Champa - 6 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 6

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

चंपा - भाग 6

चंपा







“हो...” राम





“जवळपास वर्ष होत आलंय मी इथल्या मुलांना शिकवतीये. आई का्य करते? हे समजायला नको म्हणून या वेळेला मी त्यांची शाळा भरवते. एक छोटा प्रयत्न... पण समजायच ते समजतेच, कारण वेगळी जागा नाही न कुठे.”




“माझा कोणताही स्वार्थ नाही यामध्ये जे मी सोसलं आहे ते यांना मला सोसू द्यायचं नाही हे आणखी एक कारण...”

“म्हणजे ?” मला पुन्हा प्रश्न पडला.

ताई ताई करत चार पाच लहान लहान मुल तिच्या जवळ आलीत.

“गुड इविनिंग ताई...” मी आवाक होवून बघत होतो.

“ बाळांनो तुम्ही जरा वेळाने या... “ मुलांनी तिने दिलेली सूचना पाळली आणि बाहेर गेले.

“मी हि याच वस्तीतल्या एका कोणत्यातरी बाईची मुलगी असावी. मला नाही माहित मी कोणाची मुलगी आहे आणि मी हि चौकशी करायचा प्रयत्न केला नाही.”

“मला शाळेची आवड आहे हे पाहून कार्पोरेशनच्या शाळेत माझे नाव इथल्या आंटीने घातले. मला घरी यायचे नसायचे. इथले वातावरण मला नको वाटायचे. माझी शाळेतली प्रगती पाहून मला कोणी जाऊ नको असे म्हंटले नाही. कळायला लागले तेंव्हापासून गिर्‍हाईक यायला लागले होते. मी आंटीला सांगितले मला शिकायचे आहे आणि इथल्या मुलांना शिकवायचे आहे. का?? माहित नाही आंटीने मला होकार दिला इतर मुलींसारखी मला जबरदस्ती केली नाही. कदाचित या आंटीची मी मुलगी असेन आणि तिने जे सहन केले ते मी करू नये असे वाटत असेल. तिने मान्यता दिली म्हणूनच मी आज हा दिवस बघू शकले.”

ती सांगत होती आणि मी सुन्न झालो. “किती गैरसमज करून घेतले मी या मुलीविषयी.”

“सर मला कामाची गरज होती, कारण या सगळ्यासाठी, मी इथे राहत नाही सर मला आंटीने चांगल्या सोसायटी मध्ये फ्लॅट घेवून दिला आहे. पण मी येते या मुलांना शिकवायला... जेंव्हा मी शाळेत जायचे तेंव्हा शिक्षकांपासून माझी सगळे टिंगल करायचे. “शिकून कुठे दिवा लावणार?”असे येता-जाता म्हणायचे... इतर मूल मला चिडवायची, हसायची. शाळेतल्या मुली मैत्रीणी झाल्या नाहीत. सतत येताजाता कुजबुज ऐकू यायची. माझ्याविषयी असायची पण मी तिथली एक आहे यात माझा दोष होता का? मैत्रिणी असाव्यात अस वाटायचं पण कोणी मला जवळ करायचे नाही जवळून गेल तरी अंग चोरायचे म्हणून मी सुद्धा कोणाबरोबर मैत्री करण्याचे धाडस केले नाही. मला याकडे लक्ष द्यायचे नव्हते. आंटीला मी बारावी फस्ट क्लास ने पास झाल्यावर खूप आनंद झाला मला विचारले काय करायचं तुला यानंतर मी माझे स्वप्न सांगितले आणि ती लगेचच हो म्हणाली. डीएड झाले. नोकरीची गरज होती पण मला इथून लांब जायचे नव्हते आणि जवळपास कुठे नोकरी मिळत नव्हती. म्हणून मग तुमच्याकडे आले.”

“चंपा... मी या सगळ्याचा विचार सुद्धा केला नव्हता. मला माफ कर... मी नको नको ते विचार केले.”

“मला ठाऊक आहे सर...तुम्ही काय विचार केले असतील.“ चंपाने रामच्या डोळ्यात पाहिले.

“मी इथून पुढे तुझ्या सोबत असेन तुला हवी ती मदत करायची माझी तयारी आहे.”

“थँक यु सर पण मला मदत नको आहे. मी समर्थ आहे. मी हे सगळ एकटी करू शकेन कोणाचे उपकार नकोत मला... “

“उपकार कसले यामध्ये ... मी एखादा विषय शिकवेन या मुलांना.. हे चालेल.”

“हो अशी मदत नक्की चालेल.”

“येवू मी.”

“सर कॉफी...”

“नको... थँक्यू... “

“आमच्या इथून असे नाही जायचे. पहिल्यांदा आलात न... थांबा ...” थोड्या हक्कानेच ती बोलली आणि गेली आणि मी पुन्हा विचारात...

“हिला फक्त हीच मदत करायची की आणखी काही करू शकेन...”

चंपा कॉफ़ी घेवून आली.

काहीही न बोलता आम्ही कॉफ़ी घेतली.

“ मी येतो. उद्या ये ऑफिस मध्ये...”

“उद्या संडे आहे सर.”

“अरे हो...”

ठीक आहे. येतो.

“अच्छा ... “

“तिला आज मला सोडून जावेसे नव्हते वाटत... नकळत मी तिच्या प्रेमात पडलो.”

तिथून घरी आलो...तर मारिशा दारात उभी होती. मारीशा आणि राम एकाच कॉलेजमध्ये होते. घट्ट मैत्री होती इतकंच… मारीशाला रामचा सगळं भूतकाळ माहीत होता. महत्त्वाचे निर्णय दोघे एकमेकांना विचारून घ्यायचे. मारीशा च्या आई वडिलांना रामचा स्वभाव माहीत होता. मारीशा हॉस्टेलमध्ये राहत असली तरी जास्त वेळ राम सोबत घालवायची. मारीशा च्या आई वडिलांना राम होता म्हणून मारीशाची काळजी वाटत नव्हती. मोकळा स्वभाव, जे आहे ते पटकन बोलून दाखवणारी, फक्त रामला तीच बोल्ड राहणं पटत नसायचं. तो नेहमी तिला म्हणायचा. "मुलींसारखी रहा…" मारीशाला तस राहायला आवडायचं. ती कोणासाठी बदलणारी मुलगी नव्हती. तिची तिला मत होती. ती काही निर्णय जरी रामला विचारात असली तरी तिचा फायनल निर्णय घेऊन झालेला असायचा. बोल्डनेस राहण्यात होता तसा विचारांनीसुद्धा ती बोल्ड होती.

“फोन का नाही उचलास? 2 तास दारामध्ये उभी आहे.”

“कधी आलीस तू? आणि कळवले का नाहीस?”

“त्यात काय कळवायच? नेहमी मी अशीच येते.” रामने दरवाजा उघडला आणि सोफ्यावर बसला.

“मीटिंग आहेत का तुझ्या ?”

“हो...पण का रे अशीही येऊ शकते की मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला. तुला आवडले नाही का?”

“असे नाही ग…”

“मग चेहरा का उतरला?”

“आता हिला काय सांगू? चंपा विषयी हिच्यासोबत बोलायला काय हरकत आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे...नको बाई उगीच गोंधळ करेल… आधीच उगीचच गळ्यात पडते. चंपा विषयी सांगितले तर…नाही नकोच”

“मारिशा...कॉफी देशील?”

“येस व्हाय नॉट… फ्रेश होते...माझी बॅग ठेवते आणि कॉफी आणते तुझ्यासाठी.”

“मारिशा...किती दिवसांसाठी राहणार आहेस?”

“अस तर याआधी कधीच नाही विचारलेस? मारिशा सोफ्यावर त्याच्या शेजारी बसली.”

“असे काहीच नाही. ऐकतर तुझा आई बाबांना न सांगता तू अशी माझ्याकडे राहतेस , मी मागेच बोललो होतो की चांगले मित्र असलो तरी मला नाही पटत हे तुझं अस राहणं.”

“म्हणजे? आपण अजूनही मित्रच आहोत का?”

“हो…”

“ओके काहीच प्रॉब्लेम नाही मला तरीही मी इथेच राहणार.”

“आणि उद्या मला मीटिंग नाही परवा आहे सो उद्या बाहेर जाऊयात आपण.”

“उद्या मला नाही जमणार…”

“का…?”

“निवांत झोपायचे आहे.”

“तुझी झोप झाल्यावर जाऊ.”

“प्लिज मारिशा… तुला हवं तर जा तू मला निवांतपणे हवा आहे.”

मारिशाला समजत नव्हते की आज राम असा का वागतोय? तिला जाणीव मात्र झाली होती की काहीतरी बिनसलं आहे ह्यावेळी ना मैत्रिणी सारख बोलणं ना मी आल्याचा आनंद? विचार केला आणि बेडरूम मध्ये निघून गेली.

माणसाला चेहऱ्याने ओळखण्यापेक्षा,
तो मनाने कसा आहे
हे ओळखणे जास्त महत्वाचे
कारण चेहऱ्यापेक्षा माणसं
मनाने चांगली असावीत.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
पुणे

वाचा पण लेखकाने काय लिहिले आहे आणि वाचकाला त्यावर काय वाटते हे महत्त्वाचे म्हणून प्लिज मला कमेंट मध्ये नक्की तुमचा अभिप्राय सांगा. रेटिंग द्या आणि हो कॉइन सुद्धा द्या.