अहमदाबाद हायवेवरुन बिऱ्हाडाकडे परतताना बुवांचे शब्द ईश्वराच्या देवळातील धडाम् ss धुडूम् ss वाजणाऱ्या नगाऱ्यासारखे माझ्या कानात घुमत राहिलेले....! “कलेची साधनाम्हणजे मोठं दिव्य असतं.... खर्डेघाशी करण्याइतकी सवंग-सोपी गोष्ट नाही ती. एकवेळ गायकी जमेल. ईश्वराने गोड नरडं दिलेल असेल तर थोड्याफार प्रयत्नाने गायक बनणं फारसंअवघड नाही.... पण संवादिनीवर कब्जा मिळवणं भलतं जटिल... सगळ्या संवेदना कर्णपटलात केंद्रित करुन गायकाचा नेमका सूर अचूक पकडायचा आणि तो मनात साठवित बोटांच्या माध्यमातून संवादिनीच्या स्वरमंडलातून उमटवायचा म्हणजे बजवैया अष्टावधानी, सावधचित्त असावा लागतो.
स्वर आले जुळूनी - भाग 1
स्वर आले जुळूनी अहमदाबाद हायवेवरुन बिऱ्हाडाकडे परतताना बुवांचे शब्द ईश्वराच्या देवळातीलधडाम् ss धुडूम् ss वाजणाऱ्या नगाऱ्यासारखे माझ्या कानात घुमत “कलेची साधनाम्हणजे मोठं दिव्य असतं.... खर्डेघाशी करण्याइतकी सवंग-सोपी गोष्ट नाही ती. एकवेळ गायकी जमेल. ईश्वराने गोड नरडं दिलेल असेल तर थोड्याफार प्रयत्नाने गायक बनणं फारसंअवघड नाही.... पण संवादिनीवर कब्जा मिळवणं भलतं जटिल... सगळ्या संवेदना कर्णपटलात केंद्रित करुन गायकाचा नेमका सूर अचूक पकडायचा आणि तो मनात साठवित बोटांच्या माध्यमातून संवादिनीच्या स्वरमंडलातून उमटवायचा म्हणजे बजवैया अष्टावधानी, सावधचित्त असावा लागतो. स्वराची दीर्घ-त्रोटक लांबी, तीव्रता बोटांच्या कसबाने नियंत्रित करायची असते. एककल्ली सराव करुन रागदारीची मांडणी अवगत होते. तालाची समज ही प्रयत्नाने साध्य होते ...Read More
स्वर आले जुळूनी - भाग 2
पण कुणी नवशिका, येरा गबाळा असेल तर सरळ नाही म्हणायचे.काही भजनीबुवा तर मृदंग वाजवावा अशा आवेशात पेटीच्या सुरांवर खडा-खडा मारायचेअसल्या वाजप्यांच्या हाती सोन्यासारखं हत्यार सोपवायला भाऊ राजी नसत. आम्हा पोराबाळांची तर पेटीला हात लावायची बिशादच नव्हती. सातवीला पी.एस्सी – केंद्राची परीक्षा व्हायची. त्यावेळी या परीक्षेला मोठी प्रतिष्ठा. चार-पाच शाळांसाठी एक केंद्र असायचं. पी.एस्सीला ६८%गुण मिळवून मी केंद्रात पहिला आलो. हेडमास्तर पडवळ रिझल्ट घेऊन आल्यावर मुद्दामआमच्या घरी माझ कौतुक करायला येऊन गेले. पेळप केंद्रात पावणे दोनशे मुलांमध्ये मीपहिला आलो. गुणांच्या टक्केवारीत तालुका स्तरावर माझ्यापेक्षा चार गुण अधिक मिळविणारी देवगडची कुणीतरी मुलगी पहिली आणि माझा नंबर दुसरा आला. पडवळ गुरुजी चहा ...Read More
स्वर आले जुळूनी - भाग 3
स्वर आले जुळूनी भाग 3आता दिवसभर नुसती त्रेधा तिरपट व्हायची पण माझ्या पेटीच्या छंदात व्यत्यय आला नाही हाआनंद कष्टापेक्षाही वाटायचा मला. आपटे बुवा नामांकित गवई आणि वादक. गायनाच्या जोडीला पेटी, तबला, सारंगी वादनातही त्यांनी व्यासंग. अगदी नेमस्त मोजक्याच शिकवण्या त्यांनी घेतलेल्या. बुवांचा संपर्क मोठा आणि संपन्न विश्वनाथ बागूल, रामदास कामत, प्रभाकर कारेकर, बकुल पंडित,वासुदेव चंद्रचुड, प्रसाद घांग्रेकर अशा दिग्गज मंडळींची बुवांकडे उठबस. मुंबई आकाशवाणी केंद्रावर बुवांचे शास्त्रीयसंगीताचे कार्यक्रम नियमीत व्हायचे. बुवांच्या मार्गदर्शनाखाली पेटी वादनात मला प्रभुत्व मिळणार याची खूण गाठ मी बांधली. रोज आठ ते साडे दहा अडीज तास शिकवणीचालायची. बुवा गळ्यानं सुरांची छाननी करायचे अन् ते स्वरमंडल मी ...Read More
स्वर आले जुळूनी - भाग 4
स्वर आले जुळूनी भाग ४त्याच्या पदरची कॉफी पिऊन अॅडमिशनफार्म घेतला. चार दिवसांनी नंदा आली. तिची कागदपत्र घेऊन मी पुजारीकडे १५ मिनीटात सगळे सोपस्कार पूर्ण करुन रसिट आणि आय कार्ड माझ्या हातातसुपुर्द केलं. बुवांनी विश्वासाने सोपवलेलं अवघड काम आपल्या हातून पूर्ण झाल्याच्याआनंदात त्या संध्याकाळी मी शिकवणीला गेलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी पेटी उघडून बुवांनी काल दिलेली चीज वाजवायलासुरुवात केली. पेटीचे सूर ऐकून बुबा बाहेर आले. मी फी रसीट, आयकार्ड बुवांकडे देत अॅडमिशन झाल्याच बोललो. बुवा आत गेले. मी रियाझ सुरुकेला. चार-पाच मिनीटात बुवा बाहेर आले. शिकवणीला सुरुवात झाली. साधारण अर्ध्या तासानेट्रे मध्ये चहाचे कप घेऊन सुनंदा बैठकीत आली. बुवांना ...Read More
स्वर आले जुळूनी - भाग 5
मी रस्त्याच्या कडेला थांबवून तलतचे मधुर आर्त स्वर कानात साठवीत राहीलो. त्यांच्या सुरातला कंप, थरथर आणि आर्तता हृदयाचा ठाव गाण्याचा मुखडा ऐकून मी केलेला अंदाजही पुढची ओळ ऐकल्यावर साफ चुकलेला. ते गीत प्रेमांच साफल्य सुचीत करणारं नव्हतचं मुळी कारण पुढच्याच ओळीत कवी म्हणतो, "बदले में हमको गम दिया ssशुक्रिया ss" वैफल्यातही आनंद असतो.... मला नंदाची प्राप्ती नक्कीच होणार नाही पण तिच्या संगतीत सुरांचा साक्षात्कार होऊन माझ्या कौशल्यात पूर्णत्व येईल हे नक्कीच नाहीतर आयुष्यात समोर दिसणारी प्रत्येक चांगली वस्तू तुमच्या उपभोगासाठी विधात्यानं निर्मिली आहे असं थोडचं असणार आहे? नकळत तलतचा आणि त्या गीतकाराचा ...Read More