Barsuni Aale Rang Pritiche - 35 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 35

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 35

दिवसामागून दिवस जात होते.... प्रणितीच्या आजूबाजूला गार्ड आल्यामुळे इच्या आसपास सुद्धा कोण पोचू शकत नव्हता... रोज सकाळ संध्याकाळ ऋग्वेद चे फोन येत होते.... शिवाय कंपनीची anniversery जवळ असल्याने काम वाढलं होत ... त्यामुळे प्रणिती पूर्ण कामात गुंतली होती ... त्यामुळे प्रणिती पूर्ण कामात गुंतली होती.... रात्री मात्र रूममध्ये गेल्यावर त्याची खूप आठवण यायची ..... त्याचा फोटो छातीशी कवटाळून ती झोपी जायची... 


पंधरा दिवस झालेच होती .... सुर्यंवंशी mantion मध्ये renovation च काम सुरु झालं.... आई आणि काकी ने मुख्य जबाबदाऱ्या प्रनिटिव्ह सोपवली होती... तिला हवं तस सगळीकडे reovate करायला सांगितलं.. त्यामुळे आता ऑफिस सोबत प्रणितील घराकडे पण लक्ष द्यावं लागत होत.... 

रात्री उशीर lawn वरच्या झोपाळ्यावर बसली होती.... ऋग्वेद ला जाऊन आज वीस दिवस झाले होते.... पण गेल्या पाच दिवसापासून त्याने व्हिडीओ कॉल तर लांबच साधा कॉल पण केला नव्हता... झोपाळ्याच्या कडेला टेकून ती एकटक फोन कडे बघत होती.... 

"प्रणिती ..."

"अ ....sss ....आजी ?या ना... बसा .."तिने उठून आजींना बसायला हात दिला .. आणि त्याच्या बाजूला बसली... 

"झोपली नाही तू...?.."आजी 

"नाही....आजी... झोप येत नाहीच आज..."प्रणिती 



"दिवसभर धावपळ करत असतेस ... कोणालातरी जबाबदारी वाटून द्यायची ना दगदग कमी होईल..."आजी 



"मला आवडत करायला आजी.... आणि स्वतःच्या घराला आपल्या हातानी सांजवायची मजा वेगळी च असते ....."प्रणिती 

"तुझं पण बरोबर आहे... तुला माहितीय जेव्हा हा बांगला पहिल्यांदा बांधलेला ना... तेव्हा एवढा मोठा नव्हता .. आणि त्याची रंगरंगोटी मीच केलेली .."आजी 


"काय खरच ...?...किती महा आली असेल ना...?... आपण आता पण करूया ना..."प्रणिती 


आजी हसायला लागल्या .... 


"आता ह्या एवढ्या मोठया घराला रंग काढायला गेलो ना तर महिना जाणार ... आणि वेद ला समजल ना त्याच्या नाजूक बायकोकडून आम्ही रंग काढून घेतोय तर मग झालंच ..."आजी 



"काय आजी तुम्ही पण .."प्रणिती चे गाळ गुलाबी झाले .... 


"मी आल्यापासून आपल्याला निवांत बोलायला वेळच मिळाला नाही ना.... तुला राग आला नाही ना माझा मी प्रिया च..."आजी 


"नाही आजी... काहीही काय.... तुम्ही मोठ्या आहेत माझ्यापेक्षा .... आणि तो फक्त एक गैरसमज होता... जो दूर झाला...."प्रणिती 



"हम्म ... खार तर माझंच चुकलं .... मला वाटलं वेद आणि प्रिया लहानपणापासून एकत्र आहेत तर त्याला ओळखणारी तिच्यापेक्षा चांगली मुलगी अजून कुठे मिळणार ... दोघेही एकत्रच काम करतात ते बघून माझा गैरसमज झाला ..."आजी 


"होऊन जात आजी .... आणि ते झालं आता ... पुन्हा तो विषय नको..."प्रणिती 



"हो ... आता मी पणजी झाली कि डोळे बंद करायला मोकळी.."आजी 


"आजी ... असं काही बोलू नकात .... आम्हाला हव्यात तुम्ही.."प्रणिती ने त्याचे हात हातात घेतले..... 


"म्हातारपणाचा काय सांगता येत नाही... असो .... उशीर झालाय खूप...झोप आता... पुन्हा सगळी उठून पायाला भिंगऱ्या लावल्यासारखी फिरणार तू...."आजी 


"हो चला... मी सोडते तुम्हाला.."प्रणिती ने त्यांना उठायला मदत केली.... आणि त्यांना त्याच्या रूममध्ये सोडून ती बेडरूम मध्ये आली.... 

सगळ्यांसमोर स्ट्रॉग राहणारी ती एकटी असल्यावर बिखरूं जायची ... ऋग्वेद ला पुन्हा कॉल केला... पण ह्यावेळी सुद्धा त्याचा message आला "बिझी आहे नंतर बोलू..."

फोन तसाच बाजूला ठेऊन ती उताणी बेड व्रत पडली... डोळ्यातून वाहणारी पाणी उशी भिजवत होत.... पण तिला तिला पर्वा नव्हती.... रात्री अश्याच जात होत्या .... तीच तर जेवणावरून सुद्धा मन उडाल होत .... त्याचा चेहरा काय आवाज पण ऐकलं नव्हता... सृष्टी आणि सर्वेश होते त्यामुळे तेवढाच तिचा विरंगुळा होत होता..... 


महिना संपायला एक दिवस होता... दुसऱ्यादिवशी ऋग्वेद येणार होता... प्रणिती ला आता बेडरूम मध्ये करमत नव्हतं ... तिची तब्येत खालावत चालली होती.... 


"प्रणिती..?... बाळा बस इथे.."आई ने रात्री तिला हॉल मधेच बसवलं..... 

"काही झाली का बाळा..?.. तू जेवत नाहीय ..?..हे बघ तुमच्या नवऱ्या बायकोच्या प्रॉब्लम मध्ये मी येणार नाही ... पण बाळा एकमेकांना समजून घेऊन नातं पुढे न्यायचं नसत .... ऋग्वेद चुकत असेल तर त्याला बोलायचा हक्क आहे तुला..."मॉम 

"बोलायचं ...?... बोलायला त्यांनी एकदा माझा फोन तर उचलायला हवा ना..."प्रणिती ने मान खाली घातली ... डोळे भरून आले.... 



"फोन करो ना तो रोज...?.."मॉम 

"ह्ह,...हो... करतात..."तिने कशीबशी मान हलवली.... 

"छान ... मला वाटलं इथे जाऊन कामाच्या व्यापात वविसरून तर गेला नाही ना... "मॉम बोल्त होत्या तेवढ्यात होत्या तेवढ्यात त्याचा फोन वाजला ... 

"हा बघ ... त्याचाच फोन आहे ... तू बोल.... मी ओव्हन मध्ये कुकी ठेवल्यात त्या काढून येते... "मॉम नि तिच्याकडे फोन दिला... प्रणिती नेपटक्न फोन उचलला....

"हँलो मॉम ...?.. कशी आहेस...?.."

त्याचा आवाज आला आणि प्रणिती ला हुंदका अनावर झळा ... तेवढा बारीक आवाज पण त्याला बरोबर गळा.... आता फोन वर फक्त श्वास घेण्याचा आवाज येत होता.... 

"व..वेद .."तिची आर्जव करणारी हाक कानावर पडली ... आणि फोन बंद करून टाकला.... प्रणिती च्या डोळ्यातून पाणिआता गालावर वाहायला लागलं... फोन तिथेच सोफ्यावर ठेऊन ती बेडरूम मध्ये पळत गेली.... 


बेड वर तोड खुपसून ती जोरात रडत होती.... समजतच नव्हतं अचानक काय झालं..? .. जाताना तर सगळं चंगळ होत..... मा असं ..?...ते रोज मॉम ला कॉल करत होते मग मला का नाही...?.. माझ्याकडून काही चुकली का...?... खूप प्रश्न डोक्यात उसळी मारून आले.... 


दुसऱ्या दिवस तिचा घरीच गेला तब्येत बारी नाही म्हणणं मॉम ने तिला बाहेर जाऊच दिल नाही .... ती मात्र त्या बेडरूम मध्ये एकत्र घालवलेले क्षण आठवून मनातच रडत होती... आता तिने रूम renovate केली होती पण काही खास गोष्टी तश्याच होत्या.... त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिने प्रत्येक गोष्ट केली होती.... रम पाहिल्यावर त्याची reaction बघायची होती तिला... 


ती रात्र झोप काही लागलीच नाही .. सकाळी उशिरा कधीतरी डोळे बंद झाले... पण त्याचा perfume चा वास नाकात गेला आणि मिटलेल्या पापण्या लागोपाठ उघडल्या.... 


"वेद..... ss "समोर त्याला उभं बघून ती मिठी मारायला जाणार कि त्याच्या डोक्याला बांधलेली पट्टी दिसली.... 

"वेद..?हे..हे काय झालं...?... तुम्हाला कास लागलं...?,...."तिने जवळ येत त्याचा हात हातात घेतला.... 

"काही नाही... छोटा accident झाला होता... बस्स "ऋग्वेद 


"असिसिडेन्ट...?... आणि छोटा...?अहो तुम्हाला किती लागलंय ..?आणि डॉक्टर कडूनच dressing करून घेतलंय ना हे?... अजून लागलं नाहीय ना... ?प्रणिती एकावर एक प्रश्न विचारत होती.... 

"just stop it प्रणिती ... जिवंत आहे मी मेलो नाहीय.."तो ओरडला ... आणि ती दोन पावलं मागेच गेली... ऋग्वेद ला त्याची चुकी लक्षात आली ... 

"हे बघ.."तो बोलत होता कि ती तशीच पळत बाथरूम मध्ये गेली... खर्च एवढं सोपं होत त्याच्यासाठी हे सगळं...?... तो आल्यावर प्रेमाने मिठीत घेईल... कुरवाळले किती स्वप्न बघितली होती तिने आणि त्याने काय केलं..?.. डोळ्यातून येणाऱ्या अविरत पाण्यासोबतच तिने सगळं आवरलं... बाहेर तो वाट बघत असेल अशी भोळी आशा ... पण तो रूममध्ये नव्हताच...!! तिने ऑफिस ची तयारी केली आणि धावतच खाली आली... ऋग्वेद सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करायला बसला होता.... 

"हे खर्च माझ्यासाठी थांबले नाहीत ..?.. "मनात प्रश्न येऊन गेला... पण त्याला भूक लागली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं.... 



"अरे ..... मजा आहे एका मुलीची आता....हा..?.."काकी बोलल्या तस तिने आनंदाने पापण्या मिचकावले.... आणि ऋग्वेद कडे बघितलं तर त्याच कुठे लक्ष च नव्हतं ... ब्रेकफास्ट सुद्धा तो नीट करत होता.... कोणत्या तरी खूप मोठ्या टेंशन मध्ये असल्यासारखा वाटत होता..... तिने त्याच्यासोबत नंतर बोलायचं ठरवलं.... 

"वेद अरे आराम कर आज .. उद्यापासून जा.."मॉम 
"नो मॉम.... काम वाढवीत... मला जावं लागेल...."त्याने blazer उचललं ... 

"अरे प्रणिती..?.."मॉम 

"घरात अजून पण ड्राईव्हर आहेत मॉम .."तो तसाच बाहेर पडला.... 


"आहो मी येते तुमच्यासोबत थांबा... ब्रेकफास्ट मी ऑफिसमध्ये कारेन..."परिणीती तशीच उठली... आणि डबा पॅक करत त्याच्यामागे पळाली..... 

"अहो काही झालंय का....?.. तुम्ही टेंशन मध्ये दिसताय ...."प्रणिती ने त्याच्या हातावर हात ठेवला... 


"मला काम करायचं आहे त्यामुळे please शांत बस....."त्याने अगदी सरळ तिचा हात झिडकारून दिला .... तिचे डोळे टचकन भरले .... आणि तो...?... रडत नव्हता...? .... गेले पंधरा दिवस तो झोपला सुद्धा नव्हता .... डोळे अक्षरशः लाल झाले होते..... तिला होत होता त्यपेखा दुप्पट त्रास त्याला होत होता... प्रणिती ला सगळं समजलं तर काय होईल...?... विचारानेच तो घाबरत होता.... कोणाचीही पर्वा न करणारा ऋग्वेद सूर्यवंशी मनातून पुरता हादरला होता... 

ऑफिसमध्ये आल्या आल्या तो गाडीतून उतरून निघून गेला... ती तशीच त्याच्याकडे बघत राहिली ... जीव नसल्यासारखी पावलं टाकत ती तिच्या केबिब मध्ये आली .... 

"मॅनेजर प्रिया प्रिया खूप छान दिसतंय... तुम्ही ...!"

"yes mam ... you are glowing ...!" बाहेरून मुलीचे कॉम्प्लिमेंट ऐकायला यायला लागले.... तस तिने केबिनच्या काचेतून बाहेर लक्ष टाकलं.. प्रिया कोणत्यातरी file घेऊन आली होती.... आणि काही मुली तिच्यासोबत बोल्ट होत्या.... 

"मी आणि ऋग्वेद काळ स्पा करायला गेलेलो ना... त्यामुळे ... खूप मस्त सेंटर होते ते...." प्रिया सांगत होती .... आणि प्रणिती चे अक्षरशः हात पाय थरथरायला लागले... होते....

कामात तर लक्ष लागतच नव्हतं ... दुपारी तसेच half day टाकून ती ऑफिस मधून बाहेर पडली .. वरून खिडकीतून ऋग्वेद तिला बघत होता.... डोळ्यात आलेला पाणी त्याने पुसलं.... 


"सॉरी नीती.... really सॉरी.... पण जे झाली त्यांनतर मी तुझ्याशीच काय माझ्या स्वतःशी सुद्धा नजर मिळवू शकता नाहीय... ऋग्वेद सूर्यवंशी पहिल्यांदाच आयुष्यात ठरलाय नीती ... ठरलाय...."काचेवर हात टेकून तो एकटक तिची गायब होणारी गाडी बघत होता.... 


रात्री तो खूप उशिरा घरी आला.... पण प्रन्ति जागीच होती..... त्याला हे expet नव्हतं.... फ्रेश होऊन तो रूममध्ये आला आणि झोपायला जाणार कि प्रणिती ने येऊन त्याला घट्ट मिठी मारली..... 


एक क्षण त्याच्या तिला घट्ट कवेत घ्यायची इच्छा झाली.... पण डोळे बंद कर सावरलं ... त्याचे हात वर आले नाहीत .... 


"वेद ... माझं काही चुकली का..?...please बोला ना..?... तुम्ही बोल्लातच नाही तर मला कास समजणार ..."प्रणिती चे डोळे पाण्याने तुडूंब भरले होते... 

"तुझं नाही नीती माझं चूल ... मी दोषी आहे तुझा..."त्याच मन ओरडून ओरडूंसागत होत... पण ते ओठावर येत नव्हतं.... 
"वेद बोला ना..."त्याच्या कॉलर घरत तिने हलवलं ... 

"मला झोप येतेय..."त्याने कठोर आवाजात सांगितलं.. 


"वेद ...?..." रडून रडून चेहरा लाल झाला होता.... 

त्याने तिची कॉलर वरचे हात बाजूला केले आणि झोपायला जाण्यासाठी मागे वळला .... 

"तुम्ही आज माझ्याशी बोलला नाहीत तर मी हा चाकू चालवणार ..." तिने मनगटावर सूरा ठेवला.... 

"नीती...?... are you mad ...? टाक तो.... लागेल तुला..." तो पुढे आला.. पण ती मागे जात होती.... 

"तुम्ही बोलणार कि नाही ते सागा.."प्रणिती 

"बोलतो ... बोलतो मी... पण तो सुरा टाक please ..."ऋग्वेद 

प्रणिती ने सुरा बाजूला टाकला आणि त्याच्या मिठीत शिरली .... तिच्या पाठीवर हात घट्ट रोवत त्याने वर उचललं .. त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते... तिच्या मनगटावर सूरी बघून एक क्षण त्याचा जीवच गेला होता.... 


तुच्या खणाड्यावरून मान काढत प्रणिती ने ओठांना ताब्यात घेतलं... त्याच्याकडून जास्त प्रतिसाद येत नव्हता..... पण ती थांबत नव्हती ... तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला जाणवत होत... श्वास अडकलेले पण समजत होत.... शेवटी मुशकीलने त्यानेच तिला बाजयला केलं.... 


"आता झोपूया..?.."स्वतःच्या फिलींग कंट्रोल करत त्याने तिच्या गालावरून हात फिरवला... प्रणिती त्याच्या कुशीत अगदी घट्ट मिठी मारून झोपली... तो मात्र टक्का जागा होता ... तिचा तो निरागस चेहरा बघत ... खूप जोरात रडावं वाटत होत.... पण ते हि करू शकत नव्हता.. तिला घेऊन सगळ्यापासून दूर कुठेतरी जावं जिथे फक्त ती आणि तो एवढाच असतील असं वाटत होत.... पण वेळ निघून गेली होती.... 


सकाळीच प्रणिती ला जाग आली तर तो बाजूला नव्हता... खाली असतील म्हणून तिने पटापट सगगल आवरलं ... मंगळसूत्र घालायला जाणार ते हातातून खाली निसटलं...




"ohh god ..."तिने खाली वक्त ते उचललं पण मधून तुटलं होत... 

"मॉम तर बोलल्या होत्या असं झालं तर अपशकुन होत...."तिने त्या तुटलेल्या मंगळसूत्रावरून हात फिरवला आणि सोनाराकडे जाताना देऊ असा विचार करत purs मध्ये ठेवलं.... 

तुंमध्ये बाहेर पडत ती पायऱ्या उतरत होती... कि हॉल मधला शांत नजर दिसला.... घरातले सगळे मांस उभी होती.... समोर ऋग्वेद उभा होता.... प्रिया चा हात हातात घेऊन...!!!



क्रमशः