Champa - 7 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 7

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

चंपा - भाग 7




चंपा

फ्रेश होऊन खाली आली तर राम फ्रेश होऊन कॉफी घेत बसला होता.

“तुझ्यासाठी कॉफी मी करणार होते.” तिच्यासाठी रामने भरलेला कॉफीचा मग उचलत बोलली.

“मारिशा सॉरी…”

“आता काय झालं? काहीतरी नक्कीच बिनसलंय?”

“मी अस बोलायला नको होतं… तूला वाईट वाटले ना?”

मारिशा मोठ्याने हसली आणि म्हणाली, “मला का वाईट वाटेल… तुला मी आज ओळखते का? “

मारिशा त्याच्या जवळ गेली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि कॉफीचा एकेक सिप घ्यायला लागली.

राम सावरला… ”चल खूप दमलोय झोपतो.” तो उठला. आणि तडक रूम मध्ये निघून गेला रामचे असे निघून जाणे तिला खटकले. तिला कळेचना हा असा का वागतोय? मारीशा किचनमध्ये गेली. रेडी टू कुक व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि रात्री उशिरा दोघांनी जेवण केले. मारीशाला आज उशिरापर्यंत रामसोबत गप्पा मारायच्या होत्या.

"राम किती मस्त थंडी पडली आहे. कॅम्प फायर करूयात आणि मस्त गप्पा मारत बसू… मी कॉफी बनवते." मारीशाने तिचा प्लॅन सांगितला.

"मारीशा उद्या लवकर ऑफिसमध्ये जायचं आहे. मी झोपतो." राम उठून निघून गेला.

राम तिला टाळतोय हे मारीशाला समजले होते.

नेहमीपेक्षा लवकर येऊन राम ऑफिसमध्ये काम करत होता.

“साहेब आत येऊ का?”

रामने वर पाहिले तर रद्दीवला उभा होता.

“अरे परवा तर रद्दी नेलीस ना? चार पेपर देऊ का तुला...?” रामला खूप राग आला होता.

“तस नाही साहेब तुमची बाकी रद्दी पण असते ना...म्हणून”

“म्हणून काय? रद्दीवला ऑफिसमध्ये वाकून बघत होता.”

“काय नाय साहेब येतो.” रद्दीवला बाहेर पडला आणि चंपा आली.

“गुड मॉर्निंग सर.” चंपा आज खूपच छान दिसत होती.

“गुड मॉर्निंग.. .” राम तिच्याकडे न बघताच बोलला उगीचच काम करत बोलला.

“साहेब आत येऊ का?” चहावाला चहा घेऊन आला.

“हो ये…”

त्याने रामला चहा दिला आणि चंपाकडे बघत म्हणाला,

“बाई तुम्हाला कटिंग की फुल्ल…”

“मला नको चहा…”

“घ्या बाई लई चवदार हाये...अगदी…”

“ये बाई काय म्हणतो...मॅडम म्हण आणि नको आहे त्यांना चहा तर कशाला आग्रह करतोयस? घे पैसे आणि निघ.” रामने त्याच्या हातात पैसे टेकवले. राम रागाने लाल झाला होता. तेवढयात त्याचा फोन वाजला.

“हा मारिशा बोल…”

“निघणार आहेस का आजच…? बर … हो पोहचलीस की फोन कर.”

“बाय…”

तोपर्यंत चहावाला तिथेच घुटमळत चंपाकडे बघत उभा होता.

“तू अजून इथेच?”

“तुम्ही पैसे देताय ना... म्हणून थांबलो होतो.”

“अरे मी काय ऑफिस उचलून पळून जाणार आहे का?”

“बर येतो उद्या तेवढंच… “

“काय ?”

“काही नाही साहेब येतो.” चहावाला निघून गेला.

राम चिडलेला होता. चंपा मात्र खूपच शांत तिचे काम करत बसली होती. तिला माहिती होते. राम चिडलेला आहे.

“सर परवा फाईल ठेवली होती.”

“कोणती फाईल?” रामचा अजून राग गेला नव्हता.

चंपाला मात्र खूप छान वाटत होते. पहिल्यांदाच कोणीतरी पुरुष तिची अश्या पद्धतीने काळजी घेत होता. ना त्याची नजर किसळवाणी नव्हती की कोणती अपेक्षा होती.

“शिंदेंची…”

“तुझ्या टेबलवर ठेवली आहे.”

चंपा फाईल शोधत रामकडे बघत होती.

“सर…” राम काहीही बोलत नव्हता.

“यांच्यावर ओरडून किंवा रागवून काहीही उपयोग नाही. त्यांना माहिती आहे मी कुठून येते आणि कुठे जाते?”

रामला धक्का बसला होता …

“म्हणजे…?”

“सगळे पुरुष सारखेच असे मी म्हणणार नाही पण जसे तुम्हाला वाटत होते मी कुठे जाते तसे हा चहावाला, रद्दीवाला तुमचे काही मित्र सगळे माझ्या मागे येऊन झाले.“

रामला चंपाकडे बघवत नव्हते… एक शब्दाने कोणाविषयी काहीही न बोलता या सगळ्या लोकांचा ती त्रास सहन करत होती.

“पण ते ही तुमच्या सारखेच गल्लीपर्यंत आले आणि इतर बायकांना पायांच्या नखांपासून ते केसांपर्यंत न्याहाळत निघून गेले त्यांना मी त्यांच्यातली एक वाटत होते.” हे सगळं ऐकून त्याला कोणी तरी डोक्यावर वार करतय अस वाटत होत. हे एवढं होऊन चंपा तिचे काम अगदी व्यवस्थित करत होती. राम शांत बसला होता.

चंपाला त्याची काळजी कळत होती. या लोकांकडे लक्ष दिले तर काहीही साध्य होणार नाही हेही तिला माहीत होते. रामला चंपाला होणारा त्रास आता होऊ द्यायचा नव्हता. म्हणूनच राम सिद्धार्थला सगळे सांगणार होता.

रात्री राम आणि सिद्धार्थ बऱ्याच वेळ बोलत बसले. रामने सगळया गोष्टी सिद्धार्थला सांगितल्या. सिद्धार्थला जाणवत होते राम प्रेमात पडला आहे.

रामला चंपाविषयी खुप वाईट् वाटत होते. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. सिद्धार्थ रामला समजावले. रामच्या मनात चंपाविषयी सहानभूती होती.

आज दोन दिवस झाले होते चंपा ऑफिसमध्ये आली नव्हती.

काय झालं असेल? फोन का स्विच ऑफ केला असेल? इतकी बेजबाबदार मुलगी नाही चंपा… जाऊन यावे का? काही मोठा प्रॉब्लेम नसेल ना? एक ना हजारो प्रश्न रामला पडतं होते की या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोडला असेल जॉब...नाही नक्कीच ती एवढ्या हलक्या काळजाची मुलगी नाही. आज मी जाऊन बघेन नक्की काय झाले ते… रामने ऑफिस बंद केले आणि गाडी काढली...घरी जाऊन फ्रेश होऊन मग जावे या विचाराने त्याने गाडी घरच्या दिशेने वळवली. घरी आला तर मारिशा आणि तिचे आई बाबा दारात उभे…

‘अरे सगळी फॅमिली अचानक?’

रामला त्यांना असे अचानक बघून धक्का बसला. दरवाजा उघडून सगळे आतमध्ये आले.

“राम आई बाबा ना सगळे समजले आपल्याबद्दल…” मारीशाला हे सांगताना आनंद होत होता. पण आई बाबा समोर ती तसे दाखवत नव्हती.

“अरे होत तुमच्यामध्ये असे तर सांगायला हवं होतं घरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता.” मारिशाची आई म्हणाली.

“पण काकू...” रामने बोलायचं प्रयत्न केला.

“राम अरे तुमची मैत्री पाहतो आहे आम्ही असे मित्र आयुष्यभरासाठी एकत्र येणार असतील तर चालेल आम्हाला.” मारिशाची आई म्हणाली.

खरंतर मारिशाकडे मी आ करून बघत होतो. ”काय झालं असेल नक्की?”

मारिशा पहिल्यांदाच लाजताना पाहत होतो.

“मारिशा…?”

“परवा मी इकडे आले तेंव्हा आई बाबाना संशय आला म्हणून ते पाहायला माझ्या मागे आले आणि…” मारिशा म्हणाली.

“ आम्हाला माहीत आहे की ती इकडे आ ली की तुला भेटले पण तुझ्याबरोबर चार चार दिवस राहणं हे आम्हाला पटले नाही. अरे प्रत्येक स्थळाला ही मुलगी नाही का म्हणते हेच आमच्या लक्षात येत नव्हते तेंव्हा तिच्या बाबांना संशय आला, ते तिच्या मागे इथे आले.” मारिशाची आई समजूतीने बोलत होती.

“तू बोल राम काय करायचे? कधी लग्न करायचे? “

“काकु अहो तस मारिशाविषयी माझ्या मनामध्ये काहीच नाही ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे.” रामला लग्न वैगेरे ऐकून जरा टेन्शन आले.

“किती वेळ पाहिजे अजून तुला? किती दिवस झाले तुझे हेच उत्तर… आई बाबा कित्येक वेळा ह्याला लाडात, रागाने, प्रेमाने विचारून झाले, म्हणून मी तुम्हाला सांगितले नव्हते. हा असाच आहे पहिल्यापासून, मनात काही असलं तरी स्पष्टपणे कधीच बोलत नाही. तुला दुसरी कोणती मुलगी आवडते का?”

आई तिच्या जवळ गेली. “मारिशा शांत हो.”

“नाही आई आज तुमच्यासमोर मला ह्याच्याकडून उत्तर हवे आहे.”

“मारिशा असे काही नाही. आई बाबा समजावून सांगा हिला मला थोडा वेळ दे.”

“मी काही वेळ देणार नाही तुला मला आत्ताच उत्तर हवं आहे.”

राम शांतपणे बोलला. ”मारिशा तू फक्त माझी मैत्रीण आहेस त्या दृष्टीने तुझ्याकडे मी कधी पाहिले नाही. काका, काकू खरंच एवढी वर्ष आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.”

“आई चल जेंव्हा ह्याचा विचार होईल तेंव्हा कळवं म्हणावं तोपर्यंत मी इथे येणार नाही की ह्याला फोन करणार नाही.” मारिशा ताडकन बाहेर निघून गेली.

“काका, काकू तुम्ही तरी मला…“ दोघेही रामचे न ऐकता मारिशाच्या मागे गेले.

राम रिलॅक्स झाला. ”अशी कशी ही? मला नाहीत तिच्याविषयी त्या भावना किती वेळ सांगू हिला…? काका काकूंना काय वाटले असेल…?” त्याने डोकं शांत केले कारण या क्षणी त्याच्यासाठी चंपा महत्त्वाची होती. राम उठला आणि फ्रेश झाला गाडी काढली आणि तडक त्या गल्लीकडे गाडी वळवली.

पसंत नहीं हमें,
हरवक्त हारनां...
जीवन की हर रांह पर,
हसते हसते चलना...
मालूम हैं हमें अपनी मंजिल,
इरादे बुलंद हैं,
पुरे होनें के बाद ही ठेहेरनां...

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
पुणे