Bhagya Dile tu Mala.. in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | भाग्य दिले तू मला ...... भाग -८

The Author
Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला ...... भाग -८

"मला पण कॉलेज ला जायला उशीर होतोय.... एवढं च असेल तर वाट पहा... अंतर दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.. एवढा मोठा वीला आहे... किती बाथरूम आहेत ... कुठे पण जा... मी बाहेर येणार नाही....."ती आतून ओरडत म्हणाली.... 



"ओ गॉड ... कुठे फसलो मी... आणि या बावळट मुलीशी लग्न केलं ... मिस नंदिनी राणे पाहून घेईल तुला.... "तो मनातच म्हणलं आणि पाय आपटत दुसऱ्या रूममध्ये अंघोळीला गेला ... कारण आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मिटिंग होती लेट करून चालणार नव्हतं.... 


आता पुढे .... ...



शौर्य त्याच आवरून खाली नाश्त्यासाठी आला .... तर तिथे अगोदरच त्याची मॉम आणि पप्पा बसलेले होते.... 


"गुड मॉर्निंग ... पप्पा कधी आलात तुम्ही ..."तो त्याच्याकडे पाहत म्हणाला.... 



"पहाटे आलो... हे काय तुम्ही एकटेच नंदिनी कुठे आहेत...." ते त्याला ऐकत आलेलं पाहून म्हणाले... तेवढयात नंदिनी त्याच्या पाठीमागून पायऱ्या उतरत डायनींग हॉलमध्ये आली.... 


"आहो.... त्या पहा आल्याचं.... "मॉम हसत म्हणाल्या ... तस पप्पानी हसून नंदिनी कडे पाहिलं... नंदिनी ने त्यांना पाहिलं तस गालात हसली... आणि पटकन पुढे जाऊन त्याच्या पाया पडली .. शौर्य ने मात्र लगेच फिरवली मघासचा राग जो होता... 



"अहो काय करताय लेकीने पाय पडायचं नसत..."पप्पा तिच्या डोक्यावरुनहात फिरवत म्हणाले ... तशी ती गालात हसली... 


"कशा आहात तुम्ही...??करमत आहे ना.... तुम्हाला...??काही त्रास तर नाही त्यांनी...??"त्यांनी शौर्य वर एक तिरपा कटाक्ष टाकत तिला विचारलं .... त्याने कपाळावर आठ्या आणून त्याच्याकडे पाहिलं... त्याच्या बोलण्याचा रोख त्याला समजत होता.... 


"हो पप्पा... मी ठीक आहे आणि होते सवय हळूहळू ...." तीही हसून म्हणाली... तेवढ्यात कुणाची तरी एंट्री झाली आणि सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं.... 



"हाय वाहिनी...." निखिल म्हणाला आणि त्याने सरळ जाऊन नंदिनीला मिठीच मारली.... 


त्याच्या अचानक मिठीने नंदिनी मात्र पूर्ण गोंधळून गेली... तर इकडे निखिलला पाहून शौर्यला आधीच राग आला होता... त्यात त्यांनी नंदिनी ला अशी डायरेक्ट मिठी मारलेली त्याला अजिबात आवडली नाही.... रागात त्याच्या हाताच्या नासा लगेच फुगल्या आणि कपाळावरची शीर तडतड उडू लागली ... 



"निखिल अहो काय करताय सोडा त्यांना .... सवय नाहीये त्यांना...."मॉम थोडस मोठ्या आवाजात म्हणाल्या .... कारण त्यांनी हि नंदनीच अवघडलेलं पण लगेच समजलं होत... आणि शौर्य च्या आवळलेल्या मुठी देखील त्यांनी पहिल्या होत्या... पप्पा देखील काहीसे नाराजीतच मान हलवली.... नंदिनी मात्र घाबरून निखिल कडे पाहत होती... त्याला याआधी पहिल्याच आठवत नव्हतं.... 


"सॉरी हा वाहिनी .... मी असा अचानक तुझ्या गळयात पडलो .. मला ओळखलस का तू....??आग मी निखिल ... शौर्य दादाचा छोटा भाऊ आणि तुझा लाडका दीर... "निखिल हसत म्हणाला... त्यावर नंदिनी फक्त कस नुस हसली.... तेवढ्यात निखिलची नजर तिच्या पाठीमागे असलेल्या शोरीवर गेली.... आणि तो लागेच शौर्यच्या दिशेने गेला.... 



"दादा कसे आहेत तुम्ही..."निखिल म्हणाला आणि शौर्यच्या गळ्यात पडला... शौर्यने हि त्याच्या गळ्यात हात टाकला.... 


"जिला तू वाटत मिठी मारली ना... आणि जिच्या कमरेवर हात ठेवण्याची चूक केली आहेस.. ती या शौर्य सूर्यवंशी ची बायको आहे... हे कायम लक्षात ठेव ... नाहीतर हात आणि मान दोन्हीही मोडून ठेवेल..."शौर्य त्याच्या गळ्याभोवतीचा हात घट्ट आवळत फक्त त्याला ऐकू जाईल असे त्याच्या कानात म्हणाला... तसा निखिल थोडासा घाबरला आणि तो पटकन शौर्य पासून बाजूला झाला ... शौर्य डोळ्यात राग आणून त्याच्याकडे पाहत होता... त्याची ती रोखलेली नजर पाहून निखिल ने एवढा गिळला .... 



"निखिल या असा तुम्ही पण नाश्ता करा...." मॉम निखिल ला म्हणाल्या .... पण निखिल एवढा घाबरला होता... कि त्याला काही सुधारत नव्हता... शौर्याचा डोळ्यातलं राग आणि त्याची हातावरची पकड त्याला अजूनही मानेवर जाणवत होती .... 


"नाही काकी... मला जरा काम आठवलं... मी बाहेरच नाश्ता करतो.... सॉरी हा वाहिनी ते जरा जास्तच झालं..." निखिल मानेवर हात चोळत म्हणाला ... नंदिनी थोडी विचित्रपणे निखिल कडे पाहत होती.... पण तो मात्र कोणाचंही ऐकून न घेता लगेच तिथून निघून गेला ... खार तर काल ऑफिसमध्ये शौर्य ने रॉकी जवळ त्याला भेटायला नाही दिला म्हणून आज तो शौर्य ला भेटायला आला होता... दोघे एका घरात राहत असूनही नसल्यासारखे होते.... 



तो जाताच शौर्य ने खूप रागात नंदिनी कडे पाहिलं... त्याचे लाल झालेले डोळे पाहून ती मानतच थोडी घाबरली.... 

"हा सडू असा काय पाहतोय ... मी काय केलं आता.... सकाळचा राग तर नाही दाखवत ना...." तिने मनातच विचार केला... तो रागात तिच्याकडे पाहत होता.... आणि ती मनात त्याच्या रागाने तर्क लावत होती... तेवढ्यात....

"शौर्य, नंदिनी या बसा नाश्ता करून घ्या ..."मॉम दोघांना म्हणाल्या ...नंदिनी ने होकारार्थी मान हलवली आणि एक चेअरवर ओढून बसली ... शौर्य हि जरा रागात चेअर वर बसला... त्याला राहून राहून निखिल ने नंदिनी ला मिठी मारलेली आणि मुद्दाम तिच्या कमरेवर हात ठेवलेला आठवत होत.... आणि त्याचा राग जास्तच वाढत होत...आणि त्याचा राग जास्तच वाढत होता.... त्याला तर नंदिनी चा राग येत होता... कारण त्याने कमरेवर हात ठेऊन सुद्धा तिने काहीच रिअक्ट केलं नव्हतं... 



"नंदिनी कॉलेज कधी पासून जाताय ..."पप्पा आता विषय बदलत म्हणाले.. 


"आज पासून जाणार आहे ...." ती म्हणाली 


"शौर्य लग्नानंतर पहिल्यांदाच कॉलेजला जात आहे त्या... तर आज तुम्ही सोडा त्यांना कॉलेजला..."मॉम शौर्य कडे पाहून म्हणाल्या ... 



"मॉम तिच्यासाठी मी गाडी आणि ड्रॉयव्हर दोन्ही अरेंज केलं आहे.... ड्रॉयव्हर तिला घेऊन जाईल आणि परत घेऊन हि येईल...." शौर्य निर्विकार चेहऱ्याने म्हणाला ... सकाळचा राग होताच पण त्यात निखिलमुळे हि रंगात भर पडली होती.... पण इकडे पप्पाच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या... तर नंदिनी ने मनात तोड वाकड केलं.... 

"मला पण हौस नाहीये या सदू सोबत जायची ..." ती मनातच नाक मुरडत म्हणाली .... 



"अहो.... पण आजच्या दिवस गेला असतात ..."मॉम हि थोड्या नाराज झाल्या... 



"नंदिनी तुम्ही तुमचं आवरून ठेवा... आज तुम्हाला शौर्य सोडतील कॉलेजला .... आणि शौर्य तुम्ही .... नाश्ता झाला कि मला स्टडी रूममध्ये भेट.... थोडं बोलायचं आहे... "पप्पा करारी आवाजात शौर्य वर नजर रोखत म्हणाले आणि निघून गेले.... शौर्यने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला.... आता त्याला नाश्ता करायची इच्छा राहिली नव्हती.... तो तसाच चेअर वरून उठला.... 
"शौर्य नाश्ता..."मॉम त्याची भरलेली प्लेट पाहून म्हणाल्या 



"पॉट भरलं माझं.."तो म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला.... 


"आरा ह्याला काय झालं.... "नंदिनी मनातच म्हणाली... 


"नंदिनी .. जा तुम्ही पण आवरा ... परत शौर्य घाई करतील... आणि ड्रेस च घाला.... साडीत त्रास होतो ना तुम्हाला ..."मॉम म्हणाल्या आणि नंदिनी ने मनातच देवाचे आभार मानले ... एवढी छान सासू दिली म्हणून... 


"हो मॉम,..."नंदिनी हसत म्हणाली आणि ती हि उठून रूममध्ये गेली.... 


क्रमशः ..... 


कदाचित शौर्यने नानंदिनी सोबत लग्न कुणामुळे केलं ते कळेल ... 


आजचा भाग कसा वाटलं नक्की सागा.. तुम्ही एक कमेंट मला लिहायला बळ देते ....