स्वर आले जुळूनी भाग ४
त्याच्या पदरची कॉफी पिऊन अॅडमिशनफार्म घेतला. चार दिवसांनी नंदा आली. तिची कागदपत्र घेऊन मी पुजारीकडे दिली.त्याने १५ मिनीटात सगळे सोपस्कार पूर्ण करुन रसिट आणि आय कार्ड माझ्या हातातसुपुर्द केलं. बुवांनी विश्वासाने सोपवलेलं अवघड काम आपल्या हातून पूर्ण झाल्याच्याआनंदात त्या संध्याकाळी मी शिकवणीला गेलो.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी पेटी उघडून बुवांनी काल दिलेली चीज वाजवायलासुरुवात केली. पेटीचे सूर ऐकून बुबा बाहेर आले. मी फी रसीट, आयकार्ड बुवांकडे देत अॅडमिशन झाल्याच बोललो. बुवा आत गेले. मी रियाझ सुरुकेला. चार-पाच मिनीटात बुवा बाहेर आले. शिकवणीला सुरुवात झाली. साधारण अर्ध्या तासानेट्रे मध्ये चहाचे कप घेऊन सुनंदा बैठकीत आली. बुवांना चहाचा कप देऊन एक तबलजी समोरठेऊन सुनंदा माझ्यासमोर उभी राहिली. पेटी थांबवून मी चहाचा कप घेतला, “अरे अशोक भैया... मोठंच काम केलसं बर माझं... मुंबईत अशी मध्येच अॅडमिशनमिळणं भलतं कठिण... आमचा दोस्ताना मोठा पण तो संगीताच्या प्रांतात.... त्यातलाकोणी अॅडमिशनच्या कामाचा नाही. ठीक आहे, आज पासून सुनंदाचीशिकवणीही सुरु करुया. मी गाऊन दाखवीन, सुनंदा गळ्याने सरावकरील तू पेटीवर सराव करायचा. गायन आणि वादनाची जुगलबंदी सुरु करुया आपण.” घसा खाकरुन, डोळे मिटीत बुवा म्हणाले, “आज सुनंदाच्या शिकवणीचा शुभारंभ! तुम्हाला आवडेल अशी उडत्या चालीतलीराजस्थानी ढंगाची ही चीज घेऊया...”
छेल छवैली ss छुन छुन घुंगरु
छुम छुम छन् छन् करके आवत
बुवांनी उच्चारलेली ती पंक्ती ऐकताच त्यातली नजाकत, चालीतला गोडवा आणि लटक.... नेमक्या त्याच क्षणी नंदाने माझ्याकडेसाभिप्राय फेकलेला नेत्र कटाक्ष... मी अंर्तबाह्य मोहरुन गेलो... केतकी सारखागौरवर्ण, कुरळे केस, झटकन् छाप पडावीअसं व्यक्तिमत्व अन् त्याहीपेक्षा मला भावले तिचे निळसर झाक असलेले टपोरे डोळे....तिच्या निळसर डोळ्यातून चमकलेली प्रकाश शलका माझ्या रोमरोमात थिरकली... बुवांनीगायिलेली स्वरमाला नंदाच्या मधूर कंठातून उमटताच मृगाच्या पहिल्या पर्जन्यधारेसारखी शीतल शिडकावा करुन केली आणि माझ्या शरीरावर रोमांच फुलला ! तिचे स्वरमाझ्या कानातून आत शिरताच संवादिनीच्या नेमक्या सुरांवर बोटं टेकण्यापुर्वी माझ्याशरीराला कंप सुटला आणि थरथरणारी बोटं सुरांवर प्रयत्न करुन टेकताच मान वेळवीतमयुराने छेडलेल्या म्याँ ss ओ अशा आर्त केकावली प्रमाणे संवादिनीचेसुर अशा नजाकतीने उमटले की सर्व सामर्थ्यानिशी पिसारा फुलवून पदन्यासाला सज्जझालेल्या मयुरांचा साक्षात्कारी प्रत्यय यावा.... प्रतिभेच्या परिस स्पर्शाचामाझ्या कौशल्यात आमुलग्र परिवर्तन करणारा टर्निंग पॉईंटचा तो क्षण...
खणाच्या कुंचीत वेष्टीलेल्या श्रीफळरुपी बालदत्तात्रेयाला स्वरांच मांगल्यस्नान घालणारा कामतेकर बुवांचा मधूर आवाज आणि त्या आवाजाला तेवढ्याच ताकदीनेसुरांच आभूषण चढवणारी भाऊंची बोटं... त्याक्षणी भाऊंच्या बोटातून जणू ध्वनीपाझरतात आणि संवांदीनीतून ते उमटतात असा भास मला व्हायचा.... त्याच पूर्णत्वाचाआविष्कार त्या विशिष्ट क्षणी माझ्या बोटांनी केलेल्या किमयेतून साधल्याचासाक्षात्कार मला झाला....! सलामीलाच शिष्यव्दयानी केलेला स्वर-सुरांचा अविष्कारऐकून प्रसन्न चित्र होत बुवांनी 'बहोत अच्छे' अशी दिलखुलास दाद दिली. त्यानंतर पुढचा अर्धापाऊण तास कृष्ण वेड्यागोपींचा भक्ती आणि प्रीती रसात न्हाऊन निघालेला पदन्यास बुवांच्या दिवाणखान्यातथिरकत राहिला. बुवा तल्लीन होऊन एक एक बारकावा रेशमी लडी सारखा उलगडीत निघाले. हळूहळू एक एक अवघड टप्पा सुरु झाला. नंदाचा आवाका बुवांच्या तुलनेत थिटा पडू लागला.चुकीच्या स्वरमालांची पुन्हाःपुन्हा आवर्तनं व्हायला लागली. अर्थात मी कुठेच उणापडलो नाही. उलट नंदाला सांभाळून घेण्यासाठी तिच्या कडून दुर्लक्षित झालेले बारकावेचुकलेल्या मात्रा मी पेटीवर थोड्या अधिक स्पष्ट करुन दाखवायचो.
रियाझ पुर्ण झाला अन् बुवा उठून आत गेले. तबलजीने हत्यारांच्या मुखावर गिरद्याटाकून नाड्या बांधायला सुरुवात केली. मी पायपेटी मिटण्यासाठी लाकडी झडपा पाडायलावाकलो. "तुमच्या बोटात खरंच जादू आहे जादू ! तुम्ही एवढे पट्टीचे बजवय्येअसाल याची कल्पनाही नव्हती मला....!" नंदाची प्रतिक्रिया एकून मी अक्षरशःउडालोच. "छे ssछे! तुमचा काही तरी गैरसमज होतोय्... आता कुठे माझीशागिर्दी सुरु होतेय् ...! तुम्ही उगीच माझी तारीफ केलीत तर मला पंख फुटतील अन् नजाणो त्या भ्रमात मी उडायचा प्रयत्न केला तर धाड् दिशी जमिनीवर आदळेन... इथेसरावासाठी यायला लागून जेमतेम दीड दोन वर्ष होतायत् मला." मी उत्तरलो.
"एकमात्र खरं....!" पेटीवर आच्छादन घालता घालता मी पुढे म्हणालो, "आज बुवांनी पेश केलेली चीज.... शब्दांची नजाकत, सुरांची लटक आणि थिरक एवढी प्रभावी की अगदी मात्रान् मात्रा माझ्याहृदयापर्यंत खोल जाऊन भिडली खरी....! खरंच परमेश्वराने तुम्हाला गोड गळा दिलाय्... मी हा असा भणंग.... तुम्ही कमाल करताय् ती किमया माझी नसून संवादिनीच्यासुरांची आहे.... या पेटीवर किती जाणकार बुजुर्गानी स्वरांचे ताज उभे केलेयत्... खरश्रेय या खानदानी अरगणाला द्यायला हवं... माझी कर्तबगारी अगदी नगण्य.... नुसतीहवेत बोटं फिरवून मधूर स्वर थोडाच उमटणारेय् ...."
मानेला नापसंती दर्शक झटका देत नंदा म्हणाली,"तुमचं हे बोलणं म्हणजे निव्वळ विनय आहे... किंवा माझ्या सारख्या नवशिक्याचीप्रतिक्रिया तुम्हाला तुच्छ वाटत असेल... ते जाऊ द्या.... माझी एक विनंती आहेतुम्हाला.... तुम्ही मला अहो जाहो म्हणू नका प्लीज.... माझं नाव फार गोड, रेअर वगैरे नाही की कुणालाही ते उच्चारावसं वाटेल पण भीमा, राम, काशी इतक टाकावू नक्कीच नाही.. अन् अहो जाहोम्हणण्याएवढी काही मी पोक्ती पुरवती दिसतं नाही.... मी शिष्या म्हणून मैफिलीत बसलेतेव्हा तुम्ही तरी मला फक्त नंदा असंच म्हणा... अन् हो.... अॅडमिशनचं मोठं कामतुम्ही केलंत् आभार वगैरे मानणं तुम्हाला रुचणार नाही पण तुमच्या सद्भावनांची दखलमी घेतलीय् एवढंच लक्षात ठेवा...."
खुशीच्या हिंदोळ्यावर झुलतच मी घराकडे निघालो. घंटेच्या मंजूळ किणकिणी सारखेनंदाचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. माझ्या साधनेतला परिवर्तनाचा क्षण...प्रतिमेचा-प्रेरणेचा स्पर्श, शब्द कर्ण रंध्रातशिरुन बोटातून झिरपत झिरपत सुरु होऊन संवादिनीतून उमटणं काय असतं याचा थरार मी आजअनुभवला होता...! विचारांच्या तंद्रित वाटचाल करीत असताना अकस्मात लाऊड स्पीकरवरुन तलत मेहमूदच गीत कानावर आलं... 'ऐ प्यार तेरा शुक्रिया ss शुक्रिया ssशुक्रिया ss...' माझ आवडतं... माझ्या मनात रुतलेल गीत...खरंतर रेडिओ सिलोनवर खूप वर्षापुर्वी फक्त एवढीच ओळ मी ऐकलेली.... मी पुढेऐकण्यासाठी सरसावणार तोच गाणं संपल अन् "अभी आपने तलत के स्वर में..."असा निवेदकाचा आवाज आला. या गाण्याचाअर्धवट मुखडा मात्र अंतरात खोलवर रुतुन राहिला तो राहिलाच... पुढच्या काळात ते गीतमला इच्छा असूनही पुन्हा ऐकण्याची संधी कधीच मिळाली नव्हती... (क्रमश:)