Taddy - 15 in Marathi Fiction Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग १५

Featured Books
Categories
Share

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग १५

भाग १५.

   
"हे बघ कविता, ती दिसायला चांगली असली तरीही खानदानी नाही आहे. मला अशी मुलगी माझ्या घरात नको आहे. जर युवराजने स्वतः हून सांगितले तरच मी तिला आपल मानेनं. कशा वरून ती मुलगी फसवत नाही?",आजी युवराजच्या आईसोबत बोलत असते. 



"आई, अहो तिने तर सगळ काही सांगितले आहे आणि तिच्याकडे एवढं असताना ती का असे वागेल बर?",कविता(युवराजची आई) विचारते.



"आईवडील नाही आहे तिला आणि बहिणीचे सगळ बाकी आहे तर त्यासाठी देखील ती अशी वागू शकते. मला काय त्या पोरीवर विश्वास नाही आहे. ते एवढं मोठ मंगळसूत्र घालून फिरत आहे ते मागून घे तिच्याकडून. काय माहित ते विकून ही येऊ शकते. माझ्या नातवाने केलेलं सगळ काही सोन काढून घे!",आजी विचार करत बोलत असतात. हे ऐकून मात्र कविता यांना थोडा राग येतो. 



"आई, त्या मुलीने आपल्या युवराजची अशी अवस्था असताना देखील स्वीकारून लग्न केले आहे. तुम्ही तिचं मंगळसूत्र कसे काय मागू शकतात? त्याचे महत्त्व तुम्ही जाणतात ना?",काहीश्या नाराजीनेच कविता म्हणाल्या. 



"आता तू मला शिकवणार का कविता? मंगळसूत्र पुढ्यात घातले असते तर गोष्ट वेगळी होती. हे चोरुन घालून बायको बनून येणे काही वेगळे वाटत नाही का तुला?मला तर ती मुलगी चालू वाटत आहे. ते काही नाही त्या मुलीला सांग आणि आपल्या मुलाला आपल्या घरी घेऊन जाऊ! आम्ही काळजी घेऊ शकतो असे सांग!",आजी चीड चीड करत म्हणाल्या.



"हे होऊ शकत नाही आजी! तुम्ही त्यांना इथून घेऊन जाऊ शकत नाही.", गायत्रीचा आवाज कानी पडतो. तसे आई थोडी शांत होते. पण आजीच्या चेहऱ्यावर मात्र आठ्या पडतात.



"आमचा नातू आहे तो! त्याच्या वर अधिकार आहे आमचा.",आजी तोऱ्यात म्हणाल्या.



"माझा नवरा आहे तो. मी तुम्हाला घेऊन जायला देऊ शकत नाही! मी त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे!",गायत्री शांत आवाजात म्हणाली. तिला युवराज बद्दल अजिबात रिस्क घ्यायची नव्हती. आधी तर शत्रू कोण आहे? हे समजत नव्हते आणि त्यात आजी त्याला आपल्या घरी घेऊन जायचं म्हणत होती. जे गायत्रीला अजिबात आवडल नव्हते. गायत्रीच्या बोलण्याने आजी अजून चिडते.



"किती संपत्ती पाहिजे सांग?",आजी चिडून विचारते.



"मला युवराज पाहिजे बस्स! तुमची संपत्ती नको आहे.",गायत्री ठाम होती या वेळी. 



"ते कधीच मिळणार नाही. आम्ही आजच त्यांना घेऊन जाणार आहोत. कविता अनिलला फोन लाव!",आजी रागात एक कटाक्ष गायत्रीवर टाकत म्हणाली. टेडी वर राहून फक्त पाहत होता.



"आई, तुम्ही तरी समजून घ्या!",गायत्री युवराजच्या आईकडे पाहत म्हणाली. 



"मी समजून घेत आहे... पण...", कविता बोलत असतात. तशी आजी बोलू लागते.



"काही समजून घेऊ नको हिला. हिच्या या घरात माझा नातू रहाणार नाही!",आजी लगेच म्हणाली.



"तुम्हीच तर नाही ना युवराज जिजूचा अपघात केला आहात? आता कोमात असताना इतकी घरी घेऊन जायची घाई करत आहात म्हणून विचारत आहे आजी!",अंतरा आजीचा चेहरा पाहत वरून खाली येत म्हणाली. अंतराचे बोलणे ऐकून आजीचा चेहरा बदलतो. अंतरा मात्र त्यांच्या चेहऱ्याला पाहत असते.



"दीदी, जिजूला इथून कोणीच घेऊ शकत नाही. कारण त्यांचा अपघात संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्यांच्या फॅमिलीवर अविश्वास दाखवला आहे. कायद्याच्या कचाट्यात सध्या त्यांची फॅमिली आहे म्हणून त्यांनी जिजूला सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर सोपवली आहे! त्यांचे म्हणणे आहे गायत्री यांचे वागणे संशयास्पद नाही आहे! रेकॉर्ड ही चांगल आहे.",अंतरा डोळे मिचकावत आजीच्या बाजूला फिरत म्हणाली. जे ऐकून गायत्रीला बर वाटते. एका क्षणाला ती घाबरली होती. युवराजच्या शरीराला ही आजी घेऊन जाते की काय? त्याच मुळे ती पॅनिक होऊन उत्तर देत होती. 



"काय? म्हणजे आम्ही आमच्या नातवाला मारू शकतो?",आजी डोळे मोठे करत रागात विचारते.



"मी अस म्हणाले का आजी? मी फक्त एवढं सांगितले जिजू आमच्याकडे राहणार आहे. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पोलीसच उत्तर देतील मग!",अंतरा हसून म्हणाली. खर तर तिच्या डोक्यात चालली होती आजी. पण गायत्रीने समजावले असल्याने, तिला काही करता येत नव्हते. कविता मात्र शांतच असतात. त्यांना मनातून गायत्री वर विश्वास ठेवावा वाटत होता. 



"बघून घेईन तुम्हा बहिणींना! ते दागिने....",आजी बोलत असते.



"बायकोला दिले आहेत ते जिजूने. तर ते दीदी कडे राहतील. तुम्ही या वयात काय त्याच लोणचं घालणार आहात का ठेऊन? एवढी संपत्ती आहे तुम्ही बोलत असतात. नाही....काय तो शब्द....??हा आठवला खानदानी! मग खानदानी लोक २५ तोळ्या साठी मागे लागतात का? छी छी.",अंतरा आजीला चांगलीच हसत हसत टोमणे मारून मोकळी होते. आता एवढा अपमान ऐकून आजी तणतणत तिथून स्वतःला सावरत बाहेर पडून जाते. कविता मात्र गायत्री जवळ येतात.



"माझे मन सांगत आहे तूच योग्य मुलगी आहे माझ्या मुलासाठी! कोणी तुला आपले मानू किंवा नको! माझ्यासाठी तु माझी सून राहशील! आईच्या बोलण्याच वाईट वाटून घेऊ नको. त्या अश्याच आहेत. मनासारखे घडल नाही की असे वागत असतात. तू माझ्या मुलाची चांगली काळजी घेशील हे माहीत आहे मला. हे तुझ्यासाठी! माझा आशीर्वाद समजून घे!",कविता गायत्रीच्या डोळ्यांत पाहत बोलत असतात. बोलता बोलता त्या आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून तिच्या हातात घालून ही मोकळ्या होतात. त्यांचे बोलणे ऐकून गायत्रीला कसतरी होत. ती वाकून युवराजच्या आईच्या पाया पडते. तश्या आई तिला आशीर्वाद देऊन जवळ घेतात. 



"खूप प्रगती कर!",आई तिच्या कपाळावर हात फिरवत बोलतात आणि तिथून निघून जातात. गायत्री त्यांना पाहत राहते. आज सकाळीच युवराजचे बाबा तिथून निघून गेले होते आणि आजीला ही त्या घरात रहावे वाटत नव्हते. त्यासाठी सकाळ सकाळी गायत्री बद्दल राग राग करत होते. कविता समजावत असतात. पण आजी काही ऐकून घेत नाही. गायत्रीला आपल्याबद्दल त्यांनी काहीही विचार केला तरीही काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा त्या युवराजला घेऊन जायचं बोलत होत्या, तेव्हा मात्र तिला बोलावे लागले होते! ती समजावत होती. पण आजी काही ऐकून घेत नव्हत्या. हेच पाहून अंतरा तिथं आली होती. तिने फक्त बाण मारला होता. तो बाण नक्कीच योग्य ठिकाणी बसला होता. हे तिला समजले होते. 



"दीदी, काय त्या म्हातारीला शांत बोलत असते. सरळ सरळ सांगायचं ना? माझे दागिने आहे मी नाही देणार! विषय संपला असता!",अंतरा आता गायत्री कडे पाहत वैतागत म्हणाली.



"त्या पेक्षा युवराज महत्त्वाचे आहे! त्या ऐकायला तयार नव्हत्या. तू काय मध्येच त्यांना बोलली तुम्ही अपघात केला वगैरे?",गायत्री शेवटचं आठवत म्हणाली. 



"अनिलला बोलावते म्हटले, तेव्हा काहीतरी क्लिक झालं आणि त्यावेळी सुचले ते बोलून दाखवले. बाकी मी काही मोठ केले नाही. पण नक्कीच वाटत काहीतरी गडबड आहे या आजीत!",अंतरा हसत हसत खर बोलते. 



"सहजच म्हणाली का? मला वाटले खर खर बोलत आहे. ठीक आहे मग. त्या आजी का इतक्या पॅनिक होत होत्या काय माहिती? कदाचित आपला नातू डोळ्यासमोर असावा अस वाटत असेल! असू दे, आपण नंतर त्यांची इच्छा पूर्ण करू. मी जाते टेडीला पाहायला. त्याला माझ्यासोबत सगळीकडे यायला आवडत असते. आता तर मिस्टर टेडी बिझनेसच नॉलेज शिकवणार आहे मला थोडफार.",गायत्री शांत होत बडबडत असते. ती ही काही सिरियस बोलणे घेत नाही! 



"ओके. शिक शिक.",अंतरा हसून बोलत गायत्रीला बेस्ट लक करते. गायत्री हसूनच तिला बाय करत तिथून आपल्या रुम मध्ये निघून जाते. 



   अंतरा मात्र बंगल्याच्या बाहेर येत कोणाला तरी कॉल करते.



"काही बातमी मिळाली का?",अंतरा पलीकडून फोन उचलताच सरळ विचारते.



"हो मॅडम. खूप अस नाही! पण आपल्या महत्त्वाचे आहे असे. आज भेटा मला चौकात. आपल्या लोकांना ही कामाला लावलं आहे मी. बघू काय काय मिळते आणखीन ते? नक्कीच त्यांना धोका आहे. तुम्ही बंगल्याची सिक्युरिटी वाढवून घ्या!",पलिकडील व्यक्ती अस बोलून कॉल कट करतो. त्याच बोलणे तिला समजून जाते. 



क्रमशः
*******