Kimiyagaar - 8 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 8

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

किमयागार - 8

त्याला अंदालुसीआ मधील सर्व कुरणे, मैदाने माहित झाली होती. आणि आपल्या मेंढ्यांची योग्य किंमत करणे त्याला कळू लागले होते. त्याने मित्राच्या तबेल्याकडे लांबच्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. तो शहरातून जाताना एके ठिकाणी थांबला आणि एका टेकडीवर चढला. तेथून काही अंतरावरील आफ्रिका दिसत होती.
त्याला कोणी तरी सांगितले होते की
" मुर " लोकांनी तेथून येऊन स्पेन काबीज केले होते. तो जिथे बसला होता तेथून सर्व शहर दिसत होते, म्हाताऱ्याबरोबर ज्या चौकात भेट झाली होती तो चौक पण दिसत होता.
कुठुन तो म्हातारा आपल्याला भेटला असं त्याच्या मनात आले. तो या शहरात त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्या जिप्सी स्त्रीला भेटण्यासाठी आला होता. जिप्सी किंवा तो म्हातारा या दोघांनाही तो मेंढपाळ आहे याचे काहीच अप्रुप नव्हते. त्या दोघांना कोणत्याही बाबतीत विशेष रस नव्हता आणि ते कशावरही विश्वास ठेवणारे नव्हते. आणि त्यांना मेंढपाळाला त्याच्या मेंढ्यांविषयी किती प्रेम असू शकते याचा अनुभव नव्हता.
तो त्याच्या कळपातील प्रत्येक मेंढीला‌ नीट ओळखत होता. कोणती मेंढी नीट चालु शकत नाही , कोणती दोन महिन्यांत पिल्लाला जन्म देणार आहे आणि कोणती आळशी आहे, कोणती लोकर काढण्यास योग्य आहे व कोणती कापण्यास योग्य आहे हे त्याला चांगले समजत होते. त्याने मेंढ्यांना सोडण्याचे ठरवले तर त्यांना दुःख होईल.
त्याच्या मनात विचार आला माझ्या समोर आता मेंढ्या व खजिना असे दोन पर्याय आहेत. एक आपल्याला पूर्ण माहिती असलेले क्षेत्र व दुसरे त्याला हवें असलेले मिळण्याचे पण अनिश्चित आहे.
आणि व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार पण होताच. पण ती काही मेंढ्या इतकी महत्त्वाची नव्हती कारण ती त्याच्यावर अवलंबून नव्हती. आणि ती त्याला विसरली असण्याची पण शक्यता होती. आणि तो कोणत्या दिवशी तिला भेटेल याने तिला काही फरक पडत नव्हता कारण तिच्यासाठी सर्व दिवस सारखेच होते. कारण अशा लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक नवीन दिवशी काही तरी चांगले घडू शकते हेच कळत नाही.
मी माझ्या आई वडिलांना सोडून आलो, त्यांंना मी ' नसणे ' सवयीचे झाले आहे तसेच मेंढ्यांना मी नसण्याची सवय होईल. त्याच्या मनात आणि काही विचार येत होता इतक्यात त्याच्या चेहऱ्यावर वारा झोंबला. याच वाऱ्याबरोबर मुर लोक आले होते . आणि हे लोक हिंमत करून काही मिळवण्यासाठी इकडे आले होते.
वारा जसा स्वतंत्र असतो तसे आपणही स्वतंत्र असतो तर त्याच्या मनात आले. त्याला आता त्याच्याशिवाय कुणीच थांबवू शकत नव्हते,
ना मेंढ्या ना‌ व्यापाऱ्याची मुलगी ना अंदालुसीआची मैदाने व कुरणे.
तो त्याच्या भाग्यातील संधी मिळवण्यापासून आता थोडीच पावलं दूर होता. तो त्याचे नशीब आजमावणार होता.
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलगा सहा मेंढ्या बरोबर घेऊन म्हाताऱ्याला भेटला. मुलगा म्हणाला
' माझ्या मित्राने सर्व मेंढ्या लगेचच घेतल्या. तो म्हणाला माझी मेंढपाळ होण्याची खुप दिवसांपासुन इच्छा होती. '
म्हातारा म्हणाला ' हा एक शुभ शकुन आहे. हे असेच असते. यालाच अनुकुलतेचा सिद्धांत म्हणतात. नशीब बलवत्तर असणे म्हणतात. हे यासाठी होते की तुम्हाला तुमचा इरादा पक्का करण्यासाठी पहिले यश मिळून तुमचे धैर्य वाढावे.'
म्हातारा मेंढ्यांचे निरीक्षण करू लागला त्याला एक मेंढी लंगडी दिसली. मुलगा म्हणाला ते महत्त्वाचे नाही ती सर्वात जास्त लोकर देणारी मेंढी आहे .
खजिना कोठे आहे ? मुलाने विचारले. तो इजिप्तमध्ये पिऱ्यामिड जवळ आहे. मुलाला आठवले की जिप्सी ने हेच सांगितले होते पण तीने हे सांगण्याची फी घेतली नव्हती.
खजिना मिळवण्यासाठी तुला कांही शकुन चिन्हं ओळखावी लागतील व त्या अनुषंगाने मार्ग काढावा लागेल. देवाने प्रत्येकासाठी एक मार्ग नेमलेला असतो त्याच्यावरून जाणे त्याच्या हिताचे असते. तुला देवाने दाखवलेली शकुन चिन्हे ओळखणे जरुरीचे आहे.