श्रावणीचे ऑफिस:
DreamThreads Textiles Pvt. Ltd.”
“Creativity never goes out of style.”
श्रावणी ऑफिसमध्ये प्रवेश करते, ओल्या केसांवरून हात फिरवत
श्रावणी: Good morning!
रुचा तिची मैत्रीण आणि सहकारी
Good morning? आज तर तू खरंच ‘Rain Queen’ दिसतीय! काय गं, पुन्हा बस चुकली वाटतं?
श्रावणी :बस नाही, रस्ता चुकला! पाणी इतकं होतं की auto वाले सुद्धा Titanic बनले होते.
राजेश सर तिचे बॉस
कॅबिनमधून आवाज देतात: Miss Shravani! माझ्या DreamThreads ची ‘dream employee’ आली तर खूप चांगलं वाटतं… पण थोडं लवकर आली असतीस तर अजून बरं वाटलं असतं!
श्रावणी : Sir, वेळेवर येणं म्हणजे फॅशन नाही, पण मेहनत मात्र कायम ‘in trend’ ठेवते मी.
राजेश सर: “वाह! संवादापेक्षा attendance जास्त छान दिसू दे.
सगळे हसतात.
प्रणव:श्रावणी, कालचे samples finalize केलेस का?
श्रावणी: हो रे, केलेत. सरांकडून final चे final करू 😅
श्रावणी आपल्या टेबलवर फाईल्स लावत असते. तेवढ्यात रुचा आणि प्रिया दोघी येतात
रुचा :श्रावणी! न्यूज पाहिलंस का? तो श्रीराम सरपोददारचा मुलगा… अभिराज!
प्रिया :हो ना! अरे देवा, किती स्मार्ट आहे तो 😍! न्यूजपेक्षा जास्त लक्ष माझं त्याच्याकडे गेलं.
रुचा: आणि त्याचा bungalow पण पाहिलास का? Velora Villa! संपूर्ण Versova ला झाकणारी ती प्रॉपर्टी आहे ! मी तर विचार करतेय एकदा बघायलाच हवं!”
श्रावणी :अगं, तुम्ही दोघी न्यूज बघता की celebrity crush show?
प्रिया: काय करू श्रावणी, इतका smart मुलगा पाहिलं की crush येतोच. आणि तू बघ ना, त्याचं accent, personality… लंडनचं education आहे.
रुचा :हो, आणि जर तो DreamThreads मध्ये आला कधी तरी… तर प्रिया थेट embroidery सोडून engagement ची तयारी करेल!
प्रिया : इश्श..... मला लाजच आली .... मी तर आता पण तयार आहे करायला 😜
रुचा : काय गं,श्रावणी तू पण त्याच्यावर फिदा झालीस का आता?
श्रावणी : नाही गं… माझं जग इतकं मोठं नाही की Velora Villa पर्यंत पोहोचेल.
राजेश सर (हातात फाईल घेऊन): Ladies! gossip break संपलं का? कामाचा show सुरू करा! Fashion week साठी deadline आहे, लक्षात ठेवा!
सगळ्या गप्पा बंद करून आपल्या जागेवर बसतात.
चार दिवसांनंतर Velora Villa मध्ये..
बंगल्याच्या गेटसमोर काळी कार थांबली. अभिराजने गाडीचं दार उघडलं आणि श्रीरामना काळजीपूर्वक उतरायला मदत केली.
रूम मध्ये घेऊन गेले..
Baba, आता फक्त आराम. ऑफिस, मीटिंग्स सगळं मी बघतो. तुम्ही काळजी करू नका....
श्रीराम हो मध्ये मान हलवतात... आणि डोळे बंद करून आराम करतात...
दुसऱ्या दिवशी सकाळी
श्रीराम अजून विश्रांती घेत होते.
अभिराज टेबलावर ठेवलेल्या काही फाईल्स चाळत होता.
त्या फाईल्सवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं
“Velora Groups Pvt. Ltd.”
अभिराजने फाईल उघडली.
त्यात कंपनीचं पूर्ण स्ट्रक्चर होतं
> Velora Groups 1998 साली श्रीराम सरपोददार यांनी स्थापन केलेली एक मल्टी-डोमेन कंपनी.
दोन मुख्य विभाग Velora Textiles Division आणि
Velora Events & Culture Hub.
Founder & Chairman: श्रीराम सरपोद्दार (45% shares)
Co-founder: विश्वनाथ सरपोद्दार (अभिराज चे काका) (20% shares)
Managing Director & CEO: अभिराज सरपोद्दार (35% shares)
हे घ्या बाबा... ही फाईल तुम्ही मागितली ती.. अभि बोलला...
शर्मा वकीलसाहेबांना आणि विश्वनाथला पण कॉल कर आणि बोलाऊन घे मला सर्वांसोबत बोलायचे आहे... श्रीराम बोलले
थोड्याच वेळात बंगल्याच्या हॉलमध्ये सर्वजण जमले होते.
गंभीर पण शांत वातावरण होतं.
गंगा, अभिराज, विश्वनाथ, त्यांची पत्नी सविता, मुलगा कृषव आणि शर्मा वकील सगळे श्रीरामसमोर बसले होते.
श्रीराम हळूहळू खुर्चीवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता, पण डोळ्यांमध्ये पूर्वीसारखीच दृढता होती.
सगळ्यांना आज इथे बोलावण्याचं एक कारण आहे…
त्यांचा आवाज खोल, स्थिर होता.
Velora Groups आज जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप कष्ट घेतले. पण आता पुढचं पाऊल टाकायचं आहे Smart Culture Hub Project.
हा प्रोजेक्ट फक्त कंपनीचा नाही, तर आपल्या भावी पिढीचा आहे.”
ते थोडा थांबले, अभिराजकडे पाहत म्हणाले,
या प्रोजेक्टचं नेतृत्व आणि पूर्ण जबाबदारी अभिराजकडे देण्याचा माझा निर्णय आहे.
सर्व शेअर्स, डॉक्युमेंट्स, आणि इनचार्जपद सगळं त्याच्याकडे जाईल.
हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली.
विश्वनाथ थोडे आश्चर्यचकित झाले, सविता काहीतरी बोलायचा प्रयत्न करणार इतक्यात श्रीराम पुन्हा म्हणाले
“पण…”
सगळ्यांचे डोळे पुन्हा त्यांच्या दिशेने वळले.
“हा अधिकार मी विनाकारण देत नाही. अभिराजला माझा विश्वास कमवावा लागेल.”
ते टेबलवर ठेवलेली एक छोटी फाईल पुढे ढकलत म्हणाले
या फाईलमध्ये माझ्या काही अटी आहेत.
त्या पूर्ण केल्याशिवाय Smart Culture Hub Project त्याच्या नावावर जाणार नाही.
या अटींपैकी शेवटची अट... अभिराजला मान्य करावी लागेल.”
काय असेल शेवटची अट.... वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि पुढील भागाची वाट पाहा 😊