Anubandh Bandhanache - 36 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 36

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 36

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३६ )
अंजलीला भेटीची ओढ लागल्यामुळे भले त्या रात्री ती उशिरा झोपली होती, तरीही आज तिच्या नवीन मोबाईल च्या वाजणाऱ्या अलार्म मुळे पहाटेच तिला जाग आली. 
दोन्ही हात उंचावत, अंगातील आळस झटकून ती बेडवरून उठते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. आज स्वतःला ती प्रेमच्या नजरेने बघु पहात होती. थोडीशी लाजत चेहऱ्यावरील केसाची बट कानावरून मागे टाकत दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकते. आणि गालातच मिश्कीलपणे हसत हळुवार चेहऱ्यावरील हात बाजुला करत स्वतःला पाहत राहते.
थोड्या वेळातच ती त्या भाव विश्र्वातून बाहेर पडते. भेटीच्या उत्सुकतेने ती पटपट बिछाना आवरून घेते. पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहते. आत्ताशे फक्त सात वाजले होते. प्रेम दहा वाजता भेटणार होता. मग एवढ्या लवकर उठून काय करायचं...🤔
 या विचाराने पुन्हा ती बेडवर पडते. बेडवर असलेला टेडीला दोन्ही हातात घेऊन, दोन्ही हात वरती उंचावत त्याच्याकडे पाहून गोड स्माइल करत त्याला पुन्हा खाली घेत अलगद मिठीत घेते. 😊
थोडा वेळ ती तशीच बेडवर पडुन असते. बाहेर जायचं म्हटलं तर, मॉम, डॅड विचारात पडतील की, 'हि आज लवकर का उठली. ' 🤔
म्हणुन ती तिथेच तिच्या नवीन मोबाईल सोबत वेळ घालवते. आणि डॅड ऑफिस ला जायची वाट बघते. 
थोड्याच वेळात तिला डॅड ऑफिस ला निघाल्याची चाहूल लागते. ते जसे बाहेर पडतात तशी ती पण तिच्या बेडरूम मधुन बाहेर येते. इकडे तिकडे पहात ती किचन मधे जाते. आणि किचन मधे काम करत असलेल्या मॉम ला पाठीमागूनच मिठी मारत बोलते.
अंजली : गुड मॉर्निंग माय स्वीट मम्मा...!😘
मॉम : अरे व्वा....! आज काय स्पेशल आहे का ? लवकर मॉर्निंग झालीय आज....😊
अंजली : तसं तर काही नाही... पण आणि आहे पण.😋
मॉम : अच्छा...! मग आम्हाला पण कळेल का...? 😊
अंजली : मॉम...! खरं खरं सांगू....!😊
मॉम : सांग ना मग...!😊
अंजली : ओके...! सांगते... आज मी प्रेमला भेटायला चाललीय... जाऊ ना....? तुझी परमिशन असेल तर...! 😊
मॉम : अच्छा...! यासाठी हे सर्व चालु आहे तर...😊
अंजली : मॉम...! खुप दिवसांनी भेटतोय ग्...नाही बोलू नको...! प्लिज जाऊ दे ना, आज तरी.... प्लिज....🙏🏻
मॉम : भेटणारच आहात तर मग घरी का नाही बोलवत त्याला...? मला पण त्याला भेटुन खुप दिवस झालेत. 😊
अंजली : मॉम...! तुला माहित आहे, मागे झालेल्या प्रकारामुळे तो आता घरी नाही येणार. असं मला तरी वाटतं. हवं तर तु बोल त्याच्याशी, मला चालेल तो घरी आला तरी. पण काही प्रोब्लेम नको व्हायला. 😔
मॉम : हो...! ते ही आहेच...! आत्ता कुठे तुझे डॅड थोडेफार हे सर्व विसरलेत. त्यापेक्षा राहू दे. तुम्ही बाहेरच भेटा. पण सांभाळूनच... कधी कधी मलाही टेन्शन येतं या गोष्टीचं. 😔
अंजली : तु नको ना टेन्शन घेऊ मॉम...! मी काळजी घेईन. डोन्ट वरी...😊 जाऊ ना मग मी...?😋
मॉम : हो...! जा... पण, लवकर घरी या. त्यांचा कॉल येतो कधी कधी... मग विचारतात अंजु कुठेय ? काय करतेय ? 
अंजली : मॉम...! आजचा दिवस मॅनेज कर फक्त. मी लवकर येईन संध्याकाळी. ओके....😊
मॉम : हो..., पण कुठे जाणार आहात...? ते तरी सांग...? 
अंजली : ते मलाही माहित नाही, अजुन काही ठरलं नाही. 😋 आणि आता माझ्याजवळ सुद्धा मोबाईल आहे. विसरली का...? 😊
मॉम : अरे हो...! खरच विसरले...😊 बरं जा आता, तयारी करा....😊
अंजली : थँक्यू सो मच... माय स्वीट हार्ट...😘 
मॉम : हो...! पुरे झालं आता... आवर जा. 😊
अंजली : हो....! आवरते....😊
* असं बोलुन ती आपली तयारीला लागते.
थोड्याच वेळात छान तयार होऊन ती तिच्या रूम मधुन बाहेर येते. मॉम तिला जबरदस्ती ब्रेकफास्ट करायला लावतात. थोडंसं खाऊन ती मॉम ला बाय करून आपला नवीन मोबाईल हातात घेऊन घरातून बाहेर पडते. आणि ऑटो पकडून ती स्टेशन ला पोचते. 
आज ती नेहमीपेक्षा जरा लवकर आली होती. 
 प्रेम अजुन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोचला नव्हता.
ती त्याची वाट पाहत तिथे उभी असते. थोड्याच वेळात तिला समोरून येणारा प्रेम दिसतो. त्याला पाहून ती धावतच त्याच्यापर्यंत पोचते आणि तिथेच त्याला घट्ट मिठी मारते. 
तिथे जमा असलेले सर्व लोक हे पहात होते. ही गोष्ट प्रेमच्या लक्षात येताच तो अंजलीला त्याच्या मिठीतुन सोडवत तिला थोडं बाजूला घेऊन जातो. 
प्रेम : काय हे...किती घाई..! पडली असतीस ना...!😊
अंजली : सॉरी... सॉरी...! काय करू, तुला पाहून कंट्रोल नाही झाला. 😋
प्रेम : अच्छा...! 😊
अंजली : हो... ना...! 😊
प्रेम : पण एक गोष्ट सांगू....! 😊
अंजली : काय...?😊
प्रेम : आज नेहमी पेक्षा जरा जास्तच सुंदर दिसतेय तु...😊
अंजली : खरच का...? 🥰
प्रेम : हो...! खरच बोलतोय मी...😊 आणि अभ्यासाचं ठिक आहे, त्यासोबत डाएट पण चालु होती का...? किती बारीक झालीय तु...? 
अंजली : अरे...! कुठे बारीक झालीय...? हा ड्रेस थोडा टाईट आहे त्यामुळे तुला तसं वाटत असेल. 😊
प्रेम : अच्छा...! मग हे गुबगुबीत गाल पण आत गेलेत , त्यांचं काय...? 🤔
अंजली : प्रेम...! तू जरा जास्तच ऑब्जर्व करतोय असं नाही का वाटत तुला. 😋
प्रेम : अरे...! मला जे दिसतंय तेच मी बोलतोय ना, बरं चल आपण वजन करू तिकडे. 😊
अंजली : दोघांचे पण करायचे ओके...😊
प्रेम : बरं ओके... चल. 😊
अंजली : पण आधी ट्रेन चे तिकीट तरी काढू. प्लॅटफॉर्म वर टिसी पकडेल नाहीतर. 😊
प्रेम : अरे हो...! मग कुठे जायचं आहे आज...?😊
अंजली : तु नेशील तिकडे...! 🥰
प्रेम : अच्छा....! पण आज तु बोलशील तिकडे जाऊ. 😊
अंजली : मी काय बोलू...😊 गेले वर्षभर आपण असेच थोड्या थोड्या वेळासाठीच भेटलो. आज जर एवढा वेळ मिळाला आहे तर, तो तुझ्यासोबत एकांतात घालवायला आवडेल मला. 🥰
प्रेम : अच्छा....! जशी आपली इच्छा.😊
* असं बोलुन प्रेम तिकीट काउंटर वर जाऊन तिकीट काढून आणतो. दोघेही स्टेशन मधे येतात. तिथे एक वजन काटा असतो, अंजली त्याला तिथे येऊन येते. पर्स मधुन दोन कॉइन काढून हातात घेते,आणि प्रेमला त्यावर उभा राहायला सांगते...
अंजली : चल आधी तुझं वजन बघु किती आहे ते..😊
प्रेम : नाही...! आधी तु...! लेडीज फर्स्ट..😋
अंजली : बरं ओके....😊
* ती वजन काट्यावर उभी राहुन हातातील एक कॉइन त्या मशीन मधे टाकते. लगेचच एक तिकीट बाहेर येते. ती ते तिकीट हातात घेत त्यावरील अंक पहाते. 
प्रेम : किती आहे बघू...! 😊
* असं बोलुन प्रेम तिच्या हातातील ते तिकीट घेत असतो. तेवढ्यात अंजली बोलते.
अंजली : नाही...! त्या आधी तुझं पण वजन करू आणि मग बघू....😊
प्रेम : बरं ओके...! 😊
* प्रेम त्या वजन काट्यावर उभा राहून अंजलीच्या हातातील कॉइन घेऊन त्यामध्ये टाकतो, आणि त्यातुन बाहेर आलेलं तिकीट हातात घेतो.
अंजली : दाखव बघू...! किती आहे...?😊
प्रेम : आधी तुझे तिकीट दाखव....😊
अंजली : नाही...! आधी तुझे तिकीट मला बघायचं आहे. 😊
प्रेम : बरं...! एक काम करू. दोघांनी एकत्र बघू.😊
अंजली : चालेल...😊
* दोघेही आपापल्या हातातील ते तिकीट ओपन करतात. 
प्रेम : ४२ फक्त.....🤔 मी बोललो होतो ना, बारीक झालीय तु, लास्ट टाईम आपण वजन केलं होतं तेव्हा ४७ होतं.😊
अंजली : हो... हो...! ठिक आहे ना मग, तुझं तरी कुठे वाढलं आहे. तेव्हाही ५५ होतं आणि आत्ताही ५५. 😊
प्रेम : मग...! कमी तर झालं नाही ना, तुझ्यासारख...😊
अंजली : जाऊ दे... जे आहे ते आहे. उलट बरं झालं कमी झालं ते, निदान आता तरी मी तुला थोडी सुट होईल.😋
प्रेम : अच्छा...! म्हणजे मुळ उद्देश हा होता तर.🤔
अंजली : काही उद्देश वगैरे नव्हता, ते झालं असेल असच. 😊
प्रेम : आत्ता कळलं मला...!🤔
अंजली : गप्प बस तु आता...! वाईट दिसतेय का मी, जराशी बारीक झाल्यावर...😊 उलट मेघा बोलली मला, आता तुमची जोडी जरा बरोबर दिसेल.😊
प्रेम : अच्छा...! म्हणजे हे सर्व तिच्या बोलण्यावरून झालय का...? थांब मी बघतोच तिला...!
* असं बोलुन तो पॉकेट मधुन मोबाईल काढतो आणि मेघाला कॉल लावत असतो, तेवढ्यात अंजली त्याच्या हातातुन मोबाईल घेत त्याला बोलते...
अंजली : पागल आहेस का तु...! काहीही काय..? आणि तिला काय बोलणार आहेस...? 🤔
प्रेम : हेच की, तुझ्यामुळे माझी गुटगुटीत बाहुली, एवढी बारीक झालीय, आता तिचे गाल पण नीट ओढता येत नाहीत. 😋
अंजली : असू दे...! एवढी पण बारीक नाही झालीय, अजुन गाल थोडेसे वरतीच आहेत.🥰
प्रेम : हो...का...! बघु बरं....,😊
* असं बोलुन तो दोन्ही हातांनी अलगद तिचे गाल ओढतो....
अंजली : ओय...! बस् झालं आता... एवढे पुरेसे आहेत. 😋
प्रेम : हो...! पण आधी कसे गुबगुबीत होते. 😊
अंजली : हो...! तेव्हा मी लहान होते. 😋
प्रेम : अच्छा...! मग आता मोठी झाली का....?🤔
अंजली : नाही का मग....!🥰
प्रेम : मला तर नाही वाटत....🤔😊
अंजली : तु आता गप्प बस...! चल निघुया, ट्रेन आली.
* दोघेही तिथून सी एस टी ला जाणारी ट्रेन पकडतात. ट्रेन मधे अंजली त्याला डॅड नी गिफ्ट केलेला मोबाईल दाखवते. तो मोबाईल हाताळत ते दादर ला पोचतात. दादर ला उतरून पुन्हा ट्रेन चेंज करून त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोचतात. 
आज खुप दिवसांनी नाहीतर खुप महिन्यांनी त्या दोघांना असा एकांत मिळाल्यामुळे ते दोघेही एकमेकांत हरवून जातात.
संध्याकाळी तिथून बाहेर पडून नेहमीप्रमाणे दोघे बँड स्टँड ला येतात. नेहमीच्या हॉटेल मधे थोडंसं खाऊन, सोबत कॉफी घेऊन मग हॉटेल मधुन बाहेर पडतात. खडकाळ बिचवर एका बाकावर गप्पा मारत समुद्राच्या लाटांचा व सोबत सुर्यास्ताचा आणि त्या रोमँटिक वातावरणाचा आनंद घेत एकमेकांना बिलगुन बसलेले असतात.
सूर्यास्त होताच ते तिथून निघतात. उशीर होऊ नये म्हणुन कॅब बुक करून घरी यायला निघतात. 
मागील सीट वर अंजली बोलत बोलत त्याच्या कुशीत कधी झोपी गेली हे तिलाही कळलं नव्हते. प्रेम ने पण तिला तसेच कवटाळून घेतले होते.
तिच्या घराच्या काही अंतरावर तो कॅब ड्रायव्हर ला गाडी थांबायला सांगतो. अंजली अजुनही झोपली होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पहात तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवत तिला आवाज देतो.
प्रेम : मॅडम... उठा, घर आले...😊
* अंजली डोळे उघडते, आणि प्रेमकडे गोड हसत पहात बोलते.
अंजली : एवढ्या लवकर कसे पोचलो आपण...?😊
प्रेम : अच्छा...! लवकर पोचलो का...! किती वाजलेत बघ जरा. 😊
* अंजली हातातील वॉच बघते. साडे सात वाजलेले असतात. ती पटकन त्याच्या कुशीतून बाहेर येत स्वतःचे डोळे पुसत प्रेम ला बोलते...
अंजली : मला का झोपुन दिलं तु...! उठवायच ना..!😔
प्रेम : कशाला...! छान झोप लागली होती तुझी, म्हणून नाही उठवलं. आता उतरायचं का मॅडम. ते ड्रायव्हर काका थांबले आहेत कधीचे...😊
अंजली : बरं ओके...! उतरूयात...😊
* असं बोलुन ती कॅब मधुन बाहेर येते. पर्स मधुन पैसे काढून ती ड्रायव्हर ला देते.
प्रेम : लगेच काय घाई होती पैसे द्यायची, मी दिले असते ना...? 
* त्याचा हात हातात घेत बोलते...
अंजली : ठिक आहे ना...! मी दिले म्हणुन काय झालं...! आणि ते जाऊदे..., थँक्यू वेरी मच्...😘 तुझ्यासोबतचा आजचा हा दिवस नेहमीप्रमाणेच खुप छान आणि स्पेशल होता माझ्यासाठी. आणि माझ्या आठवणींच्या खजाण्यात अजुन एका दिवसाची भर पडली. त्याबद्दल खरच थॅन्क्स....🥰
प्रेम : अच्छा...! बरं आता जा पटकन घरी, मॉम वाट पहात असतील...😊
अंजली : हो...! 😊
तिथूनच ती प्रेमला बाय करून घरी जायला निघते. प्रेम तिथेच तिला जाताना पहात उभा असतो. दोन तीन वेळा ती मागे वळून त्याला हात करत पुढे चालली होती. 
ती दिसेनाशी झाल्यावर तो पण ऑटो पकडुन घरी येतो. फ्रेश होऊन चहा घेऊन तो आरवच्या घरी येतो.
इकडे अंजली घरी पोचते. मॉम डोअर ओपन करून तिला आत घेतात तशी ती आपल्या बेडरूम मधे जाऊन बेडवर पडते. मॉम बाहेरूनच तिला आवाज देतात.
मॉम : अंजु...! असं बाहेरून आल्यावर लगेच बेडवर झोपायच नाही, चांगली सवय नाही. किती वेळा सांगायचं...! फ्रेश होऊन घे आधी.
अंजली : हो...! जाते...!
* मॉम अजुन काही बोलायच्या आधी ती फ्रेश होऊन बाहेर येते. किचन मधुन मॉम तिला आवाज दे.
मॉम : मग...! एवढं दिवसभर कुठे फिरत होतात. एवढ्या गर्मी मधे...? 
अंजली : अगं... खुप फिरलो आज... तेही चालत.. अगदी थकायला झालं गर्मी मुळे....😋
मॉम : अच्छा...! कुठे गेला होतात...? 😊
अंजली : सीएसटी... आणि तिथून मरीन ड्राईव्ह. 😋
* तिला वाईट या गोष्टीचे वाटत होते की, ती मॉमशी खोटं बोलत होती... पण सर्व गोष्टी सांगु पण शकत नव्हती.
मॉम : बरं ते ठिक आहे... प्रेम कसा आहे...? खुप दिवस बोलणं नाही झालं त्याच्याशी.
अंजली : ठिक आहे तो... विचारत होता तुझ्याबद्दल. 😊
मॉम : कॉल करायला सांग कधीतरी.
अंजली : हो... सांगेन...😊 आधी मला एक छान कॉफी दे. 😋
मॉम : हो...! रेडी आहे... घे आत येऊन. 😊
* अंजली किचन मधे जाऊन कॉफीचा कप हातात घेत. अलगद मॉम च्या गालावर किस करत बोलते.
अंजली : लव यू मॉम....!😘
मॉम : अच्छा...! खायला घे काहीतरी. का पोट भरलं. 😊
अंजली : मॉम...! खरच... आत्ता काही नको. 😊
* असं बोलुन ती हॉल मधे येऊन टीव्ही बघत बसते. तेवढ्यात तिला मेघाचा कॉल येतो. ती कॉल रिसिव्ह करते.
मेघा : हाय मेरी जान...! कशी आहेस...?😊
अंजली : मी मस्त आहे...! पण तु का एवढी खुश आहेस....!🤨
मेघा : एक गुड न्यूज आहे....! दिदी ने तिच्या नवीन गोल्ड शॉप च्या ओपनिंग सेरेमनी साठी इन्वॉइट केलं आहे. नेक्स्ट मंथ मधे.
अंजली : अरे व्वा...! मस्तच...! मग कधी जाताय...? 
मेघा : अरे पागल... पुढे तरी ऐक...!😊
अंजली : पुढे काय...? 🤨
मेघा : तुला आणि सिद ला पण घेऊन यायला सांगितलं आहे. 😊
अंजली : काय....,!🤨 ते कसं शक्य आहे....?🤔
मेघा : एवरीथिंग इज पॉसिबल... मेरी जान.😊
अंजली : पागल झालीय तु....! तुला वाटतं डॅड मला एकटीला पाठवतील. ते ही दुबई....! इम्पॉसिबल. 😏
मेघा : अरे... पागल, ऐक तरी मी काय बोलतेय ते...😊
अंजली : बरं... बोल... ऐकते. 😊
मेघा : माझ्या पप्पांना सुट्टी मिळत नाही. त्यामुळे मम्मी पण येणार नाही. उरली मी आणि सिद... आणि तुला पण बोलवलं आहे. मग आपण तिघेही जाणार आहोत.... कळलं. 😊
अंजली : अच्छा...! म्हणजे हे सर्व तु एकटीनेच ठरवून बसली का...? मला नाही वाटत... डॅड पाठवतील मला. 😔
मेघा : ते तु माझ्यावर सोड...! हे बघ... मी पप्पांना सांगेन तुझ्या डॅड सोबत बोलायला. आणि त्यांना ते नकार देणार नाहीत याचा मला कॉन्फिडन्स आहे. क्युंकी... पुराणा याराना है....😊
अंजली : जरा ओव्हर कॉन्फिडन्स नाही वाटत तु...,,🤔
मेघा : बिलकुल नाही...! एका एसीपी ची मुलगी आहे मी...😊 आणि ऐक खरा प्लॅन तर पुढे आहे. 😋
अंजली : काय....?🤨
मेघा : सांग बरं काय असेल माझ्या डोक्यात...!😊
अंजली : तुझं डोकं ना... कधी कधी अती चालतं, त्यामुळे त्यात काय चाललंय हे कोणालाच कळणार नाही. तुच सांग मग....,😋
मेघा : बरं... नीट ऐक.... आपण प्रेम ला पण सोबत घेऊन जायचं. कसा आहे प्लॅन. 😊
अंजली : डोक्यावर पडलीय का तु...! इथे अजुन माझं कन्फर्म नाही, आणि त्याला पण घेऊन जायचं बोलतेय. वेडी बिडी झाली का तु...? काय बडबडतेय कळतंय का तुला...? 
मेघा : अगं...! ऐक तरी....! मी तर ठरवलंय, हा प्लॅन सक्सेस झाला तर मज्जा येईल. आणि आपण चौघे मिळुन धमाल करू तिकडे दुबई मधे...🥰
अंजली : अहो मॅडम....! खुप घाई होतेय... परत या दुबईवरून, काहीही काय प्लॅन करते...😊
मेघा : मी तर यासाठी ट्राय करणारच, जस्ट इमॅजिन.🥰
अंजली : मला काही इमॅजिन करायचे नाही, आणि नको ती स्वप्न रंगवायची नाहीत. तू जरा जास्तच हवेत आहेस. जरा जमिनीवर ये....आणि प्रॅक्टिकल विचार कर... हाऊ इज पॉसिबल....?🤔
मेघा : मघाशी बोलले ना मी तुला... एवरीथिंग इज पॉसिबल... मेरी जान.😊 आणि मी प्रॅक्टिकल विचार पण करून झालीय. फक्त तु थोडा पॉजीटीव्ह विचार कर. 😊
अंजली : बरं...ओके. समजा तु बोलतेय ते शक्य नाही पण... तसं झालच तर... दिदी आणि जिजुला काय सांगणार आहेस तिकडे प्रेम बद्दल...🤔
मेघा : अंजु....! सॉरी...! पण हे सर्व आधीच सांगुन झालंय त्यांना...😋
अंजली : काय....!!!!! पागल आहेस का तु जरा...?🤨 काय सांगितलं तु त्यांना...? आणि कधी...?🤨
मेघा : सॉरी.... डियर, पण मागे एकदा असच बोलता बोलता तुमच्या बद्दल बोलुन गेले. मग आज सकाळी त्यांचा कॉल आला होता तेव्हा मी या प्लॅन बद्दल सर्वच सांगितलं.... सॉरी. 😋
अंजली : ओह गॉड....! 🤦🏻 काय करू तुझं मी...🤨 काही कळत नाही. 🤔 दि, आणि जिजु हे कोणाला बोलणार तर नाही ना...,? मला आता अजुन टेन्शन यायला लागलं आहे.😔
मेघा : अंजु... ! मेरी जान...! ऐक ना सोन्या...! ते दोघेही कोणाला काहीच बोलणार नाहीत. हि माझी गॅरंटी आहे. कारण ती माझी बहिण आहे....,,😋 आणि तु माझं काही करु नको. फक्त तु फक्त प्रेम ला रेडी कर यासाठी. बाकी सर्व मी हॅण्डल करेन. 😊
अंजली : वाऊ....! इथे अजुन कशात काय नाही, आणि मॅडम कुठे पोचल्या...🤨 कुठून येतो ग एवढा कॉन्फिडन्स....🤔
मेघा : अगं... ! तु काही काळजी करू नको. तु फक्त प्रेमला मॅनेज कर. बाकी सर्व काही आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल.
अंजली : अच्छा...! काय बरं बोलू मी त्याला...? कि आम्ही दुबईला चाललोय पुढच्या महिन्यात, तु पण चल आमच्या सोबत.... असं,,,,, जसं की गावीच जाणार आहोत... इतकं सोप्पं आहे का ते...?
मेघा : तु फक्त बोलुन तर बघ...! त्याला पण हे सरप्राइज दे....,😋
अंजली : मला नाही वाटत तो येईल. 😔
मेघा : त्याला विचारायच्या आधीच तु का बोलते असं...! तुझं तूच ठरवते का... तो येईल की नाही ते...🤨
अंजली : मेघा... अग, खुप साधा मुलगा आहे तो, एवढ्या मोठ्या गोष्टीची कल्पना पण करू शकत नाही तो...! लास्ट टाईम आम्ही गावी गेलो होतो तेव्हा तो फर्स्ट टाईम फ्लाईट मधे बसला होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मी जवळुन पाहिलेत. ती एवढीशी गोष्ट त्याच्यासाठी खुप मोठी होती. खुप वेळा तो मॉम ला हे बोलताना मी ऐकलंय तेव्हा. 😔
मेघा : हो... ना...! अरे पागल... मग तुझ्यासाठी किती मोठी संधी आहे की, तु त्याला तुझ्यासोबत एका दुसऱ्या देशात घेऊन चाललीय की ज्याची त्याने कल्पना पण केली नसेल. 😊
अंजली : अरे पण... कसं सांगु मी हे सर्व त्याला,...? आणि सर्वात मोठी गोष्ट..., त्याच्याकडे पासपोर्ट नाही. त्याचं काय करणार....?🤔
मेघा : डोन्ट वरी डियर....! हे बघ आपल्याकडे अजुन एक महिना आहे. आणि तु विसरते की मी कोणाची मुलगी आहे. आपली ओळख कधी कामाला येईल. तु पासपोर्ट चे टेन्शन सोडुन दे. ते मी मॅनेज करेन. तु उद्या भेट त्याला आणि येताना त्याला त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि फोटो घेऊन यायला सांग.
अंजली : मेघा....! खुप पुढचा विचार करतोय आपण असं वाटत नाही का तुला...? अजुन मला हे ही माहित नाही की, डॅड मला तरी पाठवणार आहेत की नाही ते,,, आणि मी स्वप्न बघतेय प्रेम ला घेऊन जायची.😔
मेघा : ओय... ! दुखी आत्मा... बस् झालं...! आता तर काही झालं तरी हा प्लॅन सक्सेस करूनच दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. 
* मेघाला पुढे काही बोलणार एवढ्यात डोअर बेल वाजते.
अंजली : डॅड आलेत,,,, आपण नंतर बोलू... बाय.
* एवढं बोलून ती कॉल कट करते....

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️