नवरा काबाडकष्ट करून घर चालवायचा तिथपर्यंत कधी कामच नाही पडलं बाजारात काही खरेदी विक्री च सर्व आयत मिळायचं घरच्या घरी.आपण फक्त घर आणि मुले संभाळायची आणि रात्री उशिरापर्यंत नवऱ्याला खटल्यावर असा नित्यक्रम होता शिला बाईचा.अचानक एकेदिवशी अपघातात नवरा गेला शेजारी पाजारी,नातलग यांच्या जोडीने महिना काढला पण कोण किती पुरवणार,शेवटी शिला ने मनाशी ठाम विचार करून काहीतरी काम करायचे ठरविले होते,कारण पदरी तीन मुलाचा डोलारा होता.तिने एका घरी काम धरले ते स्वयंपाकाचे घरात तीन माणसं काका-काकू व त्याचा तरुण मुलगा.मुलगा ड्युटी वर जायचा म्हणून ९.३०ला स्वयंपाक रेडी हवा होता म्हणून ती सकाळी लवकर जाऊन कामे आटपायची तिची मुलगी शाळेत जायची म्हणून काकू म्हणायची तिलाही डब्बा बांधून देत जा इथूनच नाहीतर घरी जाशील केव्हा आणि स्वयंपाक करशील केव्हा.किती समजदार होत्या काकू नाहीतर कामवाल्याचा कोण करतो विचार एवढा.असेच एकदा काका-काकू गेले होते लग्नाला आठ दिवसासाठी.आणि सांगून गेले की रोज वेळेवर येऊन स्वयंपाक करून जात जा आम्ही दोघे आठ दिवस नाही आहोत.ती रोजच्या प्रमाणे आली होती आज मंदार जरा घाईत बोलला की आज संध्याकाळी तुम्ही पोरांना घेऊन इकडेच या आणि इथेच झोपा आज जरा घरी पार्टी आहे तर पाच सहा माणसं व दोन तीन भाज्या आणि काही पदार्थ बनवावे लागतील तर उशीर होईल म्हणून तुम्ही इकडेच झोप जा व मुलंही.ती हो बोलून तर गेली पण मनात विचार करत होती असं काय आहे आज की,रात्रभर इकडे झोप म्हणतो......रात्रीच्या स्वयंपाकाला ७वा आली सोबत तीनही पोर घेऊन मोठी पोरगी पहिल्या वर्गात ती चालती बोलती होती बाकी दोन तर दूध पिते होते पूर्वतयारी म्हणून तिने भाताच आंदण घेतलं होतं आणि कणिक भिजविली होती नऊ दहा माणसाची. मंदार आत येऊन बोलला की थोडे शेंगदाणे खारवून आणि पापड तळून घ्या.आणि फ्रीज मध्ये मी पनीर,दही व चक्का ठेवला आहे लक्षात ठेवा मी नंतर सांगेन ते बनवलं.शिलाने मान डोलविली,पार्टी सुरू झाली पाच पुरुष व दोन स्त्री होत्या पाहिले स्टार्टर त्याचं चालू होतं पॅक पॅक मंदार आत येऊन बोलला की श्रीखंड तयार ठेवा पनीर ची भाजी आणि मठ्ठा बेत करा आज सगळे खुश झाले पाहिजे.शिला बाई म्हणजे सुगरण काही वेळातच ताट तयार बसली पंगत सगळे बाईचा हाताची तारीफ करू लागले की,काय चव आहे हॉटेल टाकलं तर फुल्ल होईल ग्राहकाने बोलत होते,त्यातली एक बाई बोलली की मंदार बोलावं तुझा बाईलाशिला मात्र दचकतच बाहेर गेली तिला वाटलं काही चुकलं असेल तर रागावणार.पण बाई म्हणाली तुम्ही एखादं हॉटेल का नाही टाकतशिला बोलली आम्ही गरीब लोक कुठून आणायचा एवढा पैसातर ती बोलली मी माझा बँकेतुन लोन मिळवून देते दुसरी म्हणाली मी माझा कॉलेजच्या समोरील जागा भाड्याने घेऊन देते.एक पुरुष बोलला आणि ग्राहक तर येणारच चवच तशी भारी आहे.जो खायेगा एक बार वो आयेगा बार बार.बघता बघता शिलाची कॅन्टीन सुरू झाली होती आणि चालू नाहीतर धावू लागली होती.आता उत्पन्नही चांगलं मिळत होत जसे पगारदार कमवितो तेवढे महिन्याकाठी चाळीस पन्नास हजार पण बाईने आमचे घर काही सोडले नाही ती नियमित यायची स्वयंपाकाला तिचे म्हणणे होते की ज्याने लावलं अन्नाला तिथे शेण का खावं !
आज या जगात फार थोडे लोक आहेत जे उपकाराची जण ठेऊन त्याचे स्मरण करीत जीवन व्यतीत कफीत असतात त्यापैकी च एक होती शिला बाई.
कृतज्ञता माणसाचा सर्वश्रेष्ठ गन आहे जो प्रत्येकाने बाळगला,बानवला पाहिजे अंगी.
कारण आपण आज जे करतो ते असत कर्म आणि हिशोब हा कधी न कधी कुठं न कुठं द्यावाच लागतो.
@#*@#*@#*@