Ekapeksha - 14 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 14

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

एकापेक्षा - 14

तर मीत्रांनो, ही तर झाली धारगावे सरांची अल्पशी ओळख, धारगावे सर हे फिजिक्स फारच उत्तम रित्या शिकवायचे परन्तु काही दुर्भाग्याने ग्रसीत विद्यार्थ्यांना ते कळत नव्हते. त्यातील दुर्भाग्य असलेला विद्यार्थी मी सुद्धा होतो हे संपूर्ण ईमानदारीने मी सांगतो आणि स्वीकृत
करतो. तर मीत्रांनो, माफ़ कराल मी पुन्हा एकदा कुणाची नव्हे तर एका शिक्षकाची थट्टा करतो आहे. धारगावे सरांचा शिकवण्याचा पद्धतीचा बाबतीत तुम्हाला थोड़ी माहिती सांगतो. खर तर मी जो प्रसंग सांगणार आहे तो त्यांचा शिकवण्याचा पद्धतीचामुळे अनपेक्षित घडल्या गेला. तर
मी आधीच सांगितल्याप्रमाणे धारगावे सर हे फिजिक्स फार उत्तम रित्या शिकवायचे आणि त्यातल्या त्यात त्यांची इंग्रजी इतकी फरटिदार होती की माझासारख्या कम बु्धीचा डोक्यावरून नीघून जाईल, हो खर सांगतो आहे मी मीत्रांनो, मी सामान्य वर्गाचा परिवारात जन्माला आलो. माझे प्रारंभिक शिक्षण हे जिल्हा परिषद अशा शाळेत मराठी माध्यमातून झाले होते. मग पूढ़े आठवी पासून मीत्र घेत आहेत म्हणून मी सुद्धा इंग्रजी माध्यमचा वर्गात दाखला घेतला तसे इंग्रजी विषयाची मला लहानपणापासून आवड तर होतीच, तर दहावी पर्यन्त ती इंग्रजी माझा औळखीची होती परन्तु दहावी नंतर जेव्हा मी अकरावी आणि मग बारावी या वर्गात गेलो तेव्हा मी आणखी शहाणपणाचे कार्य केले. मी विज्ञानाचा विभागात प्रवेश घेतला कारण की मी दहावी हा वर्ग इंग्रजी माध्यमचा वर्गात शिकलो होतो म्हणून, एकतर बारावी अणि त्याचा वरुन विज्ञान विभाग तर तेथील उच्च अशी इंग्रजी ही मला कधीच ओळखीची काय तर आवडीची कधीच वाटली नाही. त्यातल्या त्या गणित हा माझा आधीपासुनचा शत्रु ज्याने मला कधीच सुखाने जगु दिले नाही. ज्याचामुळे पुढ़े काहीच शिकू शकलो नाही आणि आता माझी व्यथा कहानी इथेच थांबवून मी आपल्या प्रमुख मुद्द्यावर येतो.

  तर धारगावे सर शिकवायचे तेव्हा त्यांचा खडू पकडण्याचा एक विशिष्ट असा स्टाइल होता. ते खडू तीन बोटांचा आत धरायचे इथे तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे सगळेच तसे धरतात, परन्तु त्यात विशिष्ट गोष्ट अशी होती की त्यांचा हाताची करांगळी अशा प्रमाणे सरळ उभी
रहायची की लहान मुले शाळेत सु लागल्यावर शिक्षिकेला त्यांची करांगळी दाखवून सु करायला जाण्याची परवानगी मागतात. त्याप्रमाणे त्यांची ती करांगळी ही सरळ उभी रहायची. त्यानंतर एक आणखी गोष्ट ती म्हणजे सर जेव्हा " स " या अक्षराचा उच्चार करायचे तर ते " ससस .." असे एका सुरात ऐकू यायचे. आता मी तुम्हाला या प्रसंगाचा संपूर्ण मसाला दिला आहे आता मी तो गमतीदार प्रसंग सांगतो. तर आमचे धारगावे सर शिकवनी घेण्यासाठी वर्गात आले तेव्हा वर्ग एकदम शांत होवून गेला होता. सरांनी शिकवायला सुरु केली होती. सर त्यांचा फरटिदार इंग्रजीत शिकवत होते. सर आणि उरलेले विद्यार्थी शिक्षणात तल्लीन होऊन गेले होते तेवढ्यात कुणाचा तरी हसण्याचा आवाज आला. तर सरांनी वळून
बघीतले तर माझ्या बेंच चा समोरचा बेंचवर बसलेल्या मुरली हसत होत्या. सरांनी त्यांना वीचारले, " काय झाले हसायला: " तर त्या मुली काहीच बोलू नाही शकल्या आणि सरांनी त्यांना पुन्हा न हसण्याची ताकीद दिली आणि ते पुन्हा शिकवू लागले. काही वेळाने त्या मुली पुन्हा हसल्या आणि आता मात्र सरांनी मागे वळून बघीतले आणि ते जोरात ओरडले, " काय मी जोक्स सांगतो आहे, Can । am looking like joker, so why are
you laugfhing. Get out of my class." असे म्हणून त्या मुलींना सरांनी बाहेर जाण्यास सांगितले कुठलाही वाद केल्या शिवाय, त्या मुली काहीच बोलू शकल्या नाही आणि आमचाकड़े बघत बाहेर नीघून गेल्या.

  आता तुम्हाला वाटत असेल यात कसली गंमत आली. तर खरी गंमत मी तुम्हाला सवीस्तर सांगतो. मी तुम्हाला सांगीतले आहे की आमचा वर्गातील मुले इतकी खोडकर आणि बदमाश टाइपची होती की नागपुरे सरांनी आम्हा तीघांना मुलींचा मागचा बेंचवर बसायला सांगीतले होते
कायमचे. ते आम्हाला शिक्षा म्हणून नाही तर यासाठी की आम्ही तीघेही दिसायला एकदम छोटेशे आणि नाजुक त्याचबरोबर एकदम शरीफ असे दिसायला होतो. यात प्रमाणिकपणे सांगतो आम्ही तीघेही शरीफ होतो फक्त एक कीड़ा होता आमचात तो म्हणजे खोडी करण्याचा. तर त्या दिवशी आणि त्यावेळेस झाले असे की सर शिकवत होते आणि आम्ही त्रिमूर्ति बसून ऐकत होतो. आम्हाला ते हाय फ़ाय इंग्रजी काहीच काहीच कळत नव्हते म्हणून ते शिकवलेले आमचा डोक्यावरून जात होते. आम्ही फक्त सरांचा क्लास संपण्याची प्रतीक्षा करत होतो आणि, टाइम पास करत होतो. तीतक्यात मला अहो हो खरच माझ्या खोडकर अशा बुद्धितील एक कीड़ा वळवळला आणि मला एक खोड़ी सुचली. धारगावे सर शिकवत होते, त्यांनी खडू त्यांचा अतरंगी स्टाइलने धरला होता. त्याच बरोबर सर वारंवार " ससस .." असा आवाज करत होते. तेव्हा अनयास माझ्या तोडून नीघाले, " सर, जाऊन याना. बस माझे एवढे बोलणे आणि माझा बेंचचा समोरचा बेंचवरील मुलीचे हसने हे एकाच वेळेस झाले, मग सरांनी त्या मुलींना हसण्यासाठी मनाही केली. त्यानंतर सरांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली आणि आम्ही तीघे ही ती खोड़ी एन्जॉय करत होतो. आता पुन्हा सरांनी तोंडातून " ससस .. असा आवाज काढला आणि तेवढ्यात मी पुन्हा बोललो, " सर, जोरात लागली असेल तर पटकन जाऊन याना नाही तर येथेच होईल." माझे असे म्हणताच त्यां समोरचा बेंचवर बसलेल्या मुलींना हसू आवरले नाही आणि त्या जोरात हसल्या. त्यानंतर काय घडले ते तुम्हा सगळ्यांना मी आधीच सांगीतले, मग काही वेळाने सरांचा क्लास संपला आणि मग त्या मुली पुढचा क्लास करीता क्लासचा आत आल्या. आता मला भीती वाटू लागली होती की त्या मुली माझी एकतर सरांचा समोर तक्रार करतील अथवा एकतर माझा थोबाडीत नक्की लावतील. त्या क्लास मध्ये आल्या तेव्हा बाकी सगळे मुले मुली त्यांना विचारु लागले. " काय झाले होते ग तुम्हीं का बर हसत होत्या. तुम्हीं तर इतक्या हुशार आणि अभ्यास करणाऱ्या मुली आहात तर मग असे कसे तुम्ही सरांचा क्लास मध्ये हसु शकता." मग त्या मुलीनी संगळ्या मुला मुलींना माझ्या आणि माझ्या द्वारे केलेल्या खोड़ीबद्दल सांगीतले. ते ऐकून त्या मुली आणि सगळा वर्गे पोट धरून हसू लागला. मग त्या मुलींनी माझे नाव ठेवले होते, " मूर्ती लहान आणि कीर्ती महान," तर मीत्रांनो, माझ्या शालेय जीवनातील काही निवडक असे गमतीशीर प्रसंग मी तुमचा सोबत शेयर करतो आहे. तर हा त्यातील आणखी एक हास्याने भरपूर असा प्रसंग होता. तर असेच आणखी काही नवीन प्रसंग घेऊन मी तुमचा समक्ष लवकरच उपस्थित होईल तो पर्यंत हसत रहा आणि माझ्या द्वारे सांगीतलेल्या प्रसंगांचा आनंद लूटत रहा. तर लवकरच आपली भेट पुन्हा होईल तो पर्यंत मला पुन्हा एकदा रजा द्या, माझा लीखाणाबद्दल आपले चांगले किवा वाईट वीचार नक्कीच कळवा तुमचा कमेंट्सचा स्वरूपात.

        धन्यवाद