भाग १४.
युवराजच्या आजीचे बोलणे अंतरा ने ऐकले होते. जे ऐकून तिला राग येत होता. आजवर तिच्या बहिणीला अजून पर्यंत कोणी असे बोलले नव्हते. त्या आजीच्या मते, गायत्री एक फसवणारी मुलगी आहे! हेच तिला जास्त लागले होते. त्यावर ही गायत्रीची थंड प्रतिक्रिया होती. जे पाहून तिचा राग वाढला होता. गायत्री एकटीच रूम मध्ये आपल्या असते. त्याच वेळी अंतरा तिथं येते. टेडी असतो हे तिला माहीत नव्हते.
"दीदी, तुला त्या आजीला उत्तर देता येत नव्हते का? मी म्हणते अश्या लोकांना तर सत्य सांगून टाकायला हवे होते. तुमचीच प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हे सगळ करावे लागले होते. हौस नव्हती आम्हाला, असे वागायची.", अंतरा संताप करत म्हणाली. टेडी तिचं ऐकत असतो.
"अंतरा, हळू बोल! इतका का त्रागा करत आहेस? ते लोक संकटात आहेत. आधीच त्यांच्या घरातील मुलगा अश्या स्थितीत आहे आणि त्या नंतर प्रॉपर्टी बद्दल ऐकून तर ते तुटून जातील. त्याच मुळे आपण मदत करत आहोत. आपल्याशिवाय कोण आहे त्यांना मदत करायला? त्या आजींचे वय झालं आहे. आपल्या पेक्षा जास्त पाहिले आहे म्हणून त्यांचे बोलणे ही योग्यच आहे. कशाला राग करून घेत आहेस त्यांचा? सगळा गोंधळ सुटला की, कळेल त्यांना आणि टेडी थोडीच ठेवणार आहे आपल्याला लक्षात. मग तेव्हा कळेल सत्य आपोआप. मी ही मग इकडचं सगळ करून बाहेर निघून जाणार आहे!",गायत्री शांतच तिला म्हणाली.
"दीदी, तुला काय कळत नाही आहे का? तू त्यांची सून झाली आहे आणि जग जाहीर झालं आहे. मग त्या युवराजला शुद्ध आली तरीही तो या सत्यापासून पळून नाही जाऊ शकत. त्याला मान्य करावे लागेल. ही बाई तो पर्यंत तुला असच समजून त्रास देईल हे वेगळे आहे. आपण काय ऐकत रहायचे का? नाही! मला नाही जमणार हे सगळ. माझ्या दिदीचा अपमान केलेला तर नाहीच नाही चालणार मला.",अंतरा अजूनही चिडून बोलत असते.
"तुला माझी शप्पथ आहे! ते त्यांना काही बोलायचं नाही आणि काही सांगायचं नाही. नंतरच नंतर पाहू! आता आधी यांचा अपघात कोणी केला होता? हे शोधून काढले पाहिजे. सुशीलाचे बोलणे होते अजून एक व्यक्ती आहे सहभागी. ते आठवताच ती व्यक्ती नक्कीच कोणीतरी मोठी असेल किंवा काहीतरी मोठ इंटेंशन ठेवून हे सगळ घडवून आणत आहे असे वाटत आहे. आता ही बातमी ऐकून तर ती सैरभैर झालीच असेल. सुशीला प्याद होती! खरा राजा किंवा राणी कोणी वेगळे आहेत. ते कोण आहेत? हे शोधावे लागेल. तू या आजी आणि आमच्या गोष्टीत पडू नको! तू या व्यक्तीला शोध.",गायत्री समजावत विचार करत म्हणाली. या युवराजच्या घरातील लोकांनी तिला सुनावले तरी तिला त्याच काही वाटत नव्हते. ती तर त्याच्या शत्रूवर फोकस करत होती. तिच्यासाठी ते महत्त्वाचे होते सध्या. टेडी ती कशाप्रकारे आपल्या फॅमिलीचा विचार बदलवून आपला विचार करत आहे हे पाहून त्याला वेगळेच वाटत असते.
"कोणत्या दगडाची बनली आहेस तू? जाऊ दे! तू सांगते म्हणून मी पडत नाही. पण अती झालं तर मी बोलणार. त्यावेळी मी तुला ऐकणार नाही!",अंतरा सरळ सरळ रागात बोलून तिथून निघून जाते.
"डॉक्टर, तू नको ना माझ्याबद्दल इतके करू. मला तुझी काळजी वाटत आहे. तू चांगल करत आहे. पण सगळ उलट होत आहे. मी तुला विसरलो, तर तुला नंतर खूप प्रॉब्लेम येतील. याची मला भीती वाटत आहे.", टेडी अंतरा गेल्यावर गायत्रीला बोलतो.
"तू त्याची नको काळजी करू! तू मला विसरला तरी मी तुला कायम लक्षात ठेवेन. माझी गरज आहे तो पर्यंत मी तुझ्याजवळ थांबेन. एकदा तुला तुझ्या पायावर चालवले की, माझे काम संपून जाणार! मग मात्र मी तुझ्या लक्षात नसले तर निघून जाणार.",गायत्री चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली. आता काही वेळापूर्वी अंतरा बोलली होते. ते त्याला आठवत होते. "कोणत्या दगडाची बनली होती ती?"
एवढं सगळ माहीत असून देखील ती मागे हटत नव्हती.
"डॉक्टर, मिस करत राहशील तू मला? समजा, प्रेम झाल माझ्यावर तरीही तू सोडून जाशील मला?", टेडी दुःखी होत म्हणाला. टेडीचा प्रश्न ऐकून ती डोळे मोठे करते.
"तुझ्या आठवणी मध्ये मी नसेल तर त्याला प्रेम म्हणत नाही मिस्टर टेडी. तू तर एवढं कौतुक करत असतो तुझे? तर भेटेल तुला कोणी दुसरे. फक्त सुशीला सारखी शोधू नको!",यावेळी ही तिच्या चेहऱ्यावर हसू होत. ती हसत टेडी कडे जात त्याचे डोळे पुसते.
"काही पाणी वगैरे नाही आहे. तरीही तुझे डोळे असे भरतात कसे?",गायत्री विषय बदलत विचारते. त्याच्या डोळ्यात पाणी नव्हते. पण दुरून अस वाटायचं पाणी भरले आहे जणू!
"अस आहे का? नसेल पाणी मग. तुझे डोळे डॉक्टर खूप छान आहेत. अगदी कोरीव असे. आय ब्रो करते काय? की नॅचरल आहे?",टेडी त्याच्या मूड मध्ये येत विचारतो. त्याला मूड मध्ये आलेल पाहून ती छान स्माईल करते.
"नॅचरल आहेत. मला वेळ नाही मिळत पार्लरला जायला.",गायत्री त्याचे गाल ओढत हसून म्हणाली.
"ओहह. रिअल ब्युटी आहे तुझी! गुड गुड. डॉक्टर, तू रिअल मध्ये छान दिसत असते.",टेडी गायत्रीचे कौतुक करत म्हणाला.
"ठीक आहे. मस्का जास्त मारू नको. तू इथ झोप. मी तुझ्या शरीराला पाहून येते. उद्या काम आहे आपल्याला. ऑफिसला जावे लागेल मला आणि तीन सर्जरी देखील आहेत.",गायत्री त्याला उचलत म्हणाली. ती उचलून त्याला बेडवर ठेवते. तसा टेडी आडवा होतो बेडवर. पोटावर हात ठेवून तो झोपून ही जातो. तशी गायत्री त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि बाहेर निघून येते.
युवराजच्या घरच्यांनी तिला मानल नाही तरीही ती त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. ती आधी त्याला चेक करण्यासाठी त्याच्या रुम मध्ये निघून येते. त्याला नीट पाहून थोड हळू आवाजात त्याच्याशी एकतर्फी संवाद साधून ती तिथून बाहेर येते. एकदा आजीच्या आणि युवराजच्या आई वडिलांच्या रूम मध्ये जाऊन बघून येऊ, असा विचार करून ती आजीच्या रूम मध्ये आधी जाते. तिने युवराज बरा होत नाही तो पर्यंत तिच्याच घरी थांबण्याचा आग्रह केला होता. आई तिच्या आग्रहाला नाही म्हणू शकली नाही! आजीच्या तिथं रूम मध्ये ठेवलेल्या जग मध्ये पाणी नसते. ते पाहून ती तो जग सोबत घेऊन जाऊन पाणी भरून आणून नीट टेबलवर ठेवते. त्यांची ब्लँकेट ही नीट ओढून देते.
"माझी आजी कशी होती? माहीत नाही मला. पण ती तुमच्यासारखी असेल अस वाटत मला. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात. मला त्याबद्दल काहीच वाटल नाही. प्रत्येक आजी आपल्या नातवाचा विचार करतेच! माझ्या घरात तुमचे पाय लागले हे मी माझे भाग्य समजते.",मनातच आजी कडे पाहून ती म्हणाली. त्या वयस्कर आजीला पाहून तिला जणू आपलीच आजी आहे अस वाटल होत. हे खेळ जाणणारी ती नव्हती! त्यामुळे इतकं घडून ही ती त्या आजीची ती काळजी घ्यायला रूम मध्ये आली होती.
त्यांना एकदा पाहून शेवटी ती आपल्या रूम मध्ये झोपायला येते. सोफ्यावर नेहमी प्रमाणे जाऊन पडते. मनात सध्या बरच काही चालू होते तिच्या. टेडीचा मगासचा प्रश्न जरी तिने हसण्यावर नेला असला तरीही ती त्या प्रश्नाने थोडी दुःखी झाली होती. टेडी सगळ विसरेल याच विचाराने तिला वाईट ही वाटत असते. कारण तो विसरला तर त्याच्या आयुष्यात तिचे काहीच स्थान नसणार होते. टेडी रुपात असताना तो तिला भेटला होता. खऱ्या आयुष्यात कुठे ते दोघे ओळखत होते एकमेकांना?
नुसते विचार करून ही दुःख होत होते. या काळात टेडी बद्दल थोड का होईना मनात फिलिंग निर्माण झाल्या होत्या. कदाचित एक मित्र म्हणून. त्याच मुळे ती दुःखी होत असायची. या पासून अनभिज्ञ असलेला टेडी मात्र चांगला गाढ झोपलेला असतो. काही वेळाने त्याच्या घोरण्याचा आवाज तिला ऐकू येतो. तेव्हा मात्र ती विचारातून बाहेर येत आपले डोळे पुसत नकारार्थी मान हलवत डोक्यावर ब्लँकेट ओढून घेत झोपून जाते.
उद्या उठून पुन्हा नवीन गोष्टीला सामोरे जायचे होते आणि त्यासाठी ती झोपणे पसंत करते.
क्रमशः
*******