The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
आयुष्यात बरेच क्षण 'मोह'बनुन समोर येतात. तो मोह कुठल्याही रुपाने येवु शकतो. प्रेम, संपत्ती, सत्ता, पद, वासना, प्रतिष्ठा, प्रसिद्धी..! अशा अनेक रुपांनी तो मोहाचा क्षण समोर येवु शकतो. आणि तीच खरी परिक्षा असते आपल्या संयमाची..अशा मोहाच्या क्षणी जो शांत राहून पुढचा आणि मागचा विचार करतो, जो क्षणिक सुखाच्या ऐवजी निरंतर योग्यतेची निवड करतो, जो अशा प्रसंगी स्वतःचा सदविवेक जागा ठेवतो, तोच आयुष्यात खुप काही मिळवतो. छोट्या छोट्या मोहांना ओळखुन त्यांचा त्याग करणाऱ्याचे अंतिम ध्येय नक्की पूर्ण होते. - साधना वालचंद कस्पटे ©🌸
आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. आज बऱ्याच जणांनी तिरंगा विकत घेतला असेल, कोणी WhatsApp la statue ठेवलं असेल, dp ठेवला असेल. कोणी तिरंग्याच्या रंगाचे कपडे, ओढणी, बांगड्या घातल्या असतील. कोणी टिकली लावली असेल. पण मी यातलं काहीच करत नाही. कारण मला माझ्या देशावरील प्रेम व्यक्त करायला निमित्त लागत नाही. मी भारतीय आहे..आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. देश प्रेम व्यक्त करण्याची माझी पद्धत वेगळी आहे. इथे मला काही उदाहरण द्यायला आवडेल. फिरायला गेल्यावर माझ्या एका इंजिनिअर मित्राने चालता चालता रोडवर कचरा फेकला. मी कारण विचारल्यावर तो म्हणाला " अरे सारी दुनिया टाकतेय मी एकट्याने टाकलं तर काय होतय. & I was shocked. कारण एखादी व्यक्ती एवढं शिक्षण घेवून ही अशी वागत असेल तर काय बोलावं?" आणि ह्याच मित्राने १५ ऑगस्ट ला बरोबर रात्री १२ वाजता मेरा भारत महान वगैरे status ठेवले. मला ही देशभक्ती कळली नाही.असे अनेक प्रसंग आहेत. मला माझ्या देशाने दिलेल्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा अभिमान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान लोकांनी दिलेलं बलिदान मी कधीही विसरणार नाही. त्यामुळे या स्वातंत्र्याचा मला आदर आहे. आणि त्याचा योग्य वापर करणे हीच माझी देशभक्ती आहे. मी माझ्याच देशात राहून माझ्या देशाच्या विरोधात कधीच बोलत नाही. माझ्या समोर कोणी देशाला नावं ठेवत असेल तर मी त्याला सांगते की कधीच देश चांगला वाईट नसतो.. तिथले लोक असतात. मी कधीही traffic चे नियम तोडत नाही. मी आजपर्यंत कधीच कुठल्याही ट्रेन मध्ये, बस मध्ये, रस्त्यावर, नदी मध्ये, समुद्र मध्ये कचरा फेकला नाही. सार्वजनिक शौचालय मध्ये saintery pad इतरत्र टाकले नाहीत. कधीही फुकट प्रवास केला नाही. कुठलही काम करण्यासाठी लाच दिली नाही. सोशल मीडिया वर देश विरोधी पोस्ट, जातीवाचक, धर्मविरोधी पोस्ट शेअर केली नाही की तशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं नाही. चंद्रयान असो की कुठलाही नवीन तांत्रिक प्रयोग जो देशहितासाठी केला गेला पण पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाला... त्यावर मी कधीही टोलेबाजी केली नाही किंवा देशावर अविश्वास दाखवला नाही. कधी परदेशी पर्यटक भेटले तर त्यांच्या मनात देशाबद्दल खराब भावना निर्माण होईल असं वागले नाही.कुठलाही देश हा झटक्यात परिपूर्ण होत नसतो..त्याला एका प्रोसेस मधूनच जावं लागतं. त्यातून आपला देश कसा सुटेल. प्रत्येक व्यक्ती ही प्रथम देशाचा नागरिक असते आणि प्रत्येक नागरिक देशाचं प्रतनिधित्व करत असतो. हे मी लक्षात ठेवून चालते.माझ्या देशात होवून गेलेल्या महान व्यक्तींचे मी फोटो , मुर्त्या बाळगत नाही. पण त्यांचे आचार विचार आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न करते. आणि मला वाटतं हीच माझी देशभक्ती. आज मी जी काही प्रगती करू शकले त्यात माझ्या देशाचा वाटा सिंहाचा आहे. कारण ज्यांनी बलिदान देवून देशाला स्वातंत्र्य बहाल केलं त्यांच्या मुळेच मी, तुम्ही, आपण आज स्वतंत्र आहोत. त्यांच्यामुळेच शिक्षण घेवू शकलो आणि प्रगतशील माणूस बनू शकलो. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवून देणाऱ्या सर्वांना सलाम !! - साधना वालचंद कस्पटे © ?
कल्पना आणि वास्तव यांचा जेव्हा मेळ बसत नाही तेव्हा मनाला अस्वस्थतेची पोखरण लागते. - साधना वालचंद कस्पटे ?
फार काही नाही पण रोज काहीतरी नवीन शिकायचयं आयुष्याचा विद्यार्थी म्हणुनच मला जगायचयं.. माझ्यातील चुका शोधुन मला रोज नव्याने चांगला माणूस व्हायचयं.. जे मला मिळालं नाही ते इतरांना मिळावं यासाठी प्रयत्न करु शकेल इतकं निस्वार्थी व्हायचयं.. अपयशानंतर येणाऱ्या भयाण राञीच्या काळोखाला आरपार चिरुन, सार्या जगाला प्रकाशमान करणारा सूर्य मला व्हायचयं.. एक एक पाऊल टाकत..मला क्षितीजावर पोहचायचयं फार काही नाही पण रोज काहीतरी नवीन शिकायचयं.. आयुष्यावर भरभरुन प्रेम करायचयं.. - साधना वालचंद कस्पटे ©?
क्रश अचानक तिच्या Crush चा फोन आला . " आज मी , तुमच्या भागात येणार आहे. तुला वेळ असेल तर भेटुया का ? ५- १० मिनीटांसाठी ? " ती क्षणाचाही विलंब न करता ती ' हो' म्हणाली. किती खुश झाली ती. लगेच तिने स्वतः ला आरशात पाहीलं.. पण ; नेमके आजच गालावर उगवलेले पिंपल बघुन ती थोडी नाराज झाली. तिला त्याच्यासमोर सुंदर दिसावसं वाटत होतं... साहजीकच आहे. ती एखाद्या बाळाप्रमाणे तोंड फुगवुन बसली. तेवढयात कोणाचा तरी मेसेज आला. तिने बळच तो उघडुन पाहिला. त्याचाच होता तो ... " हे डिअर.. तुझा dp खुप cute आहे. तु कधीच मेकअप करत जावु नको कारण ; तुझी smile इतकी सुंदर आहे की त्यापुढे कुठलाही मेकअप फिका पडेल. A beautiful soul always reflects a beautiful smile try to have a beautify your soul than your face ! " हे वाचुन इतकावेळ चेहऱ्यावर दाटलेल मळभ क्षणात मोकळ झालं . आणि ती पुन्हा एकदा आरशात पाहुन खुदकन हसली. आरशात दिसणाऱ्या पिंपल कडे पाहुन तिने तोंड वाकड केलं. जणुकाही तिला म्हणायच होतं, ' हुं....आता मला तुमचं काही वाटतं नाही.' आणि आरशातील स्वतःच्या प्रतिमेला पाहुन तिने एक गोड फ्लाईंग किस दिले आणि निघुन गेली. बिचारा आरसा माञ खुपवेळ लाजत राहीला.. - साधना वालचंद कस्पटे ©
Emotional bond ! तुम्ही घरापासून दुर राहत असता. तुम्ही खुप उदास असता. कशातच मन लागत नाही. राञभर तळमळत असता. पण कुणाशीच काहीच बोलत नाही. अचानक सकाळी सकाळी बहिणीचा फोन येतो. अग मला काल स्वप्न पडल . तु रडत होतीस स्वप्नात. सगळ ठिकय ना ? तु बरी आहेस ना ? You shocked... Sister's love rocks ! तुम्ही कुठेतरी मोठ्या संकटात सापडता. मदतीला कोणी नसत. कावरा बावरा जीव , मदतीच्या शोधात. आणि तेवढयात आईला ठसका लागतो. ती लगेच तुम्हाला फोन लावते. बाळा बरा आहेस ना ? खुप आठवण येत होती आणि उगीच तुझी काळजी वाटत होती , जीव घाबरत होता. नीट आहेस ना ? You shocked ... Mother's love rocks ! तुम्ही खुप लो फिल करत असता. करियर मध्ये भयाण टेंशन चालु असत. काय कराव कळत नाही. तुम्ही अचानक डिपी बदलता. गौतम बुद्ध वगैरे. आणि स्टेटस ठेवता ' peace ' आणि दुसर्याच क्षणाला , तुमच्या best friend चा फोन येतो. " हं बोल काय problem चालुये ? कसला stress घेतेस ? " you shocked... Friend's love rocks ! तुम्ही अपयशी झालेले असता. सगळ संपत आलेल असत. तुम्ही कायमच give up करण्याचा विचार करता. तुम्ही मानसिकरित्या पुर्णतः कोसळणार असता..त्यापुर्वी best friend ला एकदा बोलुया , सगळ सांगुया...असा विचार करुन फोन लावता. पण मिञ बाहेर असतो. तो थोडा कामात असतो. म्हणुन दुसरच बोलुन फोन ठेवण्याचा प्रयत्न करता पण सगळ ऐकुन झाल्यावर मिञ बोलतो , " हं आता जे सांगण्यासाठी फोन केला होतास ते सांग..सगळ खरं खरं " आणि तुम्ही मुकपणे अश्रु गाळता. you shocked ... Friendship rocks ! तुम्ही तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी बोलत असता. आज रोजच्या पेक्षा थोड वेगळ काहीतरी जाणवत. तुमच्या पासुन ५०० किमी दुर व्यक्तीच्या मनात काय चाललय हे तुम्ही feel करु शकता. तुम्ही लगेच विचारता , " r u ok ? उदास आहेस का ? काय झाल ? " आणि तिकडुन शाँक वाली whats app emoji येते. तुला कस कळल ? इथे घरातल्यांना कळाल नाही की मी उदास आहे. पण तुला कस कळाल ? बेटा इसे तो कहते है Heart to heart connection ! emotional bond ! नात कुठलही असो , बहिणीच , भावाच , मैञीच , प्रेमाच.. त्यात आपण प्रामाणिकपणे मनापासुन involved असलो ना की समोरच्याला आपण फिल करु शकतो .. मग त्यात ठिकाणांच अंतर अगदी हजारो किलोमीटर असल तरी ! " हृदयाशी जोडलेल्या नात्यांना..रस्त्यांच्या अंतरांचा फरक कधीच पडत नाही !" जर तुमच्या आयुष्यात असा एकही emotional bond असेल तर तो जपा .. कारण प्रत्येकालाच तो मिळेल अस नाही. तुम्हाला मिळालाय म्हणजे तुम्ही नक्कीच खास आहात ! - साधना वालचंद कस्पटे ©
कधी कधी दुःखाची नदी इतकी प्रदीर्घ असते की सुखाच्या किनाऱ्यावरील विसाव्याचा आनंद उपभोगायचा असतो हेच आपण विसरुन जातो. - साधना वालचंद कस्पटे©
कर्ज फेडता येतं उपकार नाही.. - साधना वालचंद कस्पटे ©?
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser