. निदान काही काळ तरी त्यांचा राग राहणारंच.... कदाचित काळाप्रमाणे पुढे पुढे गेल्यावर... शांत होईलही...पण जेव्हा अनपेक्षितपणे मुले मोठे झाल्यानंतर असं काहीतरी पुढे येते तेव्हा मात्र त्यांचा राग राग होतोच....



आणि इथे तर मायरा आणि मोहित मध्ये फार मोठी दरी होती... आर्थिकही आणि सामाजिक सुद्धा....मायराचं मन गच्चपणे भरून आलं... ती जाऊन लीला यांच्या पायाशी बसली... आणि त्यांचे दोन्ही हात हातात धरून त्यांच्याकडे पहात क्षमा मागू लागली....



मायरा...

."आई... मला खरंच माफ कर.... खरं तर मला तुझी रोज आठवण येत होती... फोन पण घ्यायचे हातात बरेचवेळा तुला कॉल करावा म्हणून.... पण माझी हिम्मत झाली नाही.... बाबाही काय म्हणतील..??.... याचीही भीती वाटत होती मला...असा एकही दिवस नाही की मला तुझी आठवण आली नाही आणि बाबांची आठवण आली नाही.... येत होती गं मला तुमची आठवण...पण...मला माफ कर... आई... प्लीज."


तिला आता... रडूच कोसळले.... लीलासुद्धा रडू लागल्या...तसे मायराने त्यांच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि रडू लागली.....हे दृश्य दाराजवळ उभा असलेला मोहित पाहत होता...मायलेकींना असं पाहून त्यालाही गलबलून आले...आणि...मग....



🌹🌹🌹🌹🌹