"हे सगळं गोल गोल का फिरतंय ...."प्रणिती डोक्याला हात लावत उठली .... पण तिला समोरची भिंत हलताना दिसत होती...
डोळे चालूबंद करत तिने झटकली ... तास डोके दुखायला लागलं.....
"आह .... आई ग ....."ती एका हाताने डोके दाबायला लागली....
तेवढ्यात दरवाजातून ऋगवेद हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन आला....
"हे घे.... डोकं दुखत असेल ना.." त्याने तिच्यापुढे ग्लास धरलं.... तिने पण मागचा पुढचा विचार न करता सगळं रिकामी केलं .... तेव्हा कुठे थोडं बार वाटायला लागलं...
""थँक्स ..."तिने ग्लास बाजूला ठेवलं ... पण तेवढ्यात लक्ष बाजूला असलेल्या आरश्यात गेलं.... आणि ४४०volt चा झटका लागल्यासारखे तिचे डोळे मोठे झाले..... पूर्ण शरीर थरथर कापायला लगल ... त्या सकाळच्या गारव्यात पण तिला घाम फुटायला लागला.....
"प्रणिती ...."वेद ने तिला हाक मारली.... तिने भानावर येत ब्लॅंकेट पूर्ण अंगावर ओढून घेतलं... तिचा तो चेहरा बघून वेड थोडीच शांत बसणार होता....
"आता लपवून काय उपयोग .... काळ जे व्हायचं ते झालंच..." त्याने चेहरा पकडत सांगितलं.... त्याच बोलणं ऐकून तिच्या अंगातून वीज सळसळत गेली.... घास कोरडा पडला ... पण तरी तिने हिम्मत करून विचारलं....
"क ..काय झालं...???..."प्रणिती
"तेच जे नवरा बायको मध्ये होत...." वेड ने जरा लाजत सांगितलं...
"म ....म्हणजे ...???..."प्रणितीने आवंढा गिळला ....
"मी डिटेल मध्ये सांगू.... चालेल ना...??..."वेद
"न ...नको...."प्रणितीने कानावर हात ठेवले...
"तरी मी तुला थांबवण्याचा किती प्रयत्न करत होतो.... पण तू होतीस कि..."वेद
प्रणितीला आता कुठेतरी गायब व्हावं असं वाटत होत... लाजेने तिचे गाळ टोमॅटो पेक्षा लाल झालेले... असं वाटत होत gallary मध्ये जाऊन तिथून उडीच मारावी .... पण तीच शरीर साथच देत नव्हतं ....
"मला मॉम बोललेली कि ती किती शांत आणि नाजूक आहेस.... पण काळ तर..."वेद
"मी काय केलं..??..."तिने चेहऱ्यावरून एक हात काढत त्याच्याकडे बघितलं....
"तू ना हे बघ .... नख ...." त्याने खांद्याकडे असलेली नखांचे निशाण दाखवले ... ते बघून तर आता प्रणितीच लाजून पाणी पाणी झालं....
"मी बिचारा नवरा..... किती थांबवायचा प्रयत्न करत होतो.... पण तू मला सोडायलाच तयार नव्हती......" तो येणार हसू कसबस आवरत होता... तेवढ्यात मॉमचा फोन आला... त्याने मुद्दाम स्पीकर वर टाकला...
"हा मॉम...."वेद
"वेद अरे काळ रात्री फोन करायला विसरलास ..... घरी गेलेलास ना...??... कि ऑफिस मधेच होतास....???..."मॉम
"मॉम ... आता तुला काय सांगू काल रात्री काय काय झालं..."ऋग्वेद
प्रणितीने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली......
"काय झालं...??..."मॉम
तो डोळ्यांनीच प्रणितीला विचारायला लागला सांगू का...???...ती नाही नाहीम्हणून मान हलवत होती....
तस वेद ने स्पीकर वर हात ठेवला ...
"मी मागेल ते मला द्यायचं ... तरच नाही सांगणार ...."वेद
"ok..."प्रणितीने मान हलवली
"हे divorce मागणार आहेत का...???..."तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली....
ऋग्वेद फोन घेऊन gallary मध्ये गेलं..... तस प्रणिती पळतच बाथरूममध्ये घुसली...
"काय होती हे मला...???>>हे सांगतात तस खर्च ...???..पण मला तर काहीच जाणवत नाहीये..."प्रणिती ने एकदा स्वतःच्या शरीरावरून हात फिरवला....
"ohh god ....."तीच लक्ष बाजूला पडलेल्या साडी कडे गेलं आणि तिला लाजायला झालं... शेवटी तिने डोकं झटकत अंघोळ केली... अमी ड्रेस घालून बाहेर आली...
तर वेद बेड वर बसून तिच्याकडेच बघत होता.... तिने एका डोळ्याने त्याच्याकडे बघितलं तर तो हसत होता.. आता तिला खर्च तिथून पळून जवस वाटत होत....
"हा.... sss तर मी मागून ना.. मला हवं ते.." तो उठला आणि तिच्यासमोर आला... आता पुन्हा तिची बोलती बंद झाली ..... तिने फक्त मानेनेच होकार दिला ...
"मला... ना.... " त्याने बोलता बोलता तिला जवळ ओढलं ... तिची छती आता जोरात धडधडत होती....
"माझी इच्छा आहे कि तू माझं frendship च proposal accept करावं..."ऋग्वेद
"हा...???..."प्रणिती blank होऊन त्याच्याकडे बघतच राहिली .... तिला कधीच वाटलं नव्हतं तो असं काही मागेल.... "असं बघू नको.. तू प्रॉमिस केली.... मी मागें ते पूर्ण करणार ..."वेद
"पक्के businessman आहेत..."प्रणिती मनातच बडबडली....
"तू बोल्ट का नाहीय ...??... काळ रात्री किती बोल्ट होती..??..." वेद
"न..नाही...ते...?...."प्रणिती तरी काय सांगणार होती .. तो जवळ आल्यावर तिची काय हालत होते....
"okay .... आता माझ्या लक्षात आलं ... तू मला घाबरतोय का....???...listen मी राक्षस नाहीय... हा मी आधी तुला त्रास दिला... but that was my mistake ... अँड i am sorry for थाट....."ऋग्वेद
"its ok ..."प्रणितीचे चे ओठ रुंदावले......
"एवढुस...?... you know आयुष्यात पहिल्यांदा कोणालातरी तरी मी सॉरी बोललोय ... तर अजून पण काही तरी बोल...."ऋग्वेद
"ohh god काय माणूस आहे... सॉरी पण बोलतो आणि क्रेडिटपण स्वतःच घेतो....."प्रणिती ने डोळे फिरवले....
"हा.... पण एक सांगतो .... माझी friendship एवढी सोपी नाहीय हा.... मी खूप त्रास देतो... "ऋग्वेद
"ठीक आहे..."प्रणिती ने मान हलवली ....
"एक सिक्रेट सांगू ..."वेड ने तिच्या ओल्या केसातून हात फिरवत विचारलं...
"कं ....काय....?...."प्रणिती
"काल आपल्यात काहीच झालं नाहीय ....."ऋग्वेद
"जा....???..खरच ...."प्रणिती आनंदाने ओरडली....
"एवढ्या जोरात ओरडू नको... मी थांबवली तुला... नाहीतर तू तर..."तो हसायला लागला.... तस ओशाळून प्रणिती ने मान खाली गाठली....
"अम्म्म तर आपल्या friendship ची सुरुवात आपण तुझ्या हातची कॉफी घेऊन करूया का..??..."वेद
"ह ...हो...मी बनवते..."प्रणिती
"एक गोष्ट आहे तुझे पाय खूप सेक्सी आहे...."तो डोळा मार्ट बोलला आणि बाथरूम मध्ये पळाला ....
"देवा .. काय बोलतात हे...."प्रणिती ने डोक्याला हात लावला..... पण चेहऱ्यावर एक गॉड हास्य होत..... न जाणे किती दिवसांनी आलं होत....
"पण मला एक समजत नाहीय..... ह्यांना जर मॅनेजर प्रिया सोबत लग्नच करायचं आहे तर मग हे सगळं ... नक्की कोणत्या ऋग्वेद वर विश्वास ठेवू मी ...?... ह्या कि आधीच्या ...?.... "तिच्या मनात प्रश्न पडलाच ...
अर्थात ह्यात ऋग्वेद ची सुद्धा पूर्ण चुकी नव्हतीच ... त्याचा मुलीवर विश्वास नव्हता ह्याला सुद्धा कारण होतेच .... जेव्हापासून कॉलेज ला जायला लागला तेव्हापासून त्याच्या आजूबाजूला मुली फॊजच पैशासाठी फिरायच्या जे त्याला अजिबात आवडतंच नाही त्यातच त्याच्या एका मित्राने मुलींसाठी जीव दिला त्यामुळे मनात एक राग निर्माण झाला तो अजून तसाच होता....
एक प्रियाचं होती जी अगदी लहानापासून त्याच्यासोबत होती.... पण तिने आतापर्यन्त कधीच त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता.... आता प्रणिती च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा बदलण्याचा प्रयत्न करत होता... पण फक्त मॉम ने सांगितलं म्हणून ......
हो लहानपणापासून लाडात वाढलेला होता.... आणि आता तिच्याकडून हट्ट पुरवून घेत होता... खूप मस्तीखोर आणि हत्ती होता.. तो सुरवाती पासूनच .... आणि त्याच हे रूप तो फक्त काही लोकसमोरच आंत होता...
असं अजिबात नव्हतं कि प्रणिती च्या बाबतीत त्याच्या मनात प्रेम झाली म्हणजे तो तिच्यावर विश्वास ठेवेल.... त्याच्या स्वभावच नव्हता तो..... पण एक होत तिच्या सोबत असल्यावर तो त्याच्या मूळ स्वभावातच असायचा... ज्या गोष्टी आतापर्यन्त केल्या नाही त्या तिच्यासाठी कराव्या वाटायच्या ....
पण आता ह्या नात्यात नक्की विश्वास किती होता हे तर येणारी वेळच ठरवणार होती....
************************
"कसे आहेत हे... आणि किती हत्ती ..." कॉफी करता करता प्रणिती त्याचाच विचार करत होती.... चेहेऱ्यावर एक मनमोहक हास्य होत.... ते बघून तिथे असलेल्या maid पण खुश होत्या....
"प्रणिती मॅडम कॉफी झाली ...."एका maid ने तिला आवाज दिला... तस ती भानावर आली आणि डोक्यावर हात मार्ट दोन मग मध्ये कॉफी घेतली...
ती त्याच्यासारखी नव्हती ... तिच्या आयुष्यात खूप कमी माणसं आली होती... पण जी आली होती ती तिच्यासारखीच होती त्यामुळे तिने जगाची दुसरी बाजू बघितलीच नव्हती .... बस समोरचा जे सांगेल त्यावर विश्वास ठेवायचा हा तीचा स्वभाव होता....
कोण जरा सुद्धा वाईट बोललं तर लागोपाठ तिच्या मनाला लागायचं ...
दोघांनी थोडंफार बोल्ट ब्रेकफास्ट केला.... आणि नंतर वेगवेगळ्या गद्यामधून ऑफिसला निघून गेले....
मैत्री तर झाली होती पण त्या नात्याला सुद्धा एक awkwardness होता... आता तो दूर करण्यासाठी कोण किती प्रयत्न करतो कि नवीन नातं जोडण्याच्या नादात सगळंच हातातून निसटून जाईल हे येणार काळ ठरवणार होता.....
क्रमशः
"काय आहे हे..?... असं काम करत का कोण ...?..." श्रुती मुद्दाम प्रणिती ला ओरडत होती .... त्या चुकी वरून जी प्रणिती ने केलीच नव्हती....
"ह्या file मध्ये किती चुका आहेत माहिती तरी आहे का तुला ..?..आणि अशी file मी वर पाठवली ना तर तुझ्यासोबत मलासुद्धा ओरडा ऐकावं लागणार द्यावयाची येतेस का तू.....?.... "श्रुती चा आवाज बाहेर त्या floor वर बसलेल्या प्रत्येक एम्प्लॉयी च्या कानावर पडत होता.... आणि आता त्यांना प्रणिती वर द्या येत होती. कारण त्या प्रत्येकाने तिला इथे आल्यापासून फक्त काम करताना बघितलं होत... काम आणि घर दोन्ही ठिकाणी सावरू शकेल का स्वतःला..???.. ऑफिसमध्ये चाललेला अन्याय ऋग्वेद ला सांगेल का ती कि त्याला दुसरीकडून समजेल...???