Alltitude.And Manymore in Marathi Short Stories by kk online books and stories PDF | शिखर .....अनेकांचे

Featured Books
Categories
Share

शिखर .....अनेकांचे

नेहमीप्रमाणे मी मधात बोललो जेव्हा चर्चा चालू होती. नुकतेच मुसरुड फुटलेल्या टोळक्यात कि,अस नसत ज्याचं त्यांनी ठरवायचं असत समजल का ?

तो दिवस म्हणजे सोमवार ११ मार्च २०११ वेळ सकाळी ११.३० असेल बहुतेक.शिमग्याच्या अगोदरचा दिवस आमच्या कडे सर्वत्र शिमग्याची धामधूम असते म्हणून मुददाम रजा टाकली होती.घरी करमत नव्हत म्हणून फेरफटका मारावा आलो फिरत फिरत चौकात ! नेहमीच आम्हच बैठकीच दुकान म्हणजे न्ह्व्याच केसकर्तनालय त्या दिवशी बंद.समोर ची दोन्ही बेंच खाली होती म्हणून ठेकवले बुड तिथे,तर चार पाच पोर येणून बसली जवळच्या बाकड्यावर आणि टवाळक्या करू लागली.मी आपला होतो सोशल मिडिया पहात तसा मला गर्दीतून आवाज आला अबे तो देवाचा बाप होय त्याले सर्व भेटते आणि साल आपण फ़क़्त मागमाग करा बसतो .

सवयीप्रमाणे मी मारलं मधात तोंड ती पोर आ वासून पाहू लागली त्यातल्या एकाने काकाजी तुम्हाले काही मालूम आहे का कायची गोष्ट चालू आहे मग मधात कायले पडता आमच्या.मी म्हटलं बरोबर आहे तुमचं मला सवय आहे घाणेरडी कि कोणी संभ्रमात असल कि नेमक मी बोललो!

त्यातला एक कोणी नाही संभ्रमात येथ आमच वेगळ बोलन चालू आहे पोट्टी चा मत्तर आहे तुम्ही नाही पडलेलेच चांगले.ते घाबरतील म्हणून मुददाम म्हणालो अरे आमचं कामच आहे ते लोकाची मदत करणे.त्यातला एक म्हणजे तुम्ही पोलिसात आहे का जी ,सर्व पोर दचकून होती मी बोललो नाही रे लेकहो मी साधा समाजसेवक आहे.मग त्यातली बरीच अह्ह्ह बर झाल बापा !

तुम्ही म्हणाल तर मी तुमची मदत करू शकतो पण आधी तुम्ही सांगा सर्व ,पोर आपापसात कुजबुजू लागले म्हणू लागले अबे ओळखी न पाळखी कसा सांगायचं आपला गुत्ता.कोणी नातेवाईक गी असेल सेजल चा तर मोठी पंचाईत होईल बर.त्यातला एक अबे आपण मागन पासून काही उपाय काढला का आता करतो म्हणते मदत त पाहू न हा काकाजी काय करतो ते ,तो म्हणाला पहा आम्ही तुम्हाला सर्व सांगतो पण तुम्ही आमची विचार पूस करायची नाही,न आम्ही तुमची विचारू बस्स आपण एकमेकाची मदत करू चालेल ,पटल असल तर ठीक नाहीतर तुम्ही आपल्या रस्ते आम्ही आपल्या.होकार कळवून पोर आनंदी झाली मी मुददाम एकाला समोरच्या गाडीवरून मुंगफल्ली आणायला पैसे दिले म्हटलं टाईमपास बरा होईल या पोट्त्याची रडगाणे ऐकताना.

त्यातला एक आला समोर आणि बोलला कि अविनाश आहे बड्या बापाचा लेक म्हणून सदैव त्याला सर्व गोष्टीत सर पुढे पुढे सारतात शिवाय पोरी पण त्याच्याच मागे मागे खायला प्यायला भेटते म्हणून ते त्याचे ते असो पण म्हणून काय आम्ही नेहमी माघार घ्यायची आणि त्याला पुढे करून नेतृत्व द्यायचं हा कुठला नियम सांगा न तुम्ही ,आता बघा परवाच तो सेजल आमच्या वर्गातील पोरगी आणि तो वर्गात नको त्या अवस्थेत सरांना सापडले त्यांनी कांगावा केला आणि बाहेरची दोन माणस जी कार्यलयीन कामासाठी आली होती,त्यांनी पाहिलं आणि पेपर मध्ये सर्व रामकहाणी आली त्यात शाळेची बदनामी होईल म्हणून कोणीतरी पुढे येऊन त्या प्रकरणाची जबाबदारी घ्या.असे वारवार शिक्षक सुचवतात.मी म्हणतो कशाला माहित त आहे कोण आहे ? मग कशाला कोणाला फसवायचं फ़क़्त तो मोठ्या बापाचं आहे म्हणून त्यात भर म्हणून सेजल ने बयान दिल कि रवी हा बिचारा काडीपहेलवान ने वर्गात माझासोबत बळजबरी केली.आता काका तुम्हीच सांगा कि हे कितपत योग्य आहे.एखाद्याचा नाहक बळी देणे का तर रवी गरीब घरचा आहे त्याचे वडील नाही आणि आई मोलमजुरी ला जाईल कि भानगडीत पडेल.

मी सर्व एकूण पोरांना म्हणालो अरे तुम्ही किती करुणामय हृदयाचे आहे रे मगाशी तुमचे बोलणे एकूण मी ग्रह बनविला होता कि तुम्ही लोफर पोट्टे आहात पण नाही खरच तुम्ही सामंजस्य विचारवादी आहात.आपण याचा छडा लावल्या शिवाय थांबायचे नाही असू दे बडी आसामी पण आपण लोकशाही अंगीकृत देशात राहतो.

आता एक काम करा जर पुन्हा रविला गुन्हा आपल्या माथी घे म्हटल तर सरळ सांग मी पोलिसात जातो तेच काय ते ठरवतील कोण अपराधी आणि कोण गुन्हेगार? त्याने एक होईल त्यांना पण भीती राहील कि खरच पोलिसात गेले तर सविस्तर चौकशी होईल कॅमेरे आणि टेस्ट होतील पोरीच्या आणि अलगद सापडेल .

माझ म्हणन पटलं बहुतेक सर्वाना आणि धन्यवाद काका तुम्ही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल.