"भाई मला खरं साग ... तू वहिनीला काही बोलला का....???"सृष्टी बारीक डोळे करून थोडी रागात त्याच्याकडे बघत होती...
"काहीही काय सृष्टी ...मी...मी काहीच केलं नाहीय .... infact ऑफिस मधून आल्यापासून low च होती ती ...."ऋग्वेद restlesly केसातून हात फिरवत होता...
"मी काकी ला सब्स समजावलं म्हणून त्या येऊन फक्त बघून गेल्या.... पण त्या तुझ्यावर चिढल्यात ... वाहिनी साठी जेवण ठेवली ... पण त्या उठल्याच नाही.."सृष्टी
"मी बघतो .... तू नको काळजी करू...."ऋग्वेद ने प्रणिती ला अलगद उचलून घेतलं .... आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आला... त्याच्यामागोमाग सृष्टी पण तीच जेवणाचं ताट घेऊन आली...
"इथे ठेवते भाई .... वहिनी ला भरीव हा नक्की .... आणि चिडू नको..."सृष्टी ने त्याला जरा ऐकवलं आणि मग गेली....
ऋग्वेद तसाच प्रणिती च्या बाजूला हात हातात घेऊन बसला....
"नीती.... तुला नक्की कशाचा त्रास होतोय मला सांगितलं नाही तर कास समजणार... तुझ्या डोळ्यात पाणी बघू शकत मी.... आता खूप झालं.. मी उद्याच conference घेऊन तुला सगळ्यांसमोर माझी बायको म्हणून आणणार .... तुझ्या डोळ्यातल्या पाण्याचं कारण समजा हे असेल ना तर मी ते करायला तयार आहे ......"तिच्या केसावरुन हात फिरवत त्याने डोक्यावर ओठ टेकवले....
तिला उठवावं तर वाटत नव्हतं त्याला.... खूप गाढ झोपली होती ती .... उठल्यावर धड जेवली पण नसती.... म्हणून त्याने झोपू दिल... आणि तो change करून तीला कुशीत घेऊन पडला...
तिने थोडी चुळबुळ केली पण ओळखीचा स्पर्श जाणवला तस ती त्याला अजून बिलगली....
"तुझ्या कृतीतून मला नक्कीच जावटी तुझं प्रेम ..... आणि मी तुला आता गमवू शकत नाही... माझ्या आयुष्याचा हिस्सा झालियस तू .... लवकरच मी तुला माझ्या मनातलं सांगणार .... तुझा निर्णय काहीही असो... "तिला कुरवाळत त्याने घट्ट उराशी कवटाळलं ... आणि डोळे मिटले .....
सकाळी प्रणिती ने चुळबुळ करत डोळे उघडले .... आणि समोर त्याचा शांत झोपलेला चेहरा बघितला तस तिच्या चेहऱ्यावर मोठी smile आली.... तिच्या दिवसाची सुरवात ... अशीच होत होती ... पण आज परिस्थिती वेगळी होती.... तिला सगळं आठवलं तस ती पटकन त्याच्या मिठीतुन बाहेर आली..... आणि तशीच फ्रेश व्हायला गेली... त्याच्या समोर जास्त वेळ राहायचं नव्हतं आता ......
अंघोळ करून ती बाहेर आली आणि घड्याळाला बघितलं तर आत्ताशी कुठे सहा वाजले होते.... ऋग्वेद सडे सहा पर्यंत उठतो तिला माहित होते...... त्यामुळे तिने केस उगवले .... gallary मध्ये जाऊन पक्षासाठी पाणी ठेवलं .... आणि खाली आली...
देवघर पूजा करून बाहेर येईपर्यंत तिला सडे सहा वाजून गेले होते.... पेपर वाचण्याची सवय उचलला ... पण पहिल्याच पानावर चा फोटो.... मन खूप अशांत झालं होत...
एव्हना कोणी खाली आलं नव्हतं... ती सरळ घराबाहेर पडली .... गार्ड मागून जबरदस्ती गाडी घेऊन येत होते .. पण त्यांना मागे पाठवलं आणि चालतच निघाली....
"वेद,प्रणिती ला बर वाटलं नाही का अजून ..??.."काकीने ब्रकफास्ट टेबल मांडताना विचारलं ....
"प्रणिती..??..पण ती तर आधीच खाली आलीय .. रूममध्ये नाहीय..."ऋग्वेद गडबडीत खाली येत होता... त्याच बोलणं ऐकून त्याने सगळीकडे नजर फिरवली.....
घरातले सगळेच काळजीत आले...
"भाई...??.." सर्वेश ला हॉल मध्ये खाली पडलेला पेपर दिसला ..... त्याने तो सगळ्यांसमोर धरला.....
"व्हॉट ..??... हे कोणी केलं..??.." बातमी वाचून तर ऋग्वेद च डोकं च फिरलं...
"मला माझी सून हवीय घरात वेद ... कल्पना तू असच निघूनगेलास... तिला काही झालं ना तर याद राख ..."मॉम त्याला ओरडल्या .... त्यांना पहिल्यापासूनच प्रिया अजिबात आवडायची नाही .... आणि हे सगळं बघून तर....
ऋग्वेद ने फोन करून त्याच्या PR हेड ला झापलं ... पण त्याच्याकडून पण काही माहिती मिळेना .... TV वर news दाखवतायत म्हटल्यावर त्याने त्या बंद करायला लावल्या .... पण जे छापलं होत त्याच तो काहीच करू शकत नव्हता...
"ते म्हणतायत कोणी सुर्यंवशी ने च फोन करून फोटो दिला होता... आणि news द्यायला सांगितली .... कोणी केलं हे...?.."... ऋग्वेद मोठ्याने ओरडला...
"मी..."दरवाज्यातून आवाज तस सगळ्याच लक्ष गेलं...
"दादी ...." ऋग्वेद च्या डोक्यावर आठ्या पडल्या....
"हो मीच ... पण तुम्ही एवढे का टेंशन मध्ये आहेत...??.. ऋग्वेद साठी प्रिया ला मी खूप आधीपासून पंसद केलेली ... आणि हे दोघे सुद्धा एकमेकांना पसंद करतात ..... तर मग...??" दादी त्याच्या बॅग घेऊन आत आल्या ....
"काहीही काय बोलतेय तू दादी .... प्रिया माझी फक्त एक चांगलीच मैत्रीण आहे.... मी तिला कधीही पसंद करत नव्हतो नाही करणार .. आणि तुझ्या ह्या news मुळे माझी बायको गायब झालीय..."ऋग्वेद
"बायको..?.." दादीनी सगळ्यावरून रंगीत कटाक्ष टाकला ...
"वसंत ..?... " त्यांनी ऋग्वेद च्या बाबाना विचारलं .... तस त्यांनी थोडक्यात सांगितलं .... ते ऐकून दादी सोफ्यावरच बसल्या.....
"तुम्ही मला न सांगता ऋग्वेद च लग्न लावून दिल...??... एकदा पण मला सांगावं वाटलं नाही...??... मी काय विरोधी करणार होते.... का...?.." दादी
"दादी ,... सगळं घाईत झालं.... आणि आता तू रडत बसू नको.. आधीच मला काही सुचत नाहीय .." ऋग्वेद
"भाई ... वाहिनी बाहेर गेली तर ...?... "सृष्टी
"एवढ्या सकाळी...?.." ऋग्वेद ने gate कडे असलेल्या गार्ड ला बोलावले....
"सर ... मॅडम सकाळीच बाहेर गेल्यात.... आम्ही त्याच्या मागे जात होतो .. पण त्या आम्हाला ओरडल्या... आणि ..."गार्ड
"मी तुम्हाला तिच्या सफतेय साठी ठेवलेलं .. ती ओरडली काय मारलं तरी तिच्या मागे जायचं असं सांगितलं होत ना....?.."ऋग्वेद त्याच्यावर ओरडला.....
"त्याच्यावर ओरडून काहीही होणार नाहीय ... तू पण तेवढाच जबाबदार आहेस वेद..." मॉम त्याला ओरडल्या.... आणि तश्याच बेडरूम मध्ये गेल्या....
"भाई .. तू वहिनीला बघ जा.... ती चालत गेलीय म्हणजे जास्त लॅब गेली नसणार .." सर्वेश
***************
प्रणितील माहित नव्हतं ती किती वेळ चालतेय ,... कुठे आलीय .... कानावर घंटीचा आवाज पडला ... तस तिने आजूबाजूला नजर फिरवली.. रस्त्याच्या कडेलाच मंदिर होत....
ती तशीच आत आली... जास्त गर्दी नव्हती .... देवाचं दर्शन घेऊन ती तशीच बाहेर गाभार्याला टेकून बसली...
डोळ्यातून हळूहळू पाणी वाहायला सुरु झालेलं... मनात वादळ उठलेलं .... सारखी सारखी त्या पेपर वरची hendline आणि तो फोटो डोळ्यासमोर येत होता....
"To be mr and mrs Sueyavanshi ...."
हुंदके देत तिने डोळे बंद केले ... आणि पाय जवळ घेत गुढग्यात तोड खुसून रडायला लागली....
"न...नि...ती"त्याचा अलवार थरथरता स्पर्श तिला जाणवला .. तस तिने अंग चोरून घेतलं...
"दु..र...व्हा तुम्ही.."मान वर काढत ती बाजूला सरकली .... तिचा चेहरा रडून रडून लाल झाला होता... डोळे सुजले होते.. आधीच ती नाजूक होती .... आणि आता तिची अवस्था बघून त्याला स्वतःवर येत होता....
"नीती... ते... ते सगळं खोट आहे...."ऋग्वेद
प्रणिती त्याला काहीही रिस्पॉन्स देत नव्हती ... तिफक्त एकटक समोर बघत होती.....
"नीती ... घरी चाल.. आपण बसून बोलू ना..." ऋग्वेद
"माझं कोणतं हि घर नाहीय.." प्रणिती
"तू रःतेय्स ते घर तुझाच आहे... तुझं पण हक्क आहे त्यावर ...."ऋग्वेद
"माझा कोणावरही हक्क नाहीय... मी तर एक ठेवलेली बाई आहे...."प्रणिती खिन्नपणे हसली....
"नीती.." ऋग्वेद मोठ्याने ओरडला... त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पण त्याच्याकडे बघायला लागले....
"काय झालं..??... राग येतोय....??... पण काय उपयोग आहे....??... जे आज तेच आहे... तुम्हाला divorce हवा असेल तर पेपर आना ... मी सही करून देता ..." प्रणिती
"तू काय बोलतेय तुला समजतंय....??... माझी बायको आहेस तू... लग्न केली मी तुझ्याशी ... तुझा हक्क आहे माझ्यावर.." ऋग्वेद
"तो फक्त त्या घराच्या उंबरठ्याच्या आत च...." प्रणिती च शरीर आता थरथरायला लागलं होत.. चक्कर आल्यासारखी वाटत होती....
"मी आजच सगळ्यांसमोर announce करणार होती नीती... please घरी चाल.." ऋग्वेद
"मी एक बेघर भिकारी आहे मिस्टर ऋग्वेद सूर्यवंशी .... तुम्हाला माझ्याकडून काहीही मिळणार नाही...."प्रणिती
"shut up .... काय बोलतेय तू ..." तिचे शब्द काटे बनून त्याला रुतत होते....
"नीती.... एक ना माझं..."ऋग्वेद तिला हात लावायला पुढे जातच होता कि ती मागे गेली... पण डोकं गरगरल्या मुळे चक्कर येऊन पडली...
"नीती.." ऋग्वेद ने लागोपाठ तिला झालेलं ...
"hey नीती.." तिच्या गालावर हात मारत तो तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होता... पण ती काहीच हालचाल करत नव्हती...
त्याने लागोपाठ तिला उचलून गाडीत ठेवलं .... आणि घरी घेऊन आला... आधीच डॉक्टर ना सांगून ठेवल्यामुळे ते तिथे हजरच होते..
प्रणिती ला असं निपचित बघून घरातले सगळे घाबरले .... ऋग्वेद ने तिला हॉल मध्ये सोफ्यावर झोपवलं ... आणि डॉकटर ना चेक करायला लावलं...
"BP low झालाय ... शिवाय त्याच्या पोटात पण काही नाहीय .... शुद्धीत आल्यावर पाहिलं त्यांना काहीतरी खायला द्या ... आणि नंतर ह्या गोळ्या .." डॉक्टर नि सगळं सांगितलं आणि गेले...
मॉम प्रणितीच डोकं मांडीवर घेऊन बसल्या होत्या ... त्यांना खूप काळजी वाटत ... होती एवढ्या दिवसात एक सून नाही तर मुलगी बनून तिने त्याची काळजी घेतली होती...
"किती नक्षत्रासारखी मुलगी आहे.... वेद मला माफ कर ... तुला न विचारत.... मी....."दादी
"दादी please ... तुझी पण काही चुकी नाहीय .. आपण ह्यावर नंतर बोलू.."ऋग्वेद ला सध्या प्रणिती शुद्धीत आल्यावर कस react करते ते बघणं महत्वाचं होत ... एकीकडे त्याला नुसते फोन येत होते... पेपर मधली बातमी बघितल्यापासून सगळे business man clients अभिनंदन करायला फोन करत होते... शेवटी त्याने PR ला सांगून officially statement release करायला सांगितलं...
"ऋग्वेद .." दरवाजातून प्रिया चा आवाज आला आणि सगळ्याच लक्ष गेलं... ती खूपचआनंदी दिसत होती....
क्रमशः
मी काहीही बोल्ट नाहीय .... ती ... ती प्रणिती माझ्या ऋग्वेद ची बायको आहे.... प्रिया ने पुन्हा एक घोट पिला.. दोघीही बार मध्ये बसून wine पिट होत्या.... प्रिया रंगात सगळी बॉटल संपवत होती.... डोळे तर लाल झाले होते..... असं वाटत होत आता प्रणिती समोर आली असती तर नक्कीच तिचा गळा आवळेल...
"पण ऋग्वेद सरानी लग्न केलं आणि तुला सांगितलं नाही...??..." श्रुती राग माणसाकडून काहीही करवून घेऊ शकतो ... प्रिया ने घेतलेला चुकीचा निर्णय संपून टाकेल का ऋग्वेद आणि प्रणितीच्या नात्याला..???