Eat when it cools down - Part 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | थंड झाल्यार खावचा - भाग 4

Featured Books
  • ક્રિસ્ટોફર કોલમ્બસ

    ઇતિહાસના પાનાઓમાં જેને આપણે 'મહાન સાગરખેડુ' તરીકે ઓળ...

  • જયપુર

    *જયપુર* રાજસ્થાનની રાજધાની જયપુરની ઓળખાણ એવો હવામહલ પહેલાં જ...

  • તારા વિનાના શહેરમાં

    સાંજ નમવા આવી હતી અને સાબરમતી રિવરફ્રન્ટ પર ઠંડો પવન ફૂંકાઈ...

  • બ્રહ્માંડ ભ્રમ

                  પ્રકરણ ૧: શાંત સવારનું તોફાનઆકાશ હજી પૂરેપૂરું...

  • લવમાં લોચો

    અમદાવાદની ભાગોળે આવેલા એ ફાર્મહાઉસમાં શનિવારની રાત ફૂલ ઓન હા...

Categories
Share

थंड झाल्यार खावचा - भाग 4

           थंड झाल्यार खावचा   भाग ४

 

 

          यंदा आंबीच्या आडव्या फाट्यावरचे  आंबे  बोंबड्यानेकाढून दिले. भटणीला सांगून  जत्रेला  विठू बरोबर  बोंबड्याही  आंबे विकायला गेला.  तो हिशोब अगदी बिनचूक करायचा.  दिलेल्या पैशाचे  आंबे उज्जू मोजून  द्यायचा.  आठ आण्याचे , रुपयाचे  आंबे घेणारं  एखादं  गिऱ्हाईक दोन चार आंबे वरून जादा मागायचं .... विठू द्यायला  लागला तर हा त्याच्यावर  खेकसून म्हणाला, “ह्यो  इलो   मोटो  शेटयो.... चार जणांक अशे जादा दिलस काय  येका  चवलीचा नुकसान करशी भटणीचा.” मिळालेला गल्ला  नी  खपलेलेआंबे  यांचॎही बरोबर ताळमेळ  तो घेई. भटणीने त्याला जत्रेत  खरचण्या साठी आठ आणे  दिलेले. अधून मधून विठू त्याला सांगे, “ तुका जत्रेत फिरॉचा असला तर जावन ये.” पण सगळे  आंबे  खपूनछल्ला  बाजार होई पर्यंत तो कुठेही गेलानाही. आंबे संपले नी एक कोपरा गाठून विठूने भटणीने दिलेली  शिदोरी सोडली. केळीच्या पानात ग़ुंडाळून आठपानग्या नी  सुक्या मिरच्यांची चटणी होती.न्हेरी केल्यावर  जत्रा  फिरून  एका पैशाचे  दोन साखर कोंबडे घेऊन उरलेले पैसे न खरचताच  बोंबड्या घरी  परतला.

              हल्ली चौथीतूनशाळा सोडल्यावर  बोंबड्या  सकाळ संध्याकाळ भटणी कडे खेप घालून  दूध काढून जनावरांचं  गवत पाणी करून जाई. भटणीची इतरही कामं करी. दरदोन तीन दिवसानी  दुपारी किंवा संध्याकाळीतो भटणीकडेच जेवायला थांबे. आता त्याला दीड शेराचा भात लागायचा. त्याचा असा दांडगाआहार  बघून कोणाची नजर बाधेल म्हणून तीमागिलदारी  गोठ्याचं दार आड करून कुडावरकांबळ्याचा रकटा  आडोशाला टाकी नी तो जेवूनउठे पर्यंत उंबऱ्यावर बसून रहात असे. हल्ली  तो अंगापिंडाने  असा  भरलाहोता  की  अख्ख्या गावात  त्याला  जोडनव्हता. त्या काळच्या  पद्धती प्रमाणे  घरचे  लोक त्याच्या  लग्नाच्या  खटपटीला लागले.  त्याचा मावळा टेळ ठेवूनच होता.  त्याला  बातमीकळली.  त्याने बहिणीला  आपल्या पोरीला करून घ्यायची गळ घातली.  पाव्हण्याचा शब्द  कोण मोडणार म्हणताना  मावळ्याच्या मुलीशी  बोंबड्याचं लगीन ठरलं.

          भटणीला खरं तर  हा लग्न संबंध पसंत नव्हता. पोरगी तिने बघितलेलीहोती. बोंबड्या साडेसहा फूट उंच, अंगा पिंडाने दैत्यासारखा  भरलेला गडी  नी  पोरगीम्हणजे  एकशिवडी, जेमतेम पाच फूट उंची.तिने पार्वतीला बोलावून घेतले.  “काय ग्ये , तां  प्वॉर  कायम्हनू  पसन  क्येलास?  माजो बोंबडो खंय  नी तां  कुरडा प्वॉर खय.... ” तर्जनी आणि आंगठा  जुळवून पार्वतीच्या  तोंडासमोर नाचवून  येंगडावीत  भटीण म्हणाली , “ह्यो  मुळी  जोडो....! ह्यो ताड माड  उंच  नी  पोर तेच्या  ढोपरा यवडा  ज्याम त्याम ...... ” पाया पडत पार्वती म्हणाली, “सासू बायनो....  झालां तां झालां,  पन आता काय बोलो नुको...  आमचो सबूद ग्येलो....पावन्या सोयऱ्याच्या  साक्षीन सुपारी फुटली, आता  आमच्ये हातीत  काय ऱ्हवला  नाय . तुमी   पसन नाय म्हटलास तर  द्येव इलो  तरी  बोंबडो तयार व्हणार नाय...... व्हयातर  दोन चार वर्सान तुमच्या पसंतीन  पोरगी  बगूनतेचा दुस्रा  लगिन  करुया पन  ह्या  लगीनमोडला  तर माका ईख खावक व्हया..... ” लग्न न्हावून  गरी आल्या आल्या न्हवरीला घेवून बोंबड्या  भटणीच्या पाया पडला. गुळाचा खडा  घातलेली  खोबऱ्याची वाटी भटणीच्या हातावर ठेवून त्यानेनवरीचं नांव  फोडलं, “गूळ खोबरां घेवा नी ठुमरी म्हणा ”  

            बोंबड्याचा एकचुलत मावळा  साबाजी  मुंबईत  सातरस्त्यावर सोराबजी  दारूवाला  ह्या  पारशीबावाजीच्या पेढीवर  पंचवीस वर्षं रखवालदारम्हणून कामाला  होता. त्यालाटी बी झाला  नी  नोकरी  सोडायचीवेळ आली.तो पारशाच्या विश्वासातला. “बावा तू  शोडून ज्याते तर  तुजा  कोन सगेवाला  माणस  माला बगून दे नी... मी आता बुढा झ्याला .... तू इस्वासाने  माजी चाकरी केलास तसा तुजे खातरीचा  सगेवाला बघ नी  माज्यासाटी.... ” त्याने गळ घातली . त्याचा मुलगा  मुंबई  पोलिसात लागल्यामुळे  दुसरा कोणीतरी  सगा सोयरा  बघायला हवा होता. विचार करता करता  त्याला  भावाचाभाचा नी  आता जावई  झालेला बोंबड्या आठवला. बोल बोल म्हणताना  चक्रं फिरली  नी आठवडा भरात  त्याचा मुलगा  बोंबड्याला घेवून हजर झाला.पोरगा बघितल्यावरपारशी भलताच खूश झाला. “अरे तू  एकलाच आला,  तुजा  बायडिलाबी  घेवून ये नी.... तेला बी  बंगल्यात छोटा मोटा  काम देईल नी सेठानी....” 

                      पारशाचा  बंगला   खोरदाद सर्कल जवळ होता.  बंगल्याच्या  मागिल  बाजूलानोकरांसाठी  दोन  क्वार्टर्स  होत्या. एका रूममध्ये  बंगल्याचा गुरखा ग्यानु आणि त्याची बहिण बैजंती  रहायची  दुसरीरूम त्याने भगवानाला (इथे  त्याच  हेच नाव रूढ झालं) दिली. आठवडाभराने  गावाहून ठुमरी आली. तो पारशी बाबा सोबतच  सकाळी  आठ वाजता टॅक्सीतून  पेढीवर जायचा. पारशी बाबा  शंभर नंबरी सोनंआणि  चिनय चांदी सोनारकाम करणाराना  विकायचा.  पेढीवर  एकच  गुजराती  कारागीर चिमणभाय  सोन्याचांदीचे   अचूक वजनाचे  तुकडे  पाडायचं काम करी. भगवानाला वसूली करणं, सोनारांकडे  डाग पोचवणं,  ग्रांट रोड- गिरगाव  भागातल्या  बावाजीच्या सगेवाल्यांकडून  माल आणणं  अशी  रोजची  ठराविक कामं बाबाजी नेमून देई.  जोखमीचा  मालअसल्या मूळे फिरती बावाजीच्या कार मधूनच  असे.बाकीच्या  वेळी नुसतं बसून आरामच  असायचा.  फुरसतीच्या  वेळेत  सोराबजीनेत्याला  गाडी चालवायला  शिक अस सांगितलं.  सकाळी  लौकर निघाव  लागत असे  म्हणून  दुपारी जेवायची सोय   पेढी पासून पाच मिनीटाच्या अंतरावर युनियनरोडवेजच्या  बाजूला गुरनाम सिंग च्याढाब्यावर केलेली  असे नी हप्त्याचे पैसेबावाजी  देई. युनियन रोडवेजचे मालकही  हरप्रीत  चढ्ढा नावाचे शीख गृहस्थ  होते.  तिथूनसंपूर्ण भारतभर मालाची   ने आण व्हायची  तिथे कायम  पंचवीस तीस नॅशनल परमीट चे  मोठमोठे  ट्रक पार्क केलेले असायचे नी  शंभर दिडशे  शीखांचा सतत राबता असायचा.

             ढाब्याच्यामोकळ्या भागात शीख पैलवान तलवार बाजीचा सराव करीत, कोणी दंड बैठकाकाढीत.त्यांचा पंज्याचा खेळ  त्यालाआवडायचा.दोन भिडूं मध्ये  दोन रुपये ,पाच रुपये  बोली  लावूनपंजाची लढत व्हायची. आठवडाभर घसण झाल्यावर एक दिवस  गल्ल्यावरचा  गुरनामसिंग   म्हणाला, “क्यों भगवानदादा (इथे बोंबड्यालात्याच्याभगवान या मूळ नावाने ओळखत) पंजा लडोग़े?”  “हां हां, भा ई  लडेंगे” म्हणत तो पुढे सरसावला नी खिशातून पाच रुपयाचीनोट काढून बाजूला ठेवली. “अरे इस मराठीपैलवानके साथ पाँच रुपियोकी शर्त लगाकर पंजा लडनेको है कोई तैय्यार? तो सामने आवे...” (क्रमश:)