Contract Marriage - 4 in Marathi Love Stories by Prakshi books and stories PDF | कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 4

या फाईलमध्ये माझ्या काही अटी आहेत.

त्या पूर्ण केल्याशिवाय Smart Culture Hub Project त्याच्या नावावर जाणार नाही.

या अटींपैकी शेवटची अट... अभिराजला मान्य करावी लागेल.”

आता पुढे.......

अभिराजने फाईल हातात घेतली

बाकी सगळेजण एकमेकांकडे पाहत होते.

श्रीराम मात्र हळू आवाजात म्हणाले 

“कधी कधी वारसा मिळवण्यासाठी रक्ताचं नातं पुरेसं नसतं… मन, धैर्य आणि दृष्टिकोनही लागतो.


अभिराजने फाईल उघडली. काही पानं पलटली आणि शेवटच्या पानावर लिहिलेली ओळ वाचताच त्याचा चेहरा बदलला.

त्याने चष्मा काढून बाजूला ठेवला. ओठ घट्ट मिटले.

> “अंतिम अट... अभिराजने पुढील ६ महिन्यांत लग्न केल्यासच Smart Culture Hub प्रोजेक्ट आणि सर्व अधिकार त्याच्या नावावर होतील.”

क्षणभर हॉलमध्ये शांतता पसरली.

“काय?” अभिराज चिडून उठला.
“Baba, ही काय अट आहे? माझं काम, माझी जबाबदारी, माझं future… आणि तुम्ही ते माझ्या personal life शी जोडताय?”

गंगा काही बोलायच्या आधीच श्रीराम शांत आवाजात म्हणाले,
“अभि… आयुष्य फक्त कामाने बनत नाही. माणूस पूर्ण होतो जेव्हा त्याच्याजवळ भावनिक स्थैर्य असतं. आणि जो व्यक्ती नातं सांभाळू शकतो, तोच मोठं स्वप्नही सांभाळू शकतो.”

अभिराज डोळे मोठे करत म्हणाला,
मग माझं काम, माझं dedication, हे सगळं तुम्हाला दिसत नाही का? लग्न म्हणजे ‘कंपनी हक्क’ मिळवण्याचं तिकीट नाही Baba!

विश्वनाथच्या ओठांवर हलकं हसू आलं. सविता त्याच्या कानाशी कुजबुजली,
छान झालं. हा लग्न करणार नाही, म्हणजे प्रोजेक्ट आपल्याकडेच येईल.

शर्मा वकील हळू आवाजात म्हणाले,
“श्रीराम सर, ही अट legal document मध्ये नमूद करायची का?”

श्रीराम ठामपणे म्हणाले,
“हो. आणि ही अट अंतिम आहे.”

अभिराज रागाने टेबलावरची फाईल आपटतो.
Baba, तुम्ही मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगू द्याल की नाही?

श्रीराम शांतपणे म्हणतात,
“तू माझ्या नजरेतून पाहिलंस तर कळेल ही अट तुझ्यावर बंधन नाही, तर एक संधी आहे.”

अभिराज फाईल हातात घेऊन हॉलमधून निघून जातो.
गंगा त्याच्यामागे हाक मारते,
“अभि, ऐक ना एकदा!”

पण तो थांबत नाही. विक्रम गाडी काढ म्हणत
गाडीचं दार आपटतो, आणि निघून जातो...

गंगा श्रीरामकडे वळते.
तुम्ही हा निर्णय घेताना त्याचा विचार तरी केला का? अभिराजचं आयुष्य आहे ते… त्याचं भविष्य…” तिच्या डोळ्यात पाणी तरळतं.

श्रीराम स्थिर नजरेने म्हणतात,
“गंगा, तू त्याची आई आहेस म्हणून भावना पाहतेस. मी बाप आहे म्हणून वास्तव पाहतो.
अभिराजमध्ये भावना नाहीत त्याचं जग फक्त आकडे, करार, आणि यश याभोवती फिरतं.
त्याच्यासाठी लग्न म्हणजे बिझनेस डील झालंय. पण मी त्याला समजवू इच्छितो की काही गोष्टी नफ्यात मोजता येत नाहीत.”

गंगा निरुत्तर होते. 

त्याच वेळी विश्वनाथ उठतो आणि हळूच म्हणतो,
“बरं, श्रीराम दादा… आता आम्ही निघतो. पण एक सांगतो, तुम्ही घेतलेला निर्णय त्याचे परिणाम मोठे असतील.”


विश्वनाथ, क्रीशव आणि साविता बंगल्याबाहेर येतात.
गाडीचा दरवाजा बंद होतो...

विश्वनाथ: हा अभिराज फार हट्टी आहे… सरळ बोलून काही साध्य होणार नाही.

क्रीशव : मग काय करायचं बाबा?

विश्वनाथ काही क्षण शांत राहतो.

विश्वनाथ धारदार आवाजात: त्याला वाटू दे की ही सगळी लढाई त्याचीच आहे...
त्याच्या प्रेमावर, विश्वासावर खेळायचं… आणि जेव्हा तो त्या जाळ्यात अडकला तेव्हा Velora Groups, Smart Culture Hub, आणि दादाचे सर्व shares आपल्या नावावर होतील.

साविता :
म्हणजे त्याला फसवायचं?

विश्वनाथ : फसवायचं नाही साविता… शहाणं करायचं.
आता वेळ आली आहे त्याला कळू द्यायची जीवन म्हणजे फक्त पैसा नाही… पण ज्याचं आयुष्य पैसा ठरवतो, त्याचं सगळं काही आपण विकत घेऊ शकतो.

गाडी निघते, आणि विश्वनाथ खिडकीबाहेर पाहत हळू आवाजात पुढे म्हणतो
आणि माहितीय का… जेव्हा तो पाच वर्षांचा होता तेव्हाच तो मरणार होता.
त्या रात्री… पावसात झालेल्या त्या अपघातात.
देवाने त्याला वाचवलं… पण यावेळी त्याला वाचवायला देवही येणार नाही.
कारण आपल्याला त्याला मारायचं नाही
आपल्याला त्याचं सगळं काही हक्कानं घ्यायचं आहे.

क्रीशव:
पण बाबा… मोठेबाबांना कळलं तर?

विश्वनाथ :
दादाला सत्य समजेल तेव्हा तो काही बोलण्याच्या स्थितीतच उरणार नाही…



क्रमशः....



काय होईल पुढे वाचायसाठी मला फॉलो करा आणि हा एपिसोड कसा वाटला ते कॉमेंट करून आणि 5स्टार रेटिंग देऊन नक्की सांगा...