Champa - 3 in Marathi Women Focused by Bhagyashali Raut books and stories PDF | चंपा - भाग 3

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

चंपा - भाग 3





चंपा

दुसरा दिवस उजाडला राम चंपाचा विचार करत रात्री उशिरा झोपला त्यामुळे सगळ्याच गोष्टीला उशीर झाला. सिद्धार्थला उठवले सिद्धार्थ घरी गेला आणि मी ऑफिसमध्ये… ऑफिसमध्ये पोहचायला अकरा वाजेल. चंपाकडे ऑफिसची चावी नव्हती. मी गाडी ऑफीससमोर लावली. चंपा दारात उभी होती.

“सॉरी उशीर झाला. खूप वेळ येवून उभी राहिलीस का?”

“नाही... साडेदहाला आले मी .”

अर्धातास हि रस्त्यावर उभी होती. मला वाईट वाटले.

“एक्स्त्रीमली सॉरी !”

“नो प्रोब्लेम सर.”

तेवढ्यात मागून आवाज आला.

“काय साहेब? साडेदहाला मला मालकांनी हाकलून लावले पाहिलं राम साहेबांच्या हापिसात टेबल खुर्ची पोस्त कर आणि तुमीच उशिरा.”

“गणपत तू कधी आलास?”

“मी पण ह्या बाई आल्या तेंव्हापासून उभा व्हतो.” चंपाकडे पाहताना त्याची नजर हलत नव्हती. डोळे बघताना बाहेर येतील की काय एवढं तिच्याकडे बघत होता.मी ऑफिस उघडले आणि गणपतला म्हंटले.

“ठीक आहे. लाव टेबल खुर्ची आणि चेक देतो तो साहेबांना दे...”

त्याने टेबल खुर्ची लावली, चेक घेतला आणि चंपाकडे बघत बाहेर पडला.

मी तिला टेबलवर पिसी अरेंज करू दिला. तिला काम समजावून सांगितली. तिचे काम सुरु झाले होते. कामाव्यतिरिक्त आम्ही एकमेकांसोबत काहीही बोलत नव्हतो.

“चंपा...” मी एकेरी हाक मारली तशी ती ताडकन खुर्चीवरून उठली.

“काय सर ?”

“उठली कशासाठी ? बस...”

“हो सर, ती जागेवर बसली.”

“मला तुझा मोबाईल नंबर देवून ठेव आणि आई किंवा वडिलांचा?”

“माझा देते, आई वडील नाहीत मला.” तिचे डोळे पाणावले.

“ओह! सॉरी जवळचे नातेवाईक ज्यांच्याकडे तू राहतेस त्यांचा?”

“सर, माझा नंबर देईन काहीही अडचण येणार नाही अर्थात तशी मी वागणार नाही. मला ठाऊक आहे एका दिवसात असा विश्वास बसणे कठीण आहे पण तरीही काहीही झाले तरी मी तुम्हाला सांगितल्याशिवाय सुट्टी घेणार नाही किंवा असा कोणताही प्रोब्लेम तयार करणार नाही कि ज्यामुळे तुम्हाला माझ्या नातेवाईकांपर्यंत यावे लागेल.”

मी शांत होतो. ती तिच्या कामाचा नीटनीटकेपणा मला समजत होता. मी काहींही बोललो नाही. तेवढ्यात सिद्ध्या आला.

“हाय राम...” सिद्धार्थ नेहमीप्रमाने मोठ्याने बोलला. मी डोळे दाखवले तसा तो नॉर्मल झाला.

“सॉरी राम.” त्याने चंपाकड़े पाहिले आणि पुन्हा माझ्याकडे कारण चंपाचे सगळे लक्ष कामामध्ये होत.

“चंपा... “ मी तिला आवाज दिला.

“एस सर.”

“ही इज सिद्धार्थ... माझा भाऊ हा इथे येत राहतो तुला माहित असावं म्हणून सांगितलं.”

तिने सिद्धार्थकड़े बघून फक्त हलकी स्माइल दिली अणि पुन्हा तिच्या कामामध्ये गुंतली. सिद्धार्थ आणि माझ्या गप्पा झाल्या. चंपाने त्यामध्ये सहभाग घेतला नाही किंवा आमच्याकडे पुन्हा बघितलेसुद्धा नाही.

संध्याकाळी ५ वाजले तसे तिने मी दिलेले काम संपवले फाइल्स माझाकडे जमा केल्या आणि निघाली.

“राम हे काय गणित?” सिद्धार्थ हसला.

“नवीन आहे रे होईल हळुहळू मिक्स...” रामला आश्चर्य वाटले होत. एवढी सुंदर दोन तरुण मूल तिच्यासमोर होती. तिला आमच्याकडे बघायचा एकदाही मोह झाला नसेल का? आणि नसेल झाला तर ही नवीन असल्यामुळे अशी असेल किंवा तिला दाखवायचे असेल की कुठेही लक्ष विचलित न करता माझे काम मी नीटनीटक करते. तिच्या स्वभावाचा पत्ता एका दिवसात लागणार नव्हता. तिला बघून का कुणास ठावुक वाटायच की ही मुलगी फार डॅशिंग आहे तिच्या मनामध्ये खुप काही साठलेल आहे. फक्त बोलत नाही.

असे बरेच दिवस चालू होते मला तिने केलेल्या कामामध्ये चूक काढायची एकही संधी ती मला देत नव्हती. माझ्याकडे बरेच क्लाएंट यायचे. तिने कधीच पुढे पुढे केले नाही. ती फक्त माझ्या कामाची पद्धत बघायची. एखाद्या वेळी मी नसेन तर न सांगता आलेल्या लोकांची माहिती विचारून मला द्यायची.

रविवारी सुट्टी मला नकोशी वाटायची.

आज चंपा वस्तीत आली तसा तिला राग आला. तिने बंड्याला हाक मारली.

"बंड्या… " तसा बंड्या धावत आला.

"काय झालं चंपा?" चंपा रागाने लाल झालेला चेहरा बघून बंड्याच्या लक्षात आले. "थांब मी कार्पोरेशनमध्ये फोन करतो आणि सगळा कचरा उचलायला लावतो."

"हे मी चिडायच्या आधी का नाही लक्षात येत तुझ्या? इथं माणसं राहतात जनावर नाही. वस्ती मधली गल्लीबोळ सुद्धा स्वच्छ असायला हवीत. हे बघ कार्पोरेशनच्या लोकांना इथला कचरा उचलायला काही प्रॉब्लम असेल तर मला बोलाव काही असेल तर मी बोलून घेते." चंपाचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता.

“नाही काहीच अड़चण नसणार तू नको काळजी करू मी करून घेईन.” बंड्याने मोबाईलवर नंबर डाईल केला.

“हे फक्त आजच्यासाठी नाही रोज साफसफाई व्हायला हवी.” बंड्याच्या लक्षात आले हे काम जर रोज झाले नाही तर चंपा आंटी पर्यंत पोहचेल.

चंपा निघाली तिला चाची दिसली.

“चाची बरी आहेस न? आणि औषध वेळेवर घेतेस ना?” चंपाने चाचीला प्रेमाने विचारले.

“काल डॉक्टरबाई येवून गेल्या जास्ती दिवस न्हाई राहिले आता माझे, शरीर कुजत चाललय ग बाई माझ... जाणवतय मला... उभ्या आयुष्यात धंदा केलाय... ही अशीच चाळण हुन मरायचं...सुखानं मरण न्हाय आम्हाला” चाचीने तिची नेहमीची बडबड सुरु केली.

“चाची अस का्य बोलतेस ग? काहीही होणार नाही तुला... औषध घे वेळेवर” चंपाला सगळ ठावुक होत. चाची जास्त दिवस नाही राहणार... पण तिला समजावायच म्हणून ती बोलली.

“मला ठाव हाय माझी समजूत काढती. तुला बी डॉक्टरांनी सांगितलय ठाव हाय मला... अन आता कोणासाठी जगायच ग बाई... हाल होवून कुढ़त बसण्यापेक्षा लवकर गेलेल बर.” चाचीच्या डोळ्यात पाणी आले. चाची हळू हळू पुढे निघून गेली. चंपा कितीतरी वेळ चाचीच्या पाठमोऱ्या आकृतिकड़े बघत उभी होती.

"गरीबाने परिस्थितीवर राग

व्यक्त करायचा

की रात्रंदिवस केलेल्या कष्टातून

मिळालेल्या चार पैशांत

समाधान मानायचे???"





क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत

पुणे.