"असे काय हे... मला वाटलेलं आज आम्ही एकत्र जाऊ..." तिने नाक फुगवल आणि खिडकीतून बाहेर बघत बसली ... ड्रॉयव्हर ने आताच तिला सांगितलं न कि ऋग्वेद एका मिटिंग साठी बाहेर गेलाय.... त्यामुळे मूड ऑफ झाला होता....
गाडी थांबली तस ती आपल्याच धूंदीत उतरली .... आजूबाजूला काय चाललंय ह्याच तिला भानच नव्हतं ... पायऱ्यांवरून ती सरळ बेडरूम मध्ये गेली... घड्याळ बघितलं तर सात वाजत आलेले ....
"भूक लागलीय .... हे कधी येणार ते पण माहिती नाहीय..." चेहरा पडतच ती खाली आली तर maid नाही .... आता तीच डोकंच सटकलं ... रागात ती kichen मध्ये आली... आणि दरवाज्याकडे येऊन थांबली .... दोनदा डोळे चोळले ....
"अ ...हो..."समोर त्याला जेवण करताना बघून ती बघतच राहिली .....
"hey नीती .... come ..."ऋग्वेद ने तिच्या हाताला धरत आतमध्ये घेतलं...
"तुम्ही...?...maid कुठे गेल्या ....??..."प्रणिती त्याच्या बाजूला उभी राहिली ....
"त्यांना सुट्टी...."ऋग्वेद
"का..???..."प्रणिती ओरडली ....
"कारण मला माझ्या बायको सोबत वेळ घालवायचा होता... तुला काही प्रॉब्लेम ...??.."ऋग्वेद ने तिच्याकडे बघत डोळा मारला...
"म....मला .... भूक लागलीय... प्रणिती ने विषयच बदलला त्याच्या रोमँटिक मोड चालू झाला तर तिच्या पोटात खड्डा पडायचा...
"तू बस जा टेबलवर ... आलोच मी घेऊन सगळं..."त्याने हसतच जेवण प्लेट्स मध्ये घ्यायला सुरवात केली .........
"मी मदत करते..."प्रणिती
"No ,.... आज तुला माझ्याकडून ट्रीट ... मॅनेजर मॅडम ..."ऋग्वेद ....
तस प्रणिती ने मान हलवली आणि बाहेर येऊन बसली ... मनात तर खूप आनंद झाला होता ... पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी जेवण बनवलं होत...
"टेस्ट कर... कसंय ..??.." ऋग्वेद ने तिच्यासमोर प्लेट ठेवली ... तिने लागोपाठ खायला सुरवात केली...
"तुम्हाला एवढं चंगळ जेवण कस येत....??.."प्रणिती
"कॉलेजला असताना शिकलो होतो..."तो तिच्या बाजूच्या चेअर वर बसत बोलला...
"मला पण शिकवा ना मग.."प्रणिती तोंडात घालायला चमचा घेतच होती.... कि त्याने तिच्या हाताला पकडत तो तसाच स्वतः खाल्ला...
"तुला शिकायची काय गरज ... तुझ्या नवऱ्याला येत ना... तुला काय हवं ते सांग मी करून देईन....."ऋग्वेद
पण ती कुठे भानावर होती... ती फक्त हातात चमचा घेऊन एकटक त्याच्याकडे बघतात होती....
"नीती... भूक लागलीय ना तुला...??..."त्याने तिच्या चेअरला धरत जवळ ओढलं.... तस धक्क्याने ती भानावर आली...
"ह..हो ..."लागोपाठ तिने दुसरा चमचा भरला... आणि तोंडात घातला.. पण आता तिला मान वर काढायला सुध्या भीती वाटत होती... तो कधी काय करेल ह्याचा नेम नव्हता...तो मात्र हसत मस्तपैकी खात होता...
पूर्ण जेऊन होईपर्यंत तिने खाली घातलेली मान वर काढली नाही....
"थांब .. तू नको करू.... मी करतो..." ती भांडी घासायला गेली तर त्याने तिला बाजूला केलं....
"अ..हो ....तुम्ही जेवण बनवला ना तर मी एवढं नक्कीच करू शकते... " प्रणिती
"नक्की तू करू शकते ..??..."ऋग्वेद ने पुन्हा प्रश्न विचारला...
"भांडी घासत येतात मला..."प्रणिती ने हसत मान हलवली .... आणि बेसिंग मधला नळ चालू केला ... पण चेहऱ्यावर असलेले हास्य जास्त वेळ टिकला नाही ... कारण पोटाभोवती त्याच्या हाताचा विळखा पडला होता....
"आहो...."तिच्या हातात असलेले भांडे थरथरायला लागलं....
"काय झालं..??.."त्याने तिचे केस एका बाजूला केले ... आणि खांद्यावर हनुवटी टेकवली .....
"मी....मी..भांडे घस्तेय...."प्रणिती
"मी भांडे थोडीच घेतलीत.... घास कि... मी माझं काम करतोय..."त्याने तिच्या मानेवरून बोट फिरवली.... तिचे वाढलेले श्वास आणि जोरात वर खाली होणारी छाती त्याला जाणवत होती...
"लवकर ये.... I am waiting ..."त्याने हसतच मागून तिच्या गालावर ओठ टेकवले .. आणि बेडरूम मध्ये गेला... तस प्रणिती ने जोरात श्वास घेतला....
"कधी काय करतील ... सांगता येत नाही..."तिने मान हलवली .... त्याच्याच धूंदीत तिने सगळं kitchen आवरलं... पण आता वर बेडरूम मध्ये जायचं म्हणजे सिहांच्या गुहेत जाण्यासारखं वाटत होत तिला...
"please...please ... आता मी जाणार आणि शांत झोपणार ....."देवाचा धावा करत तिने दरवाजा उघडला ... पण आतमध्ये जायचं कि नाही हा विचार करत ती तिथेच थांबली ... कि ऋग्वेद नेच नेच तिला आत ओढून घेतलं आणि दरवाजा बंद केला.....
"तू एवढी का घाबरत होतीस....??..."तो मुद्दाम तिची मजा घेत होता....
"म ....मी ...मी कुठे.... येतच होते मी..."प्रणिती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती.....
"you know .... मला वाटलं कि ऑफिस मध्ये कोणीतरी दुसरी प्रणित येते... कारण तिथे तर तू बोलत असते .... मग माझ्यासोबत का बोलत नाही..."ऋग्वेद
"आता ह्यांना कास सांगू कि ह्यांना बघितल्यावर माझं तोडच उघडत नाही..."प्रणिती ने डोक्यावर हात मारून घेतला.....
"तू फ्रेश होऊन ये.... I have something for you .."त्याने तिचा हात सोडला... तस ती पळतच बाथरूममध्ये गेली....
"वेडी ...."त्याने केसात हात फिरवला... आणि केलेली arrangement बघायला लागला...
"हे भगवान... हाहा रोमँटिक मोड काहीही करून बंद कर... मी दोन किलो लाडू देईल.... माझ्या हातचे..."change करून येत तिने आधी डोकं बाहेत काढत आजूबाजूला बघितलं... तर कोण दिसलं नाही.. बस इथून पळत बेड वर जायचा आणि झोपून जायचं.... मनातच तिने प्लँन बनवला... पण हाय रे तिची किस्मत ...!
बाथरूम च्या भारत पाय टाकताच वेद तिच्या समोर प्रकट झाला...
"इथे ये ..."त्याने तिचा हात हातात घेतला.... आणि रम च्या एका बाजूला असणाऱ्या होम theatre मध्ये तिला घेऊन आला....
"इथे काय आहे..??...."प्रणिती
"आपण movie बघणार आहोत..."तो सोफ्यावर बसला.... आणि तिला पण स्वतःच्या जवळ बसवलं.... आणि कंबरेत हात घालून अजून जवळ ओढलं...
"क ...कोणता movie ..??.."प्रणिती ने त्याच्या शर्ट ला एका बाजूने घाल....
"माहित नाही... मिळाली ती CD घेतली......हा पण भुताचा असणार एवढं नक्की ... कारण माझ्याकडे सगळ्या त्याच movie आहेत..."ऋग्वेद
"क.. काय.... भूत ...??.."प्रणिती ने एवढा गिळला ....
"नीती... dont tell me कि भूताना घाबरते..."ऋग्वेद ने बारीक डोळे करत तिच्याकडे बघितलं....
"मी.. नाही...नाही घाबरत.."हाताला येणारा घाम सोफ्याला पुसत ती कसबस बोलली ...
"चल .... सुरु करूया..."त्याने रिमोट च बटन दाबलं ... प्रणिती ने लागोपाठ डोळे बंद करून घेतले... मनातच रामरक्षा सुरु झाली...
मध्ये मध्ये भुताचा आवाज यायला लागला.. तस ती अजून त्याच्या कुशीत शिरू लागली... ऋग्वेद तर movie सोडून तिलाच बघत होता....
"आता खूप मोठं भूत येणार आहे..."त्याने एकदम तिच्या कानात सांगितलं... तस प्रणिती उडी मार्ट तयचय मांडीवरच चढली ....
ऋग्वेद ला जोरात हसावं वाटत होत... पण त्याने कंट्रोल केलं... आणि रिमोट ने movie बंद करून टाकला ...
"झाला संपला ..."त्याने पोटाभोवती हात गुडांळत घट्ट जवळ ओढलं... movie संपला म्हणून तिने सुटकेचा श्वास सोडला .... पण आता तर त्याच्यापेक्षा मोठं संकट समोर उभं होत....
"अभिनंदन मॅनेजर मॅडम ...."त्याने कंबरेवरून एक हात काढत तिच्या केसातून फिरवला ...
"thank you .."ती हसली ... आतापर्यन्त खूप यश मिळालं होत... पण पाठीवर कॊतुकाची थाप देणार कोणीच नव्हतं तिच्याकडे .. पहिल्यांदा कोणीतरी तीच असं अभिनंदन केलं होत.....
"काय झालं...?..."ऋग्वेद
"अहं ..काही नाही..."तिने मान हलवली ... बोलता बोलता दोघे अगदी जवळ आले होते .. त्याच लक्ष तिच्या ओठांकडे गेलं... तिने त्याची नजर बघितली आणि डोळे मिटले... तस अलगद तुकने तिचे ओठ ताब्यात घेतले ....
हळू हळू खालच्या ओठाला किस करत तो तिला जवळ ओढत होता... प्रणिती ने सुद्धा त्याच्या पाठीवर हात टेकवले... आणि त्याला हवं ते करू देत होती...
तिची मान वळवत त्याने passionatelly किस करायला सुरुवात केली.... तसेच तिच्या कंबरेवर जोर देत त्याने तिला उचलून घेतलं.... आणि बेडरूम मध्ये आणलं .... ओठावरची पकड काही सुटली नाही ....
त्याने तिला अलगद बेड वर झोपवलं .... तस प्रणिती भानावर आली... आणि लाजून कूस दुसरी बाजूला वल्ली .... तयार पुन्हा पोटावरून हात फिरवत तीळ जवळ ओढलं ...
"अ...हो .."ती वाढलेले श्वास कंट्रोल करत एवढंच बोलू शकली.... कि त्याने तिला मिठीत कवटाळून घेतलं....
"sleep... good night ...."डोक्य्वर ओठ टेकवत रुग्वे ने तिच्या पाठीवरून हात फिरवला... तिने हसतच त्याच्या छातीवर मान घासली ... आणि समाधानाने डोळे मिटले...
क्रमशः
ऋग्वेद ने हसत तिच्या ओठाखाली पसलेली लिपस्टिक पुसली .... आणि तिला खाली उतरवलं... प्रणिती ने लागोपाठ file घेतल्या आणि केबिन चा दरवाजा उघडला... तर प्रिया विचित्र नजरेने तिला बघत होती....
प्रणितीने तिच्याकडे लक्ष दिल नाही आणि तसेच पुढे गेली प्रिया आत आली तर तिच्या नजरेतून ऋग्वेद च्या ओठावर लागलेली हलकेच लिपस्टिक सुटली नाही.... हातच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या....
"ऋग्वेद फाईल्स चेक झालेल्या आहेत .. मला थॉर बदल वाटतोय ... तू सुद्धा एकदा चेक कर... म्हणजे आपल्याला पुढे काय ते कारवाई करता यईल ...."प्रिया रागात येऊन ......
प्रिया आता काय निर्णय घेईल...??? प्रेमाच्या झोक्यात धुंद विहार करणारी प्रणिती करू शकेल का तिचा सामना ..???...