किंकाळी

(2)
  • 30
  • 0
  • 11.2k

पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात,चाळीशीच्या घरातला, एक हसऱ्या, आनंदी चेहेऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला. सौंम्याने त्याची पाणिनीशी ओळख करून दिली. “ हे मिस्टर धुरी म्हणून आहेत.” पाणिनीने त्याला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं. “ तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय. पण तुमची भेट घ्यायला लागेल असं वाटलं नव्हतं.” तो म्हणाला. “ म्हणजे मना विरुद्ध किंवा नाईलाजाने भेटावं लागतंय ?” पाणिनीने विचारलं “ तसंच नाही अगदी पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. ” धुरी म्हणाला.

New Episodes : : Every Sunday

1

किंकाळी प्रकरण 1

किंकाळी.......प्रकरण १पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात,चाळीशीच्या घरातला, एक हसऱ्या, आनंदी चेहेऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला.सौंम्याने त्याची पाणिनीशी ओळख करून दिली.“ मिस्टर धुरी म्हणून आहेत.”पाणिनीने त्याला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं.“ तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय. पण तुमची भेट घ्यायला लागेल असं वाटलं नव्हतं.” तो म्हणाला.“ म्हणजे मना विरुद्ध किंवा नाईलाजाने भेटावं लागतंय ?” पाणिनीने विचारलं“ तसंच नाही अगदी पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. ” धुरी म्हणाला.“ कोर्टात प्रकरण आहे? घटस्फोटाचं वगैरे?”“ छे: हो ! बायको आणि मी एकत्रच राहतोय प्रेमाने संसार चाललाय.”“ मग उलट तपासणीचा विषय कुठे येतो?” पाणिनीने ...Read More

2

किंकाळी प्रकरण 2

..........आम्ही त्या खोलीत गेलो. दाराला किल्ली लावलेली होती. आम्ही आत गेलो. आत कुणाचीही चाहूल नव्हती. अंथरुणावर कोणीतरी झोपल्याच दिसत म्हणजे बिछाना वापरल्याचं दिसत होतं पण कोणीही नव्हतं.”....पुढे.....प्रकरण २धुरी ने दिलेलं उत्तरं ऐकून पाणिनीला आश्चर्य वाटलं नाही. त्याने पुढे चौकशी चालू ठेवली.“नंतर काय पुढे?”“बस एवढंच. हीच सगळी गोष्ट मला सांगायची होती. मला वाटतं ती सकाळी लवकर उठून किल्ली दारालाचठेऊन निघून गेली असावी. माझ्या बायकोला भीती वाटते की मी कशात तरी अडकलो असणार. त्या रिसेप्शनिस्ट ला सुद्धा आमचा संशय आला असावा असं मला आता वाटतं आहे. पण आता त्याला काही इलाज नाही. काही झालं तरी मला माझ्या घरीच यायचं होतं. त्यामुळे ...Read More

3

किंकाळी प्रकरण 3

प्रकरण ३पाणिनी आणि सौम्या सूर्यदत्त मार्गावरील डॉक्टर बंब यांच्या पत्त्यावर पोहोचले डॉक्टरांचा बंगला टेकडीच्या उतारावर होता दोन कार साठी व्यवस्था होती आणि त्यावर एक टुमदार बंगला होता."डॉक्टरांना भेटायच्या आधी आपण त्यांचे शेजारी डहाणूकर यांना आधी भेटू त्याच्यानंतर डॉक्टरांचा गडी जो टॉवेल गुंडाळून बाहेर बघायला आला होता त्याचीही मुलाखत घेऊ" पाणिनी म्हणाला.त्याने डहाणूकरच्या दारावरील बेल वाजवली दारात एक माणूस येऊन उभा राहिला"मी मिस्टर पटवर्धन आहे आणि ही माझ्या बरोबरची सौम्या सोहोनी." आपली ओळख करून देत पाणिनी म्हणाला."ठीक आहे. मी अनुमान डहाणूकर." दारात उभा असलेला माणूस म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर ना शत्रुत्वाचे भाव होते ना मित्रत्वाचे. आपल्याकडे आलेला पाहुणा पुढे काय ...Read More

4

किंकाळी प्रकरण 4

प्रकरण ४“या दुसऱ्या मुलीची काय भानगड आहे? ” बाहेर आल्यावर सौम्याने पाणिनीला विचारलं.“ डहाणूकर नवरा बायको सोडून तिच्याबद्दल कुणालाच नाही. आणि आता आपल्या दोघांना माहिती आहे. तू जी टिप्पणी घेतलीस आमच्या संवादाची त्याच्यातून हे सिद्ध होईलच की ही दुसऱ्या बाईची भानगड त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे असं मी त्याला सांगितलं आहे म्हणून.” पाणिनी म्हणाला.“ प्रत्येक गोष्ट आम्ही सविस्तर लिहून घेतल्ये मी. आणि त्याच्यात तुम्ही दिलेला सल्ला तर अधिकच व्यवस्थित लिहून घेतला आहे.” सौम्या म्हणाली. पाणिनी समाधानाने हसला.“ चल आता आपण त्या घरघड्याला भेटू.” थोड्याच वेळात पुरीच्या दारावरची बेल सौम्याने वाजवली काही क्षणात दार उघडलं गेलं. एक माणूस दारात उभा होता.पाणिनी ...Read More

5

किंकाळी प्रकरण 5

प्रकरण ५मोजून पंधरा मिनिटांनी सौंम्याने प्रज्ञा पांडवच्या दाराची बेल वाजवली होती.दारात एक सुंदर स्त्री उभी होती.“ यस? काय हवयं?” विचारलं.“ मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.”“ बरं मग?” तिने विचारलं.आणि त्याच्या मागच्या सौंम्याकडे पाहिलं.“ ही माझी सेक्रेटरी सौंम्या सोहोनी.”तिच्या तोंडावर पुसटसं हास्य उमटलं.“ आम्ही आत येऊ का?” पाणिनीने विचारलं.“ सॉरी, माझा अजून स्वयंपाक व्हायचाय.आणि नंतर मला एकाला भेटायला जायचंय”“ मला बोलायचंय” पाणिनी म्हणाला.“ खरंच वेळ नाही.”“ डॉक्टर बंब यांच्या बद्दल.” पाणिनी म्हणाला.क्षणभरच तिच्या चेहेऱ्यावर जरासा संभ्रम दिसला पण पटकन ती म्हणाली, “ मला कोणी डॉक्टर बंब वगैरे माहित नाहीत.”“ माहित्येत तुला.” पाणिनी म्हणाला. आणि तिने मान हलवून नाही म्हंटलं.“ आणि निनाद ...Read More

6

किंकाळी प्रकरण 6

प्रकरण ६दुसऱ्या दिवशी पाणिनी खरोखर सकाळी पावणे आठ वाजता कनक ओजस च्या ऑफिसात हजर झाला.कनक थोडा उशिराच आला.“ उशीर तुला म्हणजे माझ्या कामात काही प्रगती केलीस असं म्हणू शकतो का मी? ” पाणिनीने विचारलं.“ डॉ.बंब यांच्या घराच्या पुढच्या दारातून बाहेर पळालेल्या मुलीचं पोलिसांना सविस्तर वर्णन मिळालंय पाणिनी.”पाणिनीने काहीही न बोलता एक सिगारेट शिलगावली. कनक पुढे सांगायला लागला,“ पोलिसांनी अक्षरशः काही मिनिटातच तिचा पाठलाग सुरु केला तरी सुद्धा ती त्यांची नजर चुकवून गायब कशी काय झाली याचं पोलिसांना कोडं पडलंय.”“ गाडीत बसून अल्पावधीत खूप लांब जाता येतं, कनक.” पाणिनी म्हणाला.“ तिच्याकडे गाडी होती आणि ती जवळच लावली होती असं गृहीत ...Read More

7

किंकाळी प्रकरण 7

प्रकरण ७साडेनऊ वाजता पाणिनी पटवर्धन सरकारी वकील खांडेकरांच्या ऑफिसमध्ये पोहोचला खांडेकर आत आहेत का याची त्यांने त्यांच्या सहाय्यकाकडे चौकशी ते बाहेर असल्याचं त्याला सांगण्यात आलं.“माझा एक क्लायंट इथे आलाय.”“कोण?”“निनाद धुरी. त्याला भेटायचय मला इथे.”“त्यासाठी खांडेकर यांची परवानगी घ्यायला लागेल घ्यायला, मला.”सहाय्यक म्हणाला.“त्यांना सांगा. मी इथे आलोय म्हणून.” पाणिनी म्हणाला.“मला अधिकार नाहीये तसं कळवण्याचा.”“तुम्ही प्रमुख आहात ना इथे?”“मी इथे नोकरीला आहे. प्रमुख वगैरे नाही.”“तुम्हाला इथे काहीच अधिकार नसेल तर मला माझे अधिकार वापरावे लागतील.” पाणिनी म्हणाला आणि त्या अधिकाऱ्याचा विरोध धुडकावून लावत खांडेकरांच्या केबिनच्या दारात जाऊन उभा राहिला आणि दार खडखड वाजवलं.खांडेकर बंद खोलीमध्ये कुणाशी तरी बोलत होते आणि पाणिनीने ...Read More

8

किंकाळी प्रकरण 8

प्रकरण 8पाणिनी धुरीला त्याच्या घरापर्यंत घेऊन आला तेव्हा धुरीची बायको दारातच उभी होती ती पळतच आपल्या नवऱ्याकडे आली“निनाद सगळं ठीक आहे ना?”धुरीन त्याचं व्यावसायिक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणलं. “सगळं काही नियंत्रणात आहे काळजी करू नको” तो तिला म्हणाला.तिच्या चेहऱ्यावर पाणिनीसाठी कृतकृत्यतेची भावना वाढली.“ खूप वेळेवर आलात तुम्ही.” ती त्याला म्हणाली“पटवर्धन आले तिथे घाईघाईत पण खरंतर त्याची काही गरज नव्हती. मी व्यवस्थित हाताळली होती परिस्थिती. आणि मिस्टर खांडेकर खूपच सहकार्य करणारे होते आम्ही आता चांगलेच मित्र झालोय.” निनाद म्हणाला.“निनाद, तू काय सांगितलं त्याना?” त्याच्या पत्नीने विचारलं“काय म्हणजे? जी काही वस्तुस्थिती होती ती. त्यात दडवण्यासारखं मला काही नव्हतं. म्हणजे मला ती ...Read More

9

किंकाळी प्रकरण 9

प्रकरण ९दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता लीना धुरीचा पाणिनीला फोन आला आणि एकदम तारस्वरात ती ओरडली,“शेवटी ते झालंच पटवर्धन. पोलीस आले, आणि निनाद ला घेऊन गेले. ते म्हणाले की डॉक्टर बंब यांच्या खुनाच्या संशयावरून आणि पुरावा दडवण्याच्या संशयावरून ते त्याला घेऊन जात आहेत.”“ठीक आहे, मला अंदाज होताच तो. पण तुला वाटतं ना मी दिलेल्या सूचना तो पाळेल?” पाणिनीने विचारलं.“माझी मनापासून इच्छा तर आहे की तो पाळेल. शेवटी आमच्या मुलाचं,कियानचं सुख आम्हाला महत्त्वाचं आहे आम्ही त्याचे खरे आई-वडील नाही हे त्याला कळलं तर केवढा मोठा अनर्थ होईल.”“पण तुला खात्री नाही वाटत आपल्या नवऱ्याबद्दल?” पाणिनीने विचारलं.“नाही. खात्री देऊ शकत मिस्टर ...Read More

10

किंकाळी प्रकरण 10

प्रकरण १०मिसेस धुरी पाणिनी पटवर्धन ला भेटून गेल्यानंतर सौम्याने आपली खुर्ची पाणिनीच्या टेबल जवळ घेतली आणि काळजी युक्त स्वरात मला काळजी वाटते आहे. हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?”“सौम्या मला अजूनही खात्री नाही की मी नक्की कुणाचा वकील आहे. वरकरणी मी निनाद धुरीचा वकील आहे पण त्याला असं वाटतंय की मी कियान साठी सर्व काही करावं. आपल्याकडे आत्ता जो काही पुरावा आहे त्या आधारे निनाद धुरीला मी या लफड्यातून बाहेर काढू शकतो. पण ज्या क्षणी मी हे करीन त्या क्षणी त्याच्या बायकोवर खुनाचा आरोप येऊ शकतो.सर तुम्ही निनाद धुरीला सांगणार आहात की त्याची बायको डॉक्टर बंब यांच्या क्लिनिक ...Read More