Kimiyagaar - 3 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 3

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

किमयागार - 3

क्षितिजावर सोनेरी प्रकाश पसरला आणि सूर्योदय झाला. मुलाला वडिलांचे बोलणे आठवले व तो आनंदीत झाला. तो आतापर्यंत खूप शहरांतून फिरला होता आणि अनेक मुलींना भेटला होता पण आता तो ज्या मुलीला भेटणार होता तशी कोणी त्याला भेटली नव्हती.‌ त्याच्याकडे मेंढ्या होत्या, एक जाकीट व एक बदलता येण्यासारखे पुस्तक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मनासारखे फिरायला मिळणार होते. आणि अंदालुशिया च्या मैदानात फिरण्याचा कंटाळा आला तर मेंढ्या विकून तो समुद्रावर जाऊ शकत होता. आणि समुद्रावर फिरायचा कंटाळा येईपर्यंत तो अनेक शहरांमध्ये फिरलेला असेल, अनेक मुलींना भेटला असेल, त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेलेले असतील. तो नेहमी नवीन रस्ते शोधत असे. त्या भागांतून तो अनेक वेळा गेला असला तरी त्या पडक्या चर्च च्या जागेत तो कधी थांबला नव्हता. जग खुप मोठें आहे. त्याला फक्त नवीन रस्त्याकडे कळपाला वळवायचे आहे, पण मेंढ्याना मात्र तो नवीन रस्त्याने जातोय हे कळत नाही, त्याना नवीन ठिकाण किंवा ऋतू तील बदल याचा काहीच फरक पडत नव्हता त्याना फक्त अन्न , पाणी याचाच विचार असतो. आपणही काही वेळा असाच विचार करतो , त्याच्या मनात आले, मी पण व्यापाऱ्याच्या मुलीला भेटल्यापासून दुसऱ्या मुलींचा विचार केला नाहीये.
सूर्याकडे पाहून त्याने अंदाज बांधला की तो दुपारपर्यंत तरिफाला पोहोचेल. तेथे गेल्यावर तो आताचे पुस्तक बदलून एक जाड पुस्तक घेणार होता. वाईनची बाटली भरून घेणार होता. दाढी करणार होता व केस पण कापणार होता. व्यापाऱ्याच्या मुलीला भेटण्याची तयारी करायची होती. आणि दुसरा कोणी मोठा कळप असलेला मेंढपाळ तिचा हात मागण्यासाठी गेला असेल अशा शक्यतेचा तो विचार पण करू इच्छित नव्हता.
स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता मनाला एक नवीन उत्साह देत असते. त्याने आकाशाकडे बघितले व चालण्याचा वेग वाढवला. अचानक त्याला आठवले की तरिफा मध्ये एक म्हातारी स्त्री आहे जी स्वप्नांचा अर्थ सांगते.
म्हातारी त्याला घरातील मागच्या खोलीत घेऊन गेली . खोलीच्या दरवाजाला एक रंगीत पडदा होता. त्या खोलीत एक टेबल , दोन खुर्च्या होत्या व भिंतीवर प्रभू येशू चा फोटो लावला होता. म्हातारी एका खुर्चीवर बसली त्याला पण बसण्यास सांगितले. खुर्चीवर बसल्यावर तिने त्याचे दोन्ही हात हातात घेतले व ती हळू आवाजात प्रार्थना करू लागली. ही प्रार्थना जिप्सी लोकांच्या प्रार्थने प्रमाणे होती. त्याला प्रवासात अनेक जिप्सी भेटले होते. जिप्सी लोक पण प्रवास करत असतात पण त्यांच्याकडे मेंढ्यांचे कळप नसतात. लोक म्हणत असतं की जिप्सी लोकांचे जीवन दुसऱ्यांना फसवण्यात जात असते , काही लोक तर म्हणत की त्यांची सैतानाशी मैत्री असते व ते मुलांना पळवून नेतात व त्यांना गुलाम बनवतात. लहान असताना त्याला नेहमीच मुले पळवून नेणाऱ्या जिप्सींची भीती वाटत असे, आणि आताही त्या म्हातारीने हात हातात घेतल्यानंतर त्याच्या मनात एक भीतीची शिरशिरी आली, त्याला आपण घाबरलो आहे हे तिला कळू द्यायचे नव्हते. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली ' वा छान'. तो जरा बावरला. त्याचे हात थरथरले आणि ते त्या म्हातारीला कळू नये म्हणून त्याने आपले हात तिच्या हातातून झटकन काढून घेतले. तो म्हणाला की ' मी तुला हात दाखवायला आलो नव्हतो '. खरेतर त्याला आता तिथे येऊन चुक केल्यासारखे वाटत होते. त्याच्या मनात आले की तिचे पैसे देऊन निघुन जावे, आपण उगाचच त्या परतपरत पडलेल्या " स्वप्नाला " महत्व देत आहोत असेही त्याला वाटले.
जिप्सी म्हणाली ' तू तुला पडलेल्या स्वप्नाविषयी जाणून घेण्यासाठी आला आहेस. स्वप्ने देवाची भाषा असतात. मी तुला स्वप्नाचा अर्थ सांगू शकते जर तो आमच्या भाषेत बोलला असेल, पण जर ते बोलणे तुझ्या आत्म्याशी असेल तर ते फक्त तुलाच समजू शकेल. कसेही असले तरी मी तुझ्या कडून फी मात्र घेणारचं आहे.'
यातही तिची काही चाल असेल असे त्याला वाटले पण त्याने बोलण्याचे ठरवले कारण मेंढपाळाना लांडगे, दुष्काळ इ. संकटाशी सामना करण्याची सवय असते.
" मला एकच स्वप्न दोनदा पडले ". ' मी मेंढ्यांबरोबर कुरणामध्ये होतो. अचानक एक लहान मुलगी तिथे आली आणि मेंढ्यांबरोबर खेळू लागली. खरेतर मेंढ्या अनोळखी माणसांना घाबरतात त्यामुळे कोणी माणसाने तसे केलेले मला आवडत नाही. पण लहान मुलं त्यांच्याशी त्यांना न घाबरवता खेळू शकतात, हे कसे ते मला माहित नाही. मला कळत नाही की मेंढ्या माणसाचे वय कसे ओळखतात. ' म्हातारी म्हणाली ' मला तुझ्या स्वप्नाबद्दल सांग. मला स्वयंपाक करायचा आहे आणि तसेही तुझ्याकडे जास्त पैसे नाहीत त्यामुळे मी तुला जास्त वेळ देणार नाही.'
' मुलगी खेळता खेळता एकदम माझ्याजवळ आली व माझे हात हातात घेऊन मला ईजिप्त मधील पिरॅमिड पाशी घेऊन गेली.' त्या म्हातारीला पिरॅमिड विषयी माहिती असेल की नाही या विचाराने तो थोडा थांबला, पण ती काहीच बोलली नाही. मग तो तिला कळावे म्हणून एक एक शब्द उच्चारत म्हणाला ' त्या पिरॅमिड पाशी उभी राहून मुलगी म्हणाली " तू येथे ये तुला खजिना सापडेल." आणि तींने खजिन्याची जागा दाखवण्याआधीच मला जाग आली. दोन्ही वेळा असेचं झाले.