"तुझा चेहरा एवढा का उतरलाय ..?..."काव्या ने ऑफिस मध्ये आल्या आल्या प्रणिती ला विचारलं .....
खरच एका रात्रीत तिची अवस्था बिघडली होती...डोळे सुजले होते... चेहरा पण सुकून गेलेला..
"काय ग...?.. कुठे लक्ष आहे....?"काव्या
"अग न ... नाही ... काही नाही.... ते असच ...."प्रणिती ने चेहऱ्यावरून हात फिरवला....
"एक ... एक मिनिट.... तुझ्या सासरचे तुला त्रास तर देत माहित ना.. असं असेल तर मला सांग हा भल्या भल्याना सरळ केली मी..."काव्या तिच्या शर्ट चे हात वर ओढत अगदी भांडण करायच्या तयारीतच बोलली....
"नाही ग... काल रात्री झोपायला जरा उशीर झाला ना त्यामुळे .."प्रणिती
"उशीर...?.. हा..?...अहं ...?..."काव्या ने लागोपाठ तिला कोपर मारला... प्रणिती ने तिच्या कडे बघितलं.... तिच्या चेहऱ्यावरूनच समजत होते तिच्या विचाराची ट्रेन कुठे पोह्चलीय....
"हे...हे.....बघ...तू ....जसा विचार करतेय तस नाहीय .... मी...मी...काम करत होते...."प्रणिती
"मी काही बोललेच नाही... चोराच्या मनात चांदणे ...."काव्या ने हसत खांदे उडवलले...
"तू सुधारणार नाही ..."प्रणितीने मान हलवली...
"ए पण मला साग ना तुझे मिस्टर कसे दिसतात... handsome आहेत का...?... हा पण सारापेक्षा नसणार...."काव्या
प्रणिती ला ह्यावर काय सांगायचं ते समजत नव्हतं ... हा पण handsome म्हटल्यावर त्याचा कालचा किस करतानाच चेहरा समोर आला आणि आपोआप तिचे गाळ गुलाबी झाले.....
"बोलताय काय तुम्ही..?... ह्यासाठी आलात का इथे...?... "श्रुती ओरडतच बाहेर अली.... त्या floor वर असणारा सगळा स्टाफ दोघींकडे बघायला लागला....
"इथे बोलायचे पैसे मिळत नाहीत तुम्हाला...?... आणि काय ग तू...(प्रणिती कडे बघत..)लग्न झाली ना मग सरांच्या मागे काय लागतेय... लाज नाही वाटत...?middleclass ... लागोपाठ माझ्या केबिन मध्ये गेली....
प्रणितीला समजेनाच नक्की काय झालं .... डोळ्यातून पाणी वाहायला लागलं... सगळे लोक तिच्याकडे बघून गालातच हसत होते...
पाणी पुसत ती केबिन मध्ये गेली.... श्रुती ने तिच्यासमोर जवळ जवळ दहा फाईल्स चा गठ्ठा ठेवला...
"ह्या सगळ्या आजच्या आज पूर्ण झाल्या पाहिजेत ... आणि मागच्या फाईल्स मध्ये खूप चुका होत्या... तस पुन्हा होता नये..."श्रुती खोटंच बोल्त होती......
प्रणिती ने मान हलवत फाईल्स उचलल्या... आणि बाहेर निघणारच होती कि पुन्हा श्रुती चा आवाज आला... वतःला सगळ्यात सुंदर समजून सारण जाळ्यात उठायचा पयतन करत अशील ना तर ती सोडून दे.. त्यांनी आणि मॅनेजर प्रिया मॅडम नि लग्न करायचं ठरवलंय, सारण तुझं हे घाणेरडे वागणं समजले ना तर तुला कंपनीत मधून बाहेर टाकणार ..."श्रुती
तीच बोलणं ऐकून प्रणिती हे येणार हुंदका आवरला..... आणि files बाहेर आणून तिच्या टेबल वर ठेवल्या... आणि पळतच वोशरूम मध्ये गेली ....
*********************************
"वेद इथे येऊन ना अर्धा तास झालाय... आणि तू चार कॉफी संपल्यावर ... आता तरी बोल काय ते.... नाहीतर मी जातो..."निरव
"हो यार .... वेद काय लावली तू....?..."राकेश
"जरा वेळ शांत बसू शकत नाही का तुम्ही ...?..." ऋग्वेद त्या दोघांवर ओरडला...
"वेड आता बोल.."निरव
"okay...okay तर मला .... हे सागांयच आहे कि..."ऋग्वेद प्रत्येक शब्द बोलताना विचार करत होता.... कारण त्याला माहित होत त्याचे मित्र कसे आहेत.... जरा जरी शब्द इकडच्या तिकडे झाला तर ते अर्थाचा अनर्थ करायला मागे बघणार नाहीत....
"जस तुम्हाला माहीतच आहे माझं लग्न झाली.."ऋग्वेद
"हो.... माहितीय आम्हाला न बोलवता ... आणि तू ते लग्न मानत नाहीय ..... नवीन कायतरी सांग ..."राकेश
"ते म्हणजे ... ती ... तिचा.. चेहरा... सारखा माझ्यासमोर येतो..."ऋग्वेद
"कोण ती ....?... एक ....एक मिनिट तुझं बाहेर काहीतरी affair वैगरे चालू नाहीय ना....?... हे असलं आम्हाला पटणार नाही हा वेद ..."निरव
"तुम्ही थांबा ना मला बोलू द्या ..."ऋग्वेद ने डोक्यावर आठ्या आणत त्याच्याकडे बघितलं.... तस त्यांनी तोंडावर बोट घेतली.... "ती म्हणजे माझी बायको प्रणिती.."तो स्पष्टच बोलला ... पण तीच नाव घेतल्यावर मात्र त्याच्या मनात गुदगुदल्या झाल्या....
त्यांना माझी बायकोम्ह्टल्यावर ह्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि गालात हसले पण तोंडावरचा हात काही काढला नाही...
"मला सारखं असं वाटलं कि ती माझ्यासमोरच असावी .... ती माझ्या आजूबाजूला असते तेव्हा मला छान वाटत .... तिच्या डोळ्यात पाणी बघून मला कसतरी होत... हे असं का होती...?.."ऋग्वेद
निरव आणि राकेश तोंडावरचा हात काढणारच कि मागून आवाज आला ....
"कारण तू प्रेमात पडलायस ..."त्या दोन मुली ओरडतच आल्या... आणि अख्ख cafe डोक्यावर घेतलं... त्यांना बघून ऋग्वेद ने डोक्याला हात लावला...
त्या निरव आणि राकेश च्या बायको होत्या... साक्षी आणि रिया... "तू लग्न केलं ते आम्हाला सांगितलं नाही .... वरती काय रे लग्न मानत नाही म्हणून सांगतो ...."दोघीनी त्याच्या पाठीत हात मारले....
ऋग्वेद शांत बसून राहिला ... ह्या दोघीसमोर त्याच काहीच चालायचं नाही ... तो काही बोलला तर अजून lecture मिळणार त्यापेक्षा त्याने शांत राहणंच पसंद केलं ....
निरव आणि राकेश ने तोंडावरचा हात काढला ... आणि दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागले ....
"कोणीतरी बोललं होत मी कधी च प्रेमात पडणार नाही.." निरव वेड ची acting करत बोलला...
"मी तिला माझी बायको मानतच नाही ..."राकेश ने पण हसत त्याला टाळी दिली ....
"आबे प्रेमात पडला नाही चांगला आपटला आहे हा ...."साक्षी
"हि तुला अजून पण respect देत नाही...?..."राकेश ने निरव च्या कानात विचारलं .... आणि दोघेही हसायला लागलेत..
ऋग्वेद फक्त त्या चोघांकडे बघत होता.... जे सध्या त्याच्या परिस्थितीवर हसत होते...
"तुम्ही आता पुढे काही बोलणार आहेत कि मी जाऊ ...?..."ऋग्वेद
"असं कास.. आता तर तुझ्याकडून सगळं detail हवंय...."रिया
"तुला कधी realise झालं तू तिच्या प्रेमात झालं पडलाय...?.."साक्षी
"काल रात्री .." ऋग्वेद
आणि हे चोघेही त्याच्याकडे बघत गालात हसायला लागले... काही आवाज येत नाही म्हणून त्याने वर बघितलं तर ते त्याच्याककडे बारीक डोळे करून बघत होते ....
"Bas*ard तुम्ही समजतंय तस काही नाही ... काळ रात्री माझ्याकडे divorce घेऊया का विचारायला आलेली.."ऋग्वेद
आता ते सगळे जोरात हसायला लागले ... ऋग्वेद ला आता उठून त्याची तोड फोडावी वाटत होती.... पण तो तस पण करू शकत नव्हता.... मित्रच असे मिळाले होते त्याला....
"काय परिस्थिती आलीय ऋग्वेद सुरवंशी वर ... हि तर breaking news हाये..."राकेश
"shut up आणि काहीतरी उपाय सांगा ... तिला कस सांगू मी..."ऋग्वेद
"आम्ही कशाला आहोत मग....?.."चोघेही एकत्रच बोलले ....
"हे बघ आज रात्री आम्ही तुझ्या घरी येतो.. वाहिनीच्या हातच जेवायला पण मिळेल आणि तुला काही suggestions पण देऊ ..."राकेश
"वाहिनीच्या हातच जेवण ...?..."ऋग्वेद मनातच हसला...
"ठीक आहे मग ... मी येतो आता...."तो गाडीची चावी घेत उठला.... आणि निघाला....
त्यानंतर ह्या चोघांनी काहीतरी planning केली आणि स्वतःलाच शाबाशी देत तिथून बाहेर पडले...
***********************
ऋग्वेद ऑफिसमध्ये आला आणि CCTV चालू केला तर रडलेला चेहरा दिसला...
"हिला खर्च कालच्या गोष्टीचा एवढा त्रास झालाय...?.. मी जास्तच केली का...?... पण तिच्याकडे बघून मला खर्च माझ्या feelings कंट्रोल करता येत नाही... जर राकेश आणि निरव सांगतात ते खार असेल तर Yes ... i am in love with her ....!.."तो स्वतःशीच बोलला.... आणि हसला....
आज सकाळी तो लवकरच उठून बाहेर आला होता... तिला सकाळी उठल्यावर पुन्हा awkward वाटायला नको म्हणून तो तिच्या उठण्याच्या आधी फ्रेश होऊन पाहिलं प्रियाचा अनिल बघायला गेला होता आणि नंतर निरव आणि राकेश ला भेटायला....
"बस्स .... ह्यांच्यानंतर तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही.... तुझ्या चेहऱ्यावर गोड हसनच चंगळ दिसत...."त्याने लॅपटॉप च्या स्क्रीन वरून हात फिरवला.... आणि फुटेज बंद करत कमला लागला.....
क्रमशः
साक्षीने wine ची बॉटल खोलली आणि सहा ग्लास मध्ये ओतली एका ग्लास मध्ये तिने बर्फ घातलाच नाही... आणि तो ग्लास प्रणितीकडे दिला...
"मी...मी पिट नाही . नको मला.."प्रणिती
"आग फ्रुट juice च आहे तो.... बाकी काही नाही.... एकदा try कर .... नाही आवडलं तर पुन्हा घेऊ नको..."साक्षी तीच ऐकून प्रणिती ने अक्ख ग्लास त्याच्या समोर रिकामी केलं... बाकीच्या सगळ्यांना सवय होती त्यामुळे त्यांना काही वाटले नाही... पण प्रणितीला एका ग्लास मधेच धुंदी चढायला लागली होती.... काय प्लँन केला असेल ऋग्वेद च्या मित्रांनी...???... नशेमध्ये प्रणिती काय करेल...?? नवीनच जाणीव झालेल्या प्रेमाची कबुली देईल का ऋग्वेद ....???