Kimiyagaar - 7 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 7

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

किमयागार - 7

आणि म्हणून तुम्ही अवतरला आहात का?. मुलाने विचारले. "असे काही नाही, मी कोणत्या ना कोणत्या रुपात येत असतो. मी काही वेळा प्रश्नाच्या उत्तराच्या रुपात अथवा कल्पनेच्या रुपात येतो. आणि काही कठीण परिस्थितीत मी गोष्टी सोप्या करतो. मी काही वेळा अशा गोष्टी करतो की त्या माणसाला मी काय केलेय ते कळत नाही." याचे उदाहरण म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक आठवड्यापुर्वी त्याला एका खाणमालकापुढे हजर व्हावे लागले होते. त्याने दगडाचे रुप घेतले होते. त्या माणसाने हिरा शोधण्यासाठी सर्व काही सोडले होते. त्याने पाच वर्षांत हजारो दगड तपासले आणि आता हे तो अशा क्षणी सोडणार होता की जेव्हा हिरा त्याच्या हातात येणार होता. आणि तो स्वताचे भाग्य गमावयला निघाला असतानाच मी मदत करायचे ठरवले. त्याने दगडाचे रुप घेतले व घरंगळत त्या माणसाच्या पायाशी गेला. त्या माणसाने रागाने आणि पाच वर्षांच्या निराशेच्या भरात त्याने तो उचलून फेकला पण तो त्यानं ताकदीने फेकल्यांने तो फुटला व त्याला त्यात एक मौल्यवान हिरा दिसला. माणसे आपल्याला काय हवे आहे ते लवकर शिकतात पण त्यामुळेच ते सगळे सोडून देण्यासही लगेच तयार होतात. हे असेच असते.
मुलाने म्हाताऱ्याला सांगितले की तो लपलेल्या खजिन्याबद्दल बोलला होता. तो खजिना एके ठिकाणी गाडला गेला आहे पण तुला खजिन्याबद्दल माहिती हवी असेल तर एकूण मेढ्यांपैकी दहावा हिस्सा द्यावा लागेल.
" खजिन्यातील दहावा हिस्सा दिला तर" मुलगा म्हणाला. म्हातारा म्हणाला जी गोष्ट आत्ता तुझ्या हातात नाही ती देण्याचे वचन देऊन तुझी त्यासाठी काम करण्याची इच्छा कमी होईल. .
मुलगा म्हणाला मी जिप्सी ला दहावा हिस्सा देण्याचे कबुल केले आहे. जिप्सी असे करण्यात तरबेज असतात. असो पण जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी काही किंमत द्यावी लागते हे तुला कळले हे चांगले आहे.
म्हाताऱ्याने पुस्तक परत दिले. उद्या याचवेळी तू मला ठरल्याप्रमाणे मेंढ्या आणून दिल्यास तर मी तुला खजिना कसा सापडेल ते सांगेन.
" शुभ दुपार" असे म्हणून म्हातारा निघून गेला.
मुलगा परत वाचन करू लागला. पण आता त्याचे पुस्तकात लक्ष लागत नव्हते. तो अस्वस्थ झाला होता व त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होते. म्हाताऱ्याचे बोलणे त्याला बरोबर वाटत होते. तो बेकरीत गेला व पावरोटी घेऊन आला. त्याच्या मनात आले की बेकरीवाल्याला म्हातारा त्यांच्याबद्दल काय म्हणत होता ते सांगावे पण काही वेळा गोष्टी तशाच सोडून दिलेल्या बरे असते असे वाटून तो गप्प राहिला. त्याने बेकरी मालकाला काही सांगितले तर तो दोन तीन दिवस अस्वस्थ राहील. तो त्याच्या जीवनात रमला असला तरी कदाचित सगळं सोडून देण्यास तयार झाला असता. बेकरी मालकाला त्रास होऊ न देणे त्याच्या हातात होते. आणि तो शहरात फेरफटका मारायला गेला. फिरत फिरत तो शहराच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचला. तेथे एक इमारत होती. व तेथील एका खिडकीत आफ्रिकेला जाण्याची तिकीट मिळत होती. खिडकीतून माणूस म्हणाला मी तुझ्या साठी काय करू शकतो?. मुलगा खिडकीतून दूर होत म्हणाला " कदाचित उद्या'. मी एक मेंढी विकली तरी दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ शकतो आणि या विचाराने तो अस्वस्थ झाला. तिकीट विक्रेता मुलाला जाताना बघून सोबत्याला म्हणाला ' हा आणि एक स्वप्नाळू '. त्याच्याकडे तिकीट घेण्याईतके पैसे नाहीत.
तिकीट खिडकीजवळ असताना त्याला कळपाची आठवण झाली आणि त्याच्या मनात आले आपण मेंढपाळ आहोत तेच बरे आहे. आतापर्यंत तो मेंढपाळाची सर्व कामे शिकला होता. लोकर काढण्याची कला त्याला चांगली अवगत झाली होती. गरोदर मेंढ्याची कशी काळजी घ्यावी हे त्याला समजले होते. मेंढ्यांची लोकर काढणे, लांडग्यांपासून मेंढ्यांचे रक्षण करणे यात तो तरबेज झाला होता.