भाग १२.
"कोण आहात तुम्ही?", टेडीला हिंमत करत निखिल विचारतो.
"बॉसला विचारतो कोण तुम्ही?",टेडी ही रागात विचारतो.
"आता त्याला माहीत आहे का मिस्टर टेडी तू त्याचा बॉस आहे म्हणून?",गायत्री याच काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात त्याला विचारते. तसा तो गायत्रीला पाहू लागतो.
"डॉक्टर, मग तो बघ कसा प्रश्न करत आहे? मला ना बिलकुल अस आवडत नाही! मी माझ्या शरीरात असलो असतो, तर हा इथ उभा नसता राहिला.", टेडी थोडासा वैतागत म्हणाला.
"शांत टेडी! शांत!",गायत्री त्याला हात दाखवत रिलॅक्स करत म्हणाली.
"ओके.",अस बोलून तो शांत होतो. गायत्री मग निखिल आणि अंतराला पाहते. त्यांचे घाबरलेले चेहरे पाहून गायत्री समजून जाते.
"टेडी असा बोलत आहे हे पाहून भीती वाटत आहे बरोबर?",गायत्री निखिलच्या चेहऱ्याचा अंदाज घेत विचारते. निखिल होकारार्थी मान हलवतो.
"टेडी दुसरा कोणी नसून युवराज पाटील आहे. त्यांची आत्मा टेडीच्या शरीरात आहे. टेडीला आधीपासून क्यूट आणि खोडकर असे समजले जाते. तर त्या टेडीचे परिणाम देखील त्यांच्या बोलण्यावर होत असतात. आता युवराज पाटील या टेडीत राहून जसे वागत आहे, तसे ते खर्या आयुष्यात ही नाही आहेत. सो, त्यांना ओळखायला थोडा गैरसमज होत असेल. यात ना त्यांची चूक आहे ना त्यांच्या वागण्याची! कारण टेडी म्हणून ते तसे आहेत. आपल्या त्यांना जर त्यांच्या शरीरात पाठवायच असेल तर त्यांना लवकर इलाज द्यायला हवे. पण बाहेरून येणारे डॉक्टर ने आम्हाला चार पाच महिन्यांनंतरची तारीख दिली आहे. तो पर्यंत शरीराला सुखरूप ठेवणे गरजेचे आहे. युवराज पाटील यांच्या जीवाला अजूनही धोका आहे. या क्षणी त्यांची प्रॉपर्टी देखील सुशीला यांनी बळकावली आहे. त्याच्या बद्दल डिस्कस करण्यासाठी बोलावले आहे.",गायत्री अगदी शांत समजावून सांगत असते.
गायत्रीचा स्वभाव काही अर्थी शांत होता. टेडीला तो ओरडत असायची. पण बाहेरच्या स्थिती मात्र शांत सोडवत असायची. एक जर रागीट असेल तर दुसऱ्याने शांत राहून त्याला समजून घेणे गरजेचे असते. तसे काही गायत्री करत होती. निखिल तिच्या बोलण्याने थोडा शांत होतो. त्याच्या समोर उभी असलेली मुलगी अगदी शांत होती.
"सर, यात आहे. ओके. आता समजल. पण तुम्ही कोण?",निखिल.
"मी डॉक्टर गायत्री देशमुख. यांची केस माझ्या हातात आहे. सुशीला ने प्रॉपर्टीसाठी प्रेम केलं, असे यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी मला त्यांची बायको बनवले आहे. तुम्ही ही आता काही हेल्प करू शकतात तर प्लीज करा! कारण आपण यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर नाही सोडू शकत. फुकट कोणाच्या हातात प्रॉपर्टी आपण देऊ शकत नाही. त्याला मेहनत केली आहे तुमच्या सरांनी. त्यांचा घाम गाळला आहे आणि त्या मेहनतीचे ते हक्कदार आहे, त्यांचा परिवार हक्कदार आहे. तर, आपणच काहीतरी करायला हवे!",गायत्री आपली ओळख सांगत त्याला थोडफार सांगते. टेडी शांत राहत पाहत असतो.
"ओह....मला त्या सुशीला वर डाऊट येत होता. बॉसला सांगायला गेलो तर ते ओरडतील म्हणून काही सांगितले नाही. मी तुमची मदत करायला तयार आहे. बॉस चांगले व्हावे, ही माझी ही इच्छा आहे. पण तुम्ही बोलत आहात तसे बॉसचे दुश्मन ही आहेत. तर आपल्याला अगदी सावधगिरी आणि सांभाळून काम करावे लागेल. हो ना सर?", टेडी वर नजर टाकत तो बोलतो. निखिलचे आताचे बोलणे ऐकून टेडी हात दाखवून मान हलवतो.
"आता शोभतो तू माझा असिस्टंट.",टेडी म्हणाला.
गायत्री मग त्याला सगळ समजावून सांगते. मॅरेजचे कागदपत्र घेऊन वाचून ही घेते. सुशीलाचे नाव तिथून चेंज करण्यासाठी निखिल प्रयत्न करायला तयार होतो. त्या जागी गायत्रीचे नाव टाकायला तयार होतो. नंतर युवराजच्या बिझनेस बद्दल आणि त्याच्या घरच्या लोकांबद्दल ही तो सांगून मोकळा होतो. त्याच्या कडे असलेल्या बॅगेतून तो युवराजच्या फॅमिलीचा फोटो काढून गायत्रीला ओळख ही सांगतो. टेडी ही तिला त्यांच्या घरात जाण्यासाठी म्हणून सगळ्यांबद्दल सांगून मोकळा होतो. अंतरा ही सगळ्यांचे शांत ऐकत असते. आता तर तिला तिच्या रूम मध्ये जायला ही भीती वाटत होती.
"जवळपास आपल्याला हवे ते झालं आहे. अंतरा, तू घरी राहून यांचे शरीराचे रक्षण करायचे. मी, मिस्टर टेडी आणि निखिल बाकीचं हॅण्डल करू. मिस्टर टेडी तू निखिल सोबत जावून उद्या हे पेपरच बघ. तिथं बोलायचं नाही आहे. अगदी शांत राहायचं आहे समजल?कोणाला घाबरवायचे अजिबात नाही!",गायत्री सगळ डिस्कस केल्यावर टेडीला सूचना देते.
"ओ, मॅडम मी एकटा यांच्यासोबत? नाही नाही....", निखिल एकदा टेडीला पाहत म्हणाला. त्याचा बॉस असला तरीही त्याने ज्या प्रकारे घाबरवले होते, ते आठवून त्याला भीती वाटत होती आणि त्यात ती बॉसची त्याच्या आत्मा होती.
"माझी इतकी घाण चॉईस नाही आहे. लग्न झालं आहे माझं. मग मी तुझ्यासोबत थोडी काही करणार आहे? छी छी निखिल किती खराब विचार करत असतो तू!",टेडी त्याला मारत म्हणाला. त्याचा हात काही लागत नाही. टेडीचे बोलणे ऐकून गायत्रीचे डोळे ताठ होतात.
"मिस्टर टेडी तुझे विचार बघ आधी? असे काही त्यांचे विचार नाही होते. तू अर्थ वेगळा काढत आहेस! तू एक आत्मा आहे म्हणून बिचारे घाबरून तुला घेऊन जायला तयार नाही ते! ठीक आहे निखिल. मी येईन तुमच्यासोबत!",गायत्री थोडी रागवत टेडीला म्हणाली.
"बॉसचे विचार या टेडी मध्ये राहून खूप बदलत चालले आहे. काश! ते खरच त्यांच्या आयुष्यात एवढे छान राहिले असते.",हळूच गायत्रीला निखिल बोलतो. त्याच ऐकून गायत्री एकदा टेडीला पाहते.
"तो आता त्याच आयुष्य जगत आहे चांगले. असे समजून जावा. डोन्ट वरी. ते त्यांच्या शरीरात परत आले तरीही थोडेफार असे वागतील.",गायत्री विश्वास देत म्हणाली. ते ही हसून.
"असे झाले तर खरच मी खूप आनंदी होईल. त्यांच्या रुक्ष वागण्याने ते नेहमी ओळखले जातात. त्यांना घाबरून रहाव लागते सगळ्यांना. आता बघा तुम्ही चूप केलं की, आवाज ही करत नाही. तेच जर आधी त्यांना कोणी केलं की, सरळ ओरडून मोकळे होत असायचे.",निखिल टेडी कडे पाहत बोलत असतो. त्याच्या चेहऱ्यावर हसू होत.
"ओहह असे आहे का? मग आपण सुधारू त्यांना. आता आधी त्यांना सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू. ज्या कारणाने ते आपले उरलेले आयुष्य शांत घालवू शकतात.",गायत्री खूपच हसून म्हणाली. तिचा चेहरा नेहमी फ्रेश आणि हसरा असायचा. एकदा निखिल तिच्या चेहऱ्याला पाहतो. गोरी, हाईटेड होती ती. असे असून देखील अगदी सरळ साधे राहणीमान होते तिचे.
"मॅडम, तुम्ही खरच आमच्या बॉसला परफेक्ट मिळाला आहात. अग्नीला शांत करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच तुम्ही त्यांच्या आयुष्यात एक नितळ झरा बनून आला आहात. सुशीला यांच्यात हे गुण कधीच दिसले नव्हते. ते बॉसच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना अगदी नोकर समजत असायचे. गर्वात बोलत असायचे. पण तुम्ही त्या उलट आहात. एवढ्या मोठ्या डॉक्टर असून देखील इतका शांत स्वभाव कसा काय तुमचा?",निखिल तिचं कौतुक करत विचारत असतो. आता टेडी अंतरा सोबत बोलत होता. तिला भीती वाटू नये आपली म्हणून. अंतरा ही थोडी भीती बाजूला ठेवून बोलत होती. त्या दोघांना अस बोलताना पाहून गायत्री हसत होती.
"या जगात आपण आपल्या हाताने जितके चांगले कर्म करता येतील. तितके चांगले कर्म करावे! असे स्वामी म्हणत असतात. जाताना या जगातून आपण काहीच घेऊन जात नाही! आपण चांगल वागत असतो तेव्हा त्याचे फळ आपल्या पुण्यात मोजले जाते. लोक आठवणीत ठेवत असतात आपल्याला. वाईट लोकांचे विनाकारण करून कुठे त्या व्यक्तीचे चांगले होत असते बर? त्या व्यक्तीला ही त्रास मिळत असतो. हेच लक्षात ठेवून आपण चांगल रहायचे. वाईटाचा अंत करण्यासाठी स्वामी आहेतच. मी त्यांच्यावर विश्वास ठेवते म्हणून माझ्याकडुन जितके चांगले करता येईल तितके मी करत असते. आज पर्यंत मला कमी पडू दिले नाही त्यांनी! याच मुळे अस वागणे आहे.",गायत्री हसू चेहऱ्यावर ठेवत आपल्या गळ्यात असलेल्या चैनला हात लावत म्हणाली. त्या चैनीत छोट अस पान होत. त्या पानात स्वामी होते. त्यावरून त्याला काय कळायचे ते कळते.
"श्री स्वामी समर्थ!",निखिल ही हसून म्हणाला. आता खरच त्याला युवराजची चिंता नव्हती. गायत्रीचे बोलणे आणि तिचा स्वभाव का असा होता? हे समजल होत. खरच स्वामी बद्दल त्याने ऐकले होते. आज साक्षात समोर असलेल्या गायत्रीसारख्या व्यक्तीला पाहून त्याला विश्वास बसत होता. गायत्रीच एक एक वाक्य त्याच्या मनाला भिडून गेलं होत.
क्रमशः
******