Kimiyagaar - 2 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 2

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

किमयागार - 2

आणि आता चारचं दिवसात तो त्या गांवात पोहोचणार होता. त्याच्यात एक वेगळाच उत्साह आला होता. पण त्याचवेळी त्याला असे वाटत होते की ती मुलगी आपल्याला केव्हाच विसरली असेल. असे कितीतरी मेंढपाळ रोज जात येत असतात. तो मेढ्यांना म्हणाला , विसरली असेल तर विसरू दे, मला इतरही मुली माहित आहेत. पण त्याचे मन मात्र त्याला सांगत होते की नाही असे होणार नाही. मेंढपाळ, खलाशी व फिरते विक्रेते याना नेहमीच कोणीतरी असे भेटतं असते जे त्याना प्रवासातील आनंद विसरायला लावते.
दिवस उजाडायला लागला होता, त्याने मेंढ्याना उगवतीच्या दिशेने वळवले. त्याच्या मनात आले मेंढ्या कोणताच निर्णय घेउ शकत नाहीत आणि म्हणूनच त्या माझ्यावर अवलंबून असतात. मेंढ्यांच्या दृष्टीने अन्न पाणीच महत्वाचे असते. आणि त्याला त्या भागातील चांगली चराऊ कुरणे माहित आहेत तोपर्यंत मेंढ्या त्याच्याजवळ राहणार. सुर्योदय ते सुर्यास्त या काळातील त्यांचे दिवस नेहमीसारखेच असतात. त्यांनी कधी पुस्तके वाचली नाहीत , तो सांगत असलेल्या गोष्टी पण त्यांना समजत नाहीत. त्या त्यांना दिलेल्या चारा व पाण्यावरच खुश असतात त्याबदल्यात लोकर देतात व कधी कधी त्यांचे मांसही.
त्याच्या मनात विचार आला की मी राक्षस असतो व त्यांना मारू लागलो तर बऱ्याच मेंढ्या मेल्यावर त्यांना कळेल. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना स्वतःचा विचार करणे माहितचं नाही‌. मीच त्यांचे पोषण करित आहे. आपल्या या विचारांचे त्याला वाइट वाटले, कदाचित काल तो ज्या जागेवर राहिला होता ती पछाडलेली असेल. त्याला एकच स्वप्न दोनदा पडले होते आणि त्यामुळेच या विश्वासू सोबत्यांबाबत असे विचित्र विचार येत होते. त्याने रात्रीची उरलेली थोडी वाईन घेतली व जाकीट अंगाभोवती लपेटले. त्याला माहित होते की अजून काही तासानी सूर्य माथ्यावर आला की इतकी गरमी होईल की तो मेंढ्याना मैदानातून नेउ शकणार नाही. यावेळी सर्व लोक विश्रांती घेत असत. रात्र होइपर्यंत त्याला जाकीट हातातच ठेवावे लागेल जेव्हा त्याच्या मनात जाकीटाच्या ओझ्याचा विचार आला तेव्हांच त्याच्या लक्षात आले की पहाटेची बोचरी थंडी त्याला या जाकीटामुळेचं सहन करता आली होती.
आपण बदलांसाठी तयार असले पाहिजे तो मनात म्हणाला व जाकीटाचे वजन व ते देत असलेल्या उबदारपणा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जाकीटाचा जसा एक उद्देश असतो तसाच त्याच्याही आयुष्याचा एक उद्देश होता "प्रवास ".
आणि आता दोन वर्षांत तो अंदालुसीया(स्पेन) च्या आसपासच्या गावात, शहरात फिरला होता.
तो व्यापाऱ्याच्या मुलीला हे सांगण्याचे ठरवत होता की‌ एक मेंढपाळ वाचायला कसे शिकला होता. तो सांगणार होता की तो सोळा वर्षांचा होईपर्यंत विद्यालयात जात होता. त्याच्या आई वडिलांना त्या शेतकरी कुटुंबाला तो प्रिस्ट व्हावा असे वाटत होते. त्यांना पण अन्नपाण्यासाठी बरेच कष्ट करावे लागत. तो लॅटिन, स्पॅनिश भाषा व धर्मशास्त्र शिकला होता. पण लहानपणापासून त्याला जग पहावे असे वाटत असे आणि ते त्याला देवाबद्दल किंवा माणसाच्या पापाबद्दल जाणून घेण्यापेक्षा महत्त्वाचे वाटत होते. आणि एके दिवशी दुपारी त्याने धैर्याने आपल्या वडीलांना सांगितले की त्याला प्रिस्ट व्हावयाचे नाही त्याला प्रवास करायची इच्छा आहे.
वडील म्हणाले आपल्या गावातून पण अनेक लोक येऊन गेले आहेत, ते नाविन्याच्या शोधात फिरत असतात पण ते शेवटी जसे होते तसेच राहतात. एखाद्या डोंगरावर किल्ला बघायला जातात पण नंतर त्यांना वाटते आपण होतो तिथेच बरे होतो.
पण मला त्या लोकांचे शहरातील वाडे पहायचे आहेत. वडील म्हणाले ते लोक इथे येतात तेव्हा त्यांनाही इथेच राहवेसे वाटते. 'मला त्यांची गावे व जीवनपद्धती पाहायची आहे.' वडील म्हणाले त्यांच्याकडे खूप पैसे असतात त्यामुळे ते प्रवास करू शकतात. आपल्या पैकी फक्त मेंढपाळ असा प्रवास करू शकतात.
' मग मला मेंढपाळ व्हायचे आहे '. तो म्हणाला.
यावर वडील काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला तीन स्पॅनिश सोन्याची नाणी असलेली पिशवी दिली. मला ही सापडली होती. तू आता ती मेंढ्या घेण्यासाठी वापर. त्याना घेऊन फिर आणि मग तुला एक दिवस कळेल की आपलं गाव आणि आपल्या इथल्या स्त्रिया सर्वात सुंदर आहेत. आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. वडीलांच्या डोळ्यात त्याला प्रवास करायची इच्छा दिसली जी अजुनही होती पण त्यांना आयुष्यातील अन्न, पाणी, निवारा यासाठी तीला मुरड घालावी लागली होती.