Barsuni Aale Rang Pritiche - 26 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 26

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 26

"काय झालं...?..."सगळे आपल्याकडे विचित्र पाने बघतायत म्हणून प्रिया चालत आत आली .... तिला सोफ्यावर झोपलेली प्रणिती दिसली तस डोक्यावं आठ्या पडल्या.... 



"हि...?...हि काय करतेय ...??.."प्रिया 



"तू ओळखतेयस ....??..."आजी 


"हा आजू ,... हि ऑफिसमध्ये आहे आपल्या .... आणि तीच लग्न पण झाली..."प्रिया बोलली पण अचानक तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं.... आणि तिने पटकन ऋग्वेद कडे मान वळवली तर तो एकटक प्रणिती कडे बघत होत.... 

ते बघून तर तिच्या मनाला आलेली शंका खरी ठरत होतीच कि सृष्टी बोलली 
"भाई ... वहिनीला रम मध्ये घेऊन जा.. नीट आराम करायला मिळेल ..."


तीच बोलणं ऐकून प्रिया दोन पावलं मागेच गेली ..... आधारासाठी तिने सोफ्याला पकडलं ... चेहऱ्याचा रंग उडाला होता.... समोर जे आहे ते मेनी करायला तयार होत नव्हती ती ... 



"हि...हि...ऋग्वेदाची ...?..."तिच्याकडून पुढचं बोलणं पण जात नव्हतं ... पण तिच्याकडे कोणी लक्ष दिल नाही... सध्या ती नाही तर प्रणिती महत्वाची होती..... 

ऋग्वेद ने प्रणितील उचलून घेतलं आणि रूममध्ये घेऊन गेला... मॉम काकी पण kitchen मध्ये गेल्या..  

"प्रिया ... मला बोलायचं आहे तुझ्यासोबत...."आजी प्रिया ला घेऊन त्याच्या रूम मध्ये आल्या ... ती अजूनही शॉक मध्ये होती.... एवढी मोठी गोष्ट झाली अन तिला याची कानोकान खबर पण नाही ... डोकं भिरभिरायला लागलं होत... लहानापासून ती ऋग्वेद सोबत होती ती एवढं तर नक्कीच सांगू शकला असता ना तिला....?..

"प्रिया .... मला माहितीय तुझ्या मनात काय चाललंय ... मला सुद्धा आज आले तेव्हाच समजलं ऋग्वेद ने लग्न केलय ....."त्या बोलल्या तस प्रिया ने चमकून त्याच्याकडे पाहिलं... 



"हे बघ .... मला हे पण माहिती आहे तुझ्या मनात ऋग्वेद विषयी काय आहे.... पण तो तुला फक्त एक चांगली मैत्रीण मानतो... आणि आता तर त्याच लग्न पण झाली .... एकदा त्यांना कोणालाच काही न विचारता मी सरळ बातमी देऊन चुकी केलीय पुन्हा असंकाही होऊ शकत नाही... आणि प्रणिती अगदी गॉड आहे... मला वाटत तू आता लग्नाचा विचार करावा... म्हणजे हे सगळं तुझ्या डोक्यातून निघून जाईल..."आजी 



"अ ....आजी... मला वेळ हवाय थोडा..." प्रिया तिची बॅग घेत उठली ..... 

"हो तुला हवा तेवढा वेळ घे... पण जे झाली त्याच्यावर लक्ष न देता नवीन आयुष्याला सुरवात कर... मी आहेच तुझ्यासोबत..."आजी 


"हो.... येते मी..." प्रिया त्याचा निरोप घेऊन तशीच बाहेर गेली... 



************************


"please हे पिऊन घे... तुला नंतर मेडिसिन्स पण घ्यायच्या आहेत.... माझा राग ह्याच्यावर काढू नको ..." ऋग्वेद 


तिने काहीही न बोलता सगळा juice संपवला ... नंतर ऋग्वेद ने काही गोळ्या दिल्या त्या सुद्धा घेतल्या .... आणि तशीच भितीला मागे मान टेकून बसली.... 


"झोप येतेय ....?..." तिचे बंद डोळे बघून त्याने लागोपाठ परष केला... 


ती काहीच बोलली नाही ते बघून रुग्वे थड्यावेळाने तिथून उठला... खूप वाईट होत त्याला ... एक शब्द पण बोलायला तयार नव्हती ती त्याच्याशी ... त्याच्याकडे बघत पण नव्हती.... सध्या समजावण्यात काहीच पर्याय नाहीय ते बघून तो जरा gallary मध्ये गेला .... 

"प्रणिती..?.."दरवाजातून मॉम ने हाक मारली तस तिने डोळे उघडले ... आणि उठायचा प्रयत्न केला.... 


"अरे नको नको... तुला बर वाटतंय ना ...??.."मॉम 

"हो.."आवाज फुटत नव्हतं .. हळू आवाजातच तिने सांगितलं... 

"आराम कर बाळा ... आणि काही लागलं तर फोन कर ... तू खाली येऊ नको.."मॉम ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला ... 


"एक सांगते बाळा .. तुम्ही दोघेही संज्ञान आहेत .... कोणत्या गोष्टी वर विश्वास ठेवायचा कोणत्या नाही हे तुम्हाला चंगळ माहित आहे.... पूर्ण विचार करून सगळं ठरवा.. राग माणसाकडून सगळं हिरावून घेतो..."मॉम 


ह्यावर प्रणिती ने फक्त मान हलवली.... सध्या ती कोणत्याही प्रकारचा विचार करण्याच्या मनस्थिती नव्हती .... 


"चाल आराम कर.. आणि एक तो जो फोटो होता तो ऋग्वेद च्या आजी ने दिला होता पेपर मध्ये.... आम्हाला कोणालाच ह्यातलं काही माहित नव्हतं..."मॉम ने सांगितलं आणि निघून गेल्या... प्रणिती मात्र त्या गेल्या त्याच दिशेने बघत बसली... 


एक मन सांगत होत सगळ्यापासून दूर हो पण दुसरं अडवत होत.... प्रियाच्या डोळ्यात ऋग्वेद साठी असणार प्रेम तिने स्वतः बघितलं होत... पण तो फक्त तिला एक मैत्रीण मानायचा मग अश्यावेळी तिने काय करायला हवं तेच समजत नव्हतं .... एक बायको म्हणून त्याच्यावर हक्क गाजवावा...??.. पण ती त्याची बायको आहे हे कोणालाच माहित नव्हतं... 



तिची नजर gallary त राहून बाहेर एकटक बघणाऱ्या ऋग्वेद कडे गेली.... केस विस्कटले होते.... blazer काय माहित कुठे टाकलं होत... शर्ट ची ईन पण बाहेर आली होती.... पण तरीही तो मागून उठावदार दिसत होता....

तिने घड्याळात बघितलं तर अकरा वाजत आलेले ... आज त्याची एक मिटिंग होती हे तिला... माहित होत.... आणि तरीही तो इथेच उभा होता ....... 

तिने उठायचं प्रयत्न केला पण डोकं गरगरल आणि ती पुन्हा खाली बसली.... 

"वेद ..."तिचा आवाज आला तस ऋग्वेद धावतच आत आला .. 


"तू उठायला कशाला जातेय....??... काही हवंय का..?.."ऋग्वेद ने तिला पुन्हा नीट बसवलं.... त्याच्या डोळ्यात काळजी आणि प्रेम तिला साफ दिसत होत... पण नाही ती एवढ्यात मान्य करायला तयारच नव्हती... सगळं कास अचानक घडलं होत... तिने नक्की काय काय accept करायला हवं..?.. "तुमची मिटिंग आहे ... जाऊ शकता..."प्रणिती 



"मिटिंग...?..."ती बोलली तस त्याच्या लक्षात आलं नाहीतर तो तर सगळं विसरून गेला होता..... पण प्रणितीला असं सोडून तो कुठेच जाणार नव्हता.... 



"ते तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीय..." ऋग्वेद 


"तिने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि मान वळवली.... 

"प्रिया वाट बघत असेल तिकडे.." ती तोंडात च पुटपुटली पण त्याला ऐकू गेलंच.... 

"नीती..."तो तिच्या बाजूला बसला आणि तिचा हात हातात घेतला... 

"तुला राग आलाय मला मेनी आहे.. ते जे पेपर मध्ये होत ते सगळं आजीने दिल होत ... तिला असं वाटत होत कि मी आणि प्रिया एकत्र काम करतो म्हणजे आमच्यात तस काही ... पण मी सगळं क्लिअर केली त्यांना आता माहितीय तू माझी बायको आहेस... हक्काची ,,,, आणि प्रिया ,,, माझी फक्त मैत्रीण आहे.... आणि मॅनेजर बस्स.... तुला हवं असेल तर मी तिच्याशी बोलणं पण बंद करेन पण तू please असं नको ना करू..."ऋग्वेद 


प्रणिती ने त्याच्याकडे बघितलं... डोळ्यात पाणी जमा झालं होत.... 


"म... मला.... काहीच समजत नाहीय..."तिने मान हलवली... 


"its ok ... तू हवा तेवढा वेळ घे... हा.. जास्त स्ट्रेस घेऊ नको.."
ऋग्वेद ने तिच्या गालावरून वाहणार पाणी पुसलं.. ती बोलतेय तेच खूप होत त्याच्यासाठी सध्या तरी .....


"तू अराम करतेस ना आता...?.."ऋग्वेद 

"हम्म .." गोळ्याच्या आम्लामुळे तिला आता गुंगी येत होती... 

त्याने तिला नीट झोपवलं.. आणि AC च temperature सेट केलं.... तिच्या डोक्य्वर अलगद ओठ टेकवत तो बाजूला झाला.... 


"आज तुझी ओळख सगळ्या जगासमोर नक्कीच होईल..."तो हसला ... आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला... 


*****************************************

"मला वाटतंय तुला जास्त आनंद झालाय म्हणून तू असं काहीही बोलतेय...." श्रुती

"मी काहीही बोल्ट नाहीय... ती ... ती प्रणिती माझ्या ऋग्वेद ची बायकोआहे...."प्रियाने पुन्हा एक घोट पिला... दोघीही बार मध्ये बसून wine पी होत्या... प्रिया रंगात सगळी बॉटल संपवत होती... डोळे तर लाल झाले होते... असं वाटत होत आता प्रणिती समोर आदी असती तर ती नक्की च तिचा गळा आवळेल .... 

"पण ऋग्वेद सरानी लग्न केलं आणि तुला सांगितलं नाही ..?..."श्रुती 


"तेच तर... ऋग्वेद ने पण लपवलं.. त्या प्रणिती ला तर मी सोडणार च नाही .... कुठची middleclass मुलगी लायकी तरी आहे का तिची ऋग्वेद च्या बरोबरीने उभी राहायची..??.."प्रिया 


"मला तर वाटत नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार..." श्रुती 


"म्हणजे ...??.."प्रिया 

"साराच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला माहित असते .. पण त्यांनी असं लग्न केलं तुला माहित नाही... आणि पहिलं म्हणजे त्यांनी असं अचानक लग्न केलं च का...?.... काहीतरी कारण नक्कीच असणार... may be ती त्याची कोणतरी one night असेल..??.."श्रुती 


"नाही ... ऋग्वेद असा नाहीय,..."प्रिया 


"हे बघ प्रत्येकाला शारीरिक गरज असतात आणि सर काय असल्या गोष्टी तुझ्याशी discuss करून करणार नाही.. त्याच्या आई ला वैगरे समजल असेल आणि त्याच लग्न लावलं.... मग सर तरी कोणाला सांगणार..?.."श्रुती 



"म्हणजे हे लग्न फक्त तडजोड आहे असं म्हणायचं आहे का... तुला...?"प्रियाची आता tube पेटली.... 


"yes .... हे बघ ती दिसायला बरी आहे.... पण सरानी समोर आणलं नाही म्हणजे तिच्यात नक्कीच काहीतरी दोष असणार ... असं पण असू शकत कि सर सगळ्यांसमोर तिच्याशी चंगळ वागण्याचं नाटक करतायत ... तुला शोध लागेल..."श्रुती 


"असं असो किंवा नसो पण त्या प्रणिती ला मी ऋग्वेद च्या आयुष्यात राहू देणार नाही .. तो फक्त माझा आहे..."प्रियाने समोर च्या पेपर वर नजर टाकली .... 


"माझ्याकडे कोणतं काम सेल तरी नक्की सांग... मी पण माझा अपमान विसरले नाहीय.."श्रुती 

प्रिया हसली .... आता तिला ऋग्वेद वरच प्रेम नाही तर तिच्या ego ची पडली होती... सगळ्या ऑफिस मध्ये तिने पसरवलं होत ऋग्वेद तिच्यावर प्रेम करतो आणि आजच्या पेपर मधली news बघून तर तिला कित्येक जणांचे अभिनंदनाचे फोन पण आले होते.... सूर्यवंशी घराण्याची सून बनण्यात किती ताकद आहे हे तिला चंगळच माहित होत... आणि तिला तेच हवं होत....

स्वतःच्या घरात सुद्धा तिच्याशी चंगळ ह्यासाठी च वागत होते कि त्यांना वाटत होत प्रिया लग्न करून तिथे गेली कि त्यांना खूप पैसे मिळतील पण हि news बाहेर समजली तर तिच्याच घरात तिची इज्जत राहणार नव्हती ... पण ती जो विचार करत होती त्याच्या दोन पावलं पुढे होता ऋग्वेद चालत होता ... त्याने तर आधीच संध्याकाळी conference बोलवली होती.. आणि तिला समजलं तेव्हा राग आलाच पण डोक्यात लागोपाठ काहीतरी आयडिया आली आणि ती हसली... 


हि conference होऊच शकत नाही .... आणि झाली तर प्रणिती ला अजून बदनामी सहन करावी लागेल... तिने कोणालातरी फोन केला.... 


क्रमशः