फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला
“Hello Mom?”
आता पुढे....
गंगाचा आवाज कापत होता,
“अभिराज… बाबा ना heart attack आलाय… लगेच फ्लाइट पकड. लवकर भारतात परत ये बाळा.”
क्षणभर शांतता पसरली…
लंडनच्या एका आलिशान ऑफिसच्या मोठ्या खिडकीसमोर अभिराज उभा होता.
हातात मोबाईल, नजरेसमोर बाबांचं हसणारं चेहरा.
संपूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये ओळख निर्माण करणारा,
royal personality असलेला अभिराज सरपोददार confident voice, charismatic presence,
आणि Velora Groups चं एकुलता एक वारस.
तो लंडनमध्ये “Textile Innovation and Brand Management” चं higher education करत होता,
पण त्याचबरोबर एका नव्या international project deal साठी तिथे मीटिंग्स सुरू होत्या.
क्षणभरही न विचार करता त्याने कोट घेतला, फाईल बंद केली आणि विक्रम जो त्याचा मित्र आणि ऑफिस सहाय्यक होता त्याला म्हणाला
“Cancel everything. I’m flying to India… right now.”
फोनवर गंगाला म्हणाला,
“Mom, don’t worry… मी निघतोय आत्ता. Baba ठिक होतील. He’s a fighter.”
रुग्णालयाकडे धावणाऱ्या अॅम्ब्युलन्समध्ये गंगा आणि सई श्रीरामचा हात घट्ट पकडून बसली होती...
सकाळचे चार वाजले होते.
Emergency विभागात गंगा आणि सई अजूनही बसल्या होत्या
तेव्हाच हॉस्पिटलच्या दरवाजातून अभिराज धावत आत आला
त्याने रिसेप्शनकडे वळून विचारलं,
“Mr. Shriram Sarpoddar… ICU Room No.?”
“Room 302, sir,” नर्सने तत्परतेने उत्तर दिलं.
अभिराज क्षणभरही न थांबता तिकडे धावला.
दरवाज्याजवळ गंगा उभी होती तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि दिलासा होता.
अभिराज… ती म्हणाली आणि त्याला मिठीत घेतलं.
Mom…अभिराजने तिचा हात घट्ट धरला....Baba कसे आहेत?
Doctors म्हणतायत आता stable आहेत… पण अजून शुद्धी आलेली नाही.
तो हळूच ICU च्या काचेमागून आत बघू लागला
बाबा, पांढऱ्या शीटखाली शांत झोपलेले, चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क, बाजूला मशीनचा आवाज.
तो जवळ गेला, श्रीरामच्या हातावर हलकं हात ठेवत म्हणाला,
“Baba… मी आलोय. तुम्ही एकटे नाही.”
डॉक्टरांनी मागून येऊन सांगितलं,
“Good news, he’s responding… थोड्याच वेळात शुद्धीवर येतील.”
क्षणभरातच श्रीरामचे बोट थरथरले.
अभिराजचे डोळे चमकले Baba…?
श्रीराम हळूहळू डोळे उघडले ....
दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज चालू होती.
न्यूज अँकर (टीव्हीवर):
शहरातील नामांकित उद्योगपती आणि Velora Groups चे चेअरमन श्रीराम सरपोददार यांना काल उशिरा रात्री हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना Asian Heart Institute, Bandra येथे दाखल करण्यात आलं आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मात्र सर्वांचं लक्ष आता त्यांच्या Smart Culture Hub Project कडे लागलं आहे कारण MIDC मधून प्रोजेक्टला मंजुरी मिळाल्यानंतर श्रीराम घरी परतताच हा हृदयविकाराचा झटका आला.
स्क्रीनवर श्रीराम आणि अभिराज यांच्या एकत्र फोटोची झलक दिसते.
न्यूज अँकर पुढे म्हणतो:
“लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असलेले त्यांचे पुत्र अभिराज सरपोददार तातडीने भारतात परतले आहेत.
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे श्रीराम सरपोददार यांच्या स्वप्नातील या मेगा प्रोजेक्टचं पुढे काय होणार?
Velora Groups चे पुढचे निर्णय आता अभिराज घेतील का?
या सर्व घडामोडींवर उद्योगविश्वात प्रचंड चर्चेला उधाण आलं आहे…
टीव्ही स्क्रीनसमोर श्रावणी, हातात चहाचा कप घेऊन news पाहत पाहत आईला बोलते... " Hmmm, श्रीमंत लोक आणि त्यांचे श्रीमंत समस्या....."
आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला,
आई: “अगं श्रावणी, टीव्ही बंद कर आता. आपल्याला आपलं जग बघायचंय.
तुझी बस ९ वाजताची ना? निघ लवकर जॉबसाठी.”
श्रावणीने कप ठेवला आणि मान हलवली.
श्रावणी: “हो गं आई… निघतेच.”
ती उठते, पण तिची नजर भिंतीवरील फोटोफ्रेमवर जाते
तिचे बाबा, हसतमुख चेहऱ्याने पोलिसांच्या गणवेशात उभे.
डोळ्यांसमोर आठवणी उमटतात
त्या पावसाळी रात्रीचा क्षण… मुसळधार पाऊस, विजा चमकत होत्या.
रस्त्यावर एका कारचा अपघात झाला होता.
गाडीत एक चार-पाच वर्षांचा लहान मुलगा आणि त्याचा मामा होते.
गाडी पाण्याच्या गटारात अडकली होती, दरवाजे अडकलेले.
श्रावणीचे बाबा तेव्हा नाईट पॅट्रोलवर होते.
त्यांनी क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी मारली,
मुलाला बाहेर काढलं पण स्वतः गाडीखाली अडकले…
त्या रात्री ते परत आलेच नाहीत.
श्रावणीच्या डोळ्यांत पाणी दाटतं, पण ती पापण्या मिटून स्वतःला सावरते.
येते गं..... आई....!!!!!
दरवाजा बंद करत ती बाहेर पडते
आणि टीव्हीवर अजूनही न्यूज सुरू आहे
...Velora Groups मध्ये आता मोठे बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे…
पुढील भागासाठी मला फॉलो करा 😊