Champa - 9 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 9

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

चंपा - भाग 9

चंपा





"कौन रे तू..? और इतनी रात कहा जा रही हे| " खरंतर या वेळी सगळे आपापल्या कामात असतात पण रश्मी कशी बाहेर याचा विचार करेपर्यंत रश्मीने चंपाच्या बुरखा उचलला.
"चंपा...कहा जा रही हो।"चंपाला पटकन रश्मीने एका बाजूला घेतले.
"तू भाग के जा रही हैं?"
चंपाचे डोळे पाण्याने भरले.
"रश्मी मुझे जाने दे । मुझे इस दलदल मैं नही रहना हे। ये चाचा मेरे लिये गिऱ्हाईक को बता रहा है| क्या करू मै? इधर आज रुकी तो मेरी जिंदगी नरक बन जाएगी. तू बोल मैं क्या करू?"

"हाँ मुझे पता हैं साला चाचा हरामी हैं, आंटी गई तो सालेकी कोठी हो गई| तू घबरा मत।लेकीन याद रख तू जा लेकीन यहा वापस मत आ। चंपा देख हम फसे हैं, मुझे पता है तेरा जन्म ये सब करने के लिये नही हुआ है, मेरी सहेली ये सब करे ये में नही चाहती हु| तेरे सपने बहुत ऊँचे हे, जा जिले अपनी जिंदगी, पर देख इधरसे निकलना मुश्किल हैं| जगा जगा चाचा के आदमी खड़े है|"
"इसलिए तो मैंने बुरखा पहना था|"
"तुझे क्या लगा बुरखा पहेना तो तुझे जाने देंगे. सुन मुझे एक रास्ता पता हैं जहा इस वक्त कोई नही रहता है| चल में तुझे लेके जाती."

"तू मत आ रश्मी, चाचाको पता चला की तूने मुझे भागनेके लिये मदत की तो चाचा तुझे जानसे मारेगा|"
"तू मेरी चिंता मत कर... चल जल्दी|"
रश्मी कुठल्या कुठल्या बोळातुन चंपाला बाहेर काढत होती. चंपा फक्त तिच्या मागुन झपझप पावलं उचलत होती. तेवढ्यात नेमका बंड्या येताना दिसला. बंड्याला चढली होती. त्याने त्याच्या मित्राला विचारले.
"यहाँ से कोई जा रहा हैं क्या?"
"नहीं रे बंड्या तुझे न चढ़ी है इसलिए हर जगह तुझे वो दिखती है|" त्याच्या मित्र बंड्याला आणि स्वतःला संभाळत बोलला.
"चुप... वो इस वक्त नही आयेगी." बंड्या एवढ्या नशेत सुद्धा लाजला. रश्मी आणि चंपा आडोश्याला लपल्या. बंड्या खाली बसला.
"साला देख अभी इधर बैठा..." रश्मी ने शिवी हासड्ली.
"पागल सपना देखता है ते..." रश्मीने जीभ चावली.
"क्या बोली तू?" चंपाने तिला विचारले.
"पागल तुझपे लट्टू है... किती बार बोला ये तेरी वाली नाही हैं पागलों जैसे प्यार करता हैं तुझपे..." रश्मी दबक्या आवाजात चंपाला सांगत होती. चंपाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती बंड्याकड़े बघत होती.
"अबे इधर से उठ गंदा है सब..."त्याचा मित्र त्याला हाताने उठवत होता.
"इधर..." बंड्या जोराने हसला. एवढ्या शांत जागेत तो आवाज जोराने घुमला.
"साले तुझे पता नहीं... यहाँ तो सब गंदा हैं|" बंड्या उढला अणि त्याच्या मित्राचा आधार घेत चालू लागला. चंपा त्याच्याकडे बघत होती रश्मीने तिला हलवले.
"चल ज्यादा सोच मत." रश्मीच्या मागे चंपा चालायला लागली.

"रुक रुक रुक..." रश्मीने चंपाला मागेच थांब म्हणून सांगितले. चाचाची माणसं आज कधी नव्हे ते तिथे उभी होती. रश्मीला हातात रॉड लागला तिने तो उचलला.
&₹"रश्मी थांब... नको... तू अडचणीमध्ये येशील अस काहीच नको करू." चंपा घाबरून म्हणाली.
"ये इधरसे हिलेंगे नहीं.."
"थोड़ी देर रुकते हैं |" रश्मी ने चंपा चे ऐकले पण त्यांचा आवाज उभे राहिलेल्यापैकी एकाने ऐकला होता.
"कौन है रे तिकडे.." ती दोघही या दोघीकड़े यायला निघाली. आता मात्र रश्मिने रॉड वर उचलला. लपलेल्या रश्मीने एकापाठोपाठ एकाच्या डोक्यात जोरात मारले तशी दोघेही विव्हळत खाली पडली. दोघींनी धूम ठोकली. चंपाला रश्मीची काळजी वाटत होती.
रश्मीने तिला जवळ घेतले तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"अब जा तू मे यहा खडी रेहती।"रश्मी इकडे तिकडे बघत बोलली.
"रश्मी... थँक यु... तू भी जल्दी जा.. किसीने देख लिया तो..." चंपा तिच्या गळ्यात पडली.
"तू जा जल्दी..." रश्मीने तिला बाजूला केले. चंपा पटपट निघाली.
त्या गल्लीतून बाहेर पडेपर्यंत तिला घाम फुटला होता.
चंपाने खूप विचार केला आता पोलीस केस केल्याशिवाय पर्याय नाही. पोलीस नक्कीच मदत करतील आणि ते झाल्यानंतर राम सरांना फोन करेन ते नक्की येतील मला न्यायला. रात्र काळीकुट्ट झाली होती. ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पोलिसांना तिची सगळी माहिती सांगितली. तशी लिहून ही घेतली पोलिसांनी तिची अवस्था बघून तिला पाणी दिले आणि जरावेळ बसायला सांगितले. चंपाला कुठेतरी हायस वाटलं. ती डोळे बंद करून शांत बेंचला टेकून बसली.
कोणीतरी आल्याची चाहूल लागली म्हणून समोर पाहिले तर चाचा उभा होता. पोलिसांकडे पाहिले तर पोलीस क्रूरतेने बघून हसत होते. इतकी नालायक माणसं कशी असू शकतात? या विचाराने चंपाला राग आला. पोलिसांकडे न जाता जर रामसरांकडे गेले असते तर आता वेगळे घडले असते. मी पोलिसांवर विश्वास ठेवून चूक केली. घेतलेला निर्णय चुकीचा होता. चंपा न बोलता, न रडता चाचच्या मागे निघाली. कोठीवर पोहचल्यावर चंपाने चाचाला विनंती केली.

"चाचा मला जाऊदे, प्लिज चाचा तुम्हाला माहित आहे या वस्ती कळायला सुध्दा मला वेळ लागला होता. आंटीने मला एवढ्या लांब ठेवले होते या सगळ्यापासून कारण तिला कधीच असे वाटत नव्हते की मी हे करावं...चाचा मी हे काम केलं नाही तर बिघडणार नाही न, प्लिज मला हे नाही करायच…माझ्याकडून हे नाही होणार..." चाचाने तिच्या बोलण्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. त्याने बंड्याला हाक मारली. बंड्या धड शुद्धीत नव्हता. चाचा पुन्हा चिडला.


"बंड्या, देख ये साली भाग के जा रही थी। तू गौरी और रश्मीको इधर रुकनेको बोल…" चाचा रागाने निघून गेला.
गौरी तिच्याजवळ आली. रश्मीला पुन्हा चंपाला इथे पाहून धक्का बसला होता.


"ताई… ना... आता चंपा, तुला ताई का बरं म्हणू…? चंपा अग दोन दिवस रडशील आणि होईल सवय तुला पण… रडून काहीच होत न्हाय इथं तुझं आंटी होती म्हणून ऐकत होते आता कोणीच ऐकणार नाही ना डोळे पुसायला कोणी येईल...तुला वाटलं होतं की तू लै हुशार, शिकलेली, तुझ्या आयुष्यात असा प्रसंग येणारच न्हाय…. राणीसारखी आमच्या पुढं हिंडत होतीस, पण आला तो प्रसंग आला. गौरी जोरजोरात हसायला लागली.
गौरीला नको एवढा आनंद झाला होता. आनंदाच्या भरात ती झोपेल का? रश्मी आणि चंपा ती झोपायची वाट बघत होत्या. दोघींनि झोपायचे नाटक केले.. चंपा रश्मी काहीएक बोलत नव्हत्या. गौरीला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. गौरी झोपली. पण या दोघी???



मैत्रीच्या नात्याला आधार द्यायला
आज मला शब्दांचा बाजार दिसत नाही,
प्रेम अपार आहे कस सांगू,
मन लाचार आहे, पुढे यायला धजत नाही.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत