Ekapeksha - 13 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 13

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

एकापेक्षा - 13

तर मीत्रांनो, आमचे नागपुरे सर हे अवीवाहीत आणि गावखेड्यातून आलेले तरुण होते. त्यांना ईश्वराकडून वरदान लाभले होते ते म्हणजे प्रखर बुद्धीचा. ज्या तरुण वयात इतर तरुण मौज मस्ती करत त्यांची वेळ घालवत असत त्या वयात त्या सरांनी पुष्कळ असे ज्ञान मीळवले होते आणि ते एका कॉलेजमध्ये शिकवायला जायचे त्याच बरोबर त्यांनी हे ट्यूशन क्लास सुरु केले होते. तसे नागपुरे सर फारच साधे भोळे आणि सरळ स्वभावाचे होते. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कितीही राग आलेला असेल तरीही ते शिव्या देऊ शकत नव्हते कारण की त्यांना त्या शिव्या माहितच नव्हत्या. त्याचप्रमाणे ते कुणाला मारु शकत नव्हते कारण की त्यांचे संस्कार असेच होते. त्यांना जास्ती राग आला तर ते जोरात ओरडायचे आणि म्हणायचे, - अबे तुम्ही समोसे वीकाल. " अशी ही असायची त्यांची शिवी. आमचा वर्गात काही CBSC वर्गाचे मूले होती. ती मूल मोठ्या घराण्यातील असून फारच बीघडलेली होती. ती मूले दारु, सीगारेट वगैरे तेथे ट्यूशन क्लासचा मागे मैदानात जाऊन प्यायची. कधी कधी ती मूले नागपुरे सरांचा खिशात हात घालून पैसे काढायची आणि मनात येईल ते म्हणजे कधी समोसे तर कधी भजे आणून त्यांचा समोर खायचे. आमचे सर मात्र रागात येऊन हेच बोलायचे, ' अबे तुम्ही समोसे वीकाल तर मीत्रांनो, तुम्हाला माझे नाव माहीत आहेच, तरीही सांगतो माझे संपूर्ण नाव आहे, - गजेन्द्र गोविंदराव कुडमाते " तर माझा वर्गात एक मुलगा होता त्याचे आड़ नाव होते माटे. माटे हा मुलगा एकदम मस्तीखोर असा होता. तो सुद्धा त्या मुलांचा सोबतीने सरांना त्रास देण्याचा एकही चांस सोडायचा नाही.

   तर मीत्रांनो, नागपुरे सरांचा क्लास सुरु झाला की नाही झाला ही मुले गोंधळ करायला सुरुवात करायची. ती मुले आपापल्यातच मस्ती करायची आणि वर्गात स्वतः लक्ष नाही द्यायची त्याच बरोबर दुसऱ्यांना सुद्धा डिस्टर्ब करायची. तर मीत्रांनो, त्या प्रसंगाची गंमत अशी सुरु झाली होती की नागपुरे सरांनी शिकवतांना माझे नाव घेतले. त्यानंतर क्षणात माझा वर्गातील माटे नावाचा मुलगा हा वर्गात कुटु लागला. त्याला कूदतांना बघून सर म्हणाले, "बे माट्या कायले बंदरासारखा कुदुन रायला बस खाली सरांनी असे म्हटले आणि तो त्याचा सीटवर बसला. त्यानंतर सरांनी पुन्हा माझे नाव घेतले आणि पुन्हा माटे उभा होऊन कुदू लागला होता. त्याचा अशा कृत्याने सगळ्या वर्गात हास्याचे वातावरण निर्माण झाले होते. सगळ्या मुली आणि सगळी मुले ही पोट धरून हसू लागली होती. परन्तु माटेचा आशा वर्तनाचा मागचे कारण कुणालाच कळले नव्हते. सगळ्या मुला मुलींचा सोबत नागपुरे सरांना सुद्धा हसू आले होते. मग त्यांनी म्हटले, " अबे माकडा तू काऊन आपली जात दाखवून रायला चुपचाप बस न एका जागेवर." त्यानंतर वर्गात वातावरण पूर्ववत झाले म्हणजे शांत झाले आणि सरांनी पुन्हा आम्हाला शिकवण्यास सुरुवात केली. आता सरांनी शिकवता शिकवता मला प्रश्न विचरण्यासाठी पुन्हा माझे नाव घेतले आणि आमचा नगीत्तर माटे पुन्हा कुदु लागला. आता मात्र सर चिढले आणि त्याचावर ओरडले, " अबे माटया कुत्र्या काऊन कुदून रायला. अबे माकडा शांत बस नाही तर जा बाहेर शेण खायला. "आता सर फार चीढले होते हे बघून माटे सरांना चीढवण्यासाठी आता आणखी कुदू लागला होता.

   आता मात्र सरांनी शिकवणे सोडून माटेला विचारायला सुरुवात केली. अबे कुत्र्या माट्या तुले किती वेळा सांगू राहिलो मी तरी बी तू काऊन तसा करून रायला सांग मले, कोणी तुले कुदाले सांगुन रायला का. तेव्हा माटे उत्तरला, तुम्हीच सांगुन राहिले.' त्याचे उत्तर ऐकून सरच काय तर संपूर्ण वर्गातील मुले आणि मुली एकमेकांचा तोंडाकड़े बघत राहिले. मग सरांनी त्याला विचारले, काय बोलला तू मी मीन म्हटल तुले कूदाले मी कायले सांगू तुले मराले. तू. खोटा बोलू नको अन मले सांग केव्हा मीन तुले कूदाले सांगीतल. मग माटे बोलला, "मी खोट नाही बोलत तुम्ही मले बोलले दोनदा. आता मात्र सर सुद्धा विचार करू लागले होते की त्यांनी कधी त्याला कुदायला सांगीतले होते. तर मग त्यानंतर सरांनी त्याला हात जोडले आणि बसायला सांगीतले. त्यानंतर सरांनी पुन्हा शिकवणी सुरु केली आणि मला प्रश्न करण्यासाठी माझे नाव घेतले. त्याच बरोबर आमचा माटे पुन्हा तेच रिपीट अगेन करू लागला. आता सर एकदम हताश होऊन गेले आणि त्याला म्हणाले, अबे कुत्र्या तुले आता कोण सांगीतले कुदाले अन तू अजुन काऊन कुदला मग माटे हसला आणि म्हणाला, आता तुम्हीनच तर म्हटले कुदमाटे म्हणून मी कुदलो." तेव्हा सर ओरडून म्हणाले, अबे भी कूदमाटे" नाही कूदमाटे म्हणालो. तेव्हा माटे म्हणाला, मी पण थेच सांगतो की तुम्ही मले म्हणाले कूद माटे" मग सर चीढून म्हणाले, "अबे कुत्र्या मी कूदमाटेच नाव घेऊन रायलो त्याले प्रश्न विचारण्यासाठी. तुले कुदाले नाही सांगुन राहिलो." सर असे बोलले आणि एकदम क्षणासाठी शांत झाले. सरांना स्मरण झाले की ते माझे नाव "कुडमाते" न उच्चारता त्याला कूदमाटे असे उच्चारून राहिले आहे आणि हा कुत्रा माझ्या नावाला शब्दांश: अर्थाचा अनर्थ करून सरांना त्रास देत आहे.

    मग एकदम सर बोलले, " तर अशी गोष्ट आहे कुत्र्या मी "कुदमाटे" म्हणतो आहे आणि तू "कूद माटे असे करतो आहे." असे म्हणून सर सुद्धा जोराने हसू लागले. त्यानंतर सर म्हणाले, "अबे कुत्र्या माटया तू नाही सुधरशील तू खरच समोसे विकशील. असे म्हणून सर काय तर त्या वर्गातील सगळे मुले आणि मुली हसू लागते ते ही पोट धरून. तर मीत्रांनो हा होता माझ्या कॉलेजचा काळातील एक पोट धरून हसवणारा प्रसंग जो मी तुमचा सोबत शेअर केला. तुम्हाला माझी एक आवर्जुन विनंती आहे, तुम्ही जेव्हा हे प्रसंग वाचाल तेव्हा स्वतःला त्या क्षणी आणि त्या ठिकाणी ठेवून वाचाल. तुम्हाला नक्कीच एवढा आनंद होईल जेवढा मला आत्ता तुम्हाला सांगतांना होत आहे. तर मीत्रांनो. आपल्या प्रसंगांचा प्रवासात आपण आता पुढे वाढू. आपण आता ज्या काळात आहोत त्याच काळात राहू म्हणजे माझ्या कॉलेजचा काळात. यानंतरचा प्रसंग त्याच ट्यूशन क्लास मधील आहे फक्त आणि फक्त शिक्षक आणि खोड़ी करणारा बदललेला आहे. तर मीत्रांनो, आता जो प्रसंग मी तुमचाशी शेअर करणार आहे तो प्रसंग आहे आम्हाला फिजिक्स शिकवणारे धारगावे सर यांचा. धारगावे सर हे फारच अनुभवी आणि शांत स्वभावाचा व्यक्तिमत्वाचे शिक्षक होते. ते फार कमी बोलायचे आणि जे ही बोलायचे ते फक्त आणि फक्त कामाचे बोलायचे व्यर्थ विषयासाठी त्यांचाकड़े क्षणिक ही वेळ नसायचा. त्याचबरोबर ते सर्वथा आपली पातळी ओळखून आपते कार्य करायचे त्यात बोलने ही आले. हे आवर्जुन सांगण्याचा हेतु असा आहे की या आधी मी नागपुरे सरांची गोष्ट सांगीतली. तर त्यात विद्यार्थी जसे त्यांचा सोबत थट्टा मस्करी करायचे. त्याचा विपरीत धारगावे सर हे गंभीर असे होते म्हणून त्यांचाशी थट्टा मस्करी तर सोड़ा त्यांचा सोबत व्यर्थ बोलण्याचे सुद्धा कुणाचे धाडस होत नव्हते. आमचातीत कुणीही कधी त्यांचाशी बोलायचे असेल तर संबंधित विषयाचा व्यतरिक्त काहीच बोलत नव्हतो आणि आमचा समस्यांना ते फार शांत चित्ताने ऐकून घ्यायचे आणि त्याचे समाधान ही तसेच करायचे.
       शेष पुढील भागात. ... ( ३ )......२