मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवायचा तिचा दैनदिन क्रम, जशी लग्न करून आली नवऱ्याच्या घरी नवी नवरी आठ पंधरा दिवस राहिली असेल घरात मग सुरू झाली मोलमजुरी न थकता न लाजता संसाराला हातभार म्हणून.तशी तिच्या लग्नाची गोष्ट मजेशीर आहे,नवरा हा माथाडी कामगार सगुणा नेहमी असायची त्याच्या कामावर तो मिस्त्री आणि ही हेल्पर आजूबाजूच्या परिसरात कामे चालत असे तशी सगुणा आपले गाव सोडून दहा बारा किमी च्या परिसरात कामावर जायची.असाच एकदा कवडू मिस्त्री तिच्या गावच्या कामावर गेला ती नेहमीप्रमाणे हेल्पर म्हणून गेली घराचे बांधकाम चांगले महिना दीड महिना चालले ,वेळ मिळेल तेव्हा कडवू व सगुणा गप्पा मारायचे दोघांचेही वय होते वीस ते पंचवीस च्या घरात चाहूल लागली होती तारुण्याची म्हणजे बिभिन्न लिंगी आकर्षक तसेही माथाडी कामावर किती विचित्र प्रकार चालतात सर्वश्रुत आहे.त्यात हे दोघेही अविवाहित पडले प्रेमात....आता प्रेम बीम कसलं म्हणा एकेदिवशी दुपारी जेवायची सुट्टी झाली,तेव्हा सर्व कामगार बसले जेवायला आपापला कंपू तयार करून पण नेमके हे दोघंच बसले आणि सगुणा ने मुद्दाम आज कवडूच्या आवडीची भाजी आणली म्हणून आवर्जून कवडू ला वाढत तसा कवडू बोलला नुसती भाजीच चारशीन का कधी पाजशीनही तसे कामगार लोक बोलतात एकदम बेधडक.काय पितो म्हणता तर त्याने नुसते हाताने इशारा करून खुणावले तशी ती लाजून चुररररर आणि उठून जाणारच एवढ्यात कवडू बोलला की चल आंबे पाडू तिकडले आणि दोघेही पलीकडल्या बांधावर असलेल्या झाडापाशी जातात.पूर्ण शुकशुकाट हीच संधी साधून दोघांमध्ये नको ते होतं आणि सरळ सगुणा चे घरचे मागणी घालायला कवडूच्या घरी पुढच्या एक महिन्यात लग्न.असा सारा पसारा होता लग्नाचा...
बाई आली नवीन गावात गाव गावच्या बायका सारख्याच सगुणा ला सांगू लागला नवरा दारू ढोसतो तुझा कुटुंब चालवायचं असेल तर तुलाही मोलमजुरी करावी लागेल नाहीतर उपास पक्के.तशी सगुणा कवडुल चांगलीच ओळखून होती कारण होती ती प्रेमाची कसली वासनेची शिकार बायको.पहिल्या महिनाभर चांगला राहिला सभ्य माणसासारखा आणि पुन्हा सुरू झालं दारू ढोसन त्या दमात त्याला आपल्या मागे परिवार आहे,याचेही भान नव्हते राहत त्याला मग काय सगुणा ने पण त्याच्या कामावर जायला सुरुवात केली.दिवसा दोघेही कामावर रात्री मात्र कवडू कितीही ढोसून आला तरी नित्यनियमाने आपल्या वासना शांत करायचा वर्षभऱ्यात सगुणा झाकी लेकुरवाळी.ती कामावर जायची पण हप्ता घायची वेळ आली की कवडू माझीच बायको म्हणून तिचेही पैसे स्वतःच घ्यायचा. ती बिचारी काय बोलणार कुटुंबात दिवसेंदिवस एक एक सदस्य वाढत होते गरजही वाढत होत्या पण पैसा ची चणचण अधिक भासत होती.
मनावर दगड ठेऊन तिने विचार केला होता की आता माथाडी कामावर नाही तर मोलमजुरी करायची शेतात किंवा कोणाच्या घरची धुणी भांडी. सगुणा तशी प्रामाणिक हक्काचे पैसे घायची कधी तिने पर पुरुषाची वाकडी नजर पडू दिली नाही स्वतःच्या शिलावर भलेही तिने वासनेचा मोहात पडून कवदुसरख्या व्यसनाधीन माणसाशी लग्न केले पण तिची मनोमन इच्छा होती की आपली संतती चांगली निपजावी पण ते म्हणतात न खान तशी माती अगदी तसेच झाले.
एकामागून एक चार पोर झाली पण कवडूचे प्रेम म्हणजे त्याचा रात्रीचा खेळ काही केल्या कमी होईना.पोर आता मोठी झाली उघोगी लागली मोठा तर बापाच्या वळणावर माथाडी कामगार व कामावरची बाई आणली पळवून हुबेहूब कवडू चे चरित्र त्याच्यात उमटले होते पण आज तो या जगात नाही,दुसरा हॉटेल वर नोकर त्यानेही मोलमजुरी करणारी पाहून बाहेरच्या बाहेर आपले उरकले,तिसरा कमी वयात दारूच्या नादी लागून अगदी ध्यानांमनात नसताना अचानक स्वर्गवासी झाला शेवटचा चौथा हमाली काम करायचा पण दारू प्यायचाच एकदिवस दारुणेच त्याचा घात केला ऐन तारुण्यात त्यानेही जगाचा निरोप घेतला. कवडू ला लकवा मारल्याने त्यांचे कामावर जाणे झाले बंद शिवाय दोन पोरांच्या विधवा त्याची मुले यांना जगवण्याचा प्रश्न सगुणे पुढे ठाकला. पण बाई मोठी धीराची मर्दासारखी कंबर कसून हिररीने कष्ट उपसत आज ती चालवते आहे संसाराचा डोलारा...
अगदी नावाला अनुरूप होती ती गुणांची सगुणा.
@*@*@*@*@*@*@*@*@*@*@