Bhagya Dile tu Mala.. in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | भाग्य दिले तू मला ...... भाग -७

The Author
Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला ...... भाग -७

"शौर्य काय करतोय तू हे.... तिचे केस मागे घेतोय .... तिला असं एकटक पाहतोयस... तिला व्यवस्थित झोप लागावी म्हणून तिला उचलून बेडवर झोपवतोय.... कंट्रोल कर स्वतःला ... तू असा तिच्याकडे आकर्षित कसा होऊ शकतो.... विसरलास का.... ती काय वागली आहे तुझ्याशी ..."त्याच मन त्याला आतून ओरडून सांगत होत.... 


"नाही ,.... मी काहीच विसरलो नाही... हा शौर्य सूर्यवंशी त्याचा झालेला अपमान कधीच विसरणार नाही ..... आणि तिला हि विसरू देणार नाही.... मिस नंदिनी राणे ... तू माझी बायको झाली कारण कुणाच्या तरी वाचनात मी अडकलो होतो... पण याचा अर्थ मी तुला माफ केलं असा होत नाही... तू केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुला नक्की मिळणार ..."तो तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाला .... आणि बाथरूम मध्ये निघून गेला 


आता पुढे .....



सकाळी अलार्म च्या आवाजाने तिला जग अली ... आणि तिची झोप मोड झाली ....चेहऱ्यावर वैतागलेले भाव आले.... तिने झोपेतच हात बाजूला करून मोबाईल वरचा अलार्म बंद केला.. आणि परत डोळे मिटून घेतले ... पण आता मात्र झोप लागत नव्हती ..... कारण पोटावर काहीतरी भार जाणवत होता... तिने डोळे बंद ठ्वले आणि एक हात पोटावरून फिरवला... तसा हाताला कुणाच्या तरी दाट केसांना स्पर्श झाला.... तिचे बोट तिच्याही नकळत त्याच्या केसातून फिरली.... एक वेगळीच फिलींग पूर्ण अंगभर पसरली.... पण दुसऱ्याच क्षणी तिने खाड्कन डोळे उघडून तिच्या पोटाकडे पाहिलं आणि ती शॉक झाली .... कारण तो तिच्या पोटावर डोकं ठेऊन मस्त आरामात पालथा झोपला होता.... त्याला असं आपल्या पोटावर झोपलेलं पाहून तिच्या शरीरातून उगाच करत वाहू लागले... तिने गडबडून उठण्याचा प्रयत्न केला .... पण तो पोटावर झोपलेला होता.... त्यामुळे तिला धड हालत हि येत नव्हतं... 


तिची धडधड आता प्रचंड वाढली होती ... त्यापेक्षा जास्त टेंशन तिला या गोष्टीच आले होते कि ती बेड वर कशी... तिने त्याच्याकडे पहिलतर त्याच्या अंगावर शर्ट नव्हता.... तसा तिच्या पोटात भीतीने गोळा आला... तिने लगेच स्वतःकडे पाहिलं तर तिच्या अंगावर रात्री घातलेला नाईट सूट होता .... ते पाहून तिने सुटकेचा निःश्वास सोडला.... पण तरीही मनात प्रश्न होताच ती तर सोफ्यावर झोपली होती ना... मग बेडवर कशी आली... हा साडू तर उचलून आला आणि ना मला... तिने मनातच विचार केला आणि आता तिला त्याचा जबरदस्त राग आला.... एकत्र असं झोपेत उचलून आणलं आणि वरून पोटावर झोपलाय ते हि असा उघडा.... 


"ये उठ ...."तिने रंगात त्याला आवाजा दिला.... पण त्याला हात मात्र लावला नाही... तो मात्र जागचा हलला सुद्धा नाही.... 


"बाप्पा ... हा काय मागच्या जन्मी कुंभकर्ण होता कि काय.."ती वर पाहत म्हणाली 


"ये सडू उठ ना,...."ती त्याच्या खांद्यावर बोट टोचत म्हणाली.... 

"उम ..."त्याने झोपेतच तिच्या पोटावर तोड घासलं... आणि शर्ट मधून थोडस उघड्या पोटावर त्याच्या चेहऱ्याचा आणि दाढीचा तो स्पर्श होताच तिचा श्वास च अडकला... ती जणू जागीच स्तब्ध झाली... शरीरातीतून एक विजेची लाट उसळली.... आणि मनात एक अनोळखी भावना डोकं वर काढू लागली... त्याच्या एवढ्याशा स्पर्शाने हि तिचा उर वर खाली होत होता.... 


"बाप्पा... हा जर असाच झोपला ना.. माझं काही खार नाही.... आहे हा सडू , खडूस... कसला हँडसम आहे.... हा आणि हि बियर्ड ... हाय.... याची बॉडी कसली भारी आहे...."ती त्याच निरीक्षण करत मनातच म्हणाली 




"नंदू बावळट आहेस का....??? त्याला उठवायचं सोडून निरीक्षण काय करते...." ती आता स्वतःवरच चिडली.... 


"पण याला उठवायचं कस ...?? हा जागचा हलेना.."ती त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली... पट खूपच चार्मिंग वाटत होता.... पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होत.... 


"एस... बघतेच कसा उठत नाही ..."ती मनातच म्हणाली... तिने तीच तोड त्याच्या कानाजवळ नेलं..... 



"आआ .......... .... "ती त्याच्या कानात जोरात ओरडली.... तसा तो दचकून जागा झाला.... त्याने पटकन उठून तीच तोड दाबून धरले .... आता ती झोपून विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती ... आणि तो तिच्या तोंडावर एक हात ठेऊन दुसरा हात तिच्या एका बाजूला ठेऊन रागात तिच्याकडे पाहत होता.... तो पूर्ण तिच्या अंगावर होता... त्यात त्याचा ओठावरचा हात .... ती परत एकदा स्तब्द झाली.... दोघांमध्ये एका इंचा च अंतर होत..... 


तो खूप रागात तिच्याकडे पाहत होता.... कारण सकाळी सकाळी तिने त्याची झोपमोड केली होती.... पण त्याची नजर तिच्या काळ्याभोर आणि सध्या विस्फारलेल्या डोळ्यावर गेली तसे त्याच्याही नकळत त्याचे ब्राऊन डोळे तिच्या डोळ्यात हरवले .... आणि तिच्या तोंडावरचा हात त्याने अलगद श्वास घेऊ लागली....

"काय करतोस सोड मला..."ती त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन त्याला मागे लोटत म्हणाली... पण तिच्या नाजूक हाताचा स्पर्श त्याला त्याच्या छातीवर झाला.... तसे त्याने डोळे मिटून घेतले ... एक वेगळीच फिलिंग त्याला आली... ती मात्र रागात पाहत होती.... 


"ये सडू तुझ्याही बोलते मी... हो ना बाजूला ..."तिने आता त्याला जोरात धक्का दिला तसा बेसावध तो लगेच मागे झाला.... याच संधीचा फायदा घेत ती पटकन उडी मारून बेडच्या खाली उतरली... तिने धक्का दिला तसा तो भानावर आला आणि तिने धक्का दिला म्हणून त्याला राग हि आला.... 



"तुझी एवढी हिम्मत .... तू मला धक्का देणार....."तो रागात म्हणाला आणि उठून तिच्यासमोर जाऊन उभा राहिला..... 


"जशी तुझी हिम्मत झाली ना मला उचलून बेडवर आणण्याची तशीच माझी हिम्मत झाली..."ती नाकपुड्या फुगवुन म्हणाली .... 



"ओ हॅलो .. मला हौस नाहीये तुला उचलून घेण्याची .... ते तर तुलाच सोफ्यावर नीट झोपवत तर मलाच बोलते...."तो रागात म्हणाला ... 


"कोणी सांगितलं होत का तुला... माझं मी पाही असत.... तुझ्याच मनात पाप आहे म्हणून मला उचलून बेडवर नेलं.. आणि हे असं उघडा माझ्या पोटावर झोपला... शी.. नालायक कुठला.... "ती तोड वाकड करत म्हणाली.... 


"ये नालायक कोणाला बोलते... आणि माझी बॉडी तुला शी... वाटते ... किती तरी मुली मरतात याच्यावर माहितीये का...." तो तोऱ्यात म्हणाला.... 


"हं ... बहुतेक आंधळ्या असतील त्या... किंवा त्याचा चॉईस बेकार असेल...." ती नाक मुरडत म्हणाली... 


"मला ना तुझ्याशी वाद घालण्यात माझा वेळ नाही घालवायचा .... तुला तर काही काम नाही अशीच फालतू बसलेली असते... पण मला ऑफिसला जायचं य ...."तो तिला इग्नोर करत म्हणाला आणि बाथरूम कडे जाऊ लागला.... तेवढ्यात ... ती त्याच्या मागून येऊन पळतच बाथरूम मध्ये शिरली आणि तीने दरवाजा धाडकन लावून घेतला... त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या.... 



"बायको .... गोडीत सांगतोय... बाहेर ये,... मला उशीर होतोय... "तो बाहेरून दरवाजा वाजवत म्हणाला.... 



"मला पण कॉलेज ला जायला उशीर होतोय.... एवढं च असेल तर वाट पहा... अंतर दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.. एवढा मोठा वीला आहे... किती बाथरूम आहेत ... कुठे पण जा... मी बाहेर येणार नाही....."ती आतून ओरडत म्हणाली.... 



"ओ गॉड ... कुठे फसलो मी... आणि या बावळट मुलीशी लग्न केलं ... मिस नंदिनी राणे पाहून घेईल तुला.... "तो मनातच म्हणलं आणि पाय आपटत दुसऱ्या रूममध्ये अंघोळीला गेला ... कारण आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मिटिंग होती लेट करून चालणार नव्हतं.... 




क्रमशः ...... 


बाकी शौर्य नंदनि ला जे जे प्रेम देत आहेत त्यासाठी खरच थँक्यू .... 


हा भाग फक्त शौर्य नंदिनी चा होता... पुढच्या एक दोन नवीन एंट्री असेल.... आणि थोडं फार रहस्य हि उलगडेल.... 


वाचत राहा... आणि छान छान कमेंट करा.... स्टिकर दिल तर आनंदच होईल......