Swar Ale Juluni - Part 6 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | स्वर आले जुळूनी - भाग 6

Featured Books
Categories
Share

स्वर आले जुळूनी - भाग 6

 स्वर आले जुळूनी अंतीम भाग 6

 

 

        जे.जे. मधून मला मास्टर्स डिप्लोमा मिळाला त्याच दरम्याने जे.जे. ची एक बँच गोव्यात पणजीला सुरु झाली. मी कान्व्होकेशन फॉर्म भरायला गेलो तेव्हा एच.ओ.डी.आंदुर्लेकर सरांनी मला बोलावून घेतलं. मी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मला बसायला सांगून कसलीही प्रस्तावना न करता सरांनी थेट मुद्याला हात घातला. “अशोक,जे.जे.ची ब्रँच गोव्याला सुरु झालीय् तुला कळलं असेलच. त्या माणसाना चांगला स्टाफ हवाय.... चांगला हँड देण्यासाठी त्यांनी मला गळ घातलीय्... तुझं गावतिकडे कोकणातचं आहे ना? इथे कंपनीच्या जॉबमध्ये तुझं स्केलआहे त्यापेक्षा जादा पेमेंट मिळेल, रहायला क्वार्टर मिळेल.पर्मनण्ट पेन्शनेबल जॉब आहे हा. ही संधी तू घेच. गोव्यात तुला संगीताचा छंदही जोपासता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलेची कदर करणारा श्रोता तुला गोव्याखेरिज अन्य कुठेच सापडायचा नाही. तुझ्या कलेचं खरं चीज गोव्यात होईल. अरेगोव्याला  “ काम्य गोमंत ” अशी उपाधी कुणाकवीने देली आहे. अधिवास लाभायची इच्छा करावी अशी पुण्यभूमी आहे ती. मास्टर दीनानाथ,पंडित जितेंद्र अभिषेकी  हे संगीत क्षेत्रातले अध्वर्यू गोव्यातले.  यापरती  गोमंत भूमीची महती  काय सांगणार? पणजी नभोवाणीवर माझे मित्र शिरोडकर आहेत. मी कालच फोनवर बोललो त्यांच्याशीते कॉण्टॅक्ट करतील तुझ्याशी. उद्याच कंपनीत रिझायनिंग लेटर दे. नोटीस पे नवीन मॅनेजमेंट कॉम्पेनसेट करील.... मी त्याना शब्द दिलाय्... आठवडाभराने तू येशील असमी कळवतो त्याना.... ओके अॅण्ड गुडबाय्...."

                  मी अक्षरश: अवाक्  झालो. मी कल्पनेतही ईच्छा केली नव्हती  सुवर्णसंधी  माझ्या पायाशी शब्दश: चालूनआलेली!  मीहो नाही म्हणण्याचा प्रश्नच उरला नाही. मला सोन्यासारखी संधी विनासायास मिळाली म्हणून काकानी माझी पाठ थोपटली. दुसऱ्या  दिवशीअक्षरश: हवेत तरंगतच मी ऑफिसमध्ये गेलो.  रिझायनिंग लेटर आणि नोटीस पे अकौण्ट सेक्शनमध्ये देऊन हाफ डे लिव्ह घेऊन जरा लौकरच मी बुवांकडे बोरिवलीला गेलो. मी नेहमीप्रमाणे पेटी उघडून सुरांवर हात मारला. पेटीचे स्वर ऐकून नंदा धावतच दिवाणखान्यात आली. "अय्या ss कमाल आहे हं... एवढ्यातच तुमची आठवण काढली होती मी; आज लौकर कसे काय? ऑफिसला दांडी वाटतं?" मी गंभीर चेहरा करीत म्हटल..."दांडीच मारली.... पण मी नाही... ऑफिसनं मला दांडी  दाखवली.... म्हणजे काहीही कारण न दाखवता  मला काढून टाकलंय कं पनीनं... !आय् एम् जॉबलेस अॅट दीस मोमेंट!!" माझं बोलणं ऐकून नंदाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती ओशाळून म्हणाली, "आय् एम् व्हेरी व्हेरी सॉरी ss प्लीज डोंट गेट अपसेट...." डोळ्यातलं पाणी थोपवून  हसरा चेहेरा करीत ती म्हणाली, "तुमच्या मागची ईडा पीडा टळली म्हणते मी. मुंबईत ढिगानी जॉब पडलेयत्.... मी सांगते तुम्हाला... आठवडाभरात याच्यापेक्षाही प्रेशस जॉब मिळेल तुम्हाला. बघा तर खरं... माझी बत्तीशी खोटी होणार नाही...!"

     मी डोळे मिचकावीत म्हटलं,"यू आर ग्रेट नंदा ?तुझी बत्तीशी म्हणजे आकाशवाणी....!तू म्हटलस नाम्हणजे जॉब मिळालाच मला...आय् एम् शुअर.... !" आता मात्र नंदाचे डोळे भरुनआले, ओढणीच्या टोकाने डोळे टिपत ती म्हणाली, "मी प्रार्थना करीन देवाला.... माझं सगळं पुण्य कामी येऊदे पणतुम्हाला चांगला जॉब...." मी पेटीवरुन उठून तिच्या तोंडावर हात ठेऊन तिचं बोलणं थांबवलं अन् खरी गोष्ट तिला सांगून टाकली. त्यावर उत्साहाने खळखळत नंदाम्हणाली. "तुमच्या कला साधनेचं आता खरं सार्थक झालं असं माझं मत आहे. तुम्हीन मागता परमेश्वराने  भरभरून दान तुम्हालादिलंय्.... तुमच्या कलेचं चीज होईल अशी सेवेची संधी  तीही आकाशवाणी सारख्या दर्जेदार  कला क्षेत्रात आणि  गोमंतक पुण्य भूमीत तुम्हाला मिळतेय् हा साक्षात कलानिधीचा कृपाप्रसादच आहे.नाऊ वी वील सेलिब्रेट...... आज आपण थ्री स्टारला जाऊया....... तुम्हाला मिळाल्या यशाबद्दलसर्वात आधी  मी तुम्हाला वेलकम् पार्टीदेतेय्..." मी हसून म्हटल, "यू आर मिस्टेकिंग नंदा...... वेलकम पार्टी नव्हे...... फेअरवेल पार्टी म्हण......"

    त्यावर माझ्या नजरेत रोखून पहात निश्चयी सूरात नंदा म्हणाली, "एवढं इंग्रजी कळतं मला. मी अर्थ लक्षात घेऊनच बोलले. मी देणारेय,ती निरोपाची पार्टी नाही.....स्वागताची पार्टी.... वेलकम पार्टीच देणारेय्...." मी म्हटल, "थांब.... तू पार्टीदेणारेयस् ना मला? मग मी सांगेन ती पार्टी दे.... मी मागेनते देशिल मला?" क्षणाचाही विलंब न लावता नंदा उत्तरली, "हो हो ss! देईन... तुम्ही मागाल ते द्यायचं वचन मी तुम्हाला दिलं  असंसमजा....! " त्यावर नजरेत बेरकीपणा आणून डोळे मिचकावीत मी म्हटलं, "मागतो तर...! माझी मागणी कदाचित अन् एक्स्पेक्टेड वाटेल तुला..." मध्येच थांबून मी मोठा पॉज घेतला... "जे तुला अभिप्रेत आहेत्या पेक्षा वेगळं काही मी मागितल तर....?" माझा प्रश्नऐकताच नंदाच्या गालावर उठलेला रक्तिमा किंचित झाकोळला.... माझ्याकडे एक आर्त दृष्टीक्षेप टाकीत अधोवदन होत ती म्हणाली, “वचन तर दिलय्...आता अपेक्षाभंग होवो की अपेक्षा पूर्ती होवो... मागा काय ते....!” एक एक शब्द शांतपणे उच्चारीत मी म्हणालो, “एक छानसं भावगीत म्हण फक्त  माझ्यासाठी... आजपर्यंत गायलीस तो रियाज होता... अर्थशून्य रियाझ.... मला तुझं गाण ऐकायचय  माझ्या साठी म्हटलेलं...” अन् मी स्केल धरलं. नंदाने नेत्रमिटून घेतले ... एक छान आलाप घेऊन तीने गीत सुरु केलं...

     सूर तुझे शब्द इथे झाले ss गीत बनूनी ओठावर आले ss

    कृष्ण कृष्ण आर्तसाद  कधी तू नच ऐकिली

    पण अबोध प्रीतीची खूण मला उमगली

    लपविलेस अंतरात गुपित आज उलगडले ss

    मदनबाण अंतरात अवचित हा रुतला

    स्वरमय ही सप्तपदी अर्थ आज आकळला

    शतजन्मी उरणाऱ्या बंधनात गुरफटले ss

    आज तुझी झाले मी आज तुझी झाले ss

                                                         (समाप्त)