Contract Marriage - 1 in Marathi Love Stories by Prakshi books and stories PDF | कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1

रात्रीचे दहा वाजले होते.
MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या.

शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management ✨ कंपन्यांपैकी एक Velora Groups चे मालक श्रीराम सरपोद्दार आपल्या कामानिमित्त MIDC चे संचालक राघव खेराडे यांना भेटायला आले होते.

खेराडे सरांचे खास सहाय्यक आतून येऊन नम्रपणे म्हणाले,
“सर, संचालक साहेब आता मोकळे आहेत. आपण आत येऊ शकता.”

श्रीरामने घड्याळाकडे पाहिलं १०:०५ झाले होते.
MIDC ऑफिसच्या आत वातावरण शांत पण गंभीर होतं.

राघव खेराडे आपल्या टेबलामागे मोठ्या खुर्चीत टेकून बसले होते, समोर फाईल्सचा ढीग आणि एका कॉफीचा कप.
त्यांनी श्रीरामकडे एक नजर टाकली.

“या सरपोद्दार साहेब… इतक्या उशिरा भेटीचं कारण नक्कीच महत्त्वाचं असणार?”

श्रीराम शांतपणे पुढे आले.
“हो साहेब… महत्त्वाचं आहे.
Velora Groups साठी हा प्रोजेक्ट फक्त बिझनेस नाही हा महाराष्ट्राच्या ब्रँडचं रूप बदलणार आहे,” त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिलं.

थोडा वेळ शांतता पसरली.
खेराडे सरांनी कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाले,
“ठीक आहे सरपोद्दार… मला तुमचं Vision ऐकायला आवडेल. 

श्रीरामने टेबलावर एक काळी लेदर फाईल ठेवली.
फाईल उघडल्यावर खेराडे सरांच्या डोळ्यांत क्षणभर आश्चर्य चमकलं.

त्यात शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या राहणाऱ्या एका ‘Smart Culture Hub’ चा आराखडा होता 
एक असा प्रोजेक्ट, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला, फॅशनला आणि इंडस्ट्रीला एकाच छत्राखाली आणणार होता.

 श्रीराम हळू आवाजात म्हणाले,
“हा संपूर्ण राज्याच्या ब्रँड इमेजचा खेळ आहे.
आणि जर आपण दोघे हातमिळवणी केली, तर पुढच्या वर्षी महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा ‘face value’ ठरेल.”


खेराडे सरांनी फाईल पुन्हा एकदा उघडली.
“Hmm… textile park, exhibition arena, cultural theatre, start-up incubation zone…”
ते पुटपुटले, “ही संकल्पना वेगळी आहे सरपोद्दार.”

खेराडे सरांनी पेन खाली ठेवला.
त्यांच्या नजरेत आता थोडं कौतुक आणि थोडा विचार होता.

“सरपोद्दार, मी आयुष्यात शंभरहून अधिक प्रोजेक्ट्स पाहिलेत…पण हा प्रोजेक्ट फक्त उद्योग नव्हे, संस्कृतीचं पुनरुज्जीवन हे सरकारच्या अजेंड्यात सध्या बसू शकतं.”

ते काही क्षण शांत राहिले, मग हलकंसं हसले.
“ठीक आहे… हा प्रोजेक्ट Done करू 
पण इतकं लक्षात ठेवा MIDC मध्ये फाईल फक्त कल्पनेवर चालत नाही, त्यासाठी पाठिंबा, राजकीय इच्छा आणि थोडं गेमप्लॅनिंग लागतं.”

श्रीरामने उत्तर दिलं,
“गेमप्लॅन तयार आहे साहेब…
फक्त योग्य खेळाडूची साथ हवी आहे.”

श्रीराम उठले, हात जोडून म्हणाले,
“मला मागे वळायचंच नाही साहेब… Maharashtra Brand आता पुढे जाणार आहे.”

त्या शब्दांसह श्रीराम बाहेर निघाले.

श्रीराम रात्री उशिरा Versova beach जवळच्या आपल्या Velora villa नावाच्या आलिशान बंगल्यात पोहोचले.
आजचा दिवस त्यांच्यासाठी खास होता कारण अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर “Smart Culture Hub” प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवेश करताच त्यांनी कोट खुर्चीवर टाकला, शर्टच्या बटणांचा पहिला बटण सैल केला आणि हसत म्हणाले,
“Finally… game सुरु झालाय.”

भिंतीवर त्यांच्या दिवंगत वडिलांचा फोटो लटकलेला होता त्या फोटोसमोर थांबून ते शांतपणे म्हणाले,
“बाबा, आता महाराष्ट्राच्या ब्रँडला जागतिक नाव देतो… तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे.”

तेव्हाच अचानक त्यांच्या छातीत एक तीव्र वेदना झाली.
ते एका क्षणात अडखळले, हात छातीवर ठेवला, आणि काही पावलं पुढे टाकताच शरीराचं संतुलन बिघडलं.
“अंह…” त्यांनी आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण शब्द तोंडातून बाहेर आले नाहीत.

काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले.
जिन्याच्या दिशेने पायऱ्यांवरून पावलं ऐकू आली सई आणि गंगा धावत खाली आल्या.
“बाबा!” सईने किंचाळत त्यांच्या जवळ गुडघ्यावर बसली.
 घरातील security guards धावत खाली आले.
“Sir!” त्यांनी किंचाळत श्रीरामला उचलून घेतलं.
त्यांपैकी एकाने तात्काळ फोन उचलला “Ambulance! Asian Heart Institute, Bandra… लगेच या!”

काही मिनिटांतच ambulance बंगल्या बाहेर थांबली.
डॉक्टरांनी स्ट्रेचरवर श्रीरामला घेतलं

गंगा श्रीरामचा हात हातात घेत म्हणाली,
“श्रीराम… please डोळे उघडा…”
पण ते अर्धवट शुद्धीत होते, हलकंसं श्वास घेत होते.

Ambulance Asian Heart Institute कडे निघाली. गंगाचा फोन हातात थरथरत होता तिने तात्काळ लंडनला कॉल केला.
फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला 
“Hello Mom?”

पुढे काय होईल वाचनासाठी मला फॉलो करा....