Ekapeksha - 6 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 6

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

एकापेक्षा - 6

तर तो दूसरा प्रसंग होता गणेशचा घराशी निगडित, त्यांचा आधी आमचा अवतीभवतीचा परिसर याचाबद्दल थोड़ी माहिती द्यावी लागेल. मला आणि या प्रसंगासाठी हे अति आवश्यक आहे. तर मी जेथे रहायचो तो परिसर आमचा ऑर्डनेन्स फॅक्टरीचा परिसरातील सेक्टर ५ हा होता. तर आमचा क्वार्टर हा आठ ब्लॉकचा होता त्यात पाच नंबर ब्लॉक मध्ये गणेश रहायचा आणि त्याचा शेजारी सहा नंबर ब्लॉक मध्ये मी रहायचो. आमचे क्वार्टर हे एकदम शेवटचे होते आणि आमचा क्वार्टरचा नंतर फार मोठे रिकामे पटांगण होते. आमचा क्वार्टरचा शेजारून एक पायवाट होती जी थेट आमचा क्वार्टरचा मागे आणि फॅक्टरीचा परिसराचा सिमेंला लागुन एक गाव होते. त्या गावाचे नाव सोनेगाव होते आणि आत्ताही आहे. तर आमचा क्वार्टरचा शेजारून पायवाट असल्याने सोनेगावातील लोक तेथून येणे जाणे करत रहायचे. तर आता मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो. तर एके दिवशी सकाळचे ११ वाजले होते. सोनेगावातील काही तरुण मुली आणि काही शालेय मुली या शाळेत आणि कॉलेजमध्ये जात होत्या. तर त्या आमचा क्वार्टरचा माघुन निघून जेव्हा आमचा क्वार्टरचा समोरून जाऊ लागल्या तर त्यांना जोरात शिट्टीचा आवाज आला. तर त्या सगळ्या मुली तेथेच थांबुन इकडे तिकड़े बघू लागल्या होत्या. त्यांनी ५ मिनिटे आमचा क्वार्टरकड़े बघीतले तर त्यांना कृणीच दिसले नाही. मग त्या काहीतरी बडबड करत किंवा असे म्हणा की शिव्या देत निघून गेल्या. मग संध्याकाळी त्या पुन्हा त्याच मार्गाने घरी परत जाण्यासाठी निघाल्या तर त्या जशा आमचा क्वार्टरचा समोर आल्या तेव्हा पुन्हा एकदा जोरदार शिट्टी वाजली. त्या सगळ्या पुन्हा थांबुन बघू लागल्या, तर त्यांना कुणीच दिसल नाही. मग त्या तशाच शिव्या देत निघून गेल्या.

मग दूसरा दिवस उगवला आणि तीच रोजची वेळ झाली आणि त्या मुली नियमित वेळेवर तेथून जाऊ लागल्या तर एक शिट्टी पुन्हा वाजली. तर पुन्हा तेच घडले जे काल घडले होते. संध्याकाळ झाली आणि पुन्हा ते तसेच घडू लागले जे कालचा संध्याकाळी घडले होते. असा हा नि्तनियम अवघा एक आठवडा चालला, मग एके दिवशी पंधरा विस लोक आमचा क्वार्टरचा समोर येऊन उभे झाले, त्या लोकांचा बरोबर त्या तरुण मुली आणि शालेय मुली सुद्धा होत्या. त्या लोकांत काही पुरुष आणि काही महिला सुद्धा होत्या. त्यानंतर एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा बरोबर पोलिस सुद्धा आलेले होते. तर आता परिस्थिति ही गंभीर अशी वाटू लागली होती. तर मग त्या मुली आमचा क्वार्टरचा दिशेने आणि विशेष करून गणेशचा घराकडे बोट दाखवून त्या लोकांना आणि पोलिसांना सांगत होत्या. तर मग आता पोलिस हे जीण्यातुन वर आले आणि त्यांनी गणेशचा घरचे दार ठोकले. गणेशचा घरी त्यावेळेस फक्त त्याची आई होती. त्यांनी दार उघडले तर त्यांना पोलिस दारात उभे दिसले तर त्या आधी घाबरल्या मग थोड स्वतःला सावरून त्यांनी विचारले, " काय झाले साहेब, " मग पोलीस अधिकारी म्हणाले, " तुमचा मुलगा कुठे आहे. त्याला बाहेर पाठवा त्याचा विरुद्ध तक्रार नोंदवली आहे लोकांनी." तर मग त्याचा आईने विचारले की, " कोणी आणि कशाबद्दल तक्रार नोंदवली आहे, माझ्या मुलाबद्दल." तर पोलिसांनी त्याचा आईला खाली नेले आणि एका पोलिसाने घरात शिरून सगळ घर बघितले तर त्याला घरात कोणीच दिसले नाही.

गणेशची आई खाली गेल्यावर ते सगळे लोक त्यांचाशी भांड्र लागले होते. तेव्हा गणेशचा आईने त्यांना विचारले, " काय झाले आणि तुम्ही का बर असे भांडण करत आहात." मग त्या मुली समोर आल्या आणि म्हणाल्या, " काकू आम्ही सगळ्या जेव्हा शाळेत, कॉलेज मध्ये जातो आणि परत येतो. तेव्हा तुमचा मुलगा आमची छेळ काढतो आणि आम्हाला बघून जोराने शिट्टी वाजवून लपतो." मग काकुने विचारले, " ही गोष्ट केव्हाची आहे आणि कोणत्या वेळेची आहे ते सांगा." तेव्हा त्या मुलींनी सांगितले, " काकू आम्ही मागील संपूर्ण आठवडा सकाळी ११ वाजता येथून जातो आणि संध्याकाळी ५ वाजता परत येतो तेव्हा तुमचा मुलगा आम्हाला बघून शिट्टी मारतो." मग काकू बोलल्या, " साहेब तुम्ही माझे घर बघीतले तर तुम्हाला कोणी भेटले काय माझा घरात," तेव्हा तो पोलिस म्हणाला, " साहेब, त्या काकू बरोबर बोलत आहेत त्याचा घरी कोणीच नाही आहे त्यांचा शिवाय." मग काकू बोलल्या, " साहेब मी सगळ खर खर सांगते, की मला दोन मूल आणि तीन मुली आहेत. माझ्या तिन्हीं मुलींचे लग्न झालेले आहेत. माझ्या दोन मुलांतील एक मुलगा बाहेर शहरात शिक्षणा करिता गेलेला आहे आणि सगळ्यात लहान मुलगा हा खासगी कंपनीत कामाला जातो. या मुली म्हणतात त्या वेळेस माझा तो मुलगा आणि माझे पती हे दोघेही घरी नसतात. याचा बाबतीत तुम्हाला माहिती काढायची असेल तर मी तुम्हाला कंपनीचे नाव आणि पत्ता देते. शिवाय तुम्ही फॅक्ट्रीचा आत जाऊन माझ्या पतीची चौकशी करू शकता,"

आता मात्र परीस्थिती गंभीर झालेली होती, आमचे क्वार्टर हे एकदम रस्त्यावर असल्यामुळे लोकांची आणि पोलिसांची उपस्थिती दिसत्यामुळे इतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी ही वाढू लागली होती. तर मग ते गावकरी आणि त्या मुली ओरडून सांगू लागल्या की या काकू खोट बोलत आहेत. त्या मुली म्हणु लागल्या, " काकू खर सांगा काय आम्ही खोट बोलत आहोत, तुम्ही म्हणता की शिट्टी तुमचा मुलगा नाही वाजवत तर कोण वाजवतो." तेव्हा मात्र काकू चिढल्या होत्या आणि त्या जोरात बोलल्या, " तो भडव्या वाजवतो. " काकूचा तोंडून ते शब्द ऐकुन सगळे शांत झाले तेव्हा पोलिस अधिकारी म्हणाले, काकू आताच तुम्ही सांगितले की घरात कुणीच नाही आणि नसतो त्यावेळेस तर मग हा कोण आहे ज्याचाबद्दल तुम्ही सांगत आहात " तेव्हा काकू त्यांना म्हणाली, " चला मी दाखवते तुम्हाला. " असे म्हणून काकू पोलिस अधिकार्याला घेऊन वर घराचा आत गेल्या आणि त्यांनी त्यांचा गॅलरीचे दार उघडले. तेथे खाली फरशीवर कापड झाकून काहीतरी ठेवले होते. मग काकुने तो कापड काढला. तर तो एक पिंजरा होता आणि त्याचात एक पोपट होता. तर काकू म्हणाली, " हा भडव्या आहे जो शिट्टी मारतो," पोलिस
अधिकारी यांना विश्वास बसत नव्हता, तर काकुनी तो पिंजरा गॅलरीचा भिंतीवर ठेवला तोच त्या पोपटाने त्या मुलींना बघून जोरात शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच त्या मुली बोलल्या, " तो बघा आता ही शिट्टी वाजवून राहिला आहे" तेवढ्यात पोलिस अधिकारी त्या पोपटाला घेऊन खाली त्या लोकांचा समोर आले आणि त्यांना सांगितले की शिट्टी हा पोपट वाजवत होता. जेव्हा हे सत्य लोकांना कळले. रागाने तापलेल्या लोकांचे त्या मुलींचे त्यांचा आई वडिलांचे आणि आमचा परिसरातील लोकांचा चेहऱ्यावर हसू आलेच नाही तर सगळे खीळखीळून हसू लागले. संध्याकाळी गणेश घरी आला आणि मी सुद्धा घरी आलो तेव्हा आम्हाला ते कळले तर आमचा ही ओठांवर हसू आले. परन्तु या प्रसंगाचा एक दुर्देवी अंत
झाला. एका आठवङ्याचा नंतर त्या पोपटाला एका मांजरेने खाऊन घेतले, तर अशाप्रकारे हा दूसरा प्रसंग अनयास माझ्या आणि सगळ्यांचा ओठांवर हसू सोडून गेला.