थंड झाल्यार खावचा

(8)
  • 69
  • 0
  • 8k

पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोप भरून पाणी तापत लावले आणि बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपाला लागा. ” त्याचे बरोबरच होते. पाच गावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगी बेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला मिळायल

1

थंड झाल्यार खावचा - भाग 1

पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोपभरून पाणी तापत लावले बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपालालागा. ” त्याचे बरोबरच होते. पाचगावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगीबेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला ...Read More

2

थंड झाल्यार खावचा - भाग 2

थंड झाल्यार खावचा भाग २ पार्वतीची नड ओळखून भटणीने आपल्या गोठ्यातली हत्ती सारखी दांडगी ,वेळेला अडीच शेर देणारी ढवळी गाय तिने सोडून दिली नी रत्नूला बजावले, “ सोयन् बाळगलस तर तुजो झील अन्नाक लागासर दुद काय कमी पडणार नाय. कासेकक पाडो हा.... तीन चार वर्सान जोताक उजवता येयत्... धारेरच्या पडणात आयन, बिवळे,हसाणी नी धमणी हत.... रोज येंगाटभर हिरवोपालो घतलस तर गाय येक्या धारेन् दुद देयत नी पाडोदुकु उजवारात. सोयन् बाळगलस तर माज्या ढवळीचा जायपा तुजो गोटो भरीत.....” ...Read More

3

थंड झाल्यार खावचा - भाग 3

थंड झाल्यार खावचा भाग ३त्याला भाताचा भला खासा ठाय आज्जी वाढून देई नी वर पावशेर भर विरजण ओती. तोण्डी पाच सहा तळलेल्या सांडग्या मिरच्या किंवा बचकाभर लोणचं घाली. बोंबड्या आमच्यासारखा सगळा भात एकदम कालवून न घेता एका बाजूने दही भात कोलसवून घास हातात झेलवून झेलवून त्याचा चेण्डू सारखा गोळा करून तो मोठा आ करून चोंदित असे. वाटेली विठू घाडी नी त्याची चेडवं सुद्धा असंच जेवीत . आम्हाला त्याचं अप्रूप वाटायचं . आज्जीच्या मागिलदारी डेगेखाली खूप ...Read More

4

थंड झाल्यार खावचा - भाग 4

थंड झाल्यार खावचा भाग ४ यंदा आंबीच्या आडव्या फाट्यावरचे आंबे बोंबड्यानेकाढून दिले. भटणीला सांगून जत्रेला बरोबर बोंबड्याही आंबे विकायला गेला. तो हिशोब अगदी बिनचूक करायचा. दिलेल्या पैशाचे आंबे उज्जू मोजून द्यायचा. आठ आण्याचे , रुपयाचे आंबे घेणारं एखादं गिऱ्हाईक दोन चार आंबे वरून जादा मागायचं .... विठू द्यायला लागला तर हा त्याच्यावर खेकसून म्हणाला, “ह्यो इलो मोटो शेटयो.... चार जणांक अशे जादा दिलस काय येका चवलीचानुकसान करशी भटणीचा.” मिळालेला गल्ला नी खपलेलेआंबे यांचॎही बरोबर ताळमेळ तो घेई. भटणीने त्याला जत्रेत खरचण्या साठी आठ आणे दिलेले. अधून मधून विठू त्याला सांगे, ...Read More

5

थंड झाल्यार खावचा - भाग 5

थंड झाल्यारखावचा भाग ५ दिसायला उंचापुरा नी मजबूत पिळदारअंगकाठी च्या भगवानालाबघूनच त्याच्या ताकतीचा अंदाज बांधून एक शीख पैलवान पुढे आला. पाच रुपये टाकून तो समोर बसला.पंच ग्यानी सेठनी दोघांचे हात एकामेकांच्या हातात दिले नी लढत सुरु झाली. दोन तीनमिनिटं कोणीच रेसभरही चळला नाही. बघ्यानी टाळ्या नीशिट्ट्या वाजवीत , चलो भाई .... जोर लगा.. वाहे गुरु .... डगमग़ाने लगे क्या ओरडत गिल्लाकेला.... भग्याने समोरच्या भिडूला पुरता अजमावला नी ‘ हरा रा रा म्हादेव’ असा गजर करीत समोरच्या शिखाचा हात दबवीत विरुद्ध दिशेलाटेकवला. हरलेला शीख घामाने डबडबला नी डाव्या हाताने उजव्या हाताचे ननगट मनगट चोळीत मान खाली ...Read More

6

थंड झाल्यार खावचा - भाग 6

थंड झाल्यार खावचा भाग ६ तिने दोन दिवसानी ही गोष्ट ग्यानुच्या कानावर घातली नी दुसाऱ्याच दिवशी हिंदमाता जवळ च्या गल्लीतला भट गाठून ग्यानूने त्यांच लग्न लावून दिलं. मात्र ठुमरी बाळंत होईतो ही गोष्ट गुपित ठेवायची असं त्यानी ठरवलं. त्याच दरम्यानेपारशी सोराबजीला अर्धांगाचा झटका आला नी त्याचा डावा भाग लुळा पडला. त्याला जे जे मध्ये अ‍ॅडमिट केलं.त्याची बहिण मेहरू त्याच्याही पेक्षा म्हातारी होती. ती वाळकेश्वरला रहायची.भगवानने तिला वर्दी दिली. अलिकडे सोराबजीने धंद्याचा व्याप कमीच करीत आणलेला होता. पेढीवर फक्त दोन कारागीर कॉण्ट्रॅक्ट बेसवर काम करायचे. त्याना विचारून मेहरूने त्यांचा आर्थिक व्यवहार ...Read More

7

थंड झाल्यार खावचा - भाग 7

थंड झाल्यार खावचा अंतिम भाग ७ भगवान जेवायला लागल्यावर शेठाणीच्या उशा जवळचा माल आपण कसा आणला ते बैजंतीने सांगितलं. उशाशी दोन बोचकी आहेत ही गोष्टझाडूवाली, कपडेवाली धोबीण आणि जेवण करणारीबाई माहिती असणार नी उद्यातिथे काहीही नाही म्हटल्यावर गोष्ट बैंजताच्याअंगलट आली असती. " मिळाला म्हनून प्वॉट फुगासरखाल्ल्यार तां पचत नाय. मान्सान कदीपन तळां राखूनपानी खावचा आसतां." त्याने बैजंतीला तिची चूक पटवून दिली. झूट पण नीट वागायचं निम्मेशिम्मे माल होता तसा शिल्लक ठेवला की शंकेला कारणच उरणार नव्हतं. तिचं जेवण झाल्यावर दोघानी बराचसा मालभगवानाच्या क्वार्टर मध्ये ठेवला. थोडासाऐवज मात्र परतनेवून शेठाणीच्या उशागती पूर्ववत ठेवला . कोचाआड ठेवलेलं पोतं भगवानआपल्या क्वार्टरवर ...Read More