थंड झाल्यारखावचा भाग ५
दिसायला उंचापुरा नी मजबूत पिळदारअंगकाठी च्या भगवानाला बघूनच त्याच्या ताकतीचा अंदाज बांधून एक तगडा शीख पैलवान पुढे आला. पाच रुपये टाकून तो समोर बसला.पंच ग्यानी सेठनी दोघांचे हात एकामेकांच्या हातात दिले नी लढत सुरु झाली. दोन तीनमिनिटं कोणीच रेसभरही चळला नाही. बघ्यानी टाळ्या नीशिट्ट्या वाजवीत , चलो भाई .... जोर लगा.. वाहे गुरु .... डगमग़ाने लगे क्या ओरडत गिल्लाकेला.... भग्याने समोरच्या भिडूला पुरता अजमावला नी ‘ हरा रा रा म्हादेव’ असा गजर करीत समोरच्या शिखाचा हात दबवीत विरुद्ध दिशेला टेकवला. हरलेला शीख घामाने डबडबला नी डाव्या हाताने उजव्या हाताचे ननगट मनगट चोळीत मान खाली घालून बाजूला बसला. दोन तीन शीखानी पुढे येवून भग्याला उचलून घेतले. त्या दिवशी गुरनामसिंगानी त्याच्याकडून जेवणाचे बील घेतलेनाही . “अरे भाई आज तूने हमारे आखाडेके बडे वस्ताद्को हराया है.... आजकी थाली हमारी ओरसे तोहफा समझो. ”
अधून मधून कोण कोण शीख ड्रायव्हर येणऱ्या नवीन पैलवानॎची भगवानाशी लढत लावीत. आता तो पन्नास रुपयाच्याखाली पंजा लढत नसे नी आज पर्यंत त्याला हरवणारा भिडूही भेटलेला नव्हता. त्याची ही ख्यातीरोडवेजचे मालक चढ्ढांच्या कानावर गेली. तेही पंज्या खेळणारे वस्ताद होते. सगळे लोक एवढी तारीफ करतात तो भगवान दादा कशी कायलढत देतो ते बघूया एकदा म्हणून त्यांच्याखात्रीचा पैलवान घेवून आले. जिंकणाराला स्वत:चढ्ढाशेठ नी अडिचशे रुपये तोहफा जाहीर केला.लढत सुरु झाली.आता हे तंत्र भगवानालापूर्ण अवगत झालेलं ..... बघणाराना लढत इरेसरीची वाटली पाहिजे या साठी समोरच्या भिडूला अजमावल्यावरही त्याला बराचवेळ खेळवून खेळवून मगच मात करायची अशी त्याची खेळी असे. आजही समोरच्या भिडूला सहा सात मिनिटं खेळवल्यावरच त्याने खरा जोर लावला नी मात दिली. चढ्ढा बेहदखूश झाले. अडिचशे बक्षिस देवून वर , “इस वस्ताद को एक हफ्ता हमारी तरफसे लंगर खिलाओ! ” अशी वर्दी त्यानी गुरनाम सिंगाना दिली.
पारशी बाबाच्या काही जुन्या मुसलमान गिऱ्हाईकांकडे बरीच उधारी तुंबलेली असायची. ही महाखट औलाद सहजा सहजी दाद देणारी नव्हती. काही जण नवीन माल उधारीवर घेवून मगच जुनी बाकी पुरी पुरी करीत. एरव्ही वसूली साठी कितीही खेटे घातले तरी एक छदाम सोडीत नसत. अशा दोनचार गिऱ्हाईकांकडे जावून हात हालवीत परत आल्यावर भगवानाने डोकंलढवलं. दोनतीन तरण्याबांड शीखाना सोबत घेवून तो वसूलीलाजायला लागला. बेडरपणे दमदाटी केल्यावर मात्र बिनाबोभाट वसूली व्हायला लागली. काही बुडित खाती जमा केलेल्या जुन्या उधाऱ्या धाकदपटशा नी तोडापाणी करून वसूली करून भगवान साळसूदपणे वरकड कमाई करू लागला. पण आता बाबाजी मात्र भगवानावर भलताच खूषअसायचा. मोठ्या मुष्किलीने चतुर्थीला दोन चार दिवसापुरती रजा मिळायची. पाचसहा वर्षात केवळ दोनदा चतुर्थीला आणि एकदा होळी - जत्रेला त्याच्या गावी खेपा झाल्या. गावी जाताना त्याचा रुबाब मात्र बघण्या सारखा असे. धोतर, बंद गळ्याचा कोट उपरणं नी डोक्यावर पांढरी फरचीटोपी घालून हातात गुप्ती बसवलेली चांदीच्या मुठीची काठी असा सावकारी थाटाचा पोशाख तो करायचा. भटीण तर त्याचा कौतुकाने त्याची अलबला घेवून, "माजो भगवान आता शेटयो झालो" असं म्हणायची. वाडीतले लोक आता त्याला आदराने बोंबडोजी म्हणायचे.
आताशी शेठाणी कायम आजारीच असे. दुपारी नी रात्री दुवक्त जेवण करायला कामवाली होती . झाडलोट करायला स्वतंत्र कामवाली होती शिवाय बैजंता नी ठुमरी दिमतीला होत्याच. त्या शेठाणीला न्हाऊ घालित, तिची वेणी घालून देत, बाजारातून सामानआणून देत . त्या दोघींवरही सेठानीची मर्जी होती.ठराविक असा पगार ठरलेला नव्हता पण शेठाणी हप्त्याला पंधरा-वीस रुपये खुशीने हातावर टेकवीतअसे. शिवाय रोज सकाळचा नाष्टा मिळे आणि दुपारी रात्री जेवण झाल्यावर उरल सुरलं न्यायची मुभा होती. भगवानाला चांगली वरकड कमाई व्हायला लागल्यावर भगवानाने हौशीने वज्रटिक, पाटल्या बांगड्या असे डाग घडवून घेतले. सगळे दागिने घालून फिरायची हौस मात्र तो तिला करू देत नसे. "हय आपून नोकर आसंव, लय झळाकलं तर लोकांच्या डोळ्यार येयत्. मालक मालकीण शक खाती नी व्हावती गंगा बंद व्हयत, ढोरां कशी खावन झाल्यार रवथ परातत तसा आपून ऱ्हवायचा, नी खालेला पचोक देयाचा . तू गावात गेलस ना काय पुरो दिवस डागिने घालून मिरव माजां काय्येक म्हन्ना नाय... " तो बजावायचा नी तिला ते पटायचं. हल्ली ठुमरीच्या सहवासात बैजंता मराठी बोलायला शिकली. पाच सहा महिने मागे पडले आणि ठुमरीला दिवस गेले.सेठानीच्या फॅमिली डॉक्टर ने तिला तपासून बाळंतपणाची तारीख दिली. दोन महिन्यानी बोंबड्या तिला बाळंतपणा साठी गावाला पोचवून आला.
ठुमरीला गावाला पोचवून मुंबईलाआल्या दिवशी ग्यानु म्हणाला, “अरेभाय,आजसे रातका खाना तुम हमारे साथ खाओ. ”भगवान रोज रात्री च जेवणनी सकाळचा चहा नाष्टा ग्यानुसोबत घ्यायला लागला. तो आउट हाऊस मध्ये रहायला आला तेंव्हा त्याला बघितल्यावरच बैजंती त्याच्यावर भाळली होती पन आठवडाभरात ठुमरी आली नी तिचा हिरमोड झाला. पण आता अडचण दूर झाली होती. तिने हळू हळू भगवानाशी सूत जुळवायला सुरुवात केली. त्यांच्या भागात एवढ दारिद्र्य होतं की, पंचवीस पन्नास रुपयासाठी मुली विकीत असत. त्यापेक्षा भगवानासारखा देखणा कमावता गडी दुसरे पणावर मिळाला तरी तिच्यासाठी तेभाग्यच होतं.ग्यानुचं मतही यापेक्षा वेगळंनव्हतं. किंबहुना याच धोरणाने त्यानेभगवानाची रात्री जेवायची सोय आपल्याकडे केली.
पारशी बावाचा बंगला आणि बाजुच्या लाईन मधल्या पंधरा वीस गाल्यातल्या दुकानांची रखवालीची जबाबदारी ग्यानुवर असायची. तो आठ वाजता जेवण उरकून बाहेर पडला कि सहा वाजता दुधाची गाडी येईपर्यंत खडा पहारा देत चकरा मारीत जागा रहात असे. तो बाहेर पडून गेला की बैजंता नी भगवान याना मोकळंरान मिळायचं. चार पाच दिवस गेले नी बैजंताने भगवानाकडे थेट लग्न करायचीच मागणी केली नी त्याने रुकार दिला. (क्रमश:)